संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 2023 | Sant Dnyaneshwar Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध  म्हणजेच Sant Dnyaneshwar essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . sant Dnyaneshwar information in Marathi language म्हणजेच essay on sant Dnyaneshwar in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध | essay on sant Dnyaneshwar in marathi in 100 , 200 and 300 words

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 100 शब्दात | Sant Dnyaneshwar essay in marathi in 100 words

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील एक थोर श्रेष्ठ संत आणि कवी होते.  संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 रोजी आपेगाव येथे झाला.  संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता . परंतु त्यांनी नंतर परत संसारात प्रवेश घेतला व त्यानंतर त्यांना निवृत्ती नाथ ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्य झाली. 

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठाचे अभंग यांसारख्या काव्यरचना रचल्या.  ” माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ,ऐसी अक्षरे रसिके मेळविन ” असे म्हणत त्यांनी मराठी भाषेचा गौरव व अभिमान व्यक्त केला आहे .

ज्ञानेश्वरी त्यांनी 9000 ओव्या ज्ञानेश्वरीत लिहिल्या आहेत . हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये लिहिला गेला आहे असे मानले जाते  . त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 200 शब्दात | Sant Dnyaneshwar essay in marathi in 200 words

संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकिक प्रतिभा व द्वितीय व्यक्तिमत्व असणारे सर्वश्रेष्ठ संत होते . संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये माता रुक्मिणी बाईच्या पोटी आपेगाव ( औरंगाबाद  जिल्हा ) येथे झाला .

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे सन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते.  गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई ही चार मुले जन्मली.  त्यावेळेच्या समाजाने विठ्ठलपंत तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अतोनात छळ केला . संन्याशाची मुले म्हणून त्यांना समाजाने वाळीत टाकले . संत ज्ञानेश्वरांनी लहान वयापासून लोकनिंदे कडे लक्ष न देता आध्यात्मिक प्रगती केली .

संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक होते . संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचे परमभक्त होते . ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ अद्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वरी ची रचना केली.  ज्ञानेश्वरी ला भावार्थदीपिका असेही म्हणतात.  ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत आणले . ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना भुरळ घालते.  ज्ञानेश्वरीतील सुमारे 9 हजार ओव्यामधील भक्तीचा ओलावा विचारांची संपन्नता अतुलनीय आहे.

ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ अनुभा  अमृतानुभव हा स्वरचित ग्रंथ आहे.  त्यामध्ये 800 ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात . संत ज्ञानेश्वरांनी असे संपन्न व प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न अभंग हरिपाठाची रचना करून मराठीचा अभिमान वाढवला.  ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा उत्कृष्ट ईश्वरी नामस्मरणाचा नाम पाठ आहे.

ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायांत ज्ञानदेवांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना अर्थात पसायदान लिहिलेले.  संत ज्ञानेश्वरांच्या कोणताही रचनेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार जाणवत नाहीत . अशा या महान विभूतींनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीतीरी संजीवन समाधी घेतली . तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आज प्रत्येकाचे मन अचंबित होते .

संत ज्ञानेश्वर यांच्या नावाने आजच्या काळात शिक्षण संस्था शाळा आश्रम शाळा काढल्या आहेत.  संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर प्रभात कंपनीने चित्रपट काढून ज्ञानेश्वरांचे कार्य जगभर पसरवले . संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील थोर संत होते आणि त्यांची महती वर्णन करण्यास शब्द भांडार अपुरे पडतील.

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 300 शब्दात | Sant Dnyaneshwar essay in marathi in 300 words

ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न . महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यती असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर . त्यांच्या जन्म आपेगाव येथे मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी इसवीसन 1275 आळंदी येथे झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व आईचे रुक्मिणी होते .

त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ धाकटे बंधू सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे आहेत.  त्यांचे वडील मुळात विरक्त संन्यासी होते.  त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला . त्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली . निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई या चारही मुलांना घेऊन विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी येथे येऊन स्थायिक झाले .

त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे . परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला . ज्याप्रमाणे विठ्ठलपंत व त्यांच्या पत्नी हाल सोसावे लागले तसेच त्यांच्या मुलांना सोसावी लागू नये म्हणून आळंदीच्या ब्रह्म सभेपुढे त्यांनी विनंती केली की आमच्या मुलांना जातीत घ्या.   ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु मानले होते निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. 

सर्वजण योगसाधना आणि ध्यानधारणा करून एका झोपडीत राहू लागले . मात्र आळंदीत काही लोकांनी त्यांचा खूप मानसिक छळ केला . तरी ती भावंडे सुखाने नांदत होते . ज्ञानेश्वरांनी गुरूच्या म्हणजेच निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली . सातशे वर्षावर काळ लोटला तरीही तो ग्रंथ तितकाच लोकप्रिय आहे . या ग्रंथास भावार्थदीपिका असे म्हणतात .  ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत आणले .

” माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ” असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान त्याची महती व्यक्त केली आहे . ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत.  हा ग्रंथ 1290 मध्ये लिहिले गेल्याचे मानले जाते .  त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा जीवन ऐक्याचा ग्रंथ आहे हा ग्रंथ सुमारे आठशे ओव्यांचा आहे.   ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही हे विशेष .

संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली असे म्हणतात . ज्ञानदेव आणि अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करून धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला आहे.   शके 1218 मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला इसवीसन 1296 रोजी अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या तीरावर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध  म्हणजेच Sant Dnyaneshwar essay in marathi बद्दल चर्चा केली . sant Dnyaneshwar information in Marathi language म्हणजेच essay on sant Dnyaneshwar in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment