नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता छंद निबंध मराठी म्हणजेच my favourite hobby essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . maza avadta chand in marath म्हणजेच my hobby essay in marathi – Essay on My Favourite Hobby in Marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
Table of Contents
माझा आवडता छंद निबंध मराठी 2022 | Maza Avadta Chand In Marathi | Essay on My Favourite Hobby in Marathi | My Hobby Essay In Marathi In 100 , 300, 400 and 500 words
माझा आवडता छंद निबंध मराठी 100 शब्दात | My Favourite Hobby Essay In Marathi In 100 Words
माझा आवडता छंद वाचन आहे . माझ्या आई बाबांनी मला अगदी लहानपणापासून वाचनाची सवय लावली आहे. मला कितीही अभ्यास असला तरी मी दररोज किमान एक तास माझ्या आवडीची पुस्तके वाचते . मला दररोज वृत्तपत्र वाचायला फार आवडतात . मी अनेक गोष्टींची पुस्तके ,कवितांची पुस्तके ,मासिके वाचते. वाचनाच्या या छंदामुळे बाबांनी मला अनेक प्रकारची पुस्तके आणून दिली आहे . मी माझ्या स्टडी रूम मध्ये छोटेसे वाचनालय बनवले आहे . त्यामध्ये अनेक प्रकारची उपयुक्त पुस्तके आहेत.

मला ज्ञानेश्वरी, भगवतगीता, तुकाराम गाथा, श्यामची आई ,रामायण महाभारत इत्यादी. अनेक ग्रंथ व पुस्तकांनी मला अनमोल विचार दिले आहेत. मला शाळेतील वाचनाने खूप फायदा व मार्गदर्शन मिळाले आहे. वाचनामुळे मला घर बसल्या जगाचे ज्ञान मिळते . मी कुठेही व कधीही वाचन करते . वाचन केल्याने माझे मन नेहमी प्रसन्न राहते. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यास कसे सामोरे जावे हे वाचन केल्याने कळते . पुस्तके माझी खरी मार्गदर्शक व मित्र बनली आहेत. असा हा वाचनाचा शब्द मला खूप खूप आवडतो . मी तो जीवनभर जपणार आहे.
माझा आवडता छंद निबंध मराठी 300 शब्दात | My Favourite Hobby Essay In Marathi In 300 Words
छंद म्हणजे जोपासलेली आवड . प्रत्येकाला काही ना काही छंद असतो . वाचन ,गायन ,तबला,वादन असे विविध प्रकारचे छंद प्रत्येकाला असतात . दररोज धावपळीच्या जीवनात रिकामा वेळ मिळाला की प्रत्येक जण आपापले छंद जोपासत असतो. आणि आनंद मिळवत असतो . त्याचप्रमाणे माझा छंद आहे बागकाम . लहानपणापासूनच मला निसर्गातील झाडे ,पक्षी, प्राणी ,फळे, फुले यांचे फार वेड आहे . मी माझ्या घरासमोर सुंदर बाग बनवलली आहे . त्या बागेमध्ये मी विविध फळांची ,फुलांची झाडे लावली आहेत.
रंगीबिरंगी सुंदर आणि विविध फळांनी माझी बाग भरली आहे . मी बागेतील सर्व झाडांची विशेष काळजी घेते . दररोज संध्याकाळी सर्व झाडांना पाणी घालते . झाडांना पाणी घातल्यानंतर सर्व झाडे अगदी टवटवीत दिसतात आणि तिचा येणारा सुगंध मला खूप सुखावतो . माझ्या बागेमध्ये मोगरा ,जास्वंद, गुलाब ,चाफा,पारिजातक अशा अनेक फुलांची झाडे आहेत . सकाळी बागेमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक फुलांच्या सुगंध आणि परिजातक फुलांचा खाली पडलेला सडा हे दृश्य खूप सुंदर असते . बागेमध्ये उमललेली ही फुले आम्ही देवपूजेसाठी वापरतो .

माझ्या बागेमध्ये आंबा, चिकू, सीताफळ ,पेरू अशी फळझाडे सुद्धा आहेत . त्याच प्रमाणे मी माझ्या बागेत फळभाज्या आणि औषधी वनस्पतीची झाडेही लावली आहेत . जेव्हा मी बाग काम करते तेव्हा मला खूप प्रसन्न वाटते . बागकाम मला निसर्गाच्या जवळ आणते . बागकाम करताना मला निसर्गातील विविध पक्षांचे आवाज ऐकू येतात अशा निसर्गरम्य वातावरणात काम करताना मी उत्साही असते. मी बागेमध्ये लावलेली झाडे हळूहळू मोठी होत आहेत. आपण लावलेली झाडे मोठी होत आहे ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो .
मी दिवसातून एकदा तरी माझ्या बागेत चक्कर मारून येते . बागेमध्ये प्रवेश केल्यानंतर माझे मन उत्साही आणि प्रफुल्लित होते. बागेमध्ये मला शुद्ध हवा अनुभवायला मिळते. तर रोजच्या धावपळीत मी बागेमध्ये जाते . मला तिथे शांत वातावरण अनुभवायला मिळते . म्हणून मला असे वाटते की बागकाम हा अतिशय चांगला छंद आहे. निसर्ग संवर्धनाला मदत करणारा हा एक छंद आहे . बागकामाची आवड सर्वांनी जोपासली पाहिजे . जेणेकरून जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाऊ शकेल ,निसर्ग संवर्धनाला हातभार लागू शकेल व त्यामुळे आपले आरोग्य हि निरोगी राहते त्यामुळे मला बागकाम करायला खूप आवडते.
- Read Also – Essay On Water Pollution In Hindi Language
माझा आवडता छंद निबंध मराठी 400 शब्दात | My Favourite Hobby Essay In Marathi In 400 Words
कोणत्याही गोष्टीची आवड किंवा एखादी गोष्ट करणे ही चांगली गोष्ट आहे, जी माणसाला लहानपणापासून मिळते. हे कोणत्याही वयात विकसित केले जाऊ शकते, तथापि, लहानपणापासून छंद असण्याचे स्वतःचे महत्त्व आहे. आपण सर्वजण आपल्या आवडीनुसार काही गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला आनंद आणि आनंद मिळतो, त्याला छंद म्हणतात. काही लोकांना त्यांच्या आवडीनिवडी, आवडीनिवडी, आवडीनिवडी यानुसार वेगवेगळे छंद असतात.
असे अनेक छंद आहेत जे आपण विकसित करू शकतो; जसे की नाचणे, गाणे, संगीत ऐकणे, चित्रकला, इनडोअर किंवा आउटडोअर गेम्स खेळणे, पक्षी पाहणे, पुरातन वस्तू गोळा करणे, फोटो काढणे, लेखन करणे, विविध गोष्टी खाणे, वाचन, बागकाम इ. आपले छंद आपल्याला उदरनिर्वाह करण्यास मदत करतात, ज्याच्या मदतीने आपण यशस्वी करिअर घडवू शकतो. छंद ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपण आपल्या फावल्या वेळेत पूर्ण आनंद घेतो.
स्वयंपाक करणे, संगीत ऐकणे आणि बागकाम करणे हे माझे आवडते छंद आहेत. तथापि, मी नेहमी बागकामाला प्राधान्य देतो. माझ्यासाठी बागकाम हे ध्यानासारखे आहे, ज्यामुळे माझी क्षमता, आवड आणि माझी काम करण्याची क्षमता सुधारते. हे मला उच्च पातळीचे आराम देते आणि माझा संपूर्ण दिवस उत्पादक बनवते. रोज सकाळी माझ्या बागेतील फुललेली फुले, हळूहळू वाढणारी रोपे पाहण्यात मला आनंद होतो. मी दररोज माझ्या बागेत सूर्य उगवण्याचा आणि मावळण्याचा आनंद घेतो.
मला सहसा शाळेपासूनचा गृहपाठ माझ्या हिरव्यागार बागेत बसून करायला आवडतो. मी रोज संध्याकाळी माझ्या वडिलांसोबत बागेत बॅडमिंटन खेळतो आणि आईसोबत संध्याकाळी फिरण्याचा आनंद घेतो. मी रोज नवीन रोपांची वाढ पाहतो आणि रोज झाडांना पाणी देतो. मी माझ्या बागेचे सौंदर्य आणि सजावट वाढवण्यासाठी काही नवीन आणि शोभेच्या वनस्पती देखील लावल्या आहेत.
मी 14 वर्षांचा आहे आणि इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मला माझा हा छंद आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपायचा आहे. ते मला व्यस्त, आनंदी आणि दैनंदिन जीवनातील सर्व तणावांपासून दूर ठेवतात. माझे आईवडील मला माझे सर्व छंद जपण्यासाठी प्रोत्साहन देतात. जेव्हा मी माझ्या सर्व समस्या कोणत्याही राग आणि तणावाशिवाय घेऊन सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. माझी आई नेहमी म्हणते की बागकाम हा इतर छंदांपेक्षा चांगला छंद आहे; हे आपल्याला आशीर्वाद देते कारण वनस्पतींना पाणी देऊन आपण त्यांना जीवन देतो.
लहानपणापासून, मी माझ्या बागेत त्याची काळजी घेण्यासाठी दररोज 1 तास घालवतो. मी मखमली गवत वापरून तीन सुंदर हिरव्या गवताच्या रग्ज बनवल्या आहेत. मी बागेच्या प्रत्येक कोपऱ्यात एक सुंदर फुलांचा पट्टा बनवला आहे आणि त्यात रंगीबेरंगी गुलाब, कमळ, मोगरा, झेंडू, सूर्यफूल आणि इतर हंगामी फुले लावली आहेत. ख्रिसमसच्या सणावर, मी माझ्या मित्र आणि कुटुंबासह माझ्या बागेच्या मध्यभागी एक मोठा ख्रिसमस ट्री सजवण्याचा आनंद घेतो.
माझा आवडता छंद निबंध मराठी 500 शब्दात | My Favourite Hobby Essay In Marathi In 500 Words
आजच्या जगात ज्ञान हीच मोठी शक्ती आहे . प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळे छंद असतात . छंद म्हणजे जोपासलेली आवड. प्रत्येक जण आपापल्या मोकळ्या वेळेत आपापले छंद जोपासत असतो . प्रत्येकाला वाचन ,गायन, नाच, चित्रकला वादन असे वेगवेगळे छंद असतात. असे छंद आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद देतात . छंद हा पैसे कमवण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात केले जातात.
आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून ते आपल्याला प्रसन्न करतात . वाचन हा माझा आवडता छंद आहे. वाचनाचे महत्त्व पण खूप आहे. वाचन व्यक्तीला योग्य बनवत असते . लहानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड आहे . माझ्या आजोबांमुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. मी लहान असताना ते मला अनेक गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत . त्यानंतर त्या गोष्टी वाचण्याची सवय मला त्यांनी लावली . वर्तमानपत्र ,मासिक, पुस्तक ,कादंबऱ्या खरंतर अशा अनेक गोष्टी वाचनाची मला आवड आहे .
गोष्टीच्या पुस्तकात साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई हे माझे आवडते पुस्तक आहे . पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतीक सल्लाही देतात. परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाचा पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाही . योग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही . आमच्या शाळेत वाचनालय आहे. शलाईच्या सुट्टी मध्ये किंवा मोकळ्या तासाला आम्ही मित्र तेथे जातो आणि विविध पुस्तके तेथे वाचतो . वाचनामुळे माझे ज्ञान वाढले आहे . वाचनामुळे अनेक गोष्टींची माहिती मला मिळते . विज्ञान व माहिती तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी मला समजल्या आहेत .
पुस्तके माझ्या मेंदूला अधिक तीष्ण बनवतात आणि विचार करायलाही चालना देतात . मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि सात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात . याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात . ते मला संपूर्ण जग फिरवतात . महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात . जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर ते मी पुन्हा पुन्हा वाचतो . महान लेखकांची पुस्तके आपल्या प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात.
घरी सुद्धा मी माझे ग्रंथालय तयार केले आहे . माझ्या वाचनाच्या आवडीमुळे बाबांनी मला अनेक पुस्तके आणून दिली आहेत . माझ्याकडे सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झाला आहे . तर रोज शाळेत अभ्यास झाला की मी पुस्तक वाचते . वाचनाच्या छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही . प्रवासात जाताना पुस्तके नेहमी माझ्या सोबत असतात . शाळेला सुट्टी लागली की दिवसातील काही तास मी पुस्तकं वाचते . पुस्तक वाचल्यामुळे माझे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होते.

त्यामुळे माझे केवळ ज्ञान वाढले नाही तर एकाग्रता हा गुण सुद्धा वाढला आहे आणि ही एकाग्रता मला अभ्यासासाठी उपयोगी पडते . कोणतेही काम करताना मी एकाग्र होऊन करते . त्यामुळे सगळे काम नेहमी व्यवस्थित पूर्ण होते. मानवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत पुस्तकाचा फार मोठा वाटा आहे. खरोखरच पुस्तके आपले प्रिय मित्र असतात . ज्या व्यक्तींच्या छंद पुस्तक वाचणे असतो तो कधीही एकटा नसतो . शेवटी एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे यात शंका नाही . वाचनामुळे माझ्यावर संस्कार घडले आहेत .
वाचनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या आपल्याला हजारो मैलांवर ची माहिती प्राप्त होते . बुद्धीला आव्हान देणारी पुस्तके वाचल्यामुळे बुद्धीला सुद्धा धार येते. असा हा वाचनाचा छंद मला नेहमी प्रसन्न करतो. पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे . पण आपण वाचनालयात जाऊन पुस्तके वाचू शकतो . वाचन करायला दुसरे काही लागत नाही फक्त वाचनाचीही आवड हवी . रोजच्या कष्टाच्या जीवनातून मला शांत करतो माझ्या मनाला विसावा देतो म्हणून हा छंद मी आयुष्यभर जोपासणार आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता छंद निबंध मराठी म्हणजेच my favourite hobby essay in marathi बद्दल चर्चा केली . maza avadta chand in marath म्हणजेच my hobby essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.