माझी आई निबंध 2023 | My Mother Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला माझी आई म्हणजेच my mother essay in marathi .हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात ह्या पोस्ट मध्ये देत आहोत . ५वी ते १०वी च्या विद्यार्थाना शाळेत दिला जाणारा माझी आई म्हणजेच my mother essay in marathi हा निबंध इथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि परीक्षेत हा निबंध लिहण्यास मदत मिळेल . तर चला मग सुरु करूया माझी आई निबंध …..

माझी आई निबंध | My Mother Essay In Marathi For School Students In 100, 300 And 500 Words

१०० शब्दात माझी आई निबंध | my mother essay in marathi in 100 words

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ, माझी आई आमच्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ आहे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊणे , आम्हाला मार्गदर्शन करणे , सकाळी मला उठण्यापासून ते माझा नाश्ता जेवण शाळेची तयारी सर्व काही आई करून देते . माझ्यासोबतच घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी ती यशस्वीरीत्या पार पाडते घरातील सर्वांच्या आवडी-निवडी पुरविते ते हि स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार न करता .

माझी आई निबंध -  My Mother Essay In Marathi In 100, 300 And 500 Words

चूल, मुल आणि घरातील सर्वांची जबाबदारी हे सर्व पेलण्याची ताकद तिच्या कडे येते तरी कुठून आपण भाग्यवान आहोत की परमेश्वराने आईच्या नावाचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या घरी दिलेले आहे. मला घडवण्यात आईचा फार मोठा वाटा आहे लहानपणापासून ते आतापर्यंत तिने माझ्यावर केलेले संस्कार यामुळेच मी माझे एक सुंदर चारित्र्य निर्माण करू शकलो . आई आपल्यासाठी इतके करते तरी आपण म्हणतो की आई कुठे काय करते ?

३०० शब्दात माझी आई निबंध | my mother essay in marathi in 300 words

आई या नावात प्रेम, माया, ममता ,श्रद्धा, सबुरी हे सर्व गुण ओतपोत भरलेले आहेत आई म्हणजे भगवंताचे दुसरे नाव आई या शब्दाने माझ्या या आयुष्याला सुरुवात झाली मी जन्मलो व हे सुंदर जग पाहिले तेच मुळी माझ्या आईमुळे आपल्या कितीही चुका झाल्या तरी बेमालूम पणे माफ करण्याची ताकद असते ती आईकडेच आई माझी माऊली आई माझी ममता आईच माझा भगवंत व आईच माझे आद्य दैवत म्हणूनच म्हणतात की भगवंत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी आई निर्माण केली त्याग सोशिकपणा उदारता माया ममता यांचं जिवंत उदाहरण म्हणजेच आई .

माझी आई निबंध -  My Mother Essay In Marathi In 100, 300 And 500 Words

आई विना आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच मुळी करू शकत नाही आईच्या ममतेपुढे सारे जग आपल्याला तुच्छ वाटते कारण आईच्या प्रेमातच तेवढी ताकत आहे म्हणूनच आई जे नातं हे जगात सर्वश्रेष्ठ आहे तिच्या कष्टाला, त्यागाला तोड नाही.

एक वेळ देव नाही भेटला तरी चालेल पण आई चे दर्शन मात्र रोजच झाले पाहिजे तिला कधीही विसरता येणार नाही कारण शेवटी या दुनियेत आपल्याला आणणारी आईच असते आई थोर तुझे उपकार. आई ह्या नावात जरी दोन शब्ध असले तरी त्यात पूर्ण विश्व सामावले आहेत . आई ला आपल्याला मुलाची खूप काळजी असते . त्या मुलाला साध खरचटले तरी तिचा जीव खाली वर होतो . मुलाला बरं नसेल तर रात्र भर जागून ती त्याची काळजी घेते. आई ह्या नावातच प्रेम आहे . आयुष्यात आपल्या वर सर्वात जास्त प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त आई आहे.

जेव्हा मूल हे लहान असते तेव्हा त्याच्या मुखात पहिले हे नाव हे फक्त आईचे असते . आई ला परमेश्वराचे दुसरे रूप सुद्धा मानले जाते . कारण देवा नन्तर कोणी आपली काळजी करत असेल तर ती फक्त आपली आई असते . देवाला तर आपण नाही पाहू शकतात पण आईच्या स्वरूपाने देव हा रोज आपल्याला सोबत असतो . त्यामुळे आईची तुलना आपण कोणासोबत हि नाही करू शकत . त्यामुळे आईशी कधी हि वाईट वागू नका कारण तिने अनंत वेदना सहन करून आपल्यला जन्म दिला आहे . तिचे दुःख फक्त तिलाच माहिती. त्यामुळे आईची काळजी घ्या . आणि तिच्या दिर्घआयुष्यासाठी साठी देवाकडे रोज प्रार्थना करा .

Read Also – Swachh Bharat Abhiyan Essay In Hindi 100,300,500 Word – स्वच्छ भारत अभियान निबंध

५०० शब्दात माझी आई निबंध | my mother essay in marathi in 500 wods

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे सत्य आहे कारण बाळ जन्माला आल्यावर पहिला शब्द उच्चारते ते आई माझ्या आई बद्दल मी काय सांगू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती कोण असेल तर ती माझी आई आहे . आज मी जे काही घडलो आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे प्रत्येक कठीण प्रसंगात जर खंबीरपणे माझ्या पाठीशी कोण उभा राहत असेल तर ती माझी आई आहे .

