नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझे आवडते शिक्षक निबंध म्हणजेच my favourite teacher essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता शिक्षक निबंध म्हणजेच maza avadata shikshak essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया majha avadta shikshak in marathi ….
Table of Contents
माझा आवडता शिक्षक निबंध | my favourite teacher essay in marathi | maza avadata shikshak essay in marathi in 100 , 300 and 500 words
माझे आवडते शिक्षक निबंध 100 शब्दात | my favourite teacher essay in marathi in 100 words
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे पहिले गुरू असतात . ते आपल्या मुलाला चांगले संस्कार करून घडवितात . पण आपण जेव्हा शाळेत प्रवेश करतो. तेव्हा आपण एका छोट्याश्या जगाततून मोठ्या जगात प्रवेश करतो . आणि या मोठ्या जगात आपले शाळेचे शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवितात. माझ्या शाळेतील श्री वसंत देशमुख हे माझे आवडते शिक्षक आहेत .

अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळावू प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असा त्यांचा स्वभाव आहे . ते आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहेत . ते आम्हाला गणित आणि संगणक हे विषय शिकवतात . गणित हा विषय शिकवताना ते अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवतात . देशमुख सर शिक्षक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून देखील खूप चांगले आहेत . सर्व मुलांना वेळोवेळी मदत करणारे आहेत .
जी मुले अभ्यासात कमजोर आहेत त्या मुलांवर ती लक्ष ठेवतात आणि त्यांना सर्व लक्षात येऊन देण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करतात . देशमुख सर आम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत घेतात . मी नेहमी प्रार्थना करतो की असे शिक्षक सर्वांना लाभो . मला या सरांचा खूप अभिमान आहे आणि त्यांची मी खूप ऋणी आहे.
माझे आवडते शिक्षक निबंध 300 शब्दात | my favourite teacher essay in marathi in 300 words – निबंध 1
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात . आई ही प्रत्येकाचा पहिली गुरु असते . त्यानंतर प्रत्येकाला घडवण्याचे महान कार्य शिक्षक करतात . मला माझ्या आई वडील प्रमाणेच घडवण्याचे कार्य माझ्या गुरुजींनी केले. त्यातील मला सर्वात जास्त भावलेले व्यक्तिमत्व म्हणजे माझे श्रीकांत पाटील सर . प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया म्हणजे त्यांचे प्राथमिक शिक्षण .
मला पण वयात येत असताना माझ्या वडिलांप्रमाणे सरांनी माझ्यावर प्रेम केले . माझे सर मी शाळेत जाण्या अगोदरच शाळेत आलेली असतात . त्यांना स्वच्छतेची फार आवड होती . त्यांनी आमच्या शाळेत औषधी वनस्पती ,सुंदर फुलझाडे लावली . ते एक उत्तम कलाकार होते . कोणती कविता ते कृतीसह शिकवत . मी आजही त्या कविता गुणगुणतो . पुस्तकातील कोणताही धडा इतक्या तन्मयतेने ते शिकवत की आमचा तो धडा तोंड पाठ होत असे . त्यांचे हस्ताक्षर मोत्या प्रमाणे सुंदर असल्यामुळे माझे हस्ताक्षर ही आपोआप सुंदर बनले .

त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते . त्यांचा गणित तर फार आवडता विषय होता . त्यांनी तो प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून आम्हाला शिकवला . त्यामुळे आमचे व्यवहारज्ञान अधिक भक्कम आहे . त्यांनी आमचा प्रत्येक विषय पक्का केला. आमच्या सरांच्या सोबत आमचा दिवस कसा जाई ते कळतच नसे . शारीरिक शिक्षणाच्या तासाला तर ते स्वतः आमच्यात सामील होऊन खेळाचा आनंद वाढवत . मला सरांनी भाषणाची ,गायनाची ,खेळाची ,नृत्याची ,वाचनाची ,लेखनाची आवड लावली.
आमच्या शाळेत सरांनी अनेक मोबाइल अॅप्लिकेशन स्वतः तयार करून आम्हाला तंत्रज्ञानात सक्षम बनवले . कसा चालवायचा त्याचा वापर कसा करायचा आम्हाला सरांनी त्यावेळी शिकवले . ते नेहमी हसतमुख होते. त्यांचे शब्द इतके भारदस्त होते की कधी कोणी चूक केल्याचे मला आठवत नाही . आम्हाला माणूस म्हणून जगणवण्याचे महान कार्य सरांनी केले . त्यांनी ई-लर्निंग द्वारे आमचे शिक्षणाची गोडी अधिक वाढवली . आमच्या शाळेला त्यांनी स्वच्छ सुंदर शाळेचा पुरस्कार मिळवून दिला .
अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत केली . त्यांनी आमच्या पालकांनी वेळोवेळी बहुमूल्य मार्गदर्शन केले . कोणतीही अपेक्षा न करता ते मनापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत . आजही सरांचे कार्य आठवले की मन थक्क होते . वाटते इतकी कार्यक्षमता आली कुठून . त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर माझ्या आयुष्याला आकार देण्याचे मोलाचे कार्य केले . अशा पाटील सरांसारखे शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे . असे हे सर माझे अतिशय आवडते आहेत . अशा प्रेमळ ,कर्तव्यदक्ष ,अष्टपैलू सरांना मी कधीच विसरणार नाही .
माझे आवडते शिक्षक निबंध 300 शब्दात | my favourite teacher essay in marathi in 300 words – निबंध 2
माझे प्रिय शिक्षक विज्ञानाचे शिक्षक आहेत. संजना कौशिक असे त्यांचे नाव आहे. त्या शाळेच्या आवारात राहतात. त्या शाळेतील सर्वोत्कृष्ट शिक्षिका आहेत आणि माझ्या सर्व मित्रांना त्या खूप आवडतात कारण त्या खूप छान शिकवतात. त्यांच्या वर्गात कोणीही कंटाळा करत नाही कारण त्या अभ्यास करताना काही मनोरंजक गोष्टी सांगतात. वर्गात त्यांची शिकवण्याची रणनीती मला खूप आवडते.
दुसऱ्या दिवशी त्या वर्गात कोणताही धडा शिकवणार असल्या तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना घरूनच वाचायला सांगतात. त्या वर्गाला तो धडा शिकवतात आणि ते स्पष्ट करण्यासाठी बरेच प्रश्न विचारतात. त्या दुसऱ्या दिवशीही त्याच मजकूरावर प्रश्न करतात. अशाप्रकारे, आपल्याला एका विशिष्ट मजकुराची संपूर्ण माहिती मिळते. तीन-चार धडे शिकवून त्या परीक्षा घेतात. त्यांना शिक्षकाचा पेशा आवडतो आणि त्या आम्हाला पूर्ण आवडीने आणि उत्साहाने शिकवतात.
त्या आमच्याशी खूप मैत्रीपूर्ण वागतात आणि आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. आम्ही त्यांना वर्गात किंवा त्यांच्या केबिनमध्ये न घाबरता कोणताही प्रश्न विचारतो. त्या वर्गात शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या हालचाली पाहतात आणि खोडकर मुलांना शिक्षाही करतात. त्या नेहमी आम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात आणि वर्गात शिक्षक जे काही सांगतात त्याचे पालन करा असे ते शिकवतात.
त्या नेहमी म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखरच यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही तुमच्या शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि आयुष्यभर त्यांचे पालन करा. त्या कमकुवत आणि हुशार मुलांमध्ये भेदभाव करत नाही. त्या कमकुवत मुलांना खूप सपोर्ट करतात आणि हुशार मुलांना कमकुवत वर्गमित्रांना मदत करण्याची विनंत्या करतात. त्या आम्हाला सांगतात की, आपण आपल्या अभ्यासाबद्दल आणि जीवनाच्या ध्येयाबद्दल गंभीर असले पाहिजे.
त्या खूप प्रोत्साहन देणारी शिक्षिका आहेत, ज्या आम्हाला केवळ अभ्यासातच प्रोत्साहन देत नाही तर अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करतात. त्या वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा क्रीडा क्रियाकलापांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्या त्यांच्या घरी कमकुवत विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देतात. सर्व विद्यार्थी वर्ग चाचणी आणि विज्ञान या दोन्ही परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्या शाळेच्या उपप्राचार्याही आहेत. त्यामुळे त्या त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडतात. शाळेच्या आवारातील हिरवळ आणि स्वच्छता त्या पूर्णपणे पाहतात.
त्या कधीच गंभीर किंवा रागावलेली दिसत नाही कारण त्यांच्या चेहरा हसरा आहे. त्या आम्हाला त्यांच्या मुलांप्रमाणे शाळेत आनंदी ठेवतात. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमाच्या किंवा स्पर्धेच्या आयोजनाची त्या पूर्ण काळजी घेतात. त्या सर्व विद्यार्थ्यांशी नम्रतेने बोलतात आणि शाळेतील कोणतीही त्रासदायक परिस्थित्या कशी हाताळायची हे त्यांना माहीत आहे.
- Read Also – Essay On Mahatma Gandhi In Marathi Language
माझे आवडते शिक्षक निबंध 500 शब्दात | my favourite teacher essay in marathi in 500 words
” शिक्षक शब्दांनी ज्ञान वाढवणारे ,जगण्यातून जीवन घडवणारे ,मूल्यातून तत्व शिकणारे, समाजाला योग्य दिशा दाखवणारे ” . प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाला अमूल्य स्थान असते . आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात तर शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात . शिक्षक आपल्याला शिकवतात ,चांगले संस्कार देण्याचे महान कार्य करतात . आम्हा विद्यार्थ्यांना चिमुकल्या पंखांना आकाशाला गवसणी घालण्याचा जोश शिक्षक निर्माण करतात. तसेच अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आदर्श शिक्षक पवार सर माझे प्रेरक शिक्षक आहेत .
ते एक शिस्तप्रिय व समाज पुढे शिक्षक आहेत . त्यांना सर्व विषयाचे सखोल ज्ञान आहे . त्याच्यामुळे आमची शाळा जिल्ह्यात आदर्श शाळा ठरली आहे . पवार सर आमच्या गावात राहत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो . ते रविवारी सुट्टी दिवशी आमचे स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे क्लास घेतात. त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत मोठ्या पदावर आहेत. ते आम्हाला आमचे अंगभूत गुण ओळखून अधिक मार्गदर्शन करतात . माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याजवळ असतात .
सध्याच्या कोरोना च्या या पार्श्वभूमीवर ते आम्हा विद्यार्थ्यांची ऑनलाइन तास नियमित येतात . त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड आहे . त्यांचे स्वतःचे यूट्यूब चैनल ,ब्लॉग आहेत . ते खूप छान व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवतात . हे कार्य पूर्वीपासून गेली चार-पाच वर्षे करीत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचली आहेत . आमचे सर आम्हाला संगणकाच्या तांत्रिक माहिती सोबत त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्व सुद्धा समजावून सांगतात . अभ्यासासोबतच आमचे सर आम्हाला खेळ व बाह्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रेरित करतात .
त्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सर्व मदत करतात . स्वातंत्र्य दिन ,प्रजासत्ताक दिन ,शिक्षक दिन असे अनेक उत्सव साजरे करण्यासाठी ते मदत करतात . त्यांनी फक्त शिक्षणच नव्हे तर संस्कारांचे धडेही आम्हाला दिले आहेत . आपण किती उच्चशिक्षित असलो तरी संस्कार विना आपले जीवन व्यर्थ आहे असे ते नेहमी सांगतात . बाहेरच्या जगात कसे वावरायचे ,परिस्थितीचा सामना कसा करायचा अशा अनेक गोष्टी त्या मला सांगतात . ते नेहमी मुलांच्या कलागुणांना वाव देतात . वेळेच्या बाबतीत अतिशय कडक आहेत .

त्याच्यामुळे आमच्या सर्व गोष्टी वेळेवर होतात आणि त्यामुळेच आम्हाला वेळेचे महत्त्व पटले आहे . गणीत शिकविताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मजेदार चुटकुले सुद्धा आम्हाला सांगतात . त्यामुळे त्यांच्या तासाला वर्गात उत्साहाचे वातावरण असते . वर्ग घेतल्यानंतर ते नेहमी आम्हाला प्रश्न विचारतात जेणेकरून आम्हाला समजले का नाही कळते आणि तेव्हाच आमच्या शंका दूर होतात .
आमचे सर वेळोवेळी आम्हाला कोरोना पासून बचावासाठी हात कसे धुवावे ,मास्क कसे वापरावेत ,बाहेरील व्यक्तींशी संपर्क कसा ठेवावा ,शारीरिक तसेच मानसिक आरोग्य कसे राखावे यांचे ऑनलाइन मार्गदर्शन करतात . याचा लाभ अनेक विद्यार्थी ,पालक ,गावकरी घेत आहेत . सरांची शिकवण्याची हातोटी खूप वेगळे आहे ते सर्वांना क्षणात आपलेसे करतात. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी ते नियमित झटतात . आमच्या सरांनी गावातील तरुण होतकरु तरुणांच्या मदतीने गावात करून जनजागृती चे फलक चौकाचौकात लावले आहेत.
स्वातंत्र्यदिनी असे त्यांचे विशेष कार्य पाहून त्यांना ग्रामपंचायतीने कोविड विशेष योद्धा म्हणून गौरव केला आहे . आमच्या शाळेत विलगीकरण कक्ष असून त्यालाही ते वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करतात . गावातील सर्व नागरिकांचे शारीरिक ,मानसिक बळ वाढवण्याचे विशेष कार्य आमचे सर करतात . सरांचे हे कार्य अचंबित करणारे आहे . मला त्यांच्यात थोर समाजसेवक संत गाडगेबाबा ,संत तुकडोजी महाराज ,आदर्श शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी दिसतात .
आमचे सरांचे अखंड ज्ञानदान तसेच समाजसेवेचे व्रत चालूच आहे . मला आशा आहे की लवकरच कोरोनाची आजची परिस्थिती मावळेल व समाज जीवन नक्कीच पूर्वपदावर येईल . पण सरांनी कोरोना काळात आम्हा विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या मनात ज्वलंत नक्कीच राहील . हे मात्र तितकेच खर . सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत..
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण माझे आवडते शिक्षक निबंध म्हणजेच my favourite teacher essay in marathi बद्दल चर्चा केली . माझा आवडता शिक्षक निबंध म्हणजेच maza avadata shikshak essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व essay on my teacher in marathi हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.