नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध म्हणजेच pavsala nibandh in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . पावसाळा निबंध मराठी म्हणजेच pavsala essay in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत . pavsala marathi essay ह्या पोस्ट च्या साहयाने तुम्ही हा निबंध अभ्यासात व परीक्षेत सहज लिहू शकता . तर चला सुरु
करूया ….
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी | Pavsala Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 100 शब्दात | Pavsala Marathi Essay In 100 Words
पृथ्वीवरती अनेक ऋतू आहेत जसे उन्हाळा ,पावसाळा व हिवाळा .हे सारे ऋतू महत्वाचे आहेत पण माझा आवडता ऋतू आहे पावसाळा. पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे शेतकरी . पावसामुळे शेती पिकते ,आपल्याला पिण्याचे पाणी मिळते . आपल्याप्रमाणेच पक्षी ,प्राणी ,झाडे वेली या सगळ्यांचे जीवन पावसावर अवलंबून असते . अंदाजे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरू होतो. पहिल्या पावसात मातीचा छान सुगंध अनुभवायला मिळतो . उन्हाने तापलेल्या पृथ्वीवर अचानक गारवा पसरतो.

आकाशात दाटलेले काळे ढग , थंडगार वारा यामुळे मन प्रसन्न होऊन जाते . लहान मुले पावसाच्या पाण्यात भरपूर खेळतात व पाण्यात होड्या सोडून पावसाचा आनंद लुटतात . पावसाळ्यात फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंदही काही वेगळाच असतो . सप्तरंगी उधळण करणारा इंद्रधनुष्य पाहायला मिळतो तो सुद्धा पावसातच . असा पावसाळा ऋतु प्रत्येक वेळी मनाला आनंदी व प्रफुल्लित करतो म्हणून मला पावसाळा खूप आवडतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 300 शब्दात | Pavsala Nibandh In Marathi Language In 300 Words
“नभ गरजूनी थेंब बरसुनी आल्या पावसाच्या धारा अल्लड वारा गुंजला कानी न्हाऊन गेला आसमंत सारा ” . पृथ्वीवरती सजलेला निसर्ग हा एक अलंकार आहे. दिवसानुसार व महिन्यानुसार निसर्गाचे आपल्याला वेगवेगळे रूप दिसते . ते म्हणजे नैसर्गिक चक्र होय . पृथ्वीवरती हिवाळा , उन्हाळा व पावसाळा ऋतू आहेत. अशा ऋतूनुसार निसर्ग आपले सौंदर्य दाखवतो . त्यातील पावसाळ्यात रंगलेले निसर्गाचे सौंदर्य मला खूप आवडते . म्हणून माझा आवडता ऋतू पावसाळा आहे. जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते.
आणि त्याच्या आसपास पावसाळा सुद्धा सुरू होतो . पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे संपूर्ण जमीन तापलेली असते . रिमझिम पडणारा पाऊस जमिनीची तहान भागवतो . सर्वत्र गारवा पसरतो . जमिनीतून मातीचा येणारा सुगंध मला खूप आवडतो . पावसाळ्यात सर्व झाडे हिरवीगार होतात . सर्व आटलेल्या नद्या पुन्हा वाहू लागतात . पाऊस कधी रिमझिम पडतो तर कधी धो-धो कोसळतो जोरात पाऊस पडला की आमच्या घराभोवती तळे साचते . तेव्हा आम्ही कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडतो . आणि आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो.

