माझा आवडता प्राणी निबंध मराठी 2023 | My Favourite Animal Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता प्राणी निबंध मराठी म्हणजेच my favourite animal essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता प्राणी निबंध मराठी म्हणजेच maza avadta prani marathi nibandh हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझा आवडता प्राणी निबंध मराठी | my favourite animal essay in marathi | maza avadta prani marathi nibandh in 100 , 200 , 300 and 500 words

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | my favourite animal dog essay in marathi

प्राणी हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अवतीभोवती आपल्याला कुत्रा ,मांजर, म्हैस ,गाय ,घोडा असे अनेक प्राणी बघायला मिळतात. प्रत्येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात . त्याचप्रमाणे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे . कुत्र्याची अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधी मध्ये कुत्र्यांचा उपयोग थेरपी म्हणून केला जातो . व कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. पुरातन काळापासून कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला . अन्नासाठी कुत्रा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा असे मानले जाते.

कुत्रा हा एक इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी ,गुन्ह्याच्या तपासासाठी तसेच सोबतीसाठी करतात. म्हणून बहुतांश लोकांच्या घरी आपल्याला कुत्रा पाळलेला दिसतो . मी सुद्धा माझ्या घरी कुत्रा पाळला आहे आणि त्याचं नाव मोती आहे . तो बुल डॉग जातीचा कुत्रा आहे . माझी आणि त्याची खूप चांगली मैत्री झाली आहे . आम्ही मोतीचे चांगली काळजी घेतो . तो दहा महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला पाळले आहे . त्यामुळे आमच्या घरचे सर्वांचा लाडका आहे . मोती हा सर्व वेळ जागा राहतो.

माझा आवडता प्राणी निबंध मराठी 2021 | My Favourite Animal Essay In Marathi

विशेषता तो रात्रीच्या वेळी आमच्या घराचे रक्षण करतो . जेव्हा आमचे संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर फिरायला जाते तेव्हा मोती आमच्या घराचे रक्षण करतो . मोती घरी आहे त्यामुळे घर सुरक्षित आहे या विचाराने आम्ही निश्चिंत राहतो. मला मोती सोबत वेळ घालवायला खूप आवडतो . मला माझे सर्व ताण आणि काळजी विसरून जायला लावतो . माझी त्याच्या सोबत मैत्री इतकी मजबूत झाली आहे की तो नेहमी माझ्या मागे फिरत असतो . दररोज सकाळी त्याला फिरायला घेऊन जाते . मी शाळेतून आले की दररोज संध्याकाळी तो माझ्याशी खेळतो.

तो आमच्या घराच्या बाहेर पाहरेदार म्हणून काम करतो . आजच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे अशा गुन्हेगारांना शोधण्यात कुत्री उपयोगी पडतात. प्रेमळ इमानदार आणि प्रामाणिक अशी कुत्र्यांची ओळख आहे. कुत्रा हा सर्वात उपयुक्त प्राणी आहे असं मला वाटते . त्यामुळे कुत्रा हा प्राणी मला खूप आवडतो.

माझा आवडता प्राणी निबंध मराठी 200 शब्दात | my favourite animal essay in marathi in 200 words

निसर्गातील प्रत्येक प्राणी हा निसर्ग साठी आणि मनुष्य साठी उपयोगी असतो. आपल्या सभोवताली आपल्याला कुत्रा ,मांजर ,घोडा, गाय ,म्हैस असे अनेक प्राणी बघायला मिळतात. हे सर्व प्राण्यांमध्ये मांजर मला खूप आवडते . मांजर ही पाळीव प्राणी आहे. कुत्र्याच्या खालोखाल मांजर एक लोकप्रिय पाळीव प्राणी आहे . आम्ही सुद्धा आमच्या घरी मांजर पाळले आहे तिचे नाव मनी असे आहे. तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. मांजरीच्या अंगावरचे केस खूप मऊ आहे त्यामुळे तिचे शरीर नेहमी मऊ लागते.

आमच्या मनीचे कान आणि डोळे खूपच छान आहेत. वस्तूची हालचाल ती लगेच ओळखते आणि मी तिला हाक मारली की ती लगेच माझ्याकडे येते. ती नेहमी आमच्या घरात मुक्तपणे फिरते . आमच्या मांजरीला नाकाने वास घेण्याची शक्ती खूप आहे. आमच्या घरामध्ये उंदीर ,साप गोम सारखे प्राणी येऊ देत नाही. ती शाकाहारी मांसाहारी असे दोन्ही पदार्थ खाते. परंतु दूध बिस्किट तिला खूप आवडते . मांजरीचे सर्व गुण वाघा समान असल्यामुळे मांजरीला वाघाची मावशी म्हटले जाते . आमच्या घरातले मांजर ही जणू माझी मैत्रीण आहे असे मला वाटते .

मी जेव्हा एकटी असते तेव्हा ती कायम माझ्यासोबत असते . मी कधी दुःखी झाले तर तिच्यामुळे माझे सगळे दुःख मी विसरते. माझ्या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींशी ती खेळत असते. मी शाळेतून आले की ते लगेच माझ्याजवळ येते मी तिला उचलून घेते आणि तिच्या अंगावर हात फिरवते. अंगावरून कुरवाळून घ्यायला तिला खूप आवडते . ती नेहमी आमच्या घरचे अंगण झाडावरून उड्या मारत खेळत असते . मनी आमच्या घरची एक सदस्य बनली आहे . ती घरात नसेल तर घर खूप रिकामे वाटते त्यामुळे तिच्यामुळे आमचे घर भरल्यासारखे वाटते तिच्या आवाजामुळे घरात उत्साह वाटतो .तिच्यामुळेच आमच्यातला बालिशपणा जागा होतो असे हे प्रेमळ मांजर मला खूप आवडते.

माझा आवडता प्राणी निबंध मराठी 300 शब्दात | my favourite animal essay in marathi in 300 words

आपण घरी जरी य एखादा कोणताही प्राणी पाळला तर आपला वेळ खूप मजेत जातो. आम्ही आमच्या घरी तानी नावाची सुंदर ,पांढरे शुभ्र रंगाची ,चमकदार डोळ्यांची , मऊ केसांची गव विविध रंगाची मांजर पाळले आहे . तिचे मी कितीही वर्णन केले तरी ते कमीच पडेल अशी ती आहे. आमची तानी फक्त दिसायला सुंदर नाही तर ती गुणांची खाण आहे असे मला वाटते .

मी तिला माझ्या आजोळहून आणली आहे. तिचर वागणे चालणे इत्यादी रुबाबदार वाघासारखी असल्याने आम्ही तिला वाघाची मावशी म्हणतो . ती अगदी छोट्या असल्यापासून तिला मी खूप चांगल्या सवयी लावल्या आहेत . ती दररोज भल्या पहाटे उठते तिच्या आवाजाने मी जागी होती . ती दररोज सकाळी दहा पंधरा मिनिटे स्वतःचे अंग चाटून स्वच्छ करते . उंदीर हे तीचे आवडते खाद्य आहे. तर दूध हे तिचे आवडते पेय आहे. ती कधीच आमच्या घरची दूध चोरून पीत नाही. ती मी घरी असताना अभ्यासाच्या खोलीत माझ्याजवळ बसते .

माझा आवडता प्राणी निबंध मराठी 2021 | My Favourite Animal Essay In Marathi

ती दिवसा खूप झोपते पण झोपल्यावर ही सावधान असते . मी तिच्या अंगावरून हात फिरवला की ती लगेच शेपटी हळूवार हलवते . घरात कुठेही बारीक आवाज आला की ती लगेच कान टवकारते . ती खूप शांत आहे. आमची तानी खूप बुद्धिमान व चतुर आहे . आमच्या घरात इतर कोणत्याही उपद्रवी प्राण्यांना येऊन देत नाही . तसेच ती खूप चतुर आहे ती बाहेर खेळत असताना तिच्यामागे चुकून जर शेजारचा कुत्रा लागला ती तर ती पटकन धावत जाऊन झाडावर बसते . ती खूप उंचावरून उडी मारते पण तिला इजा होत नाही .

ती चिमणी साळुंखे अशा छोट्या पक्षांची सुद्धा शिकारी करते . तिने शिकार खाल्यावर तिला दूध पियावेसे वाटत नाही . ती आमच्या घरात माझ्या छोट्या छोट्या वस्तू बरोबर म्हणजेच चेंडू पेन पेन्सिल इत्यादी सोबत लडीवाळपणे खेळते. मी पण तिच्याबरोबर खेळते . मला कधी आनंद किंवा दुःख वाटले तर मी तिच्याशी बोलते . ती शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेते .

मी शाळेला गेल्यावर ती माझी घरासमोर वाट पाहत असते . माझ्याबरोबर ती घरात येते आणि ती घरात नसले की मला अजिबात करमत नाही. तिला मी जवळ घेताच मला येणारा कंटाळा कसा दूर होते हे कळतच नाहीत आणि तानी आमच्या घरातील सर्वांची लाडकी आहे आणि मला ती खूप आवडते मी तिला जीवापाड जपते.

माझा आवडता प्राणी निबंध मराठी 500 शब्दात | my favourite animal essay in marathi in 500 words

माझा आवडता प्राणी हत्ती आहे. मुळात मला हत्तींची खूप आवड आहे. तो मला या पृथ्वीवरील सर्वात मैत्रीपूर्ण प्राणी म्हणून दिसतो. हत्तीचे चित्र डोळ्यासमोर येताच मला असे वाटते की काही दैवी प्राणी माझ्यासमोर अनेक आकर्षक नैसर्गिक वैशिष्ट्यांसह अवतरले आहेत. ते खूप खेळकर आहेत, हत्ती सहसा पाण्यात एकमेकांवर शिंपडण्याचा आनंद घेताना दिसतात, विशेषत: मुलांसह. मला हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात आकर्षक प्राणी वाटतो आणि त्यांच्या संख्येत प्रचंड घट होण्याची भीतीही मला वाटते.

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे ज्याचे वय 70 वर्षांपर्यंत आहे. हत्तीला दोन डोळे, दोन लांब कान, प्रचंड शरीर, लांब सोंड आणि छोटी शेपूट असते. हत्तींना त्यांच्या मोठ्या शरीरामुळे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्न लागते. हत्ती हा पृथ्वीवरील सामाजिक प्राण्यांपैकी एक आहे. ते कित्येक शेकडो वर्षांपासून माणसाबरोबर आहेत. ते समजण्यास तसेच दुःख, आनंद आणि इतर भावना व्यक्त करण्यास चांगले आहेत.
गटातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्याच्या मार्गदर्शनाखाली हत्ती कळपात फिरतात.

ते त्यांच्या तरुणांबद्दल खूप काळजी घेणारे आणि प्रेमळ आहेत; बेबी हत्ती खूप गोंडस आणि मोहक असतात. हत्ती त्यांचे जीवन त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह एक कुटुंब म्हणून जगतात. त्यांच्या गटात आजी, बहीण आणि आई हत्ती आहे. शिवाय, ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यावर दफनही करतात. हत्ती हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिवंत असताना त्यांची काळजी घेतात आणि मेल्यानंतरही त्यांचे रक्षण करतात. ते त्यांच्या कुटुंबाच्या किंवा साथीदारांच्या मृत्यूबद्दल शोक करतात आणि अश्रूही ढाळतात.

कोणत्याही शिकारीद्वारे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला करणे सोपे नाही. ते वैभवाच्या अधीन आहेत तसेच आनंदाच्याही अधीन आहेत; हत्तींवर अनेक प्रकारचे कार्यक्रम, जाहिराती किंवा इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले हत्ती अनेक कारणांमुळे हत्तींना त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे:

शिकारी क्रियाकलाप हे हत्तींच्या नामशेष होण्याचे एक प्रमुख कारण आहे. हस्तिदंताच्या दांडीला बाजारात जास्त किंमत असते आणि त्याचा उपयोग अनेक मौल्यवान वस्तू बनवण्यासाठी केला जातो. बहुतेक हत्तींना जीव देऊन दातांची किंमत मोजावी लागते. हस्तिदंत काढण्याची प्रक्रिया खरोखरच खूप कष्टाची आहे. याशिवाय हत्तींची त्यांच्या मांस आणि कातडीसाठीही शिकार केली जाते.

मानवी वसाहतींच्या विस्तारामुळे हत्तींच्या जिवंत प्रजातींची संख्या सातत्याने कमी होत आहे, त्यांचा निवारा आणि अन्न सुविधाही नष्ट होत आहेत. त्यांना अधिक अन्न तसेच मोठ्या जागेची आवश्यकता असते, त्यामुळे ते उपलब्ध न झाल्यास हे हत्ती नामशेष होऊ शकतात.

My Favourite Animal Essay In Marathi
My Favourite Animal Essay In Marathi

हत्तींना विविध संसर्ग आणि रोगांचाही परिणाम होतो, त्यामुळे अनेकदा त्यांचा अकाली मृत्यू होतो. हिंदू पौराणिक कथेनुसार, हत्तींना भगवान गणेशाचे प्रतीक मानले जाते आणि ते पूजेच्या अधीन असतात, तर दुसरीकडे त्यांना मांस, त्वचा आणि दात मिळविण्यासाठी मारले जाते.

5 जून 2020 रोजी स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्याने हत्तीचा मृत्यू झाल्याचे आम्ही ऐकले तेव्हा मानवांवरील अमानुष वागणूक समोर आली. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे हत्तीण गरोदर होती. अन्नाच्या शोधात ती गावात आली होती आणि गावातील काही लोकांनी तिला अननस खायला दिले होते. त्या प्राण्याचा मानवावर विश्वास होता, म्हणून त्याने ते फळ खाल्ले, परंतु अननस स्फोटकांनी भरलेले होते आणि पोटात स्फोट होऊन हत्तीचे संपूर्ण आतडे आणि पचनसंस्था जळून खाक झाली. ती दु:ख आणि वेदनांनी मरण पावली; आपल्या न जन्मलेल्या मुलालाही वाचवता आले नाही याचं तिला आणखीनच दु:ख झालं असेल.

असे घृणास्पद कृत्य ऐकून मी हैराण झालो आणि रडू लागलो. माझ्या मनात विचार आला की क्रौर्याच्या या पातळीपर्यंत कोणी कसे वाकू शकते. यासंदर्भात अनेक बातम्याही आल्या होत्या. प्राणी असे प्राणी आहेत जे बोलू शकत नाहीत आणि जर त्यांचा आपल्यावर विश्वास असेल तर आपण त्यांना त्रास देऊ नये म्हणून आपले प्रेम आणि निष्ठा सिद्ध केली पाहिजे.

हत्ती हे सर्वात समजूतदार, दयाळू, संवेदनशील आणि काळजी घेणारे प्राणी आहेत. ते प्राचीन काळापासून मानवजातीसोबत राहत आहेत. पण विकासाच्या शर्यतीत आपले अनेक वन्य प्राणी मारले जात आहेत. हत्तींनाही मोठा धोका आहे. त्यांचे संरक्षण सरकार आणि सार्वजनिक प्रयत्नांनी केले पाहिजे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता प्राणी निबंध मराठी म्हणजेच my favourite animal essay in marathi बद्दल चर्चा केली . माझा आवडता प्राणी निबंध मराठी म्हणजेच maza avadta prani marathi nibandh हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment