माझा आवडता लेखक मराठी निबंध 2023 | My Favourite Writer Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता लेखक मराठी निबंध म्हणजेच my favourite writer essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता लेखक मराठी निबंध म्हणजेच Maza avadata lekhak in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझा आवडता लेखक मराठी निबंध | Maza avadata lekhak in marathi in 100 , 200 and 300 words

माझा आवडता लेखक मराठी निबंध | my favourite writer essay in marathi language in 100 words

” पूलस्पर्श होताच दुःखे पळाली ,नवा सूर आनंदयात्रा मिळाली ,निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली ” सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी पू लं विषयी काढलेले वरील गौरवोद्गार अगदी सार्थ आहेत . पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत . ते एक लोकप्रिय मराठी लेखक ,नाटककार ,विनोदकार ,कथाकार ,दिग्दर्शक ,संगीत दिग्दर्शक असे विविध पैलू असणारे व्यक्तिमत्त्व होते.

विविध कलांच्या क्षेत्रात वावरताना जो आनंद पु लं ना मिळाला तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. बटाट्याची चाळ या नावाचे त्यांचे पुस्तक मला खूप आवडते. केवळ विनोदी म्हणून त्यात बाष्कळपणा येऊ न देता हसवत हसवत त्यांनी मानवी जीवनातील कारुण्याचा पदर नकळत आपल्या लेखनातून उलगडून दाखवला.

माझा आवडता लेखक मराठी निबंध | my favourite writer essay in marathi language in 200 words

. पु ल देशपांडे या अष्टपैलू कलावंताचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम एल एल बी पर्यंत झाले. त्यांच्या साहित्य वाचण्याचा आवडीमुळे विशेषक बंगाली साहित्याबद्दल त्यांना आत्मीयता असल्यामुळे संस्कृत बरोबर बंगाली भाषा ते परिश्रमपूर्वक शिकले. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लिपिक शिक्षक पुढे कॉलेजात प्राध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. आकाशवाणीवर काही वर्षे नाट्य विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विशेष म्हणजे दिल्ली दूरदर्शन वरील कार्यक्रमाचे ते पहिले निर्माते होते .

त्यांच्या लेखनातील सर्वच पात्रे ही सर्वसामान्य स्तरातील आणि दैनंदिन जीवनाचा भाग असलेली अशीच आहेत. म्हणून वाचणाऱ्याला ती आपलीशी वाटतात. पु लं चा स्वभाव निरीक्षणाच्या अचूकतेतूनच व्यक्ती आणि वल्ली साकार झाले. मानवी स्वभावाचे वैविध्यपूर्ण पैलूंचा त्यांच्या आयुष्यातील दुःखाची हलकी किनार आपल्यापर्यंत पोहोचवण्यात पु लं ची शब्द किमया काही औरच होती. चित्रपट, नाटके ,एकपात्री प्रयोग सर्वच गोष्टी लोकांना आनंद देणाऱ्या ताजेतवाने करणाऱ्या होत्या. गुळाचा गणपती चित्रपटात एका भोळ्या सरळ साध्या मुलांचे भावविश्व त्यांनी जे साकारले आहेत त्यास तोड नाही .

म्हणजे लेखन सादरीकरणा बरोबर अभिनेत्याची ही जबाबदारी त्यांनी उत्तम पणाने पार पाडली. पुलंच्या संवादांनी ,गाण्यांनी ,अभिनय आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. एक मात्र महत्त्वाचे पु लं चा शब्दनिष्ट कोटानिष्ट विनोद हा अभिजात होता .तो कुणालाही दुखावणारा कोणाचीही व्यंगावर बोट ठेवणारा नव्हता. शब्द शब्दांवर ते लिलया कोट्या सफाईदारपणे करत .

त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोट्याधीश हे पुस्तक होय. जे वाचकाला मनसोक्त हसवते . अशा या थोर दात्याचे निधन 12 जून 2000 रोजी झाले . तेव्हा नभोवाणी सह ,मासिके ,वृत्तपत्रे ,साप्ताहिक, वर्तमानपत्रे सर्व प्रसाद माध्यमातून त्यांच्यावर आदरांजली सस्मरण पत्र लेखन केले गेले. या सर्वांनी पूल एक आनंदयात्री असाच गौरव केला.

माझा आवडता लेखक मराठी निबंध | my favourite writer essay in marathi language in 300 words

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असते . गायन ,वादन, नृत्य ,चित्रकला ,कविता लेखन ,नाटक अशा अनेक विविध कला माणसाच्या अंगी जोपासलेल्या असतात. त्या कलेला साधून ती कला उत्तम करणारा कलाकार हा आपला आवडता आणि आपला आदर्श कलाकार असतो . पु ल देशपांडे यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते . त्यांनी दूरचित्रवाणी ,चित्रपट ,नभोवाणी एक पात्री -बहू पात्री नाटक अशा सर्व क्षेत्रात काम केले आहे . पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 आली मुंबईतील गावदेवी या भागात झाला .

माझा आवडता लेखक मराठी निबंध 2021 | My Favourite Writer Essay In Marathi Language

संगीत ,लेखन ,कविता अशा वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. शाळेत असताना ते आजोबांनी लिहून दिलेले दहा पंधरा ओळी चे भाषण खणखणीत आवाजात म्हणून दाखवायचे. पण काही वर्षानंतर ते स्वतः चे भाषण स्वतः लिहू लागले . लेखना सोबतच पु लं ना वाचन रेडिओवरील संगीत ऐकण्याची ,पेटी वाजवण्याची आवड निर्माण झाली . एवढेच नव्हे तर लोकांच्या वागण्यातील विसंगती हास्यास्पद गोष्ट हेरून ते लोकांच्या नकला करायचे . कॉलेजमध्ये असताना त्यांनी राजा बढे यांच्या माहेरा जा या कवितेला चाल लावली . आज हे गाणे मराठी भाव संगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. साहित्य क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते .

1937 पासून पु ल देशपांडे यांनी छोट्या-मोठ्या नाटकात भाग घेण्यास सुरुवात केली . 1944 पु लं नी अभिरुची या नियतकालिकातून भैया नागपूरकर हे पहिले व्यक्तिचित्र लिहिले . 1946 साली त्यांचा सुनीताबाईंची विवाह झाला. 1947 ते 1954 या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम करायला सुरुवात केली. वंदे मातरम, गुळाचा गणपती या चित्रपटांमध्ये त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. तसेच चोखामेळा ,देव पावला ,दूध भात ,देव बाप्पा ,नवरा बायको, मोठी माणसे अशा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले. 1955 मध्ये पु ल देशपांडे आकाशवाणीत नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या. 1956 ते 1957 मध्ये त्यांची प्रमुख नाट्यनिर्माते म्हणून बढती झाली आणि ते दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी व सुनिताबाईंनी गडकरी दर्शन कार्यक्रम सादर केला . त्यातूनच बटाट्याची चाळ या अद्भुत कलाकृतीचा जन्म झाला .

त्याच सोबत भाई व्यक्ती की वल्ली ,असा मी असामी अशी त्यांनी लिहिलेल्या आणि पुस्तके आजही लोकांच्या मनात घर करून आहेत . पुलंनी लोकनाट्याचा, व्यक्तिचित्रांचा ,विनोदी कथांचा अनमोल ठेवा आपल्याला दिला हे आपले खूप मोठे भाग्य आहे . या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी सुनिताबाई यांनी सुद्धा मोलाची कामगिरी बजावली. त्यांना पद्मभूषण, पद्मश्री ,महाराष्ट्र भूषण या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे . असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 12 जून 2000 साली अनंतात विलीन झाले . आपल्या कलेचा वापर करून लोकांना नेहमी हसवणारे ,लोकांच्या मनावर राज्य करणारे ते एक थोर व्यक्तिमत्व होते.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता लेखक मराठी निबंध म्हणजेच my favourite writer essay in marathi language बद्दल चर्चा केली .माझा आवडता लेखक मराठी निबंध म्हणजेच Maza avadata lekhak in marathi 1०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment