नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी म्हणजेच netaji subhash chandra bose essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी म्हणजेच essay on netaji subhash chandra bose in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी | essay on netaji subhash chandra bose in marathi in 100 , 200 and 300 words
नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी 100 शब्दात | Netaji Subhash Chandra Bose Essay In Marathi in 100 words
नेताजी सुभाष चंद्र बोस आहे हे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते . कठोर परिश्रम आणि महान नेतृत्व या गुणांमुळे ते नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म उडीसा कटक येथे 26 जानेवारी 1897 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते व आईचे नाव प्रभावती होते . नेताजी सुभाष चंद्र बोस एक हुशार विद्यार्थी होते . कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. एकदा त्यांनी इंग्रज प्राध्यापक यांनी केलेल्या भारत विरोधी टिपण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावे लागले होते.
त्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1918 साली ते बीए पास झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यात त्यांचा विश्वास होता. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन असे म्हणत त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या विरोधात पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले . असे सांगण्यात येते की 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमान अपघातात मरण पावले परंतु त्यांचे मृतदेह सापडले नाही. त्यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिले आहे. त्यांनी देशासाठी केलेले त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहे जय हिंद जय भारत.
नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी 200 शब्दात | Netaji Subhash Chandra Bose Essay In Marathi in 200 words
भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे तसेच जय हिंद ही जबरदस घोषणा देऊन जगाचे लक्ष वेधून घेणारे बंगालचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते . नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला त्यांनी कलकत्त्यातील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण इंग्लंडला घेतली .
त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रम मला अभ्यासाची जोड दिली . त्यामुळे ते आयसीएस परीक्षा पास झाले . त्यांनी इंग्रजांची नोकरी पत्करली पण त्यात त्यांचे मन रमले नाही . ते ती नोकरी सोडून ते मायदेशी परतले मायदेशी आल्यानंतर गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीची राजीनामा देणारे ते पहिलेच आयसीएस अधिकारी होते . सुभाष बाबूंनी स्वतंत्र आझाद हिंद सेना स्थापन केली .

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाष चंद्र भारतीय जनता प्रेमाने आदराने नेताजी म्हणू लागली नेताजींनी झाशीची राणी नावाचे स्त्री सैनिकांचे पथक उभारले. त्यांनी दिलेली जय हिंद ही गोष्ट आज सर्वतोमुखी झाली आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान प्रवास करीत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. स्वातंत्र्यसेनानी सुभाषबाबूंची स्वातंत्र्याचे होमकुंड आहुती पडली . प्रखर बुद्धिमत्ता देशभक्ती हे सुभाषबाबूंचे भारतीय जनतेच्या मनात कायमचे कोरले गेले . पुढे दोन वर्षांनी देश स्वतंत्र झाला पण देशासाठी जिवाचे रान करणारा हा शूर नेता कायमचा आपल्याला दुरावला.
- Read Also – Mango Essay In Marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी 300 शब्दात | Netaji Subhash Chandra Bose Essay In Marathi in 300 words
सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामध्ये कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. ते नेताजी या नावाने ओळखले जातात . लहानपणी ते कटक शहरांमध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल मध्ये शिकत होते . त्यावेळी त्यांचे शिक्षक वेणीमाधव दास यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या तील देशभक्ती जागृत केली. वयाच्या पंधराव्या वर्षी ते गुरूच्या शोधात हिमालयात गेले आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांचे शिष्य बनले.
अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत असे. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . तेव्हा इंग्रज प्राध्यापक हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत म्हणून सुभाष चंद्र बोस यांनी अन्यायाविरुद्ध संप पुकारला होता . त्यामुळे त्यांना कॉलेज सोडावे लागले. पुढे 1918 मध्ये त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ते बीए पास झाले .कोलकत्ता मधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या सोबत काम करण्याची त्यांची खूप इच्छा होती.
1921 मध्ये महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस हे एकमेकांना भेटले आणि त्यानंतर गांधींजीनी इंग्रज सरकारविरुद्ध चाललेला असहकार आंदोलनास सुभाष चंद्र बोस सहभागी झाले आणि ते देशातील अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले . भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसबरोबर त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला . त्यांच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या. सार्वजनिक जीवनात नेताजींना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.
आणि 1921साली त्यांनी सहा महिन्यांचा कारावास भोगला . 1938 आली नेत्यांची काँग्रेसचे अध्यक्ष झाले पण 1939 मध्ये काँग्रेसच्या धोरणातील मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला . नेताजींनी अनेक भाषण करून तेथील भारतीय लोकांना आजाद हिन्द फौजेत भरती होण्याचे आवाहन केले. हे आवाहन करताना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे म्हणत भारतीयांना इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला . त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी म्हणजेच netaji subhash chandra bose essay in marathi बद्दल चर्चा केली . नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी म्हणजेच essay on netaji subhash chandra bose in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.