माझे आजोबा निबंध मराठी 2023 | My Grandfather Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझे आजोबा निबंध मराठी म्हणजेच my grandfather essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . माझे आजोबा निबंध मराठी म्हणजेच my grandfather essay in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझे आजोबा निबंध मराठी | My Grandfather Essay In Marathi in 100 , 200 and 300 words

माझे आजोबा निबंध मराठी 100 शब्दात | My Grandfather Essay In Marathi Language in 100 words

मी संध्याकाळी शाळेतून थकून येतो तर दफ्तर चे ओझे फेकून देतो आणि मग धाव घेतो माझ्या आजोबांकडे . आजोबा अशी हाक मारत मी माझ्या आजोबांना मिठी मारतो. एखादी माझ्या आवडीची चॉकलेट ची वडी माझ्या हातावर ठेवून आजोबा मला खेळवतात तेव्हा दिवसभराचा माझा थकवा लगेच दूर होतो. संध्याकाळी फेरफटका आटोपल्यावर ते माझ्याशी गप्पा मारायला बसतात.

माझी दिवसभराची सगळी हकीकत विचारून घेतात . शाळेत कोण कोणत्या विषयाचे तास झाले . कोणी काही प्रश्न विचारले का ? शिकलेल्या भागात काय जास्त आवडले . काय कठीण वाटते ?. माझ्या सर्व काही विचारून घेतात . आता माझ्या लक्षात येते की त्यांच्या या सवयीमुळे त्या त्या दिवशी शिकवलेला अभ्यासाची उजळणी होऊन गेली आहे . रात्रीचे जेवण झाल्यावर आजोबा मला बरोबर घेऊन शतपावली करतात . कधी कधी मजेत गुणगुणतात. रात्री झोपताना मला छान गोष्टी सांगतात .

माझे आजोबा निबंध मराठी 200 शब्दात | My Grandfather Essay In Marathi Language in 200 words

माझ्यावर प्रेम करणारे माझे आजोबा मला खूप आवडतात . माझे आजोबा माझ्यावर कधीच रागवत नाही. ते माझे नेहमीच कौतुक करतात . माझ्या अभ्यासात ते मला मदत करतात . म्हणूनच मला चांगले गुण मिळतात . माझे आजोबा माझ्या बरोबर खेळतात . मला बागेमध्ये घेऊन जातात. आई पप्पा घरी मला भेल ,आइसक्रीम खायला देत नसले तरी माझे आजोबा मला भेळ आईस्क्रीम खायला देतात आणि स्वतःही आनंदाने खातात . घरातील सर्व माणसे आजोबांचा आदर करतात .

पण जेव्हा ते आमची थट्टामस्करी करतात तेव्हा ते स्वतः ही हसतात आणि आम्हाला पण हसवतात . आमच्या आजोबां मुळे आमचे सारे घर आनंदी असते . म्हणूनच मला माझे आजोबा खूप खूप आवडतात. माझे आजोबा म्हणजे सदैव प्रसन्न अशी मूर्ती . ते नेहमी आनंदी असतात . कधी कुरकुर नाही की कधी चिडचिड नाही . मी तरी त्यांना अजून पर्यंत कधी चिडचिड करताना पाहिले नाही. ते सदोदित हास्यविनोद करीत वावरतात . त्यामुळे सर्वांना त्यांचा सहवास आवडतो . त्यांच्याकडे लोकांचा मोठा गोतावळा असतो .

माझे आजोबा निबंध मराठी 2021 | My Grandfather Essay In Marathi Language

आमच्या सर्व नातेवाईकांना आजोबा खूप आवडतात. आजोबा सर्वांची नेहमी तातडीने चौकशी करतात. सगळ्यांशी त्यांचे मनमिळावू संबंध आहेत. त्यामुळे आमच्याकडे पाहुण्यांची व मित्रमंडळी याची सतत वर्दळ असते. आजोबा दिसले की सगळ्यांना आनंद होतो. माझ्या आजोबांना नीटनेटकेपणा व स्वच्छतेची भारी आवड आहे . हा गुण तर सगळी त्यांच्याकडून घ्यावा असा आहे.

माझे आजोबा निबंध मराठी 300 शब्दात | My Grandfather Essay In Marathi Language in 300 words

त्यांच्या दिवसाची सुरुवात नेहमी नीटनेटकेपणाने होते . प्रथम खिडकी ,कठीण लाकूड ,खुर्च्या ,टेबले ,कापड त्यांच्यावरील धूळ ते पुसून काढतात. सुमारे अर्धा तास त्यांची ही साफसफाई चालते . मग ते त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी द्यायला जातात तेथेही त्यांच्या स्वभावातील नीटनेटकेपणा व प्रेमळपणा दिसून येतो . प्रथम व ओलसर फटक्याने रोपट्यांची पाणी हळुवारपणे पुसून घेतात .

ओल्या फडक्याने पुसून घेतली की मग रोपट्यांना पाणी घालतात . आजोबांच्या प्रेमळ स्पर्शाने जणु रोपटी टवटवीत बनतात . साफसफाई झाली की ते अंघोळ करतात . आणि सकाळचा फेरफटका मारायला बाहेर पडतात . तासभर आणि परत आले की पुन्हा एकदा चहा घेतल्यावर त्यांच्या आवडीच्या दिनक्रमाला सुरुवात करतात . तो म्हणजे वाचनाचा. ते तासभर तरी वर्तमानपत्र वाचतात. त्यांना वर्तमानपत्रे वाचायला खूप आवडतात . म्हणून आम्ही तीन वर्तमानपत्र मागवतो. एक इंग्रजी आणि दोन मराठी . ते वाचत असताना आजूबाजूला कोणी असले तरी त्यांना ते वर्तमानपत्रातील महत्वाची बातमी ऐकवतात .

इंग्रजी वर्तमानपत्र वाचताना ते न चुकता शब्दकोश घेऊन बसतात . एखादा शब्द अडला तर कंटाळा न करता शब्दकोशात शब्द शोधतात . मी बाजूला असतो तर त्यांना मदत हवी असल्यास संग्रहणी आणून मला शब्द शोधायला लावतात. त्यांच्या या सवयीचा मला इतका फायदा झाला आहे की वर्गात माझ्या इंग्रजी निबंध सगळ्यांपेक्षा चांगला असतो .

माझे आजोबा निबंध मराठी 2021 | My Grandfather Essay In Marathi Language

मी अभ्यासाला बसतो की त्यांचे माझ्याकडे बारीक असते . मी कसा बसतो. पेन कसा धरतो . पुस्तके कसे वाचतो . वही कशी ठेवतो या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात . मला पाठांतर करताना खूप मदत करतात . ते दररोजच दहावीच्या वर्षी पाठ्यपुस्तकाचे थोडातरी मजकूर मला मोठ्याने वाचायला सांगतात . मात्र हे सर्व काही कधीच न रागवता. सगळ्या बाबतीत पद्धतशीर व नीटनेटकेपणा असला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो . त्याचीही सवय हळूहळू माझ्या अंगी बाणल्या आहेत .

मी माझ्या वह्यातील सर्व लेखन मन लावून चांगले करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बाई माझ्या लेखनाची नेहमी स्तुती करतात . आणि याचे सर्व श्रेय माझ्या आजोबांना देतो . मनात चांगले विचार बाळगावे त्यानुसार चांगले वागावे आणि हे सर्व नियमितपणे करावे असे त्यांचे सर्वांना सांगणे असते . माझे आजोबा स्वतः तसे वागतात तसे करतात . बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे . त्यांची पावले वंदावी तसेच माझे आजोबा आहेत.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझे आजोबा निबंध मराठी म्हणजेच my grandfather essay in marathi language बद्दल चर्चा केली . माझे आजोबा निबंध मराठी म्हणजेच my grandfather essay in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment