राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 2023 | Rani Lakshmi Bai Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध म्हणजेच rani lakshmi bai essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध म्हणजेच essay on rani lakshmi bai in marathi हा निबंध 100 , 200 आणि 500 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध | essay on rani lakshmi bai in marathi in 100 , 200, 350 and 500 words

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 100 शब्दात | rani lakshmi bai essay in marathi in 100 words

झाशीची राणी यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर आहे . या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या लक्ष्मीबाई चे मूळ नाव मनाकरनिका असे होते त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 आली वडील मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. राणी लक्ष्मीबाई या धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या होत्या .

मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी त्यांनी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला . त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या समाजात त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले . 1842 मध्ये त्यांचा विवाह झासी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला . गंगाधरराव नेवाळकर राणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला पण तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला . म्हणून त्यांनी वासुदा वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर असे ठेवले .

पण इंग्रजांना दत्तक वारस नामंजूर झाल्यामुळे त्यांनी झाशी हे राज्य खालसा केले . त्यावेळी लक्ष्मीबाईंनी मै मेरी झांसी नही दुंगी असे ठणकावून सांगितले . 1857 मध्ये लक्ष्मीबाई यांनी नानासाहेब पेशवे तात्या टोपे यांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. 18 जून 1858 साली इंग्रजांशी लढताना लक्ष्मीबाईंना वीर मरण आले झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले.

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 200 शब्दात | rani lakshmi bai essay in marathi in 200 words

1857 च्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रमी अद्वितीय ,असामान्य कर्तृत्व गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. ” बुंदेले हरबोलों के मुंह हमने सुनी कहानी थी ,खूब लड़ी मरदानी वोह झांसी वाली रानी थी “. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव मनकर्णिका तांबे असे होते . त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तर आईचे नाव भागीरथीबाई होते . त्यांच्या लहानपणापासूनच तडफदार स्वभाव होता म्हणूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना युद्धकौशल्य लेखन-वाचन इत्यादी शिकवले .

वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा विवाह झांसी संस्थानाचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला . विवाहानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई ठेवले गेले पुढे त्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या . ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला त्यात झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा 13 मार्च अठराशे 54 रोजी काढण्यात आला त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले.

त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नही दुंगी असे उदगार काढले . त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना जेरीस आणले. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपले झाशी संस्थान स्वतंत्र करण्यासाठी लढल्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या जनतेसाठी लढल्या. जीवनातील अनेक कठीण प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिले. लक्ष्मीबाई युद्धकलेत घोडेस्वारी मल्लखांब मध्ये निपुण होत्या .

जगभरातील क्रांतिकारकांना सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला तसे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने जिद्दीने स्फूर्ती दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार.

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 350 शब्दात | rani lakshmi bai essay in marathi in 350 words

औपचारिकपणे मणिकर्णिका तांबे म्हणून ओळखल्या जाणार्‍या, राणी लक्ष्मीबाई भागीरथी तांबे आणि मोरोपंत तांबे यांच्या शूर कन्या होत्या. 1828, 19 नोव्हेंबर रोजी काशी येथे तिचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाई ही एक ब्राह्मण मुलगी होती आणि तिचे वडील उत्तर प्रदेशातील बिथूर येथे गेले तेव्हा तिला “मनु” हे टोपणनाव मिळाले. तिच्या आईच्या मृत्यूनंतर, मोरोपंत तांबे (राणी लक्ष्मीबाईचे वडील) हे मराठा साम्राज्याचे सेनापती आणि राजकारणी पेशवा बाजीराव यांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करत असल्याने ते स्थलांतरित झाले.

लहानपणापासूनच मणिकर्णिकाला मार्शल आर्ट्स, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि नेमबाजीचे सर्व शिक्षण मिळाले. पेशव्यांच्या दरबारात येणाऱ्या रावसाहेब, नाना साहिब, तंट्या टोपे आणि इतर मुलांसोबत खेळण्यात तिचा चांगला वेळ जायचा. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे दोन घोडी होती कारण ती घोडेस्वारीत चांगली होती. सारंगी आणि पवन अशी दोन घोडींची नावे होती.

वयाच्या चौदाव्या वर्षी मनूने महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह केला. तो 1842 होता, आणि तो झाशीचा सम्राट होता. लग्नानंतर, झाशी राणीला लक्ष्मीबाई हे नाव पडले, कारण ती हिंदू धर्मातील पैशाची देवी लक्ष्मी होती. मराठ्यांच्या प्रथा आणि परंपरेनुसार, बाई यांना महाराणी किंवा राणीचे प्रतिनिधित्व करणारी एक सन्माननीय पदवी म्हणून ओळखले जाते. 1851 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव दामोदर होते

राव. दुर्दैवाने, प्रदीर्घ आजारामुळे मुलाचा जन्म झाल्यानंतर चार महिन्यांतच मृत्यू झाला.

