नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता पक्षी पोपट निबंध म्हणजेच my favourite bird parrot essay in marathi ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . parrot essay in marathi म्हणजेच essay on parrot in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघणार आहोत . तर चला सुरु करूया ….
माझा आवडता पक्षी पोपट निबंध | My Favourite Bird Parrot Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 100 शब्दात | Parrot Essay In Marathi In 100 Words
पोपट हा एक सुंदर पक्षी आहे . त्याचा रंग हिरवा असतो . त्याची चोच लाल व बाकदार असते . त्याच्या मानेवर लाल पट्टा असतो . पोपट झाडावर असतो . त्याला पेरू व मिरची आवडते . तो मिठू मिठू असे बोलतो . पोपट हा सगळ्यांच खूप आवडतो . पोपट हा खूप हुशार असतो . पोपट आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यात पटाईत असतो .

पोपट शक्यतो ३० ते ४० वर्षापर्यत जगतो . तो बर्र्याच प्राण्यांची , पक्षांची व माणसाची सुद्धा नक्कल करू शकतो . त्या मुळे हा पक्षी लहान मुलांना प्रिय असतो . पोपटांचे थवे आकाशात उडताना खूप सुंदर दिसतात . ह्या सगळ्यामुळे पोपट हा माझा आवडता पक्षी आहे
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 300 शब्दात | Essay On Parrot In Marathi In 300 Words
पोपट हा खूप सुंदर व रंगीबेरंगी पक्षी आहे अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात याच्या अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात . त्याचा रंग सामान्यतः हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. पोपट लहान मुलांना खूप आवडतो . तो झाडाच्या ढोलीत राहतो . पोपट हा मिठू मिठू बोलतो त्याचा ह्या बोलण्यामुळे तो सगळयांनाप्रिय असतो .
पिंजऱ्यात अडकून पडणे हे स्वतःच्या गोड बोलण्याची फळ म्हणावे लागेल. त्याच्या मानेच्या भोवती काळ्या रंगाची वलय असते .पोपटांची लांबी सहसा 12 ते 14 इंच असते . तो एक शाकाहारी पक्षी आहे . तो दाणे, फळे , पाने , बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. त्याला मिरची ,आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात . संघचारी म्हणजेच गटाने एकत्र राहणारे असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोगांट करणारे पक्षी आहेत . निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची ते हुबेहूब नक्कल करतात. पोपट तीस ते चाळीस वर्षे जगतात .

काही पोपट जास्त वर्षे जगतात . पोपट समूहाने जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सुंदर दृश्य पाहण्यासारखे असते. पोपट हुशार पक्षी आहे. त्यामुळे जो शिकवलेली कोणती हि भाषा सहज म्हणतो . त्याला पक्षांचा पंडित असे म्हणतात. भारतातील लोक त्याला राम राम ,सीताराम ,नमस्ते आणि स्वागतम सारखे शब्द शिकवतात . तो माणसाच्या आवाजाची नक्कल करू शकतो . बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात . भविष्य सांगणारा लोकांसाठी आणि सर्कसमध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतो. तो सर्वांचे मनोरंजन करतो .
पोपटे खूप सुंदर पक्षी आहे त्याच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली आहे. भरपूर माणसे पोटाला पिंजऱ्यात ठेवतात पण असे करू नये त्याऐवजी त्याला सोडून दया . कारण मनुष्यासारखे त्याला हि स्वातंत्र्य आहे . आणि जर त्याला आकाशात उडायला आवडत असेल तर आपण का त्यांना डांबून ठेवायचं ? . त्यामुळे पक्ष्यां घरट्यात ठेवणे बंद करायला हवे .
मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड, वृक्षतोड करत आहे त्यामुळे पोपट तसेच सर्व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे . आपल्याला त्यांच्यासाठी वेळेस उपाय करायला हवे . अन्यथा काही काळानंतर ते आपणास पाहायला सुद्धा मिळणार नाही .
Read Also – Best Essay On Science In Hindi | विज्ञान पर निबंध 2021 | Vigyan Essay In Hindi
माझा आवडता पक्षी पोपट निबंध 500 शब्दात | My Favourite Bird Parrot Essay In Marathi In 500 Words
निसर्गातील पक्षांमध्ये पोपट हा एक अतिशय सुंदर पक्षी आहे . तो पोपट हा पक्षी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या परिचयाचा आहे . हा पूर्णपणे शाकारी पक्षी आहे . याचे खाद्य म्हणजे डाळिंब ,पेरू, अंजीर, हिरवी मिरची, ज्वारी ,गहू ,बाजरी इत्यादी आहे. रानात पोपटांचा थवा पिकांवर धान्य टिपतो .पोपट मिठू मिठू आवाज करतो . पोपट पक्षी आपले घरटे मोठ्या आकाराच्या झाडांच्या ढोली मध्ये किंवा जुन्या घरांच्या फटी सांदी सापटीत करतो . पोपटाची मादी घरट्यात एका वेळी चार ते सहा अंडी घालते . पोपट दिसायला छान असल्यामुळे लोक त्याला मोठ्या हौसेने आपल्या घरामध्ये पिंजऱ्यात ठेवतात.
पोपटाचा रंग हिरवा व त्यामध्ये पिवळसर झाक असते .त्याचे शेपूट हिरव्या रंगाचे असते पोपटाच्या चोचीचा रंग तांबडा असतो . तो सुटसुटीत व डौलदार असतो . त्याची लांबी सुमारे 12 ते 14 इंच असते . या पक्षांमध्ये काही नरांच्या गळ्यात एक शेंदरी रंगाचा गोफ असतो. त्याचे डोळे गरगरीत असतात . त्याची चोच बाकदार व बळकट असते . चोचीच्या शेंड्याला धार असते . त्यामुळे पोपटास कठीण कवचाची फळे खाण्यास मदत होते . पोपटाचे जीभ जाड व मांसल असते . पोपट विविध फळांची अथवा बियांची टरफले व साली पटकन काढू शकतो व त्याच्या पायाची रचना झाडावर बसण्यास योग्य असते .
पोपट हा एक मनुष्य प्रिय पक्षी आहे व पोपट गटाने एकत्र राहणारे असून सगळ्या पक्षांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी मानले जातात. पोपट हा पाळिव पक्षी म्हणून लोक ह्या पक्षीला पाळतात . पोपट हा इतर पक्षांची व प्राण्यांची अगदी हुबेहूब नक्कल करण्यात पटाईत असतो म्हणूनच हा पक्षी सगळयांचा आवडता असतो . पक्षीप्रेमींच्या घरी तुम्हाला पोपट हा सर्रास त्यांच्या पिंजऱ्यात पाहावयास मिळेल . पोपटाला त्याच्या झाडाच्या ढोलीत राहणे आवडते .

तो उंच झाडे म्हणजेच जास्त पाने असलेल्या झाड वर जास्त राहतो . पोपटांना अनेक प्रकारची गोड फळे आवडतात . पोपटांचे गट जेव्हा आकाशात विहार करत असतात तेव्हा ते दृश्य मनमोहक असते . बहुतेकांच्या घरी पोपटाला बोलणे शिकवले जाते . व तो आपल्याला राम राम सुद्धा करतो . तुम्ही कधी तरी हा अनुभव घेतलाच असेल . आफ्रिकेतील काही जातींची पोपट फार स्पष्ट शब्दोच्चार करतात .पोपट्याला आपण सर्कस व भविष्य सांगणाऱ्या माणसाकडे बघितलंच असेल . हा पक्षी अतिशय हुशार असल्यामुळे हा कोणत्या हि भाषा शिकवल्यास सहज आत्मसात करू शकतो .
त्यामुळे हा पक्षी सर्कस व भविष्य सांगणाऱ्या माणसांच्या कमी येतो . पोपटी तीस ते चाळीस वर्षे जगतात काही पोपट जास्त वर्षे जगतात . पोपट हा खूप हुशार पक्ष असल्यामुळे त्याला पक्षांचा पंडित असेही म्हणतात. काही माणसे पोटाला पिंजऱ्यात ठेवतात पण असे न करता त्याला सोडून दयायला हवे कारण माणसासारखे त्याला कि स्वातंत्र्यच अधिकार आहे . त्यामुळे त्याला हि आकाशात उंच उडायला आवडत असेल .
त्यामुळे कोणत्याच पक्ष्यां घरच्या पिंजऱ्यात ठेवू नये . आजच्या काळात लोक स्थलांतरासाठी जंगल तोड करत आहेत त्यामुळे अशा पक्षांचे जीवन धोक्यात आले आहे . आताच्या काळात प्रदूषणामुळे पोपट किंवा इतर हि पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत . वाढत असलेल्या हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणामुळे हे पक्षी दिसेनासे झाले आहेत . तरी पूर्वीच्या काळापेक्षा त्यांचे आता प्रमाण खूपच कमी झालेले दिसते .
आपल्याला आपल्याला ह्या पक्ष्यांसाठी काहीतरी उपाययोजना करायलाच हवी . अन्यथा काही वर्षानंतर ते आपल्याला दिसणार सुद्धा नाही . आपण निसर्गातील अशा सुंदर पक्ष्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि आपल्या निसर्गाचे संगोपन केले पाहिजे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण आपण my favourite bird parrot essay in marath म्हणजेच माझा आवडता पक्षी पोपट निबंध ह्या बद्दल जाणून घेणार आहोत . parrot essay in marathi म्हणजेच essay on parrot in marathi ह्या पोस्ट च्या मदतीने तुम्ही हा निबंध अभ्यासात व परीक्षेत सहज लिहू शकता . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका …..
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.