शाळेची सहल मराठी निबंध 2023 | My Picnic Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण शाळेची सहल मराठी निबंध म्हणजेच my picnic essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . शाळेची सहल मराठी निबंध म्हणजेच essay on my picnic in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

शाळेची सहल मराठी निबंध | essay on my picnic in marathi language in 100 , 200 and 300 words

शाळेची सहल मराठी निबंध 100 शब्दात | My Picnic Essay In Marathi Language in 100 words

शाळेची सहल हा क्षण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण व अविस्मरणीय क्षण असतो . अशाच प्रकारे माझ्या सुद्धा आयुष्यात हा क्षण आला होता आमच्या शाळेची सहल गेली होती महाबळेश्वर या ठिकाणी . महाबळेश्‍वरला जाण्याचे निश्चित झाले होते आम्ही प्रवासाला सुरुवात केली बस मध्ये आम्ही छान गाणी म्हणत प्रवास सुद्धा सुरू केला.

तेथे गेल्यानंतर आम्ही वेण्णा तलावात नौकावहान केले . त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांच्या प्रतापगड या किल्या वर गेलो व घरी येताना मॅप्रो गार्डन ला भेटते तेथून आम्ही थोडीशी खरेदी सुद्धा केली . अशाप्रकारे ह्या शाळेच्या सहलीत आम्ही खूप मज्जा केली . हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही .

शाळेची सहल मराठी निबंध 200 शब्दात | My Picnic Essay In Marathi Language in 200 words

आमची सहामाही परीक्षा झाली होती आणि सर्वांनी खूप मन लावून अभ्यास सुद्धा केला होता व या मध्येच आम्ही खूप थकलो सुद्धा होतो आणि त्याच वेळी आमचे सर आमच्या वर्गात आले व त्यांनी आम्हाला शाळेच्या वार्षिक सहली बद्दल माहिती सांगितली. ते ऐकताच आम्ही खूप खुश झालो. आम्ही आमच्या मित्र-मैत्रिणी सोबत सहली विषयी चर्चा करत होतो .

सहलीला जाण्या अगोदरच तेथे काय काय करायचे हे आमच्या मनात पक्के झाले होते . खाण्यापिण्याचे सर्व सामान आम्ही आमच्या बॅगमध्ये भरून सहलीच्या दिवशी तयार झालो होतो . सहलीचा त्या रात्री आम्हाला झोपच लागली नाही . त्यादिवशी सकाळी सात वाजता आम्ही शाळेत पोहोचलो . समोरच बस उभी होती. सामान चढवले गेले . आम्ही सगळे बस मध्ये चढलो व आमची सहलीचा प्रवास सुरू झाला आम्ही बसमध्ये छान गाणी म्हणत व निसर्गाचा आनंद घेत चाललो होतो . तीन-चार तासातच आम्ही सहलीच्या ठिकाणी पोहोचलो .

आमच्या शाळेची सहल ही महाबळेश्वर या ठिकाणी होती तिथे आम्ही सनसेट पॉईंट वेण्णा तलाव व प्रतापगड असे काही स्थळांना भेट देणार होतो. सर्वप्रथम वेण्णा तलावाला भेट दिली . त्या नंतर आम्ही ऐतहासिक महत्व असलेल्या प्रतापगड किल्या वर गेलो आणि जेवण करून थोडी विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी सनसेट पॉइंट पाहण्यासाठी गेलो . सनसेट पॉईंटवरून सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच होती. त्या नंतर आम्ही जाताना मप्रो गार्डन ल भेट दिली . ही सहल फक्त एक दिवसाची होती परंतु त्या सहलीची आठवण आमच्या मनात अजून ही कायम आहे . अशाप्रकारे ही शाळेची सहल मी कधीच विसरू शकत नाही.

शाळेची सहल मराठी निबंध 300 शब्दात | My Picnic Essay In Marathi Language in 300 words

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करुया मस्तीने हे गाणं कानावर पडल तर हिरव्यागार रम्य निसर्गातून आपण छान भटकंती करत आहोत असे दृश्य डोळ्यासमोर येते . मी आजपर्यंत आणि प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला आहे . या सर्व सहलीमधून माझी सर्वात अविस्मरणीय सहल म्हणजे शाळेतील महाबळेश्वर ची सहल. शाळेत सर जेव्हा सहलीची सूचना घेऊन आले तेव्हा आम्ही खुप खुश झालो . सरांनी सहली विषयी सर्व माहिती सांगितली .

शाळेची सहल मराठी निबंध 2021 | My Picnic Essay In Marathi Language

ती दोन दिवसांची सहल होती त्या सहली मध्ये आम्ही वेण्णा तलाव ,मॅप्रो गार्डन ,सनसेट पॉईंट ,प्रतापगड किल्ला या ठिकाणी जाणार होतो . सर सहली विषयी माहिती सांगून वर्गाबाहेर गेले आणि आमची सहली बद्दलची चर्चा सुरू झाली . कधी तो दिवस उजाडतो आणि आम्ही जातो असे आम्हाला झाले होते . सहलीला दोन दिवस बाकी असताना आमची तयारी सुरू झाली . पाण्याची बाटली ,गोळ्या बिस्किटे, कपडे अंथरुण, खेळायला पत्ते अशा खाण्याची व राहण्याची सामग्री मी माझी बॅग भरली. सहलीला जाणार ह्या कल्पनेने मला त्या रात्री झोपच लागत नव्हती .

सहलीचा दिवस उजाडला पहाटे लवकर चार वाजता उठले . सर्व आवरून सहा वाजता मी बाबांसोबत शाळेत गेले . सर्वजण वेळेत हजर होते . गणपती बाप्पा मोरया बस निघाली गाणी गप्पा गोष्टी करत आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आकाश हिरवी झाडे उंच पर्वत गार गार वारा असे पहाटेचे सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले . निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर पाहण्यासाठी मी खूप उत्सुक झाले होते . सर्वप्रथम आम्ही भेट दिली वेण्णा तलावाला , कोकणातील लाल दगडाचा वापर करुन तलावाचे सुशोभीकरण आम्ही पाहिले.

आम्ही त्या तलावात नौकाविहाराची आनंद घेतला आणि इतर पर्यटक तलावात नौकाविहाराची आनंद घेत होते. निसर्गाचे सौंदर्य असेल बघत बसावे असे आम्हाला वाटत होते. तिथुनच निघाल्यावर महाबळेश्वर लोकल मार्केटमध्ये आम्ही बरीच खरेदी केली . दुसऱ्या दिवशी आम्ही प्रतापगडावर गेलो . प्रतापगड चढताना महाराजांच्या त्या काळाची आठवण झाली. शिक्षकांनी आम्हाला तेथील महाद्वाराची विषयी किल्ल्या विषयी माहिती सांगितली. गडावर जाताना शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा भेटीचा प्रसंग आठवत होता .

शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अभिमान वाटला . त्या संध्याकाळी आम्ही मॅप्रो गार्डन ला भेट दिली महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे . मला स्ट्रॉबेरी खूप आवडतात मी तिथून स्ट्रॉबेरी खरेदी केली सर्व ठिकाणी पाहून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो . ह्या मध्ये मला निसर्गाच्या सौंदर्या सोबतच ऐतिहासिक किल्ल्याची दर्शन मिळाले . सहलीमध्ये आम्ही खूप मजा केली ती संपूर्णपणे आनंदमय वातावरणात पार पडली म्हणून माझ्यासाठी अविस्मरणीय सहल आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण शाळेची सहल मराठी निबंध म्हणजेच my picnic essay in marathi language बद्दल चर्चा केली . शाळेची सहल मराठी निबंध म्हणजेच essay on my picnic in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment