पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 2023 | Paus Padla Nahi Tar Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण पाऊस पडला नाही तर निबंध मराठी म्हणजेच paus padla nahi tar essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . पाऊस पडला नाही तर निबंध मराठी म्हणजेच marathi nibandh on paus padla nhi tar – Paus Padla Nahi Tar Nibandh Marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी | Paus Padla Nahi Tar Nibandh Marathi | marathi nibandh on paus padla nhi tar in 100 , 300, 400 and 500 words

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 100 शब्दात | paus padla nahi tar essay in marathi language in 100 words

जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता . पावसाविषयी चे सर्व अंदाज खोटे ठरले होते . सर्व जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मनात शंका आली पाऊस पडलाच नाही ? तर हा विचार मनात आला आणि अंगावर शहारा आला . खरच पाऊस पडला नाही तर माणसाचे खूप हाल होतील . पावसावर माणसाचे जीवन अवलंबून आहे .

पिण्यासाठी पाणी पाहिजे ,स्नानासाठी पाणी पाहिजे ,वैयक्तिक स्वच्छता साठी पाणी पाहिजे ,शेतीसाठी पाणी पाहिजे. पाऊस पडला नाही तर शेती कसे पिकणार ? धान्य कसे टिकणार ? पाऊस पडला नाही तर आपली भूक भागणार नाही . आपली तहान लागणार नाही . पाऊस पडला नाही तर नदी नाले कोरडे पडतील . विहिरी आटून जातील, झाडे सुकून जातील ,सर्वत्र रोगराई पसरेल ,जमिनीला भेगा पडतील ,सगळीकडे वाळवंट निर्माण होईल . सारी सजीव सृष्टी संकटात येईल . पाऊस पडला नाही तर इंद्रधनुष्य दिसणार नाही .

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 2021 | Best Paus Padla Nahi Tar Essay In Marathi Language

हिरवेगार रान दिसणार नाही . पाऊस नसेल तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे नसतील , वाहणारी नदी नसेल ,जीवणातील सारे चैतन्यच हरवुन जाईल . छे छे पाऊस पडला नाही तर हि कल्पनाच आपण करता कामा नये . हा विचार मनात आला आणि वातावरण काळोखून आले आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 300 शब्दात | paus padla nahi tar essay in marathi language in 300 words

पाऊस हा प्रत्येकाचाच मित्र पाऊस आहे . पाऊस आला की सर्व सृष्टि आनंदी होते ,डोंगर हिरवी चादर पांघरतात , नद्या ओसंडून वाहतात व ओल्या मातीचा सुगंध मनाला सुखावतो . वातावरण स्वच्छ करणारा व शेतकऱ्यांच्या व्याकुळ जीवाला शांत करणारा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो . पाऊस आहे म्हणूनच तर ठीक आहे . पिण्यासाठी पाणी आहे व समृद्ध मानवी जीवन आहे असे असताना पाऊसच पडला नाही तर या विषयांवर विचार करताना मन कासाविस झाले आहे .

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आपण ज्या मित्राची आतुरतेने वाट पाहत असतो तो जर आला नाही तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी . दरवर्षी न चुकता येणारा हा सखा जर यंदा आपली वाट विसरला तर आपण काय करणार या गोष्टीचा नुसता विचार केला तरी मनात धडकी भरते . ही गोष्ट जर सत्यात उतरली तर ? पाऊस हा आपल्या जीवनातील एक अमूल्य घटक आहे . जर पाऊस पडला नाही तर पृथ्वीवरचे संपूर्ण जीवनचक्र बदलून जाईल .

पृथ्वीवर शिल्लक असलेला पाणीसाठा थोड्या काळवधीत संपून जाईल मग पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी नाही ,शेती नाही ,अन्नधान्य नाही झाड नाही ,शुद्ध हवा नाही ,पशुपक्षी नाही एकूणच पृथ्वीवर जीवन राहणार नाही . आज आपण या दिशेने वाटचाल करत आहोत . मानवाच्या बुद्धी मुळेच आज आपल्याला निसर्गाचे रौद्र रुपाला सामोरे जावे लागते आहे . कुठे भयंकर उष्णता तर कुठे अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे येणारा महापुर, कुठे सुका दुष्काळ कुठे ,ओला दुष्काळ जर आपण अशाप्रकारे निसर्गाची ह्रास करत गेलो तर आपल्याला यापेक्षाही भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल .

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 2021 | Best Paus Padla Nahi Tar Essay In Marathi Language

आज एका दिवसात आपण तिन्ही ऋतूंचा आस्वाद घेतो . म्हणजे सकाळी गारठून टाकणारी थंडी ,दुपारी कडाक्याचं ऊन ,संध्याकाळी तुफान पाऊस . मानवाने स्वतः च्या स्वार्था पोटी केलेले वृक्षतोड त्याचबरोबर नदीच्या प्रवाहावर केलेले अतिक्रमण ,जंगली प्राण्यांची शिकार यामुळे संपूर्ण निसर्गचक्र बदलून गेले आहे . आज आपण बघतो की फक्त आणि फक्त सुरुवात आहे निसर्गाचे रौद्र रूप दाखवण्याची .

आपण जर अशाच प्रकारे वृक्षतोड ,प्रदूषण ,अतिक्रमण करत राहिलो तर मात्र निसर्गाच्या रौद्र रुपाला आपण आमंत्रण देतोय असं होईल . पावसाळा आपल्याला सुख समृद्धी देतो आणि आपण आपण प्रदूषण प्रकल्प सुरू करून त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करतोय . बघा विचार करा आणि वेळ आहे तोपर्यंत कृती करा नाहीतर या निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे पृथ्वीवरचं जीवनच नष्ट होईल..

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 400 शब्दात | paus padla nahi tar essay in marathi language in 400 words

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. तो सर्व प्रकारच्या काल्पनिक गोष्टी करतो. तसे असते तर ते घडले असते असे मला वाटते. अशातच पाऊस पडला नाही तर काय होईल.

ही एक अतिशय भयानक कल्पना आहे, ज्याबद्दल ऐकून माणूस भावनाशून्य होतो. कारण ज्याचा आपण नसण्याचा विचार करतो तोच आपल्या जीवनाचा आधार असतो. यानंतर पृथ्वी आणि इतर ग्रहांमध्ये फरक राहणार नाही.

काही वर्षे पाऊस पडला नाही तर काय होईल हे आपण सर्वांनी पाहिले आहे. राजस्थान, महाराष्ट्र यांसारखी राज्ये जिथे पाण्याचे संकट ही भयावह समस्या आहे तेही त्या दिवसात समोर येतात.

जेव्हा चांगला पाऊस पडतो आणि ते समृद्धीचे वर्ष असते. पाऊस पडला नाही तर आपण माणसं, झाडं, वनस्पती आणि प्राणी जगू शकणार नाही.

पाऊस हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. त्याशिवाय आपल्याला पिण्याचे पाणी मिळणार नाही आणि भाजीपाला पिकवता येणार नाही. पाण्याअभावी तहानलेले राहण्याचे संकट तर निर्माण होणारच, पण आपली शेतीही उद्ध्वस्त होणार आहे.

झाडे-झाडे वाढली नाहीत, तर सर्व मानव, प्राणी, पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात येईल. आज आपण ज्या हिरव्यागार जगामध्ये राहतो, जर पाऊस पडला नाही तर ते उद्ध्वस्त होऊन वाळवंटात बदलेल.

आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात, का माहीत आहे का? कारण सर्व ग्रहांमध्ये हे एकमेव ठिकाण आहे जिथे पाणी आहे. पाऊस पडला नाही तर इथूनही पाणी नाहीसे होईल.

याचा परिणाम संपूर्ण निसर्गावर होईल. प्रस्थापित जगाचा नाश होईल, पाण्याअभावी सर्व जीव नष्ट होतील. म्हणूनच जीवनाची मूलभूत गरज म्हणजे पाणी, जे आपल्याला पावसामुळेच मिळते.

पाऊस हा आपल्या भूगर्भातील पाण्याचा आधार आहे. दुष्काळग्रस्त देशातील अनेक भागात जिथे वर्षानुवर्षे दुष्काळ पडतो. तेथे पावसाअभावी भूगर्भातील अंतर्गत पाण्यामध्ये वाढ होत नाही. सततच्या अंदाधुंद वापरामुळे मर्यादित प्रमाणात उपलब्ध पाणी संपुष्टात येत आहे.

निसर्गाची परिसंस्था एकमेकांच्या प्रक्रियांवर आधारित आहे. पाऊस पडला नाही तर पृथ्वीवर झाडे आणि वनस्पती वाढू शकणार नाहीत. झाडे आणि झाडे सुकली किंवा नष्ट झाली तर वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल.

ज्याशिवाय आपले आयुष्य एक मिनिटही चालू शकत नाही. पाणी नसेल तर शेतातील पिके उगवू शकणार नाहीत. अशा स्थितीत पाणी, हवा आणि अन्नाशिवाय मानव आणि प्राणी फार काळ जगू शकणार नाहीत.

जलसंकटाची विचित्र परिस्थिती आज भारत आणि जगाच्या इतर भागांमध्ये पाहायला मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माणसाचा स्वार्थ.

पाण्याचे सतत शोषण व प्रदूषित करण्यापासून तो परावृत्त होत नाही, त्यामुळे दूषित पाणी पिण्यास अयोग्य होऊन महासागरात वाहून जाऊन अखाद्य बनते.

दुसरीकडे, सततच्या जंगलतोडीचा थेट परिणाम पावसावर होतो. जिथे जास्त जंगले आहेत तिथे पाऊस जास्त आहे आणि जिथे जंगले नष्ट झाली आहेत आणि सपाट मैदाने किंवा शहरे वसलेली आहेत असे अनेकदा दिसून आले आहे.

तेथे वर्षानुवर्षे पावसाची पातळी कमी होत आहे. ही दोन कारणे प्रामुख्याने पावसाचा अभाव आणि जलसंकटाला कारणीभूत आहेत.

पर्यावरण प्रदूषणाचा केवळ या ग्रहावरील लोकांच्या जीवनावरच परिणाम होत नाही. उलट त्याचा निसर्ग व्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. पावसाअभावी होणाऱ्या समस्यांची आपल्याला चांगलीच जाणीव आहे.

त्यामुळे आपले भविष्यातील अस्तित्व वाचवायचे असेल तर निसर्गाशी खेळ न करता वृक्षारोपण करत राहावे, जेणेकरुन पाऊस नसता तर काय झाले असते, याचा थेट त्रास आपल्याला जीवनात सहन करावा लागला नसता.

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 500 शब्दात | paus padla nahi tar essay in marathi language in 500 words

आला आषाढ-श्रावण आला पावसाच्या सरी किती चातक चोचीने त्या वर्षा ऋतू तरी ….. बा सी मर्ढेकर यांनी किती अर्थपूर्ण वर्णन केले आहे . पावसात श्रावण म्हणजे आनंद म्हणून चैतन्याचा धरतीमाता अगदी आतूर होतो. पावसाची वाट बघत असते . सर्वांना नवजीवन देणारा पाऊस सर्वांना प्रफुल्लित करणारा . पाऊस मरगळ झटकणार ,आनंदोत्सवात डुबायला लावणारा असा हा पाऊस त्याच्या परिसस्पर्शाने जीवनाचं सोनं होतं . शेतकऱ्याला अमृत प्राप्तीचा आनंद होतो .

चराचराला नवीन चैतन्य मिळते आपण ज्या पंचमहाभूतांनी बनलेला आहोत म्हणजे पृथ्वी ,आप ,तेज ,वायू आकाश असा आवश्यक असणार परिपूर्ण आपणा सर्वांना मिळतो . पृथ्वीवरती असणारा जीवाला संजीवनी मिळते असा हा वरून राजा आपल्यावर रागावला तर आणि पाऊस पडला नाही ? तर मनात आणणे देखील संकटाचे आहे . जो आपणास जगवतो तो पाऊस पडला नाही तर आपले अस्तित्व राहील काय ? ज्या पावसामुळे शेती पिकते ,अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळते त्या पावसाला पडायचं नाही असं ठरवलं तर संपूर्ण जगातच हाहाकार माजेल .

धान्य न मिळाल्याने माणूस जगू शकणार नाही . पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहतात . काठावरच्या शेतकऱ्यांना नागरिकांना त्यामुळे जीवन मिळते . काठावरची उद्याने फुलतात . जमिनीवर वनराई फुलते . विविध पशु पक्षांना आपले छोटेसे घर कुठे मिळनार पाणीच नसेल तर ? मग या पक्षांनी झाडावर आपला निवारा शोधण्यासाठी कुठे जायचं ,तहानेने व्याकूळ झालेला आपल्या पिलांना पक्षांनी पाणी कुठून आणायचे पाऊस पडलाच नाही तर ? हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह शेतकर्‍यांपुढे उभे असेल .

पाऊस पडला नाही तर अन्नधान्याचे उत्पादन काय ? शेतकऱ्याकडे तर पाण्याचा साठा नसेल पाणी नसेल तर आपल्यालाच धान्य कुठून मिळणार ? मानव प्रथम आपल्या मूलभूत गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत असतो . आपल्या सर्व मूलभूत गरजा भागल्या की मग तो आपल्या दुय्यम गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो . पण त्याच्या ज्या काही मूलभूत गरज आहे त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पावसावर अवलंबून आहेत . सिंधू नदीच्या काठीच आपली संस्कृती भहरली हे आपल्या लक्षात आहेत .

पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 2021 | Best Paus Padla Nahi Tar Essay In Marathi Language

म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वास्तव्य अनुकूल वातावरण आहे त्या ठिकाणी मानवी वास्तव्य करीत असतो पाण्याच्या अन त्याच्या वास्तव्याच्या निकटचा संबंध आहे . भारताच्या इतिहासात दुष्काळाने बऱ्याच वेळा थैमान घातले आहे . हा दुष्काळ अनेक जणांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरला आहे . एकदा दुष्काळ आला की वाढली महागाई आणि भ्रष्टाचार वाढला आणि त्याला जोडून इतर समस्या वाढल्या .

पाऊस न पडल्याने झालेले केवढे नुकसान . विशेष म्हणजे पाऊस पडलाच नाही तर शाळेत जाणारी लहान मुलांना आपले पावसाचे गाणे कसे गाता येईल . सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे गाणं म्हणून पावसाळ्यातील सुट्टी कशी आणता येईल ही झाली थोडी मजा . पण खरंच पाऊस पडला नाही तर या कल्पनेचा अंगाला घाम फुटतो .

जीवन चक्र उलटे झाल्यासारखे वाटते . लगान मधले आमिर खान काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ असं म्हणत डोळ्यासमोर येतो . शेतात काम करणारे शेतकरी ढगाकडे टक लावून बसलेला दिसतो . मनात धस्स होतं . वाटतं पाऊस नाहीतर करपलेली धरती समवेत शेतकऱ्यांचे काय ? पण सर्वांच्या मनाची कोवळी पाने करपून जाईल. दुष्काळ पडेल . तुम्ही-आम्ही मन दुःखाचे गाणे लावू म्हणून पाऊस हवाच नाही का ?

आपल्या मित्राचे आगमन दरवर्षी झालेच पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे . त्यासाठी आपण सर्वानी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांना जगवले पाहिजे . तेव्हाच आपण खरे पावसाच्या स्वागताला सुरुवात करू . नाहीतर ” येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” हे गाणं म्हणाला पाऊस शिल्लक राहणार नाही .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपणपाऊस पडला नाही तर निबंध मराठी म्हणजेच paus padla nahi tar essay in marathi language बद्दल चर्चा केली . पाऊस पडला नाही तर निबंध मराठी म्हणजेच marathi nibandh on paus padla nhi tar हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

1 thought on “पाऊस पडला नाही तर निबंध मराठी 2023 | Paus Padla Nahi Tar Essay In Marathi Language”

  1. वा फारच छान माहिती दिली आहे आपण फार छान लिहता अभिनंदन

    Reply

Leave a Comment