माझी आई निबंध -  My Mother Essay In Marathi In 100, 300 And 500 Words

मला आठवते ते तिचे काबाड ,कष्ट आणि आम्ही शिकावे म्हणून तिने केलेली मेहनत. खरंच त्याला तोड नाही. आज जे काही चांगले दिवस आम्ही बघत आहोत त्यात आमच्या आईचा सिंहाचा वाटा आहे. सकाळी लवकर उठणे, आम्हाला डबा करून देणे आमचा न चुकता अभ्यास घेणे या सगळ्या गोष्टी करणे एवढ्या सोप्या नाहीत ते फक्त आणि फक्त आईच करू शकते. कारण आई ला आपल्यला मुलाची जशी काळजी आहेत तेवढीच काळजी आपल्या कुटुंबाची सुद्धा आहे त्यामुले आई कधीच कोणाला काही कमी पडू देत नाही .

प्रत्येकाच्या इच्छा जपणे हे तर जणू तिचे कर्तव्यच आहे असे कधी कधी मला वाटते . आणि एवढे सर्व करूनही ती कधी थकत नाही की कधी थकल्याचा आव आणत नाही. सतत आपल्याला कर्तव्याशी स्वतःला गुंतवून ठेवणे बस हेचकाम. या गोष्टी कसं जमतं ते फक्त तिलाच ठाऊक. ती काही फार शिकलेली नाही परंतु एखाद्या तज्ञासारखं सर्व काम कसं टापटीप , प्रत्येक वस्तू जागच्या जागी नीटनेटक्या, जेवणात तर ती साक्षात अन्नपूर्ण, तिच्या हाताला चवच न्यारी. तिने बनवलेल्या पदार्थ हा बाहेर किती पैसे देऊन मिळणार नाही इतकी त्या पदार्थाची चव सुंदर असते. ती कधी रागावते , कधी माया करते पण सतत आमच्या भल्याचाच विचार करते . कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेताना आई स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही .

स्वतःच्या आवडीनिवडी मन मारून ती बाजूला ठेवते कशाबद्दल तक्रार न करता अखंडपणे कष्ट सोसणे , क्षमा करणे मुलांच्या चुका पोटात घालणे हा तिचा स्वभाव आहे. आपण जाणून बुजून केलेल्या अपराधांना तिच्याकडे माफी नाही अशावेळी ती जमदाग्नि बनते. चांगल्या सवयी चांगल्या गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी ती सतत जागृत असते . नवनवीन गोष्टींचे ज्ञान आम्हाला या साठी ती स्वतः मात्र अग्रेसर असते . छत्रपती शिवाजी महाराज , श्री राम अशा कर्तव्य पुरुषांचे ज्ञान आम्हाला मिळावे ह्यासाठी आम्हाला नवीन नवीन पुस्तकं ती स्वतः आणून देते .

माझी आई निबंध -  My Mother Essay In Marathi In 100, 300 And 500 Words

यावर तिचे बारीक लक्ष असते यामागे आपल्या मुलांनी चांगली शिकवण घ्यावी हा तिचा कायम अट्टाहास असतो. कारण शिवाजी महाराजांची आई जिजामाता असू दे किंवा त्या जागी आपली आई . कारण आई हि शेवटी आई आहे . आपल्या मुलावर चांगले संस्कार करणे किंवा त्यांना काही कमी पडू न देणे हे काम ती रोज न चुकता करणे . त्यामुळे आईला हे देवाचे दुसरे रूप सुद्धा मानले जाते . पहिला शब्द जो मी उच्चरला , पहिला घास जिने मला भरवला हाताचे बोट पकडून जिने मला चालवले आणि आजारी असताना जिने माझ्या अंथरूणाशी रात्रंदिवस काढले ती माझी आई .

आई आमच्या कुटुंबाचा आधार स्तंभ आहे . कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई . त्यामुळे आई विषयी जितके बोलावे तेवढे कमीच आहे. पण आजच्या इंटरनेट च्या युगात एवढे गुंतलो आहोत कि साधे आईशी दोन शब्द बोलण्यासाठी आपल्या कडे वेळ नाही . मदर्स डे ला नुसता आई सोबत पोस्ट केलेल्या फोटोवरून आईविषयी प्रेम सिद्ध होत नाही . तर वेळोवेळी आई ला केली मदत , आपल्या आईसोबत घालवलेला वेळ आणि तिच्याशी बोललेले चार शब्द हेच आईसाठी मदर्स डे चे खरे गिफ्ट ठरेल .

निष्कर्ष ( conclusion )

ह्या मध्ये आपण माझी आई निबंध म्हणजेच my mother essay in marathi हा तीन स्वरूपात पहिला जसे कि १०० , ३०० आणि ५०० शब्दात . my mother essay in marathi हा निबंध तुम्हाला शालेय जीवनात आणि परीक्षेत नक्कीच उपयुक्त ठरेल . तुम्हाला अजून कोणत्या वेगळ्या विषयावर निबंध हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला विसरू नका . व हा निबंध तुमच्या शाळेतल्या मित्राला आणि गरजवंताला नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये काही ब्लॉगिंग बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या

Leave a Comment