नमस्कार मित्रांनो आज आपण माझा गाव निबंध बद्दल म्हणजेच my village essay in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . marathi nibandh maza gav म्हणजेच essay on my village in marathi हा निबंध तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये १०० , ३०० आणि ५०० शब्दामध्ये वाचायला मिळेल. ह्या पोस्ट च्या साहयाने माझा गाव निबंध तुम्ही अभ्यासात व परीक्षेत सहज लिहू शकता .
माझा गाव निबंध मराठी | Marathi Nibandh Maza Gav In 100 , 300 And 500 Words
माझा गाव निबंध मराठी मध्ये 100 शब्दात | my village essay in marathi in 100 words
माझ्या गावाचे नाव आहे बोरगाव . जे समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे . माझे गाव म्हणजे सौंदर्य शुद्धता व शांततेचे मिलाप. हिरवीगार शेती, झाडे, पक्षी प्राणी आणि खूप काही माझ्या गावात पाहायला मिळतात . गावात जवळपास एक हजार लोक राहतात. शेती हाच गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात दोन तळे व अनेक विहिरी आहे . त्यामुळे पाण्याची कमतरता नाही .

गावातील लोक अतिशय साधे भोळे आहे व आपसात मिळून-मिसळून राहतात .आमचे गाव हे समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे गावातले वातावरण नेहमी थंड व प्रसन्न असते . गावातील काही लोक मत्स्य व्यवसाय करतात . संध्याकाळी बरीच लहान मुले व तरुण मंडळी समुद्रकिनारी फेरफटका मारायला जातात . खरच माझे गाव खूप सुंदर आहे .
माझा गाव निबंध मराठी मध्ये 300 शब्दात | essay on my village in marathi in 300 words
माझे गाव माझ्या गावाचे नाव रामपूर आहे . ते डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक निसर्गरम्य गाव आहे. या गावातील डोंगर ,नदी ,झाडे ,झुडपे ,पशुपक्षी या नैसर्गिक अलंकारांमुळे माझे गाव एकदम खुलून दिसते. माझ्या गावामध्ये आमचे घर आहे तिथे माझे आजी आजोबा राहतात . सुट्टी लागली की मी नेहमी आमच्या गावात येते. माझ्या गावाची लोकसंख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे .
गावातील तळ्याकाठी असंख्य फुले फुलतात व वारा आला की ते डोलू लागतात. इथे उगवलेले अन्न शुद्ध , स्वच्छ व पौष्टिक असते . तिथे सर्व लोकांची घरे एक सारखीच आहेत. ना तिथे उंच इमारती ना मोठे बंगले तिथे शहरासारखे मला इमारतींचे पर्वत नसून हिरवेगार खरे पर्वत बघायला मिळतात . त्यामुळे मला गावाकडे शुद्ध खेळती हवा अनुभवायला मिळते. माझ्या गावाकडे मला गाय ,बैल, घोडा, कुत्रा, बकरी, मांजर, म्हैस असे विविध प्राणी बघायला मिळतात गाय-म्हशींचे गोठे , कोंबड्यांचे खुराडे अशा अनेक गोष्टी मला तिथे बघायला मिळतात .

माझ्या गावातील लोक अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ आहेत . वर्षातील सगळे सण सर्व लोक एकत्र येऊन गोडीने साजरी करतात . कोणत्याही कामासाठी ते एकमेकांच्या मदतीला तयार असतात . अशा या एक एकोप्या मुळे माझे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते .. गावाच्या मध्यभागी देवीचे प्राचीन मंदिर आहे . मंदिराला मोठे प्रशस्त असे आवार आहे. ह्या गावात दत्त मंदिर ही आहे . गावातील सर्व लोक एकत्र येऊन या मंदिरात भक्तीभावाने पूजा करतात . दत्तजयंतीला या मंदिराजवळ जत्रा भरते . त्यावेळेस भजन-कीर्तनाचे कार्यक्रम असतात.
माझ्या गावातील नदीमध्ये मी पोहायला जाते . नदीमध्ये पोहण्याचा आनंद विलक्षण असतो . नदीकाठी वसलेले हिरवीगार शेती आणि समोर उंच उंच डोंगर रांगा हे दृश्य अतिशय सुंदर दिसते . गावातला पहाटेचा सूर्योदयाचा मनाला भुरळ घालणारा असतो तसाच सायंकाळचा सूर्यास्त सुद्धा मनाला हुरहुर लावून जाणारा असतो . सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर वातावरणाची शोभा अप्रतिम असते . गोठ्यातील जनावरे चरायला निघत असलेली , आंबा चिक्कू या झाडांवरून पक्ष्यांचा मंजुळ आवाज ऐकू येतो . असे माझे सुंदर गाव मला खूप आवडते म्हणून दर सुट्टीत नवा अनुभव घेण्यासाठी मी माझ्या गावी जाते.
Read Also – माझी शाळा मराठी निबंध 2021 – Best My School Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words
माझा गाव निबंध मराठी मध्ये 500 शब्दात | my village essay in marathi in 500 words
माझ्या गावाचे नाव डोणोली आहे . माझे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. माझ गाव हिरवागार नैसर्गिक देणगी मुळे नटलेले तर आहेच परंतु इथल्या असणाऱ्या ह्या हिरवागार परिसरामुळे प्रदूषण हे तुम्हाला इथे पाहायला सुद्धा मिळणार नाही . माझ्या गावामध्ये असलेल्या या सुंदर अशा निसर्गसौंदर्यामुळे माझं गाव अधिकच खुलून दिसत आहे .त्यामुळे मुंबई वरून येणाऱ्या माझ्या मित्रांना किंवा आमच्या पाहुण्यांना आमचे गाव फार आवडते . एक आदर्श गाव म्हणून डोणोली या गावाला ओळखले जाते.
माझे गाव शिस्तप्रिय आहे . इथले प्रत्येक माणूस हा शिस्तप्रिय आहे आणि समाजप्रिय हि आहे. म्हणूनच माझे गाव आमच्या पंचक्रोशीत एक आदर्श गाव म्हणून नावा रूपास आले आहे . माझ्या गावाची लोकसंख्या पाच हजार पेक्षा अधिक आहे . माझ्या गावातील लोक प्रेमळ तर आहेतच परंतु मनमिळाऊ सुद्धा आहेत. माझ्या गावातील सर्व लोक मोठ्या तसेच वृद्ध व्यक्तिंचा आदर करतात .त्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा हे गुण घराघरात शिकवले जातात . माझ्या गावात श्री भैरवनाथाचे देवालय आहे. श्री भैरव नाथाचे देवालय सुंदर व मोठे आहे. मंदिरामध्ये दररोज नियमितपणे श्री भैरवनाथाची पूजा केली जाते . या गावातील एक जागृत देवस्थान अशी या देवाची ख्याती आहे. माझ्या गावात मुबलक प्रमाणात पाण्याची सोय आहे.
गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने नित्य नियमित पाणीपुरवठा केला जातो . यामुळे गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे . माझ्या गावची यात्रा मंदिर भैरवनाथ यात्रा डोणोली ही दर वर्षी रंगपंचमी या दिवशी भरते. यात्रा खूप मोठी भरते. यात्रेत विविध प्रकारचे दुकाने मांडली जातात . त्यामुळे ह्ययात्रेत आम्ही सुद्धा खूप खरेदी करतो . मोठमोठी आकाश पाळणे असतात तसेच लहान पाळणे याचा आनंद घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक आतुर असतात . यात्रेमध्ये प्रत्येक घरातील पाहुणे आणि तरुणाई यामुळे यात्रेतील परिसर गजबजून जातो .

तरुणाई यात्रेचा आनंद भरभरून घेतात. गावची यात्रा ही प्रामुख्याने दोन दिवस भरते हे दोन दिवस म्हणजे लहानग्यांना न संपू वाटणारे असतात . कारण रंगपंचमी व यात्रा यांचा आनंद त्यांना घ्यायचा असतो . प्रत्येक जण ह्या यात्रेची आवर्जून वाट पाहत असतो . माझ्या गावामध्ये एक आदर्श व सुंदर शाळा आहे . शाळेचे नाव केंद्र शाळा विद्यामंदिर डोणोली आहे . गावातील शाळा ही प्राथमिक शाळा आहे . शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग शिकवले जातात . शाळेतील मुलं हि हुशार व शिस्तप्रिय आहेत . शाळेशेजारी अंगणवाडी, बालवाडी सुद्धा आहे .
शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे . त्यामुळे प्रत्येक मुलाला खेळाची आवड निर्माण झाली आहे . त्यामुळे इथली मुलं मोबाईल फोन च्या गेम मध्ये न रमत कबड्डी , खो – खो अश्या खेळात जास्त रमतात . आदर्श गावाप्रमाणेच आमची गावची शाळा आदर्श शाळा व सुंदर शाळा आहे. शाळेतील शिक्षक सुद्धा प्रेमळ व अभ्यासुप्रिय आहेत . माझ्या गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात . प्रत्येक जण दुसऱ्या च्या अडीअडचणीत धावून जातो . गावातील लोक गरिबांना मदत करतात .
निराधारांना सुद्धा आधार देण्याचे काम हे माझ्या गावातील गावकरी कोणती हि अपेक्षा न ठेवता करतात. विविध प्रकारचे सण जसे कि होळी , दिवाळी गणेश चतुर्थी हे सण गावातिलक लोक एकत्र येऊन साजरे करतात व इतर समारंभ हि मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात . तसेच आजारी रुग्णांसाठी गावातच दवाखान्याची सोय आहे. दवाखान्यातील विविध प्रकारच्या सोयी पुरविल्या जातात . स्वच्छ सुंदर गाव आदर्श गाव तंटामुक्त गाव आणि सुखी समृद्ध गाव म्हणून डोणोली म्हणजेच माझे गाव ओळखले जाते. म्हणूनच मला माझे गाव खूप खूप आवडते.
ह्या पोस्ट मध्ये आपण माझा गाव निबंध बद्दल म्हणजेच essay on my village in marathi बद्दल जाणून घेतले . marathi nibandh maza gav म्हणजेच my village essay in marathi हा निबंध तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये १०० , ३०० आणि ५०० शब्दामध्ये वाचायला मिळाला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असल्यास कंमेंट नक्की कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.
ताज्या बातम्या / व्हिडीओसाठी आजच Nashikfast.com आणि युट्युब चॅनेल ला भेट द्या .