पाऊस पडला की कधीकधी रंगीबिरंगी इंद्रधनुष्य बघायला मिळते . पाऊस पडला की मोर सुद्धा आनंदित होतो . आणि आपला पिसारा फुलवून रानात नाचू लागतो . पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस पडत असेल आणि घरामध्ये गरम भजी आणि चहा पिण्याचा आनंद विलक्षण असतो . आणि पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते . पावसात भिजत आम्ही भोलानाथचे गाणे सुद्धा म्हणतो . ” सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ” पाऊस आला आणि गारा पडू लागल्या की अंगणात जाऊन पडलेल्या गारा वेचून खायला मला खूप आवडते . पाऊस सुरू झाला की सगळीकडे पाणीच पाणी असते . पाऊस हा हवेत गारवा आणतो .
सर्व झाडे स्वच्छ धुवून निघतात. झाडांना पाणी मिळते ,सर्व रस्ते घरांची छपरे धुवून निघतात ,उन्हाळ्यात सुकलेली झाडे पुन्हा बहरतात ,हिरवीगार दिसतात हे सर्व पाहून मन प्रसन्न होते . पाणी हे जीवन आहे. पृथ्वीवरील माणूस पशू ,पक्षी ,झाडे ,वेली यांना पाण्याची फार गरज असते . ही गरज पावसामुळे पूर्ण होते . पाऊस सुरू झाला की शेतकरी सुद्धा खुश होतो . कारण जमिनीत बी-बियाणे पेरून तो आतुरतेने पावसाची वाट बघत असतो.
नद्यांचे पाणी अडवून शेतकरी शेतात पिके, भाजीपाला पिकतो . पावसाळ्यात संपूर्ण सृष्टी हिरवीगार होते . तापलेले वातावरण थंड होते . आम्हाला पावसात भिजायला ,खूप मजा करायला मिळते . कधी शाळेला सुट्टी सुद्धा मिळते . म्हणून मला पावसाळा ऋतु खूप आवडतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी 500 शब्दात | Pavsala Nibandh In Marathi Language In 500 Words
पावसाळा आला की सर्वप्रथम आठवते ते हेच गीत. ” येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा , ये ग ये ग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून ” माझा आवडता ऋतू आहे पावसाळा . जून महिना सुरू झाला आणि पावसाळा आला असे समजावे . बाजारात तर रंगीबेरंगी ,छोट्या, मोठ्या आकाराच्या छत्र्या ,रेनकोट ,गम बूट इत्यादी विक्रीला ठेवतात . पाऊस आला की आम्ही खूप मजा करतो. पावसाळा आला आणि मी भिजले नाही असे कधीच झाले नाही. वीज कडाडते , ढग गडगडतात आणि मग थेंब थेंब पडायला लागतात . मस्त मातीचा वास सुटतो आणि थोड्याच वेळात जोराचा पाऊस सुरू होतो .
पावसाची हि सुरुवात मला खूप खूप आवडते. जेव्हा वीज कडाडते तेव्हा मला थोडं घाबरायला होतं . पण त्यानंतर येणार पावसात भिजायची मजा काही वेगळीच असते . पावसाळा आला की आम्ही भोलानाथ ला शोधतो व विचारतो . “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय , शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ” . पाऊस आला की आम्ही खूप मज्जा करतो. आई कितीही रागावली तरी गारा पडल्या तर ते खायचं ,कागदाची होडी करून ती वाहत्या पाण्यात सोडणे व कोणाची होडी दूरवर जाते हे बघणे .
शाळेत असताना पाऊस आला की शिक्षकांना सुट्टी देण्याचा आग्रह करणे . सुट्टी होताच पाऊस संपण्याची वाट न बघता धावत-पळत रस्त्यावर साठलेलं पाणी उडवत घरी जाणे . पावसाळ्यात वातावरण प्रसन्न होतं . पाण्याला जीवन म्हटले जातं . त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे . मी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो . कारण तो उन्हाळ्याच्या असहनीय गर्मी पासून आपली सुटका करतो . पावसाळा हवेत थंडावा आणतो . पाऊस सुरू झाला की सगळीकडे पाणीच पाणी असते . झाडांना छान पाणी मिळते . घरांची छपरे धुवून निघतात . व मन प्रसन्न होते. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो . मोठ्या माणसांची मात्र तारांबळ उडालेली असते .

कोणाच्या घरात छतावरून पाणी पडत असते तर कोणाच्या तरी अंगणात ढोपर भर पाणी साचलेले असते . मग घरातील माणसांची दुरुस्तीसाठी धावपळ होत असते . परंतु आम्ही लहान पोरं मात्र पडणाऱ्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत असतो . पाऊस म्हणजे निसर्गाची एक अजब देणच आहे . माणसांना ,पशुपक्ष्यांना, झाडे-वेलींना पाण्याची फार गरज असते . ती गरज ह्यामुळे भरून येते. पावसाचे पाणी अडवून धरणे ,विहिरी, तलाव अशा ठिकाणी साठवून ठेवले जाते . नद्या, झरे, नाले यातील वाहणारे पाणी समुद्राला जाऊन मिळते .
परंतु नद्यांचे पाणी अडवून शेतकरी आपल्या शेतात पिके पिकवतात . कोणी भाजीपाला पिकवतो व विकतो तर काही शेतकरी मोठ्या बगीच्या तयार करतात व अनेक फळांचे उत्पादन घेतात . झाडे वेली फुले बहरतात . पण हाच कधीतरी कोठेतरी मानवाचे खूप नुकसान देखील करतो . कधी प्रचंड पाऊस पडून नद्यांना पूर येतो समुद्राला मोठी भरती येऊन पाणी शहरात गावात वाहत येते . व माणसांचे खूप नुकसान होते . डोंगर ,दरडी कोसळतात व माणसांची नाहक जीवित हानी होते . तेव्हा मला खूप दुःख होते, परंतु पावसाचे चांगले गुण बघितलं तर पावसाळा हा ऋतू मला मला खूप आवडतो .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण pavsala nibandh in marathi language म्हणजेच pavsala माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध बद्दल जाणून घेतले .पावसाळा निबंध मराठी म्हणजेच pavsala marathi essay हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघितला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता . pavsala essay in marathi व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका …. .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.