नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण निसर्ग मराठी निबंध म्हणजेच nisarg essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . essay on nisarg in marathi म्हणजेच nisarg maza mitra essay in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
Table of Contents
निसर्ग मराठी निबंध | essay on nisarg in marath | nisarg maza mitra essay in marathi in 100 , 200 and 300 words
निसर्ग मराठी निबंध 100 शब्दात | nisarg essay in marathi in 100 words
माणूस आणि प्राणी यांच्यात काही नातं असतं . मायेचे प्रेम दिल्याने प्रेम वाढतं हे माणसाने सिद्ध केले आहे. आपण अनेक सण साजरे करतो आणि आनंद वाटतो पण त्यातील . खूप सण प्राणी आणि वनस्पती वर अवलंबून आहेत . ही वेगळी आणि खूप सुंदर परंपरा आपण जाणतो . यातूनच निसर्गाच्या जवळ जातो आणि निसर्गाचे आपण एक घटक आहोत ही जाणीव ठेवतो .
या भुतालावर माणूस एकटे जीवन जगू शकत नाही त्याला सहकारी आवश्यक असतो . आपल्या मनातील बोलणे ऐकणारा आपला सखा शोधात असतो मग कधी माणसाच्या वेगवेगळ्या नात्यामधून तर कधी प्राणी आपलेसे करून तो शोध घेतो. माणसाच्या आतल्या माणसाला हे जग खूप आवडते . या जगातील प्रत्येक जण त्याला आपला वाटतो . आपले सुखाचे आणि दुःखाचे क्षण वाटून घेण्यासाठी .
पण जेव्हा माणसा माणसाची साथ सोडतात माणूस माणसापासून दूर जातो आणि माणूस खऱ्या अर्थाने एकटा पडतो तेव्हा माणसाला निसर्ग जवळ करतो. झाडे ,प्राणी त्याच्यावर प्रेम करतात आणि माणसाचा एकांतवास संपवतात त्याला जगण्याची नवी प्रेरणा देतात आणि या जगात असताना कसं जगावं हे शिकवतात. आपण या जगात आलो तेव्हापासून आपले सारे रक्षण हा निसर्ग करत असतो.
निसर्ग मराठी निबंध 200 शब्दात | nisarg essay in marathi in 200 words
जो आपल्याला शिकवतो ज्ञान देतो आणि आपल्याला अज्ञानाच्या अंधारातुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो तो म्हणजे गुरु आणि निसर्ग म्हणजे काय ? तर आपल्या सभोवताली असलेला सूर्य ,चंद्र, नदी ,झाडे ,पशू-पक्षी ,समुद्र ही सर्व सृष्टी म्हणजे निसर्ग होय. निसर्ग आपल्याला खूप काही देतो . जसे झाड आपल्याला सावली ,फळे, फुले देते . किलबिलणारे पक्षी आपल्याला आनंदी करून टाकतात .
अशा निसर्गरम्य ठिकाणी आपण उत्साही होतो. म्हणजेच निसर्ग माणसाचे मन मोहून टाकणारे एक साधन आहे . त्याचबरोबर निसर्ग आपल्याला एक माणूस म्हणून जगायला शिकवतो . मनुष्य हा भाग्यवान आहे की त्याला निसर्ग सारखा मित्र मिळाला आहे. निसर्गाने आपल्या मानव जातीला जन्म दिला आहे . तो आपल्याला हवा ,पाणी, अन्नधान्य सर्व काही देतो .
या बदल्यात तो आपल्याकडे कोणती हि किंमत मागत नाही . निसर्ग हा मोठा दिलदार आहे . आपल्या जवळ असलेले सर्व काही तो माणसांसाठी उधळून देतो. निसर्ग हा पूर्वजांचा सुद्धा मित्र आहे. पूर्वीच्या साधुसंतांनी आपले संपूर्ण जीवनच निसर्गाच्या सानिध्यात घालवले . संत तुकाराम महाराजांनी निसर्गाला वृक्षवल्ली सगेसोयरे म्हटले आहे. निसर्गातील झाडे आपल्याला कृतज्ञ बनवतात .
फुले आपल्याला इतरांना कसे आनंदित करायचे हे शिकवतात . नदी आपल्याला कसे शांत राहायचे हे शिकवतात. पक्षी आपल्याला संकटावर मात कशी करायची आणि आनंदी कसे राहायचे हे शिकवतात . पण हल्लीचे वाढते प्रदूषण यामुळे आपण आपल्या मित्राचा ,आपल्या गुरुचा म्हणजेच निसर्गाचा ऱ्हास करत आहोत. आपण सर्वांनी आपल्या सुंदर निसर्गाला जपण्याचा निश्चय केला पाहिजे.
- Read Also – Essay On Adarsh Nagrik In Marathi Language
निसर्ग मराठी निबंध 300 शब्दात | nisarg essay in marathi in 300 words
निसर्गाने आपल्या जीवनात जेवढ्या पण आवश्यक गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून दिले आहेत . लाकूड ,अन्नधान्य, कपडे ,जमीन जीवन जगण्यासाठी हवा पाणी अन्न आणि निवारा या निसर्गाने दिलेल्या वस्तू ज्याचा आपण रोजच्या जीवनात उपयोग करतो. पण निसर्गाला सुद्धा सांभाळण्याची गरज आपल्याला आहे . जर निसर्गाचा आपण अपमान केला तर त्याचा कोप होऊ शकतो .जसे कि सुनामी ,भूकंप ,अतिवृष्टी , दुष्काळ काही होऊ शकतो. निसर्ग आपला गुरु आहे त्यांनी हे जग इतके सुंदर बनवले आहे की आपण त्याचा नेहमीच जीवनात उपयोग करतो .

आधी आदि मानव जन्माला आले . त्यांनी निसर्गाचा पुरेपूर फायदा घेतला . त्यांनी दगडावर दगड घासून आग निर्माण केली . जंगलामध्ये मिळणारी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला . झाडाच्या फांद्या, सुक्या काट्या पासून हत्यारे बनवली ज्याने ते शिकार करत. पाण्यातून प्रवास करण्यासाठी झाडा पासून छोट्या-छोट्या होड्या बनवल्या . त्या झाडापासून चाके बनवली आणि लाकडाच्या गाड्या बनवलेल्या ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोगी होत्या . निसर्गाने आपल्याला खूप सारे वरदान दिले आहेत.
त्याला मी माझा गुरु मानते . तर निसर्गापासून मिळणारे लाकूड याचा उपयोग आपण आपल्याला घर बनवण्यासाठी ,स्वयंपाक घरातील वस्तू यासाठी आणि पेपर व ही पुस्तकेही सुद्धा लाकडा पासून बनवतात . जर झाडे नसती तर या वस्तू आपल्याला मिळालेल्या नसतं. या जमिनीवर एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या करून जमिनीची झीज होते . आपणास कधी कळणार झाडे तोडून वातावरणावर किती वाईट परिणाम होतो आहे .
आपल्याला काही दिवसांनी श्वास घेणे मुश्कील होईल . म्हणूनच आज सर्वत्र झाडे लावा झाडे जगवा चे कार्यक्रम राबवतात . चार महिने पावसाळा असतो पण जमीन आपल्याला पोटात पाणी साठवून ठेवते . म्हणून झाडे बाराही महिने हिरवीगार असतात . जमिनीचे पाणी सुकले तर जमीन दुष्काळग्रस्त होईल आणि जीवितहानी लवकरच होईल . त्यामुळे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे .
निसर्ग माझा गुरु आहे कारण तो जसे प्रत्येक ऋतू प्रमाणे आपले रूप बदलून आपल्याला आनंदी ठेवतो आणि उपयोगी वस्तूंचे आपल्याला योगदान देतो . तो कधीच थकत नाही . नेहमी चंद्र ,सूर्य झाडेझुडपे आपली कामे करतात म्हणून मी त्याला आपला गुरु मानतो.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण निसर्ग मराठी निबंध म्हणजेच nisarg essay in marathi बद्दल चर्चा केली . essay on nisarg in marathi म्हणजेच nisarg maza mitra essay in marathii हा निबंध 1०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.