स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 2022 | Best Swachateche Mahatva In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी म्हणजेच swachateche mahatva in marathi ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी म्हणजेच swachata essay in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघणार आहोत . तर चला सुरु करूया …

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 2022 | Swachateche Mahatva In Marathi | swachata essay in marathi In 100 , 300 And 500 Words

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 100 शब्दात | Swachateche Mahatva In Marathi In 100 words

स्वच्छता हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे . स्वच्छता चा अर्थ म्हणजे स्वच्छ राहणे होय . स्वच्छता हि के चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते . प्रत्येक दिवशी आपण जसे उठतो . तेव्हा रोज न चुकता दात घासले पाहिजेत , आपला चेहरा , हात पाय स्वच्छ धुतले पाहिजेत , आणि सोबतच अंघोळ हि केली पाहिजे . आणि हे सर्व स्वस्थ व शांती पूर्वक जीवन जगण्यासाठी एक चांगली सवय आहे .

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 2021 | Best Swachateche Mahatva In Marathi | Swachata Essay In Marathi

आपण कधी स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष नाही केले पाहिजे . कारण स्वच्छता आपल्यासाठी तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जितके आपल्या साठी पाणी व जेवण . कारण म्हटले जाते ना जिथे स्वच्छता जिथे नांदते तिथे देव वास करतो .

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 300 शब्दात | Swachata Essay In Marathi In 300 words

व्यक्तिगत स्वच्छता इतकेच घराची, गावाची ,देशाची ही स्वच्छता आवश्यक आहे . प्रत्येक गावात शौचालय हवीत . तरच गावात स्वच्छता राहील . गावातील लोक नदी तलावाचे पाणी खराब करतात . भांडी घासणे ,कपडे धुणे ,जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात . त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य होते . त्यामुळे रोगराई पसरते. म्हणून ही नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. जर आपण घरात अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारचे कीटक आपल्या घरात शिरून रोगराई पसरवण्याचे काम करतात व परिणामी आपण आजारी पडतो .

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 2021 | Best Swachateche Mahatva In Marathi | Swachata Essay In Marathi

त्यात आपले पैसे व वेळ दोन्ही वाया जातो . आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आई बाबा , शिक्षण हयांनी लहान मुलांना स्वच्छ राहण्याची सवय लहान पणा पासून लावायला हवी . म्हणजेच लहान मुलांना लहानपणी पासूनच स्वच्छतेचे महत्व समझेल . व स्वतःच्या स्वच्छते सोबतच सार्वजनिक स्वच्छतेचे सुद्धा महत्व पटवून द्यायला हवे . घरात स्वच्छता असली तर घरात एखादा पाहुणा आल्यास तो घरातील स्वच्छता पाहून खूप खुश होतो. पण जर का घरात स्वच्छता नसेल तर ती अस्वच्छता कुणालाच आवडणार नाही .

आपण सर्व आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच . पण आपण जेव्हा आपल्या परिसराचे काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल . कारण प्रत्येक व्यक्ती परिसराची स्वच्छता करत असेल तर आपला देश स्वच्छ होईल . घरात स्वच्छता राखण्याचे फायदे पण भरपूर आहेत . घरात स्वच्छता ठेवली तर आपण आजारी पडणार नाही . मनही प्रसन्न राहील . स्वछता म्हणजे आपले शरीर ,मन आणि आपला परिसर स्वच्छ करणे . आपण स्वच्छतेला अनेक प्रकारात विभाजित करू शकतो . जसे कि कपडे धुणे , रस्त्यांची सफाई , कार्यालयाची सफाई , आसपास ची सफाई , माणसाची सफाई , घरांची सफाई , पर्यावरणाची सफाई इत्यादी .

स्वच्छता हि एक सवय आहे जी प्रत्येकानी अंगिकारली पाहिजे . स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे . आपल्या भारतीय संस्कृती असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते.

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 500 शब्दात | Swachateche Mahatva In Marathi In 500 words

स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरचे अभियान आहे . हे अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले. आपला भारत देश स्वच्छ व निरोगी बनविणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न होते . म्हणून महात्मा गांधीजींच्या 150व्या जन्मशताब्दीनिमित्त म्हणजेच 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत देश स्वच्छ करण्याचा हा निर्णय सरकारने घेतला . त्यांना योग्य आदरांजली ठरेल असे मोदीजींनी व्यक्त केले होते .