ब्रिटीश सरकारने महाराजांच्या मृत्यूची संधी साधली, ज्यामुळे रक्तरंजित वारस गमावला आणि झाशीचा ताबा घेण्याचा विचार केला. या घटनांनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सचा नियम लागू केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की जर कोणतेही संस्थान कंपनीच्या कोणत्याही अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष शासनाखाली आले आणि राज्याचा शासक पुरुष कायदेशीर वारस नसताना मरण पावला, तेव्हाच ईस्ट इंडिया कंपनीला राज्य जोडण्याचा अधिकार आहे. या अन्यायामुळे मणिकर्णिका नाराज झाली आणि तिने लंडन कोर्टात बाजू मांडली. अगदी साहजिकच, हा नियम आधीच लादलेला असल्याने, तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.

ब्रिटीश सरकार किंवा ईस्ट इंडिया कंपनीने याचिका स्वीकारल्या नाहीत त्यानंतर, 1857 मध्ये युद्ध सुरू झाले. हे 1857 चा विद्रोह म्हणून प्रसिद्ध आहे. मेरठ येथे 10 मे रोजी बंड सुरू झाले. बंडाची मूळ तारीख 31 मे 1857 ही निश्चित करण्यात आली होती, परंतु लोक आधीच भावनिकरित्या आरोपित, अस्वस्थ आणि इंग्रजांच्या शोषणाविरुद्ध अधीर झाले होते. त्यामुळे त्यांनी पूर्वीपासूनच क्रांतीचा मार्ग सुरू केला.

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 500 शब्दात | rani lakshmi bai essay in marathi in 500 words

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात स्त्री ही उच्चशिक्षित आहे तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही . मात्र झाशीची राणी ही 19 व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनी ने आत्मविश्वासाने स्वकर्तुत्वाने चातुर्याने पराक्रमाने स्वाभिमानाचा स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिलेल्या. धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या .

पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या वाढलेल्या मनकर्णिका मनु होत्या. राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह 1842 मध्ये झाला पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी राणी लक्ष्मीबाई झाल्या. राणी पदाच्या कसोटीला लक्ष्मीबाई पूर्णपणाने उतरल्या झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले . लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले .

राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध 2021 | Rani Lakshmi Bai Essay In Marathi

राणीला एक मुलगा झाल्याने संपूर्ण झाशी शहर आनंदीत होते . परंतु मुलगा तीन महिन्याचा असतानाच मरण पावला परिणामी मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधर राव हे या गोष्टीने दुखी झाले . दत्तक पुत्र वारसा हक्कासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन दामोदर असे नाव ठेवण्यात आले . पण दुर्दैवाने थोड्याच अवधीत गंगाधर रावांचे निधन झाले. उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या दोन-तीन दिवस झाशीची बाजू होती घनगर्जन भवानीशंकर खडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तो बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पडली ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले केले .

त्या वेळी चुना दगड विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष. शेवटी ब्रिटिशांना साथ दिली झाशी मधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा तो कारखाना ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली अशा स्थितीत राहण्याची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती त्याप्रमाणे 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही . ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले शांत सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणे संतापले आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता.

त्यांचे धैर्य शौर्य आवेश पाहून ह्यू रोजही थबकला तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले . या पराभवाने नंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली तेथे ही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली सैन्यांमध्ये फिरून सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी 17 जूनला सकाळी ब्रिटिश अधिकारी स्मिथचे सैन्य अगदी जवळ येउन पोहोचला त्याने त्वरीत हल्ला चढवला .

आवेगाने विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणार होते. त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता काही केल्या घोडा ओलांडत नव्हता .

परिणामी मागून आलेल्या सैन्याने राणींना जखमी केले त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली आणि एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले विजय सारखे त्यांचे आयुष्य कडकडाट करून दिव्यत्वाचा लख्ख प्रकाश देऊन गेले . केवळ 27 वर्षांच्या या निर्भय पराक्रमी तेजस्वी प्रत्यक्ष भवानी चे रूप असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली ब्रिटिशांनी राणीचे उल्लेख हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क असा केला क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य पोवाडे रचले गेले राणी लक्ष्मीबाईच्या येथील समाधी स्थान वर 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध म्हणजेच rani lakshmi bai essay in marathi बद्दल चर्चा केली . राणी लक्ष्मी बाई मराठी निबंध म्हणजेच essay on rani lakshmi bai in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 5०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment