माझे बाबा निबंध मराठी 2023 | My Father Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझे बाबा निबंध मराठी म्हणजेच my father essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . maze baba marathi nibandh म्हणजेच essay on my father in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया marathi nibandh maze baba ….

माझे बाबा निबंध मराठी | my father essay in marathi | essay on my father in marathi in 100 , 300 and 500 words

माझे बाबा निबंध मराठी 100 शब्दात | my father essay in marathi language in 100 words

आपल्या जीवनात आईप्रमाणेच बाबांचे ही महत्व खूप आहे . ते खडक शिस्तप्रिय असले तरी मनाने प्रेमळ असतात . ते आपल्या कुटुंबाचा आधार असतात कोणतेही संकट आले तरी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात . आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी ते कायम आपल्यावर चांगले संस्कार करत असतात . त्याचप्रमाणे माझे बाबा सुद्धा अत्यंत हुशार शिस्तप्रिय मला अतिशय प्रेमळ आहेत . माझे बाबा डॉक्टर आहेत माझ्या बाबांनी शिक्षणासाठी खूप कष्ट केले आहेत .

शून्यातून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि आमच्या गावांमध्ये दवाखाना सुरू केला समजूतदारपणा मनमिळावू पणा आणि मैत्रीपूर्ण स्वभाव यामुळे माझे बाबा गावातील लोकांचे आवडते डॉक्टर आहेत . माझे बाबा आमचे घर घरातील सर्व खर्च काटकसरीने करतात त्यांच्या या स्वभावामुळेच आम्हालाही काटकसरीने राहण्याची पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लागली आहे .,कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी ते घेतात सुट्टीदिवशी आम्हाला सर्वाना ते फिरायला येतात .

माझे बाबा निबंध मराठी 2021 | Best My Father Essay In Marathi Language | Maze Baba Marathi Nibandh

आमच्या सोबत खूप गप्पा मारतात आम्हाला वेळ देतात माझे बाबा आमच्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ आहे . म्हणून मला नेहमी वाटते की जेव्हा आपण आईचे कौतुक करतो तेव्हा बाबांचे ही कौतुक केले पाहिजे त्यांनी केलेले कष्ट आपण कधीही विसरू नयेत . माझ्या बाबांचा मला फार अभिमान आहे आणि ते माझे जीवनाचे शिल्पकार आहेत . म्हणून माझे बाबा मला खूप आवडतात आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे.

माझे बाबा निबंध मराठी 300 शब्दात | my father essay in marathi language in 300 words – निबंध १

आई प्रमाणेच वडिलांचे अस्तित्वही आपल्या जीवनात खूप खूप महत्त्वाचे आहे. माझे वडील हे खूप प्रेमळ शिस्तप्रिय आहेत . माझ्या वडिलांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे . त्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे . त्यांचे बालपण गरिबीत गेले असल्यामुळे त्यांच्या शिक्षण जेमतेम दहावी झाले आहे . घरातील आर्थिक परिस्थितीमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत .

रोजंदारी करून घर कुटुंब चालवणे असा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे . कष्ट केल्याने कोणी मरत नाही असे त्यांचे तत्वज्ञान आहे . माझे वडील हे परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत . परंतु मुलांना खूप खूप शिकवायचे मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आपली मुलेही स्वतःच्या पायावर उभी राहावीत अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे . मला आठवते तेव्हापासून मी पाहतोय की माझ्या आई वडिलांनी आम्हा भावंडांना कधी गरिबीची झळ लागू दिली नाही. बालपणापासून ते आज पर्यंत त्यांचे आमच्यावर प्रेम काही कमी झालेले नाही .

शाळेमध्ये दररोज पाठवणे तसेच शाळा सुटल्यावर आम्हाला शाळेतून घरी न्यायला येणे असा त्यांचा दिनक्रम होता . शाळाही रस्त्याच्या पलीकडे असल्यामुळे ते नेहमी आम्हा भावंडांना शाळेत सोडण्यासाठी व शाळेतून परत परत घरी नेण्यास येत असत. आम्हा भावंडांवर त्यांचे समान प्रेम होते . कष्ट करून संसाराचा गाडा चालविणे ,उन्हातान्हाची पर्वा न करता कष्ट करून घाम गाळून कुटुंब चालवण्याचे काम हे आई वडील करीत असतात . शाळेतून घरी परत आल्यानंतर आमचा अभ्यास , शाळेमध्ये काय शिकवले हे विचारणे ,पाठांतर करायला सांगणे ,उजळणी घेणे हे कामदेखील वडील करायचे .

माझे बाबा निबंध मराठी 2021 | Best My Father Essay In Marathi Language | Maze Baba Marathi Nibandh

कारण तेच आमच्या कुटुंबांमध्ये साक्षर होते . लेखन हे चांगले असावे ,हस्ताक्षर सुंदर असावे अशी त्यांची आम्हाला शिकवण होती . त्यांच्या शिकवणीप्रमाणे माझे अक्षर देखील सुंदर झाली . त्यांच्या शिकवणीचा मला खूप खूप फायदा झाला . सणासुदीला भावंडांना नवीन कपडे घ्यायचे ,शाळेमध्ये लागणारे साहित्य उदाहरणार्थ वह्या ,पुस्तके ,दप्तर इत्यादी वस्तू अत्यंत गरिबीत त्यांनी आम्हाला घेतलेली आजही आठवतात .

त्यांनी कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी घेतलेले कष्ट खूप लाख मोलाचे आहेत . एक उज्वल यश संपादन करून मी माझ्या वडिलांचे स्वप्न साकार करेन अशी मला खात्री आहे . मी माझ्या आईवडिलांना कधीच विसरू शकत नाही . माझे माझ्या आई-वडिलांवर खूप प्रेम आहे व त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे.

माझे बाबा निबंध मराठी 300 शब्दात | my father essay in marathi language in 300 words – निबंध २

माझ्या मते एक मुलासाठी फक्त वडीलच आदर्श असू शकतात, म्हणून माझे वडील माझ्यासाठी आदर्श आहेत. एक चांगला माणूस, चांगला मुलगा, चांगला नवरा कसा असावा हे सर्व गुण मला माझ्या वडिलांमध्ये दिसतात. एक आदर्श वडिलांमध्ये जे गुण असावेत ते सर्व गुण माझ्या वडिलांमध्ये आहेत.

माझे वडील देखील माझे खरे मित्र आहेत, एक मित्र जो मला वेळोवेळी चांगले आणि वाईट समजवतो. आयुष्यात कधीही हार मानू नका आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देत पुढे जा, असे सांगून वडील मला नेहमीच प्रोत्साहन देतात.

मित्र आपल्याशी जसे बोलतो तसे वडील माझ्याशी बोलतात. तो माझा मित्र आहे असे मला नेहमी वाटते. वडील मित्रासारखे माझे ऐकतात आणि जेव्हा मी अस्वस्थ होतो तेव्हा ते माझा आधार बनतात.

वडिलांपेक्षा चांगला मार्गदर्शक असूच शकत नाही. जीवनातील अडचणींना तोंड कसे द्यायचे हे प्रत्येक मुलाला वडील शिकवतात. वडिलांकडे ज्ञानाचे भांडार आहे जे कधीही रिकामे होत नाही. बाबांनी मला चालायला शिकवले, चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि माझ्यासाठी काय वाईट आहे याची जाणीव करून दिली.

जेव्हा जेव्हा मला एखाद्या समस्येवर उपाय सापडत नाही तेव्हा माझे वडील माझे मार्गदर्शक बनतात आणि चुटकीसरशी मला असे उपाय सांगतात की माझी समस्या दूर होते.

माझे वडील एक सहनशील व्यक्ती आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो कधीच धीर सोडत नाही. पप्पा मला नेहमी एकच शिकवतात की आयुष्यात स्वतःवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. तो माझ्यावर किंवा माझ्या आईवर कधीच रागावत नाही.

वडील मला शिस्तीचे महत्त्व समजावून सांगतात आणि म्हणतात की जो माणूस शिस्तीचे पालन करतो तो नेहमीच यशस्वी होतो. त्यांचे जीवनही शिस्तबद्ध आहे. सकाळी लवकर उठणे, वेळेवर कामावर जाणे, वेळेवर अन्न खाणे हा त्यांच्या दिनक्रमाचा भाग आहे. सुट्ट्यांमध्ये ते आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जातात.

माझे वडील माझ्यावर आणि कुटुंबातील सर्वांवर खूप प्रेम करतात, ते घरात कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ देत नाहीत आणि आमच्या गरजा आणि विनंती देखील पूर्ण करतात. कोणत्याही प्रकारची चूक झाली तर आपल्याला शिव्या देण्याऐवजी ते नेहमी प्रेमाने समजावून सांगतात आणि चुकांचे परिणाम सांगून त्या पुन्हा न करण्याची शिकवणही देतात.

घरातील आजी-आजोबाही वडिलांचे खूप कौतुक करतात आणि म्हणतात की त्यांनी मुलासारखे व्हा. वडीलही आजी-आजोबांच्या पायाला स्पर्श करूनच कामाला निघतात. वडिलांचे आशीर्वाद मोठ्या नशिबाने येतात, त्यामुळे त्यांचा मान राखला पाहिजे, असे पापा सांगतात.

जगातील सर्व दुःखे सोसून, सर्व संकटे स्वतःवर घेऊनही बाबा आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात, हे सर्व पाहून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो. त्यांना वाढवणाऱ्या प्रत्येक मुलासाठी बाप हे देवाचे रूप आहे. बाप आपल्या मुलांच्या आनंदात स्वतःचे सुख विसरून रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबातील सदस्यांना सर्व सुख मिळवून देतो.

मी किती नशीबवान आहे की मला असे वडील मिळाले जे फक्त आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करतात. असे वडील प्रत्येक मुलाला देव देवो.

माझे बाबा निबंध मराठी 500 शब्दात | my father essay in marathi language in 500 words

मातृ देवो भव पितृ देवो भव ! आपल्या आयुष्यात आई-बाबा या दोघांची समान महत्त्व आहे . ते दोघे देवासमान आहेत . तरीही आई वर कविता अनेक लिहिल्या आहेत . पण वडिलांवर भव्यदिव्य असे लेखन झालेले दिसून येत नाही. बाबांचे व्यक्तिमत्व हे चार ओळीत बंदिस्त लिहिण्यासारखं नाही म्हणूनच मला वाटते की बाबांवर कविता ,लेख जास्त पहावयास मिळत नाहीत .

आज मी आमच्या शाळेतील एक आदर्श विद्यार्थी आहे . मला घडण्यामागे माझ्या बाबांचा मोलाचा वाटा आहे . माझे बाबा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत व ते स्वतः शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय समाजप्रिय शिक्षक असल्याने आमच्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार झाले आहेत .बाबाच्या खंबीर आधारामुळेच आमचे घर उभे आहे . ते स्वतः खूप गरीबी तून शिकले ,शून्यातून त्यांनी विश्व उभारले माझे . बाबा जितके कठीण तितकेच ते प्रेमळ आहेत . अगदी फणसा सारख्या त्यांचा स्वभाव आहे . मी शाळेतील शाळेबाहेरील अनेक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवतो मला बक्षीस मिळाल्यावर आई जवळ घेते तर बाबा मला माहित नसताना गोड खाऊ आणतात .

माझे बाबा निबंध मराठी 2021 | Best My Father Essay In Marathi Language | Maze Baba Marathi Nibandh

माझी एखादी चूक झाल्यावर माझे बाबा मला रागावतात कारण माझे व्यक्तिमत्व चांगले बनावे असे त्यांना वाटत असते . आपला मुलगा भविष्यात एकही चूक करू नये म्हणून ते सदैव दक्ष असतात . माझ्या बाबांना पुस्तक वाचनाची खूप आवड आहे . त्यात कोणता चांगला लेख आला तर ते नेहमी आम्हाला वाचून दाखवतात . त्यांच्यामुळे आम्हालाही वाचनाची आवड निर्माण झाली आहे . आईच्या प्रत्येक कामात माझे बाबा तिला मदत करतात त्यांनी आम्हाला विशिष्ट कामे नेमून दिली आहेत . त्यामुळे आम्हालाही काम करण्याची आणि वस्तू जास्त जागी व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली आहे. खरेच आई घराचे मांगल्य असते तर बाबा घरांच्या आधार असतात .

आई समिइतल्या ज्योतीप्रमाणे असते आणि बाबा समई प्रमाणे जणू असतात . म्हणूनच ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते . एखादी वाईट घटना घडली तर आई रडून मोकळी होते . पण सांत्वन मात्र बाबांना करावे लागते . आमच्या कुटुंबाचा आधार व बाबा आहेत . दररोज अभ्यासासोबतच बाहेरच्या स्पर्धापरीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी माझे बाबा मला नेहमी प्रोत्साहित करतात आणि ते अभ्यासासाठी मला मदत करतात बाहेरच्या जगात मी आत्मविश्वासाने करावे बाहेरच्या नवीन गोष्टी मला कळावे असे त्यांचे मत असते .

बाबांना नोकरी असून येथे आमचे घर काटकसरीने चालवतात पैशांचा योग्य वापर करतात . आजी-आजोबांचा खूप काळजी घेतात. शाळेतून घरी आल्यावर दररोज थोडावेळ आजी आजोबांबरोबर गप्पा मारतात .कधी माझ्याकडून चूक झाली तर मला समजावून सांगतात माझ्या बाबांनी आम्हाला दररोज नियमित व्यायाम करण्याची सवय लावली आहे त्यामुळे आपल्या आरोग्याला महत्त्व पटले आहे. सुट्टीदिवशी आमच्या सर्व कुटुंबाला ते वेळ देतात माझे बाबा मला खूप खूप आवडतात . त्यांनी शाळेत तसेच आमचे घरासमोर खूप झाडे लावली आहेत . मला नेहमी वाटते की आपण कधीही आईचे कौतुक जरूर करावे पण त्याच वेळी बाबांचे कष्ट विसरू नये .

देवकी यशोदेचं कौतुक करावे पण त्याच वेळी पुरात डोक्यावरून पोराला घेवून जाणारा वासुदेव आठवावा . चालताना बोटाला चुकून ठेच लागली तर तोंडातून शब्द बाहेर पडतो आई ग ! पण समोर मोठा साप पाहिला की मात्र मुखातून शब्द बाहेर पडतो च बाप रे ! . मला खूप अभिमान आहे की माझे बाबा माझ्या आयुष्यातले खरे शिल्पकार आहेत . त्यांच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. अनंत उपकार बाबा तुमचे ,घडवले माझे आदर्श जीवन ,भरारी घेताना यशापर्यन्त जपून ठेवेन संस्काराचे धन .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझे बाबा निबंध मराठी म्हणजेच my father essay in marathi language बद्दल चर्चा केली . maze baba marathi nibandