माझी शाळा मराठी निबंध 2023 | Best My School Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये माझी शाळा मराठी निबंध म्हणजेच my school essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . तुम्हाला mazi shala nibandh in marathi हा निबंध येथे १०० , ३०० आणि ५०० शब्दात वाचायला मिळेल. माझी शाळा मराठी निबंध म्हणजेच my school essay in marathi हा निबंध तुम्ही अभ्यासात व परीक्षेत ह्या पोस्ट च्या साहयाने सहज लिहू शकता .

माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Nibandh In Marathi In 100 , 300 And 500 Words

माझी शाळा मराठी निबंध 100 शब्दात | My School Essay In Marathi In Marathi In 100 Words

माझी शाळा ज्ञानाचे मंदिर आहे माझ्या शाळेचे नाव राजगुरू ह म पंडित विद्यालय सफाळे हे आहे . माझी शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे . माझ्या शाळेची इमारत खुप प्रशस्त व सुंदर आहे. माझ्या शाळेत ३० वर्गखोल्या , सुसज्ज संगणक कक्ष , क्रीडांगण सभागृह व वाचनालय , प्रयोगशाळा इत्यादी सोयी सुविधा आहेत .

माझी शाळा मराठी निबंध 2021 - Best My School Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो . माझ्या शाळेचे शिक्षक खूपच प्रेमळ आहेत ते आम्हा सर्व मुलांना खूप छान शिकवतात . माझ्या शाळेत सर्व थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी इत्यादी साजरी केली जातात . मला माझी शाळा माझे दुसरे घर वाटते . मला माझी शाळा खूप खूप आवडते .

माझी शाळा मराठी निबंध 300 शब्दात | Mazi Shala Nibandh In Marathi In 300 Words

कागद नाही कुठे नाही पालापाचोळा, वर्ग परिसरही स्वच्छ जसा, तशी स्वच्छ सुंदर माझी शाळा. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यामंदिर आहे. माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ आणि अत्यंत रमणीय आहे. ती गावापासून थोडी दूर निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे. माझी शाळा अर्ध्या एकर क्षेत्रात पसरलेली आहे . त्यामध्ये शाळेची इमारत कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे . माझी शाळा सेमी इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे. आमच्याकडे पहिली ते दहावीपर्यंत दहा वर्ग आहेत.

माझ्या शाळेत प्रत्येक वर्गात अ ,ब आणि क तुकड्या आहेत. व आमच्या शाळेत दुपार शिप चे सुद्धा वर्ग भरवले जातात . ज्या मध्ये ड व ई ह्या तुकडीचे वर्ग भरतात . प्रत्येक तुकडी मध्ये सुमारे 50 विद्यार्थी आहेत. आणि माझ्या शाळेची एकुण विद्यार्थी संख्या एक हजार एवढी आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे . शाळेत मुलीची संख्या वाढवण्यासाठी पटसंख्या वाढविण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते. आणि त्याचे परिणाम खूप चांगले आहेत.

माझी शाळा मराठी निबंध 2021 - Best My School Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

माझी शाळा फक्त आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करीत नाही तर ती आमच्यावर उत्तम संस्कार कसे होतील व भारताचा सुजान सुसंस्कारीत नागरिक कसा तयार होईल . हे सातत्याने पाहते यासाठी सर्व नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी सर्व भारतीय सण मोठ्या उत्साहात माझी शाळा साजरे करते .

प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझी शाळा वैयक्तिक लक्ष देते. आवडते मज मनापासुनी शाळा ,लाविते लळा हि जशी माऊली बाळा . खरंच माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हा आदर्श आहे. माझ्या शाळेत शाळेच्या वेळे व्यतिरिक्त ही अधिक मार्गदर्शन केले जाते . स्कॉलरशिप, नवोदय तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. माझ्या शाळेत चित्रकला, नृत्य ,खेळ ,गायन ,भाषण ,लेखन ,वाचन असे अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते .

आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्कृष्ट असतो या वर्षी दहावीच्या परीक्षेत 99 टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे . आम्हाला जिल्हास्तरावर आदर्श शाळा पुरस्कार सुद्धा मिळाला . शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या यशामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. माझ्या शाळेचे शिक्षक आम्हाला अभ्यासासोबतच बाहेरील स्पर्धा परीक्षा विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यास नेहमी प्रेरित करतात . माझी शाळा खेळ तसेच इतर सर्व उपक्रमात नेहमी आघाडीवर असते .

Read Also – होळी निबंध व रंगपंचमी मराठी निबंध 2021 – Best Holi Festival Essay In Marathi Language

माझी शाळा मराठी निबंध 500 शब्दात | My School Essay In Marathi In Marathi In 500 Words

प्रत्येक मुलाला चांगले घडविण्यात आई-बाबांचा जेवढा वाटा असतो तितकाच वाटा शाळेचा ही असतो हे प्रत्येकालाच माहित असेल . त्याचप्रमाणे मला घडविण्यात हि माझ्या शाळेचा फार मोठा वाटा आहे . माझ्या शाळेचे नाव शांतिनिकेतन असे आहे . माझी शाळा हे शहरातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. माझ्या शाळेमध्ये पहिली ते दहावी चे वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्ग हवेशीर आणि टापटीप आहेत . शाळेभोवती विविध फुलझाडे लावलेली आहेत. माझ्या शाळेमध्ये खेळण्यासाठी मोठे मैदान आहे जिथे आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळतो.

माझ्या शाळेत शिस्तीचे फार महत्त्व आहे . शाळेतील सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आणि शिस्तीने वागतात. दररोज शाळेची सुरुवात ही प्रार्थनेने होते . प्रार्थना सुरू झाली की शाळेचे वातावरण अत्यंत शांत आणि रमणीय होते . माझ्या शाळेमध्ये मोठे वाचनालय आहे. विविध प्रकारची आणि विविध भाषेतील पुस्तके आहेत . रिकामा वेळ मिळाला की आम्ही मित्र-मैत्रिणी वाचनालयात जाऊन विविध प्रकारची पुस्तके वाचतो . शाळेतील विज्ञान प्रयोग शाळेत आम्ही विविध प्रकारचे प्रयोग करतो . त्या प्रयोगशाळेमध्ये आम्हाला विज्ञानातील जादू बघायला मिळते . त्याचबरोबर माझ्या शाळेत संगणक लॅब मोठे सभागृह सुद्धा आहे .

माझ्या शाळेचे शिक्षक अत्यंत हुशार आणि मनमिळावू आहेत . माझ्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ,विविध सण प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन ,थोर नेत्यांची जयंती असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. या कार्यक्रमांतर्गत चित्रकला, रांगोळी स्पर्धा , भाषणे यांचे आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांमध्ये आमच्या शाळेचे शिक्षक नेहमी आम्हाला मदत करतात . आमच्या शाळेचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागतो . सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात . दरवर्षी चांगले गुण मिळाल्याचा आनंद हा प्रत्येक विद्यार्थ्याला असतोच . पण शाळा सोडण्याचे दुःखही मुलांच्या चेहऱ्यावर दिसत असते .

माझी शाळा मराठी निबंध 2021 - Best My School Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

मी अशा सुंदर आणि आदर्श शाळेत घडले हे माझे फार मोठे भाग्य आहे . माझ्या शाळे मुळेच मला चांगले मित्र मैत्रिणी मिळाल्या आहेत. बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास मला माझ्या शाळेमुळे मिळाला आहे . मला माझ्या शाळेचा अभिमान आहे . मी माझ्या शाळेचा आदर करते आणि माझे माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे.

माझ्या शाळेमध्ये खेळण्यासाठी मोठे मैदान आहे जिथे आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळतो. मी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी होतो. माझ्या शाळेमध्ये अभ्यासासोबत खेळालाही तितकेच महत्त्व दिले जाते . खेळा सोबतच आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे व्यायाम शिकवले जातात . त्याचबरोबर आम्हाला खेळाचे व्यायामाचे महत्त्व सांगितले जाते . आमच्यात एक टेक प्रेमी प्रिन्सिपल शिक्षक आणि एसएससी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार जिंकला आहे . मला शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे.

आमची एक विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी जिल्हा टॉपर आणि मराठी मध्ये राज्यात पहिली आली ह्यचे सर्व श्रेय आमची शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि प्राचार्य सरांना जाते. शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर सुद्धा खरेदी केल्या आहेत . पालक हे जाणून खुश आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.

माझी शाळा ग्रामीण भागातली असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आठवड्यात प्रिन्सिपल सर यांनी सांगितले की या वर्षापासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणीकृत प्रणालीवर घेतले जातील .

मी आशा करते की आमची शाळा असेच अनेक अष्टपैलू विद्यार्थी तयार करत राहील आणि आमचे भविष्य सुंदर आणि कार्यक्षम बनवण्यास नक्कीच मदत करत राहील .मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो कारण माझी शाळा फक्त शिकवण्याचे काम करीत नाही तर आम्हा मुलांवर उत्तम संस्कार करते.माझे शिक्षक माझे खरे मित्र व मार्गदर्शक आहेत. कधी नसावी सुट्टी मजला , न कधीच यावा उन्हाळा , अशी असावी माझी शाळा यावा, न मजला कंटाळा यावा …..

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझी शाळा मराठी निबंध म्हणजेच my school essay in marathi बद्दल जाणून घेतले . ह्या पोस्ट मध्ये mazi shala nibandh in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात वाचायला मिळाला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

मराठीमध्ये विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी मराठी किडा वेबसाईट ला नक्की भेट द्या .

Leave a Comment