नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट आज आपण माझा आवडता खेळ निबंध म्हणजेच my favourite game essay in marathi ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . मराठी निबंध माझा आवडता खेळ म्हणजेच maza avadta khe हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात अश्या तीन स्वरूपात बघणार आहोत . ज्यात क्रिकेट , कबड्डी आणि खो-खो असे तीन खेळ समाविष्ट आहेत . तर चला सुरु करूया ….
मराठी निबंध माझा आवडता खेळ क्रिकेट, कबड्डी आणि खो-खो | Maza Avadta Khel Cricket , Kabaddi And Kho-Kho
क्रिकेट माझा आवडता खेळ निबंध 100 शब्दात | cricket my favourite game essay in marathi in 100 words
माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. मी व माझे मित्र दररोज संध्याकाळी शाळेजवळच्या मैदानावर क्रिकेट खेळतो . मी क्रिकेट टीमचा कप्तान आहे. मी आमच्या संघाबरोबर अनेक क्रिकेट सामने जिंकले आहेत. क्रिकेट हा खेळ दोन संघात खेळला जातो . एका संघात अकरा खेळाडू असतात. खेळाची सुरुवात नाणेफेक करून केली जाते. नाणेफेक जिंकल्यास संघाला गोलंदाजी किंवा फलंदाजी निवडण्याची संधी मिळते.

संघनायक हा संघाचा प्रमुख असतो . पंचांचा निर्णय अंतिम समजला जातो. मला गोलंदाजी तसेच फलंदाजी दोन्ही आवडते . मला क्षेत्ररक्षण करायलाही आवडते . क्रिकेटमुळे माझ्या शरीराचा चांगला व्यायाम होतो. क्रिकेट खेळल्याने मला ताजेतवाने वाटते. माझे शरीर तंदुरुस्त राहते. मी क्रिकेटच्या मॅच ही आवडीने पाहतो .. मला मोठे झाल्यावर सचिन तेंडुलकर प्रमाणे क्रिकेटपटू बनायचे आहे. क्रिकेट हा खेळ मला खूप खूप आवडतो .
कबड्डी माझा आवडता खेळ निबंध 3०० शब्दात | kabaddi maza avadta khel in 300 words
खेळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो . मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच शिवाय आपल्या शारीरिक व्यायाम हि होतो . मैदानी खेळ आपल्यात तंदुरुस्ती व ताजेपणा निर्माण करतात . भारतामध्ये क्रिकेट ,खोखो ,कबड्डी ,फुटबॉल यांसारखे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात . प्रत्येक व्यक्तीचा आवडता खेळ असतो . त्याचप्रमाणे कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे. कबड्डी हा मूळ दक्षिण आशियातील खेळ असून हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे.
या खेळाला भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते . कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नसते . कबड्डीसाठी फक्त आयताकृती मैदानाची गरज असते . कबड्डीचे मैदान 12.5 मीटर लांब आणि १० मीटर रुंद असते. आयताकृती मैदानात मध्यभागात एक रेषा आखली जाते . आणि मैदानाचे दोन समान भाग केले जातात . प्रत्येक भागाला कोर्ट म्हटले जाते. प्रत्येक कोर्ट मध्ये बोनस रेषा आणि लॉबी असते . कबड्डीच्या मैदानाचे मध्य रेषेपासून तीन मीटर अंतरावर समांतर टच रेषा असते आणि टच रेषेपासून 1 मीटर अंतरावर बोनस रेषा असते . कबड्डी खेळात दोन संघ असतात . प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यापैकी सात खेळाडू मैदानात खेळण्यासाठी उतरतात .

खेळ सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकलेल्या संघामधील आक्रमक खेळाडू कबड्डी… कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो . विरुद्ध संघातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता तो खेळाडू परत येतो . जर तो खेळाडू सुरक्षित परतला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते खेळाडू बाद समजले जातात. जितके खेळाडू बाद होतात तितके गुण विजयी संघाला मिळतात . आक्रमक खेळाडू विरोधी भागात खेळत असताना त्यांचा दम सुटला तर तो खेळाडू बाद समजला जातो . अशा प्रकारे हा खेळ २० -२० मिनिटाच्या दोन भागात खेळला जातो . भारतीय असणारा हा खेळ पाकिस्तान,श्रीलंका, मलेशिया बांगलादेश इत्यादी देशात खेळला जातो.
आमच्या शाळेत सुद्धा कबड्डीचे संघ बनवीले आहेत. शाळेत होणाऱ्या वार्षिक कबड्डी स्पर्धेमध्ये खेळायला मला खूप आवडते . कबड्डी खेळल्यामुळे शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास होतो . मला असे वाटते की कबड्डी हा खेळ कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व धाडसी होण्यासाठी प्रेरणा देतो . कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे . हा खेळ खेळण्यासाठी जास्त पैशांची गरज भासत नाही . योग्य प्रशिक्षण मिळाले तर कोणीही हा खेळ खेळू शकतो . या खेळासाठी चातुर्य आणि ताकद याची जास्त गरज असते. अशा प्रकारे कबड्डी हा खेळ मला खूप आवडतो.
Read Also – माझा गाव निबंध मराठी 2021 – Best My Village Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words
Essay 1 – खो-खो माझा आवडता खेळ निबंध 500 शब्दात | Kho-Kho my favourite game essay in marathi in 500 words
आपल्या देशात विविध परंपरागत खेळ खेळले जातात . मुले क्रिकेट, खो-खो ,कबड्डी असे अनेक प्रकारचे खेळ खेळतात . खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो . शारीरिक व्यायामासोबत मानसिक व्यायाम हि होतो . मला विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळायला आवडतात. मी शाळेमध्ये कबड्डी , खो-खो, लंगडी-पळती ,क्रिकेट असे विविध खेळ खेळते . पण त्यातून खो-खो हा माझा आवडता खेळ आहे . खो-खो हा अतिशय सोपा खेळ आहे.
या खेळासाठी वेग आणि कौशल्याची खूप गरज असते .कारण ह्या खेळामध्ये तुम्हाला पळायचे असते व प्रतिस्पर्शी खेळाडूला चकवा देऊन त्याला बाद किंवा त्याच्या पासून स्वतःला वाचवायचे असते . त्यामुळे हे खेळ खेळण्यासाठी तुमची शारीरिक स्तिथी हि मजबूत असायला हवी . जर तुमची शारीरिक अवस्था जर नाजूक असेल . किंवा जास्त धावल्याने तुम्हाला थकवा लागत असेल तर हा खेळ तुम्ही खेळू नये असे माझे स्पष्ट मत आहे.
या खेळासाठी मैदानात दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते .जसे क्रिकेट खेळताना तुम्हाला बॉल , बॅट किंवा अन्य इतर गोष्टींची गरज भासते तशी खो – खो खेळा मध्ये खांब सोडल्यास अन्य इतर गोष्टींची गरज भासत नाही . त्यामुळे श्रीमंत तर हा खेळ खेळूच शकतो परंतु गरीब लोक खेळासाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकत नाही . त्यामुळे ज्या लोकांना खेळाचे साहित्य परवडत नाही त्या मुलांसाठी हा खेळ अगदी योग्य आहे . खो-खो चे मैदान 111 फूट लांब व 51 फूट रुंद असते . खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो . प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात . बारा खेळाडूंपैकी नऊ खेळाडू मैदानात उतरतात .
एका संघातील ९ खेळाडूंपैकी आठ खेळाडू एका आड एकमेकांच्या विरुद्ध बाजू कडे तोंड करून बसतात. नववा खेळाडू हा एका खांबाजवळ उभारतो . दुसर्या खेळणाऱ्या संघातील ३ खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात उतरतात . प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. पहिले तीन खेळाडू बाद झाले की दुसरे तीन खेळाडू खेळात येतात . बसलेल्या खेळाडूंमध्ये पाठलाग करणाऱ्याने मागून स्पर्श करून खो म्हंटल्या वरच दुसरा खेळाडू पळणाऱ्याचा पाठलाग करू लागतो. आणि खो देणारा त्याची जागा घेतो. खो खो खेळाचा प्रत्येक डाव हा लहान वयाच्या स्पर्धकांसाठी पाच मिनिटांचा व मोठ्या स्पर्धकांसाठी सात मिनिटांचा असतो . खोखो खेळातही अनेक नियम पाळले जातात .

खेळणारा खेळाडू मैदानी सीमारेषात कोणत्याही दिशेने पळु शकतो. परंतु पाठलाग करणाऱ्या खेळाडूला दिशा बदलता येत नाही . खो मिळताच उठल्यानंतर तो खेळाडू ज्या दिशेने उडतो त्याच दिशेने त्यांना पळावे लागते . खेळणारा खेळाडू ला बसलेल्या खेळाडूंच्या मधून किंवा खांबा मधून जाता येते . परंतु पाठलाग करणाऱ्या खेळाडूला खांबा मधून जाता येत नाही . तर त्याला वळसा घालावा लागतो किंवा खांबाजवळ रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते . आमच्या शाळेमध्ये खो-खोचा संघ बनवला आहे . आम्ही नेहमी जिल्हांतर्गत , तालुकाअंतर्गत खो-खो स्पर्धेत भाग घेत असतो.
खो-खो खेळल्यामुळे माझ्यात अनेक बदल झाले आहेत . त्यामुळे माझा शारीरिक विकास झाला आहे . माझी रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे . माझी बौद्धिक क्षमताही वाढली आहे . खोखो खेळा मुळे माझे मन प्रसन्न होते . आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलांचे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बौद्धिक व शारीरिक विकासासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळणे महत्त्वाचे आहेत . त्यापैकी खो-खो हा खेळ आहे . ज्यामुळे शारीरिक विकास चांगला होतो . म्हणून खो-खो हा खेळ मला खूप आवडतो.
Essay 2 – खो-खो माझा आवडता खेळ निबंध 500 शब्दात | Kho-Kho my favourite game essay in marathi in 500 words
खो-खो हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे आणि लोक सर्वाधिक खेळतात. खेळ त्याच्या साधेपणाद्वारे परिभाषित केला जातो, कोणतीही अनिवार्य औपचारिक मैदानी रणनीती नाहीत आणि प्रत्येक खेळाडूने स्वतःच्या धोरणाचे पालन केले पाहिजे. खो-खो हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे, हा खेळ प्राचीन काळापासून मैदानात खेळला जात आहे. खो-खो भारतीय गावांमध्ये आणि ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे आणि देशाच्या प्रत्येक भागात आढळू शकते. खो-खो हा खेळ सामान्यतः शाळांमध्ये सुट्टीच्या वेळी किंवा पीई अभ्यासक्रमाचा भाग म्हणून खेळला जातो.
खो-खो खेळ सार्वजनिक उद्यानांमध्ये आणि मनोरंजनासाठीही खेळला जातो. खो-खो हा अतिशय सोपा खेळ आहे जो कोणीही खेळू शकतो. इतर खेळांप्रमाणे या गेमला कोणत्याही उपकरणाची गरज नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याला क्रिकेट खेळायचे असेल तर त्याला बॅट, चेंडू आणि विकेटची आवश्यकता असेल. दुसरीकडे, खो-खो खेळण्यासाठी फक्त त्यांच्या संघाची गरज असते. जर त्यांच्याकडे पुरेसे मित्र असतील ज्यांच्याशी ते अडचणीशिवाय खेळू शकतील तर कोणीही त्वरित गेम सुरू करू शकतो. खो-खो हा खेळ फक्त श्रीमंत किंवा गरीबच खेळू शकत नाही. हा गेम जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
खो-खोचे नियम
खो-खो अशा मैदानावर खेळला जातो ज्याच्या पृष्ठभागावर रेषा असतात. जमिनीवरील रेषांची ग्रीड समान आकाराच्या दोन भागांमध्ये विभागली आहे. प्रत्येक भागामध्ये, त्यांच्या बाजूचे खेळाडू इतर खेळाडूंकडील खेळाडूला ग्रिडच्या मध्यभागी ढकलण्याचा प्रयत्न करतात. खो-खो हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. दोन्ही संघातील खो खोमधील खेळाडूंची संख्या १२ आहे. पण खेळपट्टीवर फक्त नऊ खेळाडूच स्पर्धा करू शकतात. प्रमाणित खो-खो सामन्यात साधारणपणे दोन डाव असतात. प्रत्येक डावात, खेळाडूंकडे 9 मिनिटे असतील ज्यात पाठलाग करणे आणि धावणे समाविष्ट आहे. पाठलाग करणारा संघ मैदानावर गुडघ्यांवर उभा असेल आणि प्रत्येक खेळाडू सलगपणे विरुद्ध दिशेने तोंड करून एक पर्यायी दिशा आहे.
पाठलाग करणाऱ्यांनी धावपटूला शक्य तितक्या लवकर पकडले पाहिजे. खो म्हणताना पाठलाग करणारा दुसऱ्या संघाच्या जवळच्या खेळाडूला त्याच्या पाठीवर स्पर्श करेल आणि पाठलाग करणाऱ्या संघाला पाठलाग करण्यासाठी कमी वेळ लागेल तो विजेता होईल. दोन्ही संघातील धावपटू किंवा पाठलाग करणारा हा नाणेफेक ठरवला जातो. पाठलाग करणार्या संघाचा कर्णधार निर्धारित वेळेपूर्वी त्यांची पाळी संपवू शकतो. जो संघ जास्त गुण मिळवतो तो सामना जिंकतो. आणि जर डिफेंडर बाहेर पडला, तर त्याने लॉबीमधून सिटिंग बॉक्समध्ये प्रवेश केला पाहिजे.
खो-खो खेळण्याचे फायदे
खो-खो खेळ खेळण्याचे विविध फायदे आहेत:
खो-खो खेळामुळे माणसाची तंदुरुस्ती वाढते कारण या खेळात धावून लगेच बसावे लागते.
खो-खो खेळ खेळल्याने व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप सक्रिय बनते कारण जिंकण्यासाठी स्वतःची रणनीती बनवावी लागते.
खो-खोमध्ये कोणतेही उपकरण नसते, फक्त आरामदायी चड्डी आणि टी-शर्ट आणि खेळण्यासाठी खेळाडू आणि ते खेळण्यासाठी तयार असतात.
खो-खो खेळ अनेक इष्ट गुण जसे की खिलाडूवृत्ती, संघकार्य, निष्ठा, स्पर्धात्मकता आणि आत्मसन्मान यांना सामर्थ्य देतो.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट आज आपण my favourite game essay in marathi म्हणजेच माझा आवडता खेळ निबंध ह्या बद्दल जाणून घेतले . maza avadta khe म्हणजेच मराठी निबंध माझा आवडता खेळ ह्यात क्रिकेट कबड्डी आणि खो-खो हे १०० , ३०० आणि ५०० शब्दात अश्या तीन स्वरूपात बघितले. जर तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.
नक्की वाचा – जाहिरात म्हणजे काय? जाहिरातींचे प्रकार? What is advertising? Types of ads?