वाचाल तर वाचाल निबंध मराठी 2023 | Best Vachal Tar Vachal Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच Vachal Tar Vachal Marathi Nibandh ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . हा वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच vachal tar vachal essay in marathi language तुम्हाला येथे १०० , ३०० आणि ५०० शब्दात वाचायला मिळेल . ह्यच्या साहयाने तुम्ही हा निबंध अभ्यासात आणि परीक्षेत सहज लिहू शकाल .

वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Essay In Marathi Language In 100 , 300 And 500 Words

वाचाल तर वाचाल निबंध 100 शब्दात | Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 Words

खरच वाचनाचा महिमा अगाध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. वाचन हे ज्ञान मनोरंजन व संस्कार देणारे प्रभावी माध्यम आहे वाचन केल्यामुळे आपण रोजच्या जीवनात कसे वागायला हवे याचे ज्ञान आपल्याला होते वाचता येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तके वर्तमानपत्रे मासिके तसेच आधुनिक युगातील आंतरजाला मुळे हव्या त्या विषयावरील माहिती क्षणात मिळवता येऊ शकते आपले ज्ञान एकाग्रता वाढते. वाचनामुळे रोजच्या तणावपूर्ण जीवनातून घटकाभर करमणूक होते. शिवाय आपल्या कल्पनाशक्तीला ही चालना मिळते . आपल्यात अधिक संवेदनशीलता निर्माण होते . थोरामोठ्यांची चरित्रे त्यांचे आयुष्य त्यांचे संघर्ष आपल्याला प्रेरणा देतात . येणार्‍या परिस्थितीला तोंड देऊन सकारात्मक विचार करण्याचे बळ मिळते.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी - Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 , 300 And 500 Words

आपला वेळ आनंदात जातो . काही तरी नवीन शिकण्याचा समजून घेण्याचा आनंद मिळतो . मोकळा वेळ सत्कारणी लागतो. प्रकट वाचन केल्याने उच्चारण स्पष्ट शुद्ध व खणखणीत होतात. पुष्कळ वाचन करणारा विद्यार्थी विद्यार्थीमंडळात प्रिय असतो .. सहलीत मोकळ्या तासाला त्याचे कथाकथन रंगत आणते आणि नकळत उत्तम लेखक बनण्याची शक्यता असते. उत्तम वक्ता बनण्यासाठी वाचन बहुविध व अद्यावत असणे अतिशय आवश्यक असते .

वाचन हा छंद कायमच आपली साथ देतो मोकळ्या वेळात प्रवासात कधीही आपण वाचनाचा आनंद घेऊ शकतो.आज विज्ञान तंत्रज्ञानाचे युग असले तरी वाचनाची गरज काही संपलेली नाही . पूर्वी आपण पुस्तके घेउन वाचायचो . आता ती आपल्याला मोबाईलवर, किंडल वर उपलब्ध असतात . वाचनाचे माध्यम बदलले असले तरी वाचनाची गरज मात्र तितकीच आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचन करणाऱ्यांना जगण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. म्हणूनच प्रत्येकाने वाचनाचे महत्त्व जाणून वाचन केले पाहिजे.

वाचाल तर वाचाल निबंध 300 शब्दात | Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 300 Words

वाचाल तर वाचाल असा कोणी तरी म्हटलंय जर आपण चांगल वाचलं नाही तर तर आपली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी तिचे वेगवेगळे कंगोरे समजून घेण्याची ताकद तयार होत नाही. असं म्हणणं काही चुकीचं ठरू नये . जसा आहार आणि विहाराचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होतो. तसाच आज किंवा त्याहीपेक्षा जास्त वाचनाचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. 23 एप्रिल 1995 पासून हा दिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणजेच वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो .

आपण हा दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे सुप्रसिद्ध लेखक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आजचा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो . भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या लेखकांची पुस्तकांची आणि साहित्याची एक परंपरा आहे. या सगळ्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो . आपण ज्याप्रमाणे म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्याच प्रमाणे व्यक्ती तितक्या पुस्तकांच्या आवडीनिवडी काही लोकांना रहस्यमय कथा वाचायला आवडतात तर काही लोकांना ऐतिहासिक कादंबऱ्या आणि कोणाला तर आत्मचरित्र असे अनेक विविध प्रकार सर्वच देशांच्या साहित्यात आपण वाचतो .

वाचाल तर वाचाल निबंध मराठी - Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 , 300 And 500 Words

वयानुसार आपल्या आवडीनिवडी डेव्हलप होतात आणि बदलतात सुद्धा आणि मग काही काळानंतर हलक्या-फुलक्या पुस्तकांबरोबरच धार्मिक पुस्तक आहे आपल्याला आवडायला लागतात . आपल्या जीवनाचे सार सांगणारी पुस्तकं वाचताना आपल्या आजोबांच्या डोळ्यात नकळत पाणी येताना आपण बघतो या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेला असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे पुस्तक आपल्या ज्ञानाचा ठेवा वाढवतो आता आपण एकविसाव्या शतकात आहोत.

त्यामुळे आपल्यासाठी ई-बुक्स किंवा किंडल सारखे ईझी पर्याय उपलब्ध आहेत . मात्र आजही हातात पुस्तक घेतल्याशिवाय आपल्या समाधान होत नाही . 1913 मध्ये भारताला पहिले नोबेल सुद्धा साहित्य मध्येच मिळालं. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलंय जे शिक्षण आपल्याला नुसती माहिती देत नाही तर आपलं अस्तित्व सर्व घटकांची जोडतं. तेच खरं शिक्षण आहे.

वाचन आणि त्यांचा विचार यामुळेच आपण आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकतो . वाचनाचे पद्धती जरी बदलली असेल तरी पण वाचन करण्याची आवड गरज आणि भूक समता कामा नये . नाहीतर आपण आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधण्याचा अनेक पर्यायांपैकी एक खूप मोठा दुवा हरवून बसू नाही का ?

Read Also – भ्रष्टाचार निबंध मराठी – Best Bhrashtachar Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

वाचाल तर वाचाल निबंध 500 शब्दात | Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 500 Words

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचाल तर वाचाल हा विचार सर्वांसाठी खूप मोलाचा आहे कारण ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी महत्त्वाचे ज्ञान आणि ज्ञान मिळवण्यासाठी चा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वाचन होय . एक चांगले सक्षम कर्तबगार व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी वाचन आपल्याला फायदेशीर ठरतं म्हणूनच म्हटले जाते वाचाल तर वाचाल. वाचन बर्‍याच जणांना कंटाळवाणे वाटते .

मात्र आजच्या या स्पर्धात्मक जगात ( युगात ) जर तुम्हाला टिकायचं असेल तर वाचन करणे , ज्ञान वाढवणे गरजेचे आहे. जर का तुम्ही आपल्या ज्ञानात वेळेवर भर घातली नाही तर तुम्ही मागेच राहाल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण शिक्षकांकडून वाचनाचे महत्त्व नक्कीच ऐकले असेल. मनुष्या जवळील सर्वात मोठी शक्ती म्हणजेच त्याच्याजवळ असणारे ज्ञान होय. या शक्तीच्या सहाय्याने तो हुशार, सुसंस्कृत बनतो . वाचनामुळे अनेक व्यक्ती आदर्श बनल्या अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध चरित्र हे पुस्तक बक्षीस म्हणून दिले होते . या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले.

आपण सर्वांच्या जीवनावर वाचनाचा खूप मोठा प्रभाव पडतो . मग आपल्या पाठ्यपुस्तकातील धडे-गोष्टी असो की शामची आई , श्रीमान योगी , स्वामी ,मृत्युंजय यासारखे असंख्य पुस्तके असो . त्यातूनच मिळवलेले ज्ञान नक्कीच आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भर घालते . त्यांचे वाचन आपणास समृद्ध करते . अगदी वृद्धापकाळात हि हा छंद आपली सोबत करतो . मनाला तरुण ठेवतो. पुस्तक आपले मित्र असतात असे मित्र जे संकट काळातही आपली साथ सोडत नाही . आपल्याला दिशा दाखवतात . एकटेपणात सोबती होतात . वाईट परिस्थितीत चांगला मार्ग दाखवतात . अडचणींना सामना करायला शिकवतात. आपले मनोबल उंचावतात . प्रेरणा देतात .

वाचाल तर वाचाल निबंध मराठी - Vachal Tar Vachal Marathi Nibandh In 100 , 300 And 500 Words

प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळा, अभ्यास करा पण त्याचबरोबर दररोज किमान एक पान तरी वाचन केले पाहिजे असे मला वाटते . पण खेदाची गोष्ट म्हणजे ही वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे टेलिव्हिजन, मोबाईल, कम्प्युटर, व्हिडिओ, गेम्स, चित्रपट, गाणी ,कार्टून यात आजचा विद्यार्थी असा गुरफटून गेला आहे. की त्याला वाचन करावेसे वाटत नाही. मात्र मित्रांनो “असाध्य ते साध्य करिता, सायास कारण अभ्यास, तुका म्हणे” संत तुकारामांनी अतिशय सुंदर शब्द सांगितले आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करायचे असेल तर त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे.

म्हणजेच जीवन मार्गावरील ध्येयप्राप्तीसाठी अभ्यास ,ज्ञान ,प्रयत्न या गोष्टी आवश्यक आहेत. वाचन मुळे आपल्या ज्ञानात भर पडते, शब्दसंपत्ती भर पडते विविध पुस्तकांचे वाचन केल्याने नवनवीन माहिती मिळून ज्ञानात अधिक भर पडते . मेंदूला चालना मिळून विचारविश्व अधिक व्यापक बनते . शब्द संपत्तीत भर पडल्यामुळे आपण आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. चांगल्या वाईट गोष्टी समजण्यास मदत होते . आपली कल्पनाशक्ती वाढते. वाचनामुळे आपण भाषण ,निबंध लेखन चांगल्या प्रकारे करू शकतो .

वाचनामुळे वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची महापुरुषांची माहिती आपणास होते. जगातील घडामोडींची माहिती होते . त्यामुळेच आपल्याला नोकरीची संधी मिळते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक, सुसंस्कृत प्रभावी होते. अशा प्रकारे वाचन हे आपणा सर्वांसाठी उपयुक्त आहे . ” वाचनाची कास धरूया , आपला विकास साधूया ,दररोज वाचन करूया वाचनाने समृद्ध बनूया “

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच Vachal Tar Vachal Marathi Nibandh बद्दल चर्चा केली . व वाचाल तर वाचाल निबंध म्हणजेच vachal tar vachal essay in marathi language बद्दल १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतला . तुम्हाला इतर विषयावर निबंध हवे असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .

तुम्हाला जर मराठी मध्ये काही ब्लॉगिंग बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Read Also – Gulvel Giloy in Marathi गुळवेल फायदे

1 thought on “वाचाल तर वाचाल निबंध मराठी 2023 | Best Vachal Tar Vachal Marathi Nibandh”

Leave a Comment