छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 2023 | Shivaji Maharaj Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध म्हणजेच shivaji maharaj essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध म्हणजेच essay on shivaji maharaj in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | essay on shivaji maharaj in marathi in 100 , 200 and 300 words

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 100 शब्दात | shivaji maharaj essay in marathi in 100 words

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे . शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात जवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला . शिवनेरी गडावरील शिवाई देवी मुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले . जनता त्यांना शिवराय शिवाजी महाराज शिवबा राजे या नावाने ओळखते .

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई होते. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते आणि त्यांना लहानपणी रामायण महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतली . तेव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली . “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।” म्हणजे जोपर्यंत प्रतिपदेचा चन्द्र वाढत जातो आणि विश्वास वंदनीय होतो तशी शिवाजी महाराजांची ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल.

शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले . वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले . 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला . स्वराज्य निर्मिती ची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावले.

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 200 शब्दात | shivaji maharaj essay in marathi in 200 words

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान आदर्श राजा होते . त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला . त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले होते . शिवरायांचे बालपण खूप धामधुमीत गेले . त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी आई जिजाऊ च्या देखरेखेखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला विद्या भाषा अवगत केले .शिवराय पूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.

महाराष्ट्राचा बहुतांशी भाग अहमदनगरचा निजाम व विजापूरचा आदिलशहा यांच्या कब्जात होता. या विरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र कार्य हाती घेतले . त्यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधले . शिवराज जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती त्यांनी महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले . शिवरायांनी विजापुरचा दरबार यातील भारी सरदार अफजलखानास शक्ति पेक्षा युक्ति ने धुळीस मिळवले .

त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रात प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या तंत्राचा अवलंब करून अनेक गड-किल्ले जिंकले . या तंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल डोंगरी किल्ले व जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळाला . शिवाजी महाराजांनी वनदुर्ग गिरिदुर्ग जलदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रेम व आत्मविश्वास निर्माण केला.

शिवरायांचे इंग्रज सिद्धी व पोर्तुगाल दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही . संतांचा ,विद्वानांचा सत्कार केला .मंदिर व मशीदे चे रक्षण केले. स्त्रियांचा सन्मान केला असा हा आदर्श पुत्र कुशल संघटक रयतेचा वाली दुर्जनांचा कर्दन काळ व सज्जनांचा कैवारी थोर राष्ट्रपुरुष 3 एप्रिल 1680 रोजी जनतेला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 300 शब्दात | shivaji maharaj essay in marathi in 300 words

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत स्फूर्तीस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय शिवबा राजे अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे . शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला . शिवनेरी गडावरील शिवाई या देवी मुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले . 19 फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो . शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे होते.

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध 2021 | Shivaji Maharaj Essay In Marathi

लहानपणी शिवरायांना दांडपट्टा तलवारबाजी भालाफेक यांचे प्रशिक्षण मिळाले आणि दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे 1640 मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला . शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊ यांच्यावर होती . जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडवले . त्यांनी शिवरायांना कर्तृत्वाची जाणीव करून दिली .

वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी काही मावळ्या समवेत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची निर्मिती ची शपथ घेतली. स्वराज्य निर्मितीच्या काळात त्यांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले . पुण्याचा कारभार पाहत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःचे राजमुद्रा तयार केली ती राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले परंतु न डगमगता त्यांनी लढा चालूच ठेवला . प्रतापगडावरचा पराक्रम ,आग्राहून सुटका ,सुरतेची लूट ,शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या . या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तीमत्व दिसून येते.

शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले . स्वराज्याचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले . अष्टप्रधान मंडळात लोकांची नेमणूक करून त्यांना मंडळाची पदे देऊन राज्य कारभार सुरळीत चालला . गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या . 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला . पंडित गागाभट्ट यांनी राज्याभिषेकाचे विधी पार पाडला .

या राज्याभिषेकाची शिवरायांचे छत्रपती छत्रिय कुलावंतस या नावाने गौरव करण्यात आला . शिवाजी महाराज मराठी व संस्कृत भाषेचे समर्थक होते . स्वराज्य कारभारात मराठी भाषेला प्रोत्साहन दिले . तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याला त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा नेहमी आदर केला .जनतेवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षाही दिली. शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध म्हणजेच shivaji maharaj essay in marathi बद्दल चर्चा केली . छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध म्हणजेच essay on shivaji maharaj in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment