नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध म्हणजेच nadiche atmavrutta essay in marath बद्दल जाणून घेणार आहोत . नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध म्हणेजच nadi ki atmakatha in marathi हा निबंध आपण २०० , ३०० , ५०० शब्दात बघणार आहोत . तर चला सुरु करूया …
Read Also – Godavari River Information in Marathi
Table of Contents
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध | Nadiche Atmavrutta Essay In Marath | Nadi Ki Atmakatha In Marathi In 200 , 300 And 500 Words
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध 200 शब्दात | Nadiche Atmavrutta Essay In Marath In 200 Words
होय .मी नदी बोलते. जिच्या पाण्यामध्ये तुम्ही स्नान करता. माझी पूजा करता, जिच्या पाण्यामध्ये खेळून तुम्ही आनंद लुटता ती मीच . आपल्या निसर्गसृष्टी तील एक महत्त्वाचा घटक . आपल्या मातृभूमीची माता. माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर ,पर्वतमाला च्या कुशीत झाला आहे. लहानपणापासूनच मी फार अवखळ आणि चंचल आहे . कधी मी संथ गतीने वाटे तर कधी मी वेगाने वाहते. पण मी एका जागेवर न थांबता सतत वाहत असते . माझ्या समोर येणाऱ्या संकटांचा सामना करून मी सतत धावत राहते .

निसर्गातील दगड, डोंगर ,झाडे, झुडपे ,वेली अशा अनेक गोष्टी माझी वाट अडवण्याचा प्रयत्न करतात . कधी माझ्यासोबत लपंडाव सुद्धा खेळतात . तरीही मी माझा रस्ता काढून पुढे वाहत राहते . मी पुढे वाहत असताना मला अनेक भाऊ बहीण येऊन मिळतात . त्यांना सोबत घेऊन आम्ही आमचे ध्येय गाठतो . या पृथ्वीवरील संपूर्ण सृष्टीचे जीवन हे माझ्यावरच अवलंबून आहे . मी मैलोन-मैल जाऊन गावांना शहरांना माझे शुद्ध पाणी देते . निसर्गातील पशुपक्षी माझेच पाणी पिऊन आपली तहान भागवतात .
जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हा माझ्याच पाण्यावरच आपली शेती करतो . अन्न-धान्य पिकवतो. हे सगळं पाहून मला कधीकधी प्रदूषण वाढवणाऱ्यांचा राग येतो. तेव्हा वाटते की रौद्ररूप धारण करावं आणि पुर आणावा आणि सारी घाण धुऊन टाकावे पण तुम्ही मला माता म्हणता . म्हणून मी आईच्या मायेने सारे अपराध विसरते. तुम्हा सर्वांना मी एक विनंती करते की मला प्रदूषित करू नका. माझे पाणी तुमच्याच उपयोगाचे आहे . तुमचे जीवन माझ्यावरच अवलंबून आहे. मला शुद्ध ठेवा आणि मला गावागावातून समृद्धीने वाहू द्या.
- Read Also – Retirement Wishes In Marathi
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध 300 शब्दात | Nadiche Atmavrutta Essay In Marath In 300 Words
होय मी नदी बोलते . माझी खळखळ ऐकू येते ना ? तुम्हाला मग माझी जन्म कथा ही ऐका . तो दूर डोंगर दिसतोय ना तिथे माझा उगम झाला . बरीच वळणं घेत मी दगड धोंड्यातून ,खाचखळग्यातून मार्ग काढत काढत येथे येऊन पोहोचले. येथून पुढेही लांब पर्यंत मी वाहत चालले आहे . मार्गात मला अनेक लहान-मोठे प्रवाह येऊन मिळाले आणि माझं पात्र विशाल होत गेले.
तशी एक मी नदी आहे . माझा वाहण्याचा मार्ग कधी सपाट भूमी वरुन , तर कधी आडवळण आतून ,तर कधी पुढे मार्गच नाही म्हणून उंचावरून खाली धबधब्याच्या रूपात असा सतत बदलत राहतो . जागोजागी माझीही रूप बदलत जातात . वेगवेगळ्या प्रदेशातून मी वाहत पुढे चालले आहे . ठिकाणी लोक मला निरनिराळ्या नावांनी ओळखतात . कधी भीमा ,कधी करा, कधी चंद्रभागा ,कधी कृष्णा ,कधी कावेरी ,कधी गंगा अशी माझी अनेक नावे आहेत . प्रत्येक गावात सणावाराला माझी श्रद्धेने पूजा केली जाते .

गावाच्या जत्रेच्या दिवशी माझी देवी रूपात खन आणि नारळ फुले यांनी ओटी भरली जाते . तेव्हा मीही खूप सुखावते . आजकाल माझी तब्येत ठीक राहत नाही याचं कारण तुम्ही लोक जाणता. गावातील सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडले जाते . निर्माल्य याबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या ,बाटल्या, टाकाऊ वस्तू अशा काही घाण वस्तू तुम्ही लोक पाण्यात टाकता . त्याचबरोबर माझ्याजवळ काठावरच्या कारखान्यातून रसायनमिश्रित पाणी घाण माझ्या पात्रात सोडले जाते . यात काचाही असतात . या सर्व गोष्टीमुळे माझे पाणी दूषित होते . हे सगळं पाहून मन दुःखी होऊन जाते कधी कधी राग येतो.
प्रदूषण वाढवणारे तुम्ही माणसांचा मला राग येतो तेव्हा वाटतं की धारण करावं रौद्ररूप आणावा पूर आणि सारी घाण धुऊन टाकावी . पण तुम्ही मला माता म्हणतात . त्यामुळे आईच्या मायेने मी तुमचे सारे अपराध पोटात घालत राहते . माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की माझं पाणी शुद्ध ठेवा . पाणी वाचवा स्वतः आनंदात राहा आणि मलाही आनंदाने राहू द्या . सुखासमाधानाने गावागावातून समृद्धीचा शिडकावा करत मला वाहत राहुद्या .
- Read Also – Essay On Flood In Hindi
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध 500 शब्दात | Nadiche Atmavrutta Essay In Marath In 500 Words
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व नातेवाईक उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो होतो. ताजमहाल ,ऋषिकेश आणि अशाच काही पर्यटन स्थळे आम्ही फिरून नंतर गंगोत्री या ठिकाणी सर्वजण गेलो . असेच गंगेच्या काठावर मी भटकत होते . माझे मन स्थिर होत नव्हते. हृदयामध्ये कुठे तरी हुरहूर लागून राहिली होती. माझ्या स्वैरसंचार पाहून कि काय पण एक हाकी माझ्या कानी आली आणि बावरुन इकडे तिकडे पाहीले. पण मला कोणी दिसेना म्हणून मी भास झाला असावा असे समजून तसेच पुढे चालू लागले.
पण त्यानंतर आणखी एकदा हाक माझ्या कानी पडली. अगं घाबरतेस कशाला ? मला ओळखलं नाहीस का ? किती वेळा माझ्या पात्रात खेळलीस , आनंद लुटला मी आहे आपल्या भारत भूमीची माता गंगा नदी. माझी ओळख विसरलीस का ? थांब थोडावेळ माझी कहाणी ऐका आणि मग विचार कर . माझ्यासोबत तुझा मूल्यवान वेळ व्यतीत कर . माझे थोडीफार सुखदुःख तू समजून घे . माझा जन्म हिमालयाच्या उंच शिखरावर झाला . लहानपणी मी फारच अवखळ होते. कधी एका जागेवरून न थांबता मागेपुढे न पाहता एकसारखी होऊन वाहत राहायचे . दगडगोटे, झाडेझुडपे यांच्या मधून रस्ता काढत फक्त धावत राहायचे . वाटेतील वेली माझी वात अडवण्याचा प्रयत्न करत.
माझ्याशी लपंडाव खेळत. पण मी कुणालाही न सापडता धावत राहायचे . मला अनेक भाऊ-बहीण येउन मिळायचे . त्यामुळे माझा वेग वाढतच जाते असे . कळसा पासून पायथ्यापर्यंत जाताना रस्त्यात अनके संकटे येत त्या सर्व संकटांना तोंड देत मी माझे ध्येय गाठत असत. एखाद्या योध्याप्रमाणे मिळत लढत असत आणि पुढे जात असत . नंतर मात्र वाट चालणे मुश्कील होई कारण सपाट रस्त्यावर शेती आणि अशा अनेक अडथळे पार करण्याचे जिकरीचे होई. त्यांच्याशी सामना करत माझी स्वारी तसेच आपले घोडे पुढे चालत . पण या सर्व प्रवासामध्ये मला माझ्या भाऊ-बहिणी शेवट पर्यंत खूप साथ दिली आणि मैलोनमैल धावत सर्व गावांना माझी शुद्ध जल वाटत राहिले सर्वांची तहान भागवत राहिली .

त्यावर किती हेक्टर जमिनींनी आपले पोट भरून घेतले . सर्व शेते माझ्यामुळे हिरवेगार दिसू लागली. शहरे व अन्नधान्य संपन्न झाली .मी गावागावातून जाताना गावातील मंदिरांचेही दर्शन घेऊन जाते . त्यावेळी गावातील लोक माझी पूजा करतात. नारळ फोडतात त्यावेळी मी सुखावते, आनंदित होते . पण आजच्या काळात माझी तब्येत ठीक नसते . तुम्ही लोकांनी पाण्यात टाकलेला कचरा ,प्लास्टिक यामुळे माझे पाणी प्रदूषित होत आहे. कारखान्यातील सांडपाणी माझ्या पात्रात सोडून देतात त्यामुळे मी खूप दूषित होते . माझे आरोग्य या गोष्टी मुले बिघडत आहे . माझ्या या जलपत्रात राहणारे जीव जलचर प्राणी वनस्पती मरण पावू लागले आहेत . त्यांच्याही जीवनाला धोका पोहोचत आहे. लोक मला गलिच्छ करत आहे .
माझा श्वास गुदमरत आहे. मनुष्याला आपल्या बुद्धीचा खूपच अभिमान आहे. त्यामुळे जल शुद्धीकरण तसे अनेक प्रकल्प राबवले जातात पण ते प्रदूषण न करता सर्वांना शुद्ध पाण्याचा उपयोग व उपभोग घेऊन दिला तर जलचर तरी सुखी होती पण पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी माझ्या पात्राचे व पाण्याचे प्रदूषण करत आहेत . गणपती विसर्जनासाठी आल्यानंतर तसेच इतर वेळीही निर्माल्य माझ्या प्रवाहांमध्ये सोडून देतात . आणि मला दूषित करतात . काही जण तर वाहने सुद्धा माझ्या पात्रात धुतात . खरतर मला तुम्ही सर्वजण खूपच पवित्र मानतात .
पण तुम्हीच माझ्या या पवित्र मनाला डाग लावत आहात . वाळू व रेती काढून माझ्या पात्रातून नेऊन मला कोरडे ठणठणीत करता आहेत . कशी होणार माझी व माझ्या सहवासातील झाडांची जोपासना ? पण हे मनुष्याला केव्हा कळणार ?आमच्यावरील अन्याय अत्याचार केव्हा थांबणार ? आज मनुष्याला सावध करणे गरजेचे झाले आहे . म्हणून मी माझी कथा आता तुला सांगून माझे मन मोकळे करत आहे . हि नवीन पिढी कदाचित त्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढेल आणि आम्ही खरंच पुन्हा एकदा सुखाने जीवन जगू शकू. तुमच्या नवीन पिढीने यातून काही तरी बोध घ्यावा आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात म्हणून माझी एक धडपड.
- Read Also – Majha Awadata Khel Kho Kho Nibandh
नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध 1000 शब्दात | Nadiche Atmavrutta Essay In Marath In 1000 Word
मी हिमालयातून प्रवाहाच्या रूपात बाहेर येणारी नदी आहे. आज मी माझ्या आत्मचरित्रातून तुम्हाला माझ्या भावना सांगणार आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की इथे भारताच्या भूमीवर लोकांनी मला गंगा यमुना सरस्वती गोदावरी इत्यादी अनेक नावे दिली आहेत. मी कोणत्याही बंधनाशिवाय स्वातंत्र्याने वाहत आहे. कुठेही थांबत नाही. माझ्या मार्गात अनेक अडथळे आहेत. पण त्या अडचणी पार करूनही मी सहज बाहेर पडतो.
शेतकरी त्यांच्या शेतात उगवणाऱ्या पिकांना माेठ्या पाण्यानेच पाणी देतात. आज माणूस आपल्या स्वार्थासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून स्वतःचे नुकसान करत आहे, त्यामुळेच नैसर्गिक आपत्तींमुळे, सर्वत्र ज्या नद्या आहेत, त्यांचा फायदा माणसाला होत नाही. भारताच्या भूमीवर अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे उन्हाळ्यात नद्यांचे पाणी आटते आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी माणूस आसुसतो. त्यामुळे माेठ्या पाण्याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो.
हिमालयातून बाहेर पडल्यावर अनेक खडकांमधून मी बाहेर पडतो. त्यामुळे माझ्या पाण्याच्या माध्यमातून लोकांना खूप फायदा होतो. माझ्या पाण्यातून लहान नालेही निघतात, ज्याचा उपयोग लोक त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी करतात आणि जेव्हा मी नापीक जमिनीतून बाहेर पडतो तेव्हा ती ओसाड माती पिकांसाठी योग्य बनते. कारण जेव्हा मी हिमालयातून बाहेर पडतो, अनेक मार्ग पार करून, तेव्हा माझ्या पाण्यात इतके गुण असतात की नापीक जमीनही सुपीक होते. माझ्या या गुणांमुळे लोकांनी मला वेगवेगळी नावेही दिली आहेत.
आजच्या काळात माणसाचे प्रत्येक काम विजेशिवाय अशक्य आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणूनच माझ्या पाण्यातूनही वीज निर्माण होते कारण माणसाच्या घर आणि ऑफिसच्या सर्व कामात वीज लागते. माझ्या पाण्याशिवाय विजेचे उत्पादन अजिबात शक्य नाही, जी काही यंत्रे विजेवर चालतात, त्यांच्यासोबत बरेच काम केले जाते. जर माझ्या हृदयात वीज निर्माण करण्याची क्षमता नसती, तर आज मानव टीव्ही, रेडिओ आणि मनोरंजनाची इतर साधने पाहू आणि ऐकू शकला नसता. माेठ्या पाण्याच्या माध्यमातून मोठमोठे बंधारे बांधून त्यामध्ये विद्युत जनित्र बसवून वीजनिर्मिती केली जाते.
माझ्या पाण्याचे धार्मिक महत्त्वही आहे. लोक धार्मिक विधींमध्ये माझे पाणी वापरतात आणि अनेक मोठ्या सणांमध्ये ते मला भेटायला येतात आणि स्नान करतात. अमावस्या, पौर्णिमा, दिवाळी, दसरा, होळी आदी सणांच्या निमित्ताने लोक माझ्याकडे नक्कीच येतात.कारण माझ्या पाण्यात आंघोळ केल्याने सर्व जीव सुख-शांतीचा अनुभव घेतात.
माझ्या पाण्याच्या सौंदर्यामुळे आणि कोमलतेमुळे मी सर्व लोकांना माझ्याकडे आकर्षित करतो. घरातील लोकही माझ्या पाण्यातून देवाला प्रथम स्थान देतात. कारण माझे पाणीही शुद्ध मानले जाते आणि तो पूजेचा योगही मानला जातो. माणूस ज्या प्रकारे आपल्या निसर्गाचा समतोल बिघडवत आहे, त्याच प्रमाणे अनेक वेळा अतिवृष्टी झाली की पाण्याची पातळी खूप वाढते, त्यामुळे पूरस्थिती येते. यामुळे मी माझे अत्यंत भयंकर रूप धारण करून अनेक गावे आणि किनारी भाग नष्ट करतो.
म्हणजे ते माझ्या पाण्यात शोषले जातात. माझ्यामुळे अनेकांची घरेही उद्ध्वस्त होतात. त्यानंतर जेव्हा मी शांत होऊन परत आलो तेव्हा माझ्यामुळे किती विनाश झाला याचा माझ्या मनात खूप पश्चाताप होतो. मी एक नदी आहे त्यामुळे मलाही माझ्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. मला त्या अडचणी माणसांमार्फतच द्याव्या लागतात कारण मानव ज्या प्रकारे माझे पाणी दूषित करत आहेत.
त्यातील कचरा आणि इतर घाण किंवा कारखान्यांचे घाणेरडे पाणी यामुळे माझे हृदय इतके दूषित होत आहे की ते पिऊन अनेक माणसे आणि प्राणी मरत आहेत. म्हणूनच माझ्या आयुष्यातील ही अडचण मला खूप त्रास देते. जिथे भारतात अनेक ठिकाणी माझी देवीसारखी पूजा केली जाते आणि तिथून लोक मला खूप घाणेरडे करतात असे अनेकदा दिसून येते. लोक माझे पाणी कसे प्रदूषित करत आहेत हे पाहून मला खूप वाईट वाटते.
पण आता आपले सरकार यासाठी खूप चांगली पावले उचलत आहे आणि मानव देखील पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाला आहे, ते नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण हे सर्व पुरेसे नाही, लोकांनी माझे महत्त्व समजून घ्यावे आणि जागरूक व्हावे आणि जाणूनबुजून मला गलिच्छ करू नये अशी माझी इच्छा आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध म्हणजेच nadi ki atmakatha in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध म्हणेजच nadiche atmavrutta essay in marathi हा निबंध आपण २०० , ३०० , ५०० शब्दात बघितला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता , व हा निबंध तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका …..
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.