माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध 2023 | Samaj Sudharak Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध म्हणजेच Samaj sudharak essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध म्हणजेच essay on samaj sudharak in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध| Maza Avadta Samaj Sevak Marathi Essay | essay on samaj sudharak in marathi in 100 , 200 , 300 and 400 words

माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध 100 शब्दात | Samaj sudharak essay in marathi in 100 words

महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते. ते महात्मा फुले या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते . जोतीराव केवळ नऊ महिन्यांची असताना त्यांच्या आईचे निधन झाले . वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.

महात्मा फुले यांनी आपल्या अतिशय तल्लख बुद्धी मुळे हा अभ्यासक्रम पाच-सहा वर्षातच पूर्ण केला . महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांचा प्रभाव होता सन 1791 मध्ये थॉमस पेन याने मानवी हक्कांवर लिहिलेले पुस्तक महात्मा फुले यांच्या वाचनात आले . त्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्याय या बाबतीत त्यांच्या मनावर विचार येऊ लागले .

त्यामुळे त्याने विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींचे शिक्षण यावर भर देण्याचे ठरवले . 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873 चाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होते.

माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध 200 शब्दात | Samaj sudharak essay in marathi in 200 words

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करणारे म्हणजेच लोकमान्य टिळक हे नाव आपल्या डोळ्यासमोर येते . म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यातील जहाल नेता अशी त्यांची ओळख. टिळकांचे जन्मगाव रत्नागिरी येथील चिखली हे गाव . त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले व पुढील स्वातंत्र्यलढ्याचे चळवळ त्यांनी येथूनच चालू केली .

ते उच्चशिक्षित होते परंतु इंग्रजांची नोकरी न पत्करता त्यांनी स्वतःला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले ते नेहमी म्हणायचे अरे आपण सर्व हिंदुस्थानी जरी चुकलो तरी हे मूठभर गोरे इंग्रज वाहून जातील त्यांनी केसरी हे वृत्तपत्र चालू केले . त्यांनी जनमाणसात स्वातंत्र्य विषयी जागृती करायला सुरुवात केली . त्यांची इंग्रजांना एवढी भीती निर्माण झाली की त्यांनी त्यांना कैद केले. व मंडाले येथे सहा वर्षाची कैद दिली .

असंतोषाचे जनक असे त्यांना इंग्रज सरकार संबोधू लागले . पण हार मानतील ते टिळक कसले. त्याने तेथेही गीतारहस्य हा ग्रंथ लिहला व आपली देशसेवेची सेवा येथे ही चालू ठेवली . लोकांच्या मागणीवरून इंग्रजांना त्यांना सोडावे लागले. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीतील मुख्य आधारस्तंभ झाले . त्यांच्या सभांना तुडुंब गर्दी होऊ लागली.

लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली आणि आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले . सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगून आल्यानंतर ते थोडे थकले होते. अहोरात्र देशसेवेचे काम ,सभा यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ न मिळणे त्यातच ते आजारी पडले . व दिनांक 1 ऑगस्ट 1920 सली त्यांची प्राणज्योत मालवली . आपले अख्खी हयात या स्वातंत्र्यलढ्यात घालवणाऱ्या शूर व सच्चा देशभक्ताला माझा सलाम….

माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध 300 शब्दात | Samaj sudharak essay in marathi in 300 words

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल अठराशे 1891 साली मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणीत असलेल्या गावात झाला . त्यांचे पूर्ण नाव डॉ भीमराव रामजी आंबेडकर असे आहे . पण ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जातात . त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भिमाबाई असे होते. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या भारतीय सैन्यात नोकरी करत होते . आणि तेथे त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले . डॉ आंबेडकर पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले .

माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध 2021 | Samaj Sudharak Essay In Marathi

त्यांचे कुटुंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या दलित जातीचे असल्यामुळे त्यांना अनेक वेळा इतर जातीतील लोकांच्या विरोधात सामना करावा लागला. आपल्या भीमराव वर उत्तम संस्कार व्हायला हवेत म्हणून बाबा साहेबांचे वडिल म्हणजेच रामजी नेहमी लक्ष ठेवीत असत . ते बाबा साहेबांना नेहमी उत्तम पुस्तके वाचायला आणू द्यायचे . म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण सवय ही आपल्याला त्यांच्या मध्ये दिसून येते . बाबा साहेबांकडे त्यांच्या मुंबई मधील घरात सुमारे 50 हजार पेक्षा जास्त पुस्तके आहेत व त्याचे उत्तम असे ग्रंथालय निर्माण झाले आहे .

1906 मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई यांच्यासोबत झाले . 1907 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पार केली . 1912 मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची बी एच ची पदवी संपादन केली . त्यानंतर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्ही मधून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या . त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती . उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांना फार संघर्ष करावा लागला . संघर्ष लढून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले .

डॉ आंबेडकर यांनी सामाजिक ,राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रात सुद्धा मोलाचे कार्य केले. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी भारताचे संविधान तयार केले . शिक्षण हे समाजाचे परिवर्तनाचे शस्त्र आहे हे समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांनी माणसाला कर्तव्य आणि हक्काची जाणीव करून दिली . 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 चाली अखेरचा श्वास घेतला . आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला . भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्य कधीही विसरता येणार नाही .

माझा आवडता समाजसेवक मराठी निबंध 400 शब्दात | Maza Avadta Samaj Sevak Marathi Essay in 400 words

१२ जानेवारी १८६३ रोजी भारतातील कोलकाता येथे विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. नरेंद्र लहानपणापासूनच खूप होतकरू विद्यार्थी होता; त्याची जाणीव आणि वाचण्याची क्षमता विलक्षण होती; नरेंद्र हा वाचक होता.

तत्वज्ञान, जीवशास्त्र, कला, संस्कृती, संगीत आणि सामाजिक विज्ञान इत्यादी सर्व प्रकारच्या विषयांमध्ये रस असणारा तो हुशार विद्यार्थी होता. विवेकानंदांना तत्त्वज्ञान आणि धार्मिक विषयांमध्ये विशेष रस होता; कांट, हेगेल, जॉन स्टुअर्ट मिल, ऑगस्ट कॉम्टे, स्पेनोझा, हर्बर्ट स्पेन्सर आणि चार्ल्स डार्विन यांसारख्या पाश्चात्य विचारवंत आणि तत्त्वज्ञानी विवेकानंदांनी उत्सुकतेने वाचले. उपनिषदे, वेद, रामायण किंवा महाभारत असो, हिंदू धर्मातील सर्व धार्मिक आणि तात्विक विषयांमध्ये ते पारंगत होते.

या सर्व अभ्यासांनी त्याला एक जिज्ञासू व्यक्ती बनवले. सत्य आणि ज्ञान जाणून घेण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडे घेऊन गेली आणि नरेंद्रनाथांचे स्वामी विवेकानंदांमध्ये रूपांतर झाले.

विवेकानंदांनी कोणत्याही सामाजिक सुधारणेची सुरुवात केली नसली, तरी त्यांच्या भाषणातून आणि लेखनातून सर्व प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध संदेश दिला.

विवेकानंदांचे मुख्य ध्येय भारतातील तरुणांची शारीरिक आणि मानसिक अशी कमजोरी दूर करणे हे होते. अधिक शक्ती मिळविण्यासाठी, त्याने शारीरिक व्यायाम किंवा ज्ञान प्राप्त करण्यास सांगितले. त्याच्यासाठी सामर्थ्य जीवन आहे आणि दुर्बलता मृत्यू आहे; भारतातील सर्व समस्या, मग ते सामाजिक असोत वा राजकीय, त्यांचे समाधान भारताच्या संस्कृतीत आणि तत्त्वज्ञानात आहे.

विवेकानंद धार्मिक सनातनी आणि अंधश्रद्धेच्या विरोधात होते; आपल्या भाषणांतून आणि व्याख्यानांतून ते सातत्याने समाजकंटकांवर ठाम मत मांडत. स्त्रिया भारताचे नशीब बदलू शकतात, असा त्यांचा प्रचंड विश्वास होता; 50 महिलांच्या मदतीने ते भारताला आधुनिक राष्ट्रात बदलू शकले, असा दावा त्यांनी केला.

तथापि, त्यांचे खरे योगदान हिंदु धर्माचे खर्‍या अर्थाने पुनरुज्जीवन करण्यात होते; 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत भारताची खरी संस्कृती आणि तत्त्वज्ञान जगासमोर मांडले; त्यांच्या या व्याख्यानाने आणि भाषणाने हिंदू धर्म कोणापेक्षा कमी नाही हे सिद्ध झाले.

अविरत प्रयत्नांनी त्यांनी देशातील तरुणांच्या मनात अभिमान आणि महत्त्व बिंबवले जेणेकरून ते पूर्ण आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाऊ शकतील. कोणत्याही धार्मिक तर्काने आणि परंपरांद्वारे कायम असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले आणि राष्ट्राची प्रगती करायची असेल तर अस्पृश्यता नाहीशी झालीच पाहिजे असा त्यांचा विश्वास होता.

पुढे, त्यांची उत्कट भाषणे आणि व्याख्याने यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला चालना दिली आणि त्यांचे जीवन आणि शिकवण आजही देशातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. 4 जुलै 1902 रोजी बंगालमधील बेलूर मठात ध्यान करत असताना स्वामी विवेकानंद यांचे निधन झाले.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध म्हणजेच Samaj sudharak essay in marathi म्हणजेच Maza Avadta Samaj Sevak Marathi Essay बद्दल चर्चा केली . माझा आवडता समाज सुधारक मराठी निबंध म्हणजेच essay on samaj sudharak in marathi हा निबंध 100 , 200, 300 आणि 400 शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment