नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच shahu maharaj essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच essay on shahu maharaj in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी | essay on shahu maharaj in marathi language in 100 , 200 and 300 words
राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 100 शब्दात | Shahu Maharaj Essay In Marathi in 100 words
छत्रपती शाहू महाराजांचे पूर्ण नाव शाहू महाराज भोसले असे आहे .कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू असे ठेवले . त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई व अनुबाई या दोन कन्या होत्या . छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती च्या लोकांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटिश कालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांनी कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या . त्यांना घरे बांधून दिली . ,वणवण भटकणाऱ्या लोकांची राहणाऱ्या पोटापाण्याची सोय झाली . गुन्हेगारी पासून मुक्ती होऊन त्या लोकांना समाजात माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले . छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी 1919 मध्ये भेट झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी महाराजांनी आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व आंबेडकरांचे इंग्लंडमधील उच्च शिक्षणाचा अर्थ सहाय्य केले.
सामाजिक सुधारणा बरोबर शाहू महाराजांनी शेतीबद्दल प्रोत्साहन दिले त्यांनी आणि कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली . कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी जयसिंगराव यांसारख्या बाजारपेठा वसवल्या यामुळेच कोल्हापुरी गुळाची बाजारपेठ जगात प्रसिद्ध पावली . शाहू महाराजांनी कारखानदारीचा पाया रचून शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगाला चालना दिली . 1922 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले .
राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 200 शब्दात | Shahu Maharaj Essay In Marathi in 200 words
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला शाहू महाराज यांचे पूर्वीचे नाव यशवंत असे होते . त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. 1 एप्रिल 1891 मध्ये बडोद्याच्या गुणाजी राव खानविलकर यांच्या मुलीशी शाहू महाराजांचे लग्न झाले. शाहू महाराज यांनी समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. शिक्षणाचा प्रसार केला त्या काळात अस्पृश्यांचा वेगळ्या शाळा भरवल्या जात होत्या.
ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अशा शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी बंद केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली . अभ्यास व शैक्षणिक सहली याद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहू महाराजांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते . राधानगरी धरणाची उभारणी ,शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अश्या उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष दिले अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद केली. त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या.
शाळा ,दवाखाने, सरकारी इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागविण्याचे आदेश त्यांनी केले . त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. या जमातीच्या लोकांना शाहूमहाराजांनी एकत्र करून गुन्हेगारी पासून त्यांना परावृत्त केले त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या . शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला ,कुस्ती या कलावंतांना प्रोत्साहन दिले . त्या काळात अनेक जमाती चोऱ्या ,दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. त्यांनी अनेक नाट्य कंपन्या व गुणी कलावंतांना आश्रय दिला .

बालगंधर्व केशवराव भोसले यांसारख्या थोर कलावंत महाराष्ट्राला दिले. मल्लविद्येचे प्रांतात शाहू महाराजांनी संस्थानात सर्व देशातील मला ना उदार आश्रय दिला . रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर त्यांनी खासबाग कुस्तीचे मैदान बांधून कोल्हापूर ही मल्ल विद्येची पंढरी बनवली . छत्रपती शाहू महाराजांचा आवडीचा छंद म्हणजे शिकार करणे होय . शाहू हे पट्टीचा शिकारी म्हणून लौकिक होता. 1922 रोजी सोमवारी यांचे निधन झाले . शाहू महाराज एक सुधारणावादी समाज सुधारक होते. शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
- Read Also – Christmas Essay In Marathi
राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी 300 शब्दात | Shahu Maharaj Essay In Marathi in 300 words
छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते . त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1874 रोजी दहा वर्षे यशवंतरावांना दत्तक घेतले . त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले . 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्य रोहन समारंभ झाला .
छत्रपती राजश्री शाहू महाराज हे वयाच्या 20 व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले . छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी इंग्रजी, संस्कृती ,इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला . सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले . छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह बडोद्याच्या गुणाजी राव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी 1891 मध्ये झाला .त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यास विशेष भर दिला .
त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी ही राजाज्ञा काढली . जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवा माहिती त्या पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली . मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे या व्यापक दृष्टीने डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर संस्थानात सहा जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना पन्नास टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित अंमलबजावणी करून मागासवर्गीयांना प्रगतीच्या प्रवाहात आणले .
छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या हेतूने विशेष प्रयत्न केले . शाळा ,दवाखाने ,सार्वजनिक विहिरी पाणवठे तरी ठिकाणी अस्पृश्याना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढले . त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पडली . जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.
कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी अनेक धरणे बांधली. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याबरोबरच संगीत, नाट्य, चित्रकला ,मल्लाविद्या यांसारख्या कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात केलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली . छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यामुळे त्यांच्याबद्दल इतरांचा उद्धारक व रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा त्यांना निर्माण झाली. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना राजश्री ही पदवी बहाल केली . अशा या थोर राजा दलित पतितांचा उद्धारक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा वयाच्या 48व्या वर्षी 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच shahu maharaj essay in marathi बद्दल चर्चा केली . राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध मराठी म्हणजेच essay on shahu maharaj in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.