या अभियानाचे नेतृत्व करताना महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असे आवाहन जनतेला करण्यात आले . या निमित्ताने गाव शहर रस्ते सर्व ठिकाणी स्वच्छता केली जाईल हा उद्देश या अभियानाचा होता . या अभियानामुळे लोकांमध्ये एक जबाबदारीची भावना निर्माण झाली . त्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतः पासून स्वच्छतेची सुरुवात केली . समाजातील सर्व स्तरातील लोकांनी यात सहभाग घेतला . सिने कलाकार ,खेळाडू ,सरकारी कर्मचारी ,लष्करी जवान यांसारखे अनेक क्षेत्रातील लोक या अभियानात सहभागी झाले .

इतकेच नव्हे तर अनेक माध्यमातून देशभरात स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविण्यात आले. नाट्य, पथनाट्य ,संगीत अशा अनेक माध्यमांचा वापर करून “स्वच्छ भारत, निरोगी भारत ” चे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले गेले . या स्वच्छते अंतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे , शौचालयाची स्वच्छता ,रस्ते साफ करणे ,ओला कचरा ,सुका कचरा वेगळा साठवणे यांसारखे अनेक उपक्रम राबविले गेले. खेड्यातील घर शौचालये बांधली गेली . गरीब लोकांना शौचालयाची सुविधा करून देण्यात आली . लोकांच्या प्रतिसादामुळे या अभियानाचे रूपांतर चळवळीत झाले . लोकांनी स्वच्छ आणि निरोगी भारत बनवण्याची शपथ घेतली . स्वच्छता हे ईश्वराचे रूप मानले जाते .

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी 2021 | Best Swachateche Mahatva In Marathi | Swachata Essay In Marathi

त्यामुळे अशा अभियानात आपण स्वतः सहभागी होऊन स्वच्छ भारतासाठी प्रयत्न केले पाहिजे . भारत निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवले पाहिजेत . जेणेकरून महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न लवकरच साकार होण्यास मदत होईल . “ना गंदगी करेंगे ,ना करणे देंगे ” हा मंत्र आपण सर्वांनी अमलात आणला पाहिजे . स्वच्छतेची खरी सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी . प्लास्टिकचा वापर टाळायला हवा ,शक्य तितका सार्वजनिक वाहनांचा वापर करायला हवा ,सर्व पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत .

प्रदूषणयुक्त घटकांचा वापर टाळायला हवा . जेव्हा सर्व काम आपण स्वतः मनापासून करू आणि भारताला निरोगी करू तेव्हा स्वच्छ भारत अभियानाचे खरे सार्थक झाले असे म्हणता येईल. देशात स्वच्छता ठेवणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. भारतात आज स्वच्छतेसाठी बर्‍याच योजना व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जेणेकरुन स्वच्छतेबाबत भारतीय जनता जागरूक होऊ शकेल. आणि स्वच्छतेला प्राधान्य द्या. स्वच्छता ही आपल्या सर्वांचीही तितकीच जबाबदारी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

कधी काळी कुणीतरी घाण वाढवत राहतो. म्हणून आपण आपल्या सवयी सुधारित केल्या पाहिजेत आणि स्वच्छता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनविली पाहिजे. अस्वच्छतेमुळे मनुष्यला खूप साऱ्या हानी पोहचतात . अस्वच्छते मुळे आपल्याला मोठे खतरनाक आजार सुद्धा होतात . त्यामुळे आपल्याला अस्वच्छता ठेवायला नाही पाहिजे . कारण ह्याचा त्रास आपल्यालाच होतो .

कचरा टाकण्यासाठी नेहमी कचरा पेटी चा उपयोग हवा . कारण कचरा उघड्यावर टाकल्याने त्यामध्ये मछरांची पैदास होते . व त्यामुळे आपल्याला डेंगू आणि मलेरिया सारखे रोग होण्याची शक्यता असते . जेव्हा आपण अस्वच्छता नाही ठेवणार व दुसर्यांची त्याप्रती जागरूक केले तर स्वच्छ पर्यावरणाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल . व एक स्वच्छ भारत बनण्यास मदत होईल.

Read Also – मोबाइल फोन पर निबंध 2021 | Best Essay On Mobile Phone In Hindi Language

निष्कर्ष ( Coclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी म्हणजेच swachata essay in marathi ह्या बद्दल जाणून घेतले . स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी म्हणजेच swachateche mahatva in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघितला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असल्यास तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हा निबंध तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ….

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment