स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 2023 | Best Swatantra Din Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण स्वातंत्र्य दिन निबंध मराठी म्हणजेच Swatantra Din Essay In Marathi बद्दल चर्चा करणार आहोत . स्वातंत्र्य दिन निबंध मराठी म्हणजेच independence day essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | Independence Day Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 100 शब्दात | swatantra din essay in marathi in 100 words

15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण भारताला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो . 1947 साली या दिवशी आपला भारत देश इंग्रज शासनापासून मुक्त झाला. जवळपास दोनशे वर्ष भारत इंग्रजांच्या गुलामी जगत होता. सारे भारतीय इंग्रजांच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते. अनेक शूरविरांनी या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला.

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 2021 | Swatantra Din Essay In Marathi | Independence Day Essay In Marathi

महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,लोकमान्य टिळक ,सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग सुखदेव व राजगुरू सारख्या अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सगळे भारतीय एकजूट झाले सत्याग्रह आंदोलन व भारत छोडो आंदोलन सारखी अनेक आंदोलने केली गेली . अखेर इंग्रजांना भारत सोडावा लागला व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो . या कार्यक्रमात असंख्य भारतीय सहभागी होतात . शाळा-महाविद्यालये व अनेक कार्यालयांमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . प्रमुख अतिथी राष्ट्रध्वज फडकवतात व राष्ट्रगीत गायले जाते. सारे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरे करतात ठिकठिकाणी देशभक्तीगीत लावले जातात . लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात व शहिदांना श्रद्धांजली अर्पित करतात.

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 300 शब्दात | independence day essay in marathi in 300 words

भारत माझा देश आहे .सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण करतो . भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . हा भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे . हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाचा व खूप महत्त्वाचा दिवस आहे . कारण आजच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला होता. या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांनी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविला होता.

तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. आपल्या भारत देशातील अनेक महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले . आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले . भारत या शब्दातील “भा” म्हणजे तेज आणि ” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस सर्वत्र आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो .

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव चिरकाल टिकावी यासाठी हा सुवर्ण दिवस सर्वत्र साजरा केला जातो . प्रत्येक राज्यात जिल्ह्यात ,तालुक्यात ,गावागावात व दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो .राष्ट्रगीत गायले जाते . या कार्यक्रमात सर्व भारतीय सहभागी होतात . त्याचबरोबर ठीकठिकाणी या दिवशी भाषणे, प्रदर्शने याचे आयोजन केले जाते . लहान मोठी मुले प्रभात फेरीत भाग घेऊन भारत मातेचा जयघोष करतात. लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात .

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 2021 | Swatantra Din Essay In Marathi | Independence Day Essay In Marathi

आपला भारत देश जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता. सर्व भारतीय इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जात होते . महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक ,सुभाषचंद्र बोस ,सरदार वल्लभाई पटेल, पंडीत जवाहरलाल नेहरू ,वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महान नेत्यांनी तसेच भगतसिंग राजगुरू व सुखदेव सारख्या अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले .

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र सैनिकांच्या बलिदान विषयी आपल्याला आठवण करून देतात . आणि आपल्याला एक नवीन प्रेरणा देऊन जातात . त्यांचे चरित्र जरी वाचली तरी अंगावर रोमांच उठतात . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत देशाने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे . परंतु आजही समाजात भ्रष्टाचार गुन्हेगारी गरिबी आणि अस्वच्छता यांचे प्रमाण वाढत आहे . भारताचे एक नागरी म्हणून आपण अश्या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे आणि आपल्या देशाला समृद्ध बनविले पाहिजे .

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 500 शब्दात | swatantra din essay in marathi in 500 words

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या निबंधाला सुरुवात करत आहे . मित्रांनो ” भा ” या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? ” भा ” म्हणजे तेज आणि ” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले . जवळपास दीडशे वर्षे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून जगत होता. सर्व भारतीय इंग्रजांच्या अन्यायाने त्रस्त झाले होते . भारतीय स्वातंत्र्याची लढाई सोपी नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरविरांनी अथक संघर्ष करावा लागला होता .

देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , लाला लजपतराय , डॉ. राजेंद्र प्रसाद अश्या हजारो शूर वीरांनी , क्रांतीकारांनी देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला .

तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र सर्वत्र आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो . अशा शूरवीरांच्या या कार्याला आपण कधीच विसरू शकणार नाही . म्हणून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे उत्सव आपल्याला शूरवीरांची आठवण करून देतात. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . पंतप्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो . राष्ट्रध्वजाला सलामी देऊन सर्वजण राष्ट्रगीत गातात. देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्य लढ्यातील शहीद क्रांतीकारांना श्रद्धांजली वाहतात. या दिवशी भारतीय संघटनांकडून परेड काढण्यात येते . पंतप्रधान परेडचे निरीक्षण करतात .

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी 2021 | Swatantra Din Essay In Marathi | Independence Day Essay In Marathi

या संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिल्लीवरुन टेलिविजन व रेडिओवर करण्यात येते . संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय ,खाजगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो . या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, भाषण, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते . स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतात. विद्यार्थ्यांना खाऊ दिला जातो आणि त्यानंतर सुट्टी दिली जाते . संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण असते . अशाप्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. आज सर्व शहरात ,तालुक्यात ,गावात ध्वजारोहण केले जाते रा. ष्ट्रगीत गायले जाते . भारतात सर्वत्र भाषणे , प्रभातफेरी यांचे आयोजन केले जाते .

आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की स्वतंत्र अशा भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. त्या शूर वीरांच्या बलिदानामुळेच आपण आज शांत आणि सुंदर आयुष्य जगू शकत आहोत . आजचा हा सुवर्णकाळ आपण इथे आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत . कारण आपल्या देशाचे वीर जवान तिकडे सीमेवरती स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूशी सामना करत आहेत. या सैनिकांना माझा सलाम . आज आपला भारत देश आणि शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान ,खेळ, व्यापार अशा अनेक क्षेत्रात मोलाचे काम करत आहे .

दिवसेंदिवस देश प्रगतीपथावर जात आहे . परंतु समाजात गुन्हेगारी ,भ्रष्टाचार ,गरिबी आणि अस्वच्छता यांचे प्रमाण वाढत आहे . भारताचे एक नागरिक म्हणून देशाच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत . वाईट लोकांपासून आणि वाईट गोष्टी पासून आपल्या देशाचे संरक्षण केले पाहिजे . सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करून भारत देश जगातील सर्वोत्कृष्ट देश बनवणे हे आपले कर्तव्य आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण स्वातंत्र्य दिन निबंध मराठी म्हणजेच Swatantra Din Essay In Marathi बद्दल चर्चा केली . स्वातंत्र्य दिन निबंध मराठी म्हणजेच independence day essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment