नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj history in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध | sant tukdoji maharaj history in marathi in 100 , 200 and 300 words
तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 100 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 100 words
तुकडोजी महाराज यांचा कालखंड 1909 ते 1967 असा आहे . तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते . तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा घालवण्यासाठी आणि जातिभेद नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या प्रभावी वापर केला . तुकडोजी महाराज ग्रामगीता नावाचे काव्य लिहिले . लोकांना प्रबोधन करताना खंजिरी भजन हा प्रकार त्यांनी वापरला .
तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते . तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव आडकोजी असे होते . तुकडोजी महाराज मराठी व हिंदी भाषा बोलत . तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होते. तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला . संत तुकडोजी महाराज म्हणतात ” हर देश मे तू, हर वेश मे तू ,तेरे नाम अनेक ,तू एक ही है ” .
तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 200 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 200 words
महाराष्ट्रातील एक आधुनिक संतभक्त, कवी व समाजसुधारक असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे होते . अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला . तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते .
अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू अडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले . विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते . एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला . सन 1942 च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्ती ठरले होते .
या राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला . तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीने एकेश्वरवादाचा पुरस्कार करीत असत . आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक ,सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन केले.
राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले केले . त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल.
- Read Also – Krishna Janmashtami Essay In Marathi
तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध 300 शब्दात | sant tukdoji maharaj information in marathi in 300 words
भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती . महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेला यावली शहीद या गावी 30 एप्रिल 1990 रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला . त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणीपासून असताना ध्यान ,भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली .
तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली वरखेड ला आजोळी असताना अडकुजी महाराजांना त्याने गुरु केले. पुढे किर्तन भजन यासाठी ते स्वतः कविता रचू लागले . एके दिवशी गुरु महाराजांनी त्यांना तुकड्या म्हणून हाक मारली तुकड्या म्हणे असे म्हणत जा असे सांगितले . तुकड्या म्हणे या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले . त्यामुळे तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले . समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली .

ग्रामोनत्ती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता . भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती . त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली . अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे . त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे . ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाड्मय सेवेची पुढची सोय.
देवभोळेपणा ,जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले . महिलोनत्ती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता . कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था ,राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रिया अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अज्ञान काय आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले .
देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील . नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन कृष्ण पंचमी शके 1890 ( 31 ऑक्टोंबर 1967 ) रोजी झाले अशा या महान संतांना मनापासून शतशः प्रणाम.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj history in marathi बद्दल चर्चा केली . तुकडोजी महाराज मराठी माहिती निबंध म्हणजेच sant tukdoji maharaj information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.
संदर्भ – विकिपीडिया