नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण पाणी वाचवा निबंध मराठी निबंध म्हणजेच save water essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत .Essay On Save Water In Marathi Language निबंध म्हणजेच पाणी वाचवा निबंध मराठी निबंध हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
Table of Contents
पाणी वाचवा निबंध मराठी निबंध 2022 | Save Water Essay In Marathi | Essay On Save Water In Marathi Language in 100 , 200 and 300 words
पाणी वाचवा निबंध मराठी निबंध 100 शब्दात | Save Water Essay In Marathi 100 words
निसर्ग सृष्टीने जशी मानव, प्राणी ,पक्षी ,कीटक अशा सजीवांची निर्मिती केली आहे . तशी प्रत्यक्ष जीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हवा ,पाणी, सूर्यप्रकाश असे नैसर्गिक स्रोतांची निर्मितीही केली आहे . अन्न ,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात . परंतु या मूलभूत गरजांमध्ये पाणीसुद्धा मानवाची एक मूलभूत गरजा आहेत .
निसर्ग सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून असते . पाणी हे जीवन आहे असे म्हणले जाते कारण प्रत्यक्ष जेव्हा अन्नाशिवाय एक-दोन दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय तो एक क्षण ही राहू शकणार नाही . म्हणून पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. फक्त चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून, मुरवणे ,साठवून ठेवणे आणि मग गरजे निहाय काटकसरीने वापरणे एवढेच आपल्या हाती आहे.
पाणी वाचवा निबंध मराठी निबंध 200 शब्दात | Save Water Essay In Marathi 200 words
हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. पाणी हे जीवन असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवणाऱ्याला या अग्रक्रम द्यावा लागतो . खेड्या पाड्यातून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल तर सर्व झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी ,अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते .
स्वच्छतेसाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण होते तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीचा असते याची कल्पना केलेलीच बरी . आपली पाण्याची सर्व गरज पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आपण धान्य पेरतो मग त्यातून आम्हाला धान्य उगवते. त्याप्रमाणे पाणी पेरून पाण्याचे पीक घेता येत नाही . आपल्याला फक्त पावसाचे पाणी मिळते हे पाणी कसे अडवायचे व आपल्याकडे वळवायचे याचा अनोखा प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी केला.

शेकडो गावातील शेतकऱ्यांना प्रेरित केले . बंधारे बांधणे खोदणे अशी कामे लोकांची अपार शक्ती वापरून उभी केली . अशीच कामे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्याने केली. खरे सांगायचे म्हणजे या मंडळींनी पाणी मिळविण्याचा एक आदर्श घालून दिला आहे . सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. त्यामुळे नुसती लागवड उपयोगाचे नाही तर त्याचा सांभाळ केला पाहिजे. प्रत्येकाने किमान दहा झाडे लावावीत अशी सक्ती केली पाहिजे. कल्पना करा की भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे प्रत्येकाच्या नावाने दहा झाडे लावली गेली तर एका वर्षात 1250 कोटी झाडे लागतील .
पण हे होत नाही . झाडांमुळे जमिनीखालचे पाण्याचे झरे वाहत राहतील . पाण्याच्या पातळीत वाढ होईल . विहरी , नद्यांना बारा महिने पाणी राहील हे सर्व आम्ही शाळेत शिकवले जाते . पण व्यवहारात मात्र हे दिसत नाही असे का ? आता खूपच उशीर झाला आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळाची अक्राळ विक्राळतेचे दर्शन घडले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे लागेल. मग मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि आपले जीवन खर्या अर्थाने बहरेल.
Read Also – Lokmanya Tilak Essay In Marathi
पाणी वाचवा निबंध मराठी निबंध 300 शब्दात | Save Water Essay In Marathi 300 words
निसर्ग सृष्टीने जशी मानव, प्राणी ,पक्षी ,कीटक अशा सजीवांची निर्मिती केली आहे . तशी प्रत्यक्ष जीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हवा ,पाणी, सूर्यप्रकाश असे नैसर्गिक स्रोतांची निर्मितीही केली आहे . अन्न ,वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात . परंतु या मूलभूत गरजांमध्ये पाणीसुद्धा मानवाची एक मूलभूत गरजा आहेत . निसर्ग सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून असते . पाणी हे जीवन आहे असे म्हणले जाते कारण प्रत्यक्ष जेव्हा अन्नाशिवाय एक-दोन दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय तो एक क्षण ही राहू शकणार नाही .
म्हणून पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन याचा अर्थ असा आहे की समाज व पाणी त्यातील संबंध समजून घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब ची किंमत समजून घेणे . आणि त्याचा वापर योग्य प्रकारे प्रकारे करणे . मानवाला पाण्याचे उपयोग फक्त पिण्यासाठी होत नाही तर दिवसभरातील स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही पाण्याचा वापर केला जातो . घरगुती वापरासोबतच अनेक कारखाने ,उद्योगधंदे यांसारखे अनेक सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा उपयोग होतो.
उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे निसर्गचक्रातील तीन महत्त्वाचे ऋतू आहेत. त्यातील पावसाळा हा ऋतू पृथ्वीवरील पाण्याची गरज भागवतो . पावसाळ्यात सारी सृष्टी हिरवीगार होते . पावसाच्या पाण्यामुळे निसर्गाचे सौंदर्य खुलते . पर्जन्यामुळे नदी तलाव सारे दुसरी भरून वाहतात . परंतु हे पाणी वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे . आजची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा होणारा अतिवापर यामुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे . पृथ्वीवरील अनेक भागात दुष्काळी समस्या निर्माण झाले आहेत . दुष्काळी भागात नद्या, तलाव ,विहिरी कोरड्या झाल्या आहेत . त्यामुळे अशा भागातील लोकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे .

हे पाण्याची समस्या टाळण्यासाठी आपण पाण्याचे वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे पाणी व्यवस्थापन त्यांचे अनेक प्रकार आहेत पाणी साठवणे आणि पाणी जिरवणे या तांत्रिक पद्धतीने वापर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करू शकतो . पाणी साठवण यापेक्षा पाणी जमिनीत मुरून आपण पाण्याचे मोठ्या प्रमाणावर वापर आपण करू शकतो. कारण जमिनीत मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते . त्यामुळे घरोघरी लोकांना पाण्याच्या साठणार या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे हवामानातील बदलांमुळे पावसाचे चक्र बदलले आहे पाऊस वेळेवर पडला नाही तर धरणातले पाणी असते बरेच औष्णिक वीज निर्मिती केंद्र पाण्याअभावी बंद ठेवावी लागतात .
त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण होतो आणि याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होतो. ही पाण्याची समस्या लक्षात घेऊन आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपण पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. पाण्याचे व्यवस्थापन यासोबतच पाण्याचे होणारे प्रदूषण ही रोखले पाहिजे. मनुष्य सोबत सर्व प्राणी ,पक्षी ,जलचर पाणी या सर्वांचे जीवन पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे या सजीवसृष्टीच्या रक्षण करण्यासाठी पाणी स्वच्छ शुद्ध असणे महत्त्वाचे आहे . म्हणूनच पाण्याचे योग्य ती गरज ओळखून स्वच्छ पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण पाणी वाचवा निबंध मराठी निबंध म्हणजेच save water essay in marathi बद्दल चर्चा केली . Essay On Save Water In Marathi Language निबंध म्हणजेच पाणी वाचवा निबंध मराठी निबंध हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.