नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण स्वामी विवेकानंद मराठी निबंध म्हणजेच swami vivekananda essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . essay on swami vivekananda in marathi म्हणजेच swami vivekananda speech in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
Table of Contents
स्वामी विवेकानंद मराठी निबंध | essay on swami vivekananda in marathi | swami vivekananda speech in marathi in 100 , 200 and words
स्वामी विवेकानंद मराठी निबंध 100 शब्दात | swami vivekananda essay in marathi in 100 words
स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते . त्यांचे खरे नाव नरेंद्र असे होते . त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला . त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो . उठा जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे ते म्हणत . स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते .
व ते उच्च न्यायालयात वकील होते . त्यांची आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या . स्वामी विवेकानंद यांना लहान असताना इतिहास साहित्य अशा अनेक विषयात रुची होती .व शास्त्रीय संगीताची जाण होती . 1884 मध्ये ते बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले . पुढे त्यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत झाली व स्वामी विवेकानंद यांनी त्यांना आपले गुरू मानले .

रामकृष्णांनी त्यांना दीक्षा दिली व त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले . स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली व रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन ची सुरुवात केली . जगाला शांततेचा संदेश दिला .4 जुलै 1902 रोजी कोलकत्ता मधील बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली.
स्वामी विवेकानंद मराठी निबंध 200 शब्दात | swami vivekananda essay in marathi in 200 words
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये उत्तर कोलकत्ता सीमा आलापल्ली येथे झाला ते मूळचे बंगालचे रहिवासी होते आणि भारतीय हिंदू विचारवंत होते . त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले . त्यांचे वडील विश्वनाथ दत्त उच्च न्यायालयात वकील होते आणि आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. स्वामी विवेकानंद यांना इतिहास, समाजशास्त्रे ,कला ,साहित्य या विषयात रुची होती आणि वेद रामायण ,महाभारत ,भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड होती .
त्यांना वाचन ,व्यायाम ,कुस्ती ,पोहणे ,घोडेस्वारी, गायन-वादन इत्यादी. छंद होते . स्वामी विवेकानंदांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली 1871 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपोलिटन इंस्टीट्यूट मध्ये त्यांनी प्रवेश घेतला . 1881 झाली ते फाइन आर्ट्सची आणि 1884 मध्ये बी ए परीक्षा उत्तीर्ण झाली . पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला . तरूणपणी स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले .
रामकृष्णांच्या पवित्र सहवासात राहून त्यांच्यात आमूलाग्र बदल झाले . पुढे रामकृष्णांनी त्यांना भगवे वस्त्र देऊन संन्यासदीक्षा देऊन त्याचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले . आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ची सुरुवात केली . राम कृष्ण यांच्या समाधी नंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले . अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले . भारताच्या कल्याणासाठी येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि मातृभूमीची सेवक बनून बनून झटणे हा संकल्प त्यांनी केला .
अद्वैत वेदांत विचार जगभरात पोहोचवणे आणि माणसातील मनुष्यत्व जागे करण्यासाठी त्यांनी पाश्चिमात्य जगात जाण्याचे ठरवले . 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मीय परिषदेमध्ये त्यांनी सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली . 4 जुलै 1902 साली स्वामी विवेकानंद यांनी कोलकत्ता जवळील बेलूर मठात समाधी घेतली . भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
- Read Also – Sant Tukdoji Maharaj Information In Marathi
स्वामी विवेकानंद मराठी निबंध 300 शब्दात | swami vivekananda essay in marathi in 300 words
स्वामी विवेकानंद तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते . त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला . त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे होते . त्यांचे वडील वकील होते . तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती . विवेकानंदाचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त हे होते .
लहानपणी स्वामी विवेकानंदांवर आई-वडिलांनी उत्तम संस्कार केले . स्वामी विवेकानंद लहानपणापासून अलौकिक प्रतिभावंत बुद्धीचे होते . त्यांनी तत्त्वज्ञान ,धर्म, इतिहास ,सामाजिक ,विज्ञान ,कला व साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले . त्याचबरोबर त्यांनी वेद ,उपनिषद ,पुराण ,रामायण-महाभारत अशा हिंदु धर्मात ग्रंथांचा अभ्यास केला . स्वामी विवेकानंद हे केवळ वेदांतात तसेच अभ्यासात हुशार नव्हते तर ते खेळ व शारीरिक व्यायाम हयात अतिकुशल होते , रामकृष्ण परमहंस आनंदाने आपला गुरु मानले .

1885 मध्ये रामकृष्ण परमहंस खूप आजारी असताना विवेकानंदानी त्यांचे मनापासून सेवा केली . पण दुर्दैवाने परमहंस यांचा मृत्यू झाला . आपल्या पूजनीय गुरुच्या मृत्युनंतर स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले . नंतर पुढे संन्यास घेतला व ते नरेंद्र ते विवेकानंद बनले. त्यांनी संन्यस्त वृत्तीने समाजसेवा करीत राष्ट्र उभारणीचे कार्य केले . जगात ठिकाणी त्यांनी रामकृष्ण मिशन च्या शाखा स्थापन केल्या . हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची ओळख जगाला करून देणे हे या मिशनचे प्रमुख कार्य होते.
याविषयी अनेक ठिकाणी रुग्णालय, अनाथाश्रम, वस्तीगृह वरून समाजसेवेचे अनमोल कार्य हाती घेतले. त्यांनी भारतात व पाश्चिमात्य देशात भाषण दिले हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा त्यांनी जगापुढे आणला. इसवी सन 1898 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधु भगिनींनो असे उद्गार काढतात परिषद दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला . या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत .
सर्व धर्मांना धर्म व अत्याचाराची लढायचे आहे हे पटवून दिले . आयुष्यात फक्त धर्म व समाजसेवा स्वीकारून विश्वबंधुत्वाची नाते निर्माण करणारे स्वामी विवेकानंद हे अलौकिक महापुरुष होते. त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत . अशा या महान व्यक्तीचा 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगाल मधील बेलूर मठ येथे निधन झाले.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण स्वामी विवेकानंद मराठी निबंध म्हणजेच swami vivekananda essay in marathi बद्दल चर्चा केली . essay on swami vivekananda in marathi म्हणजेच swami vivekananda speech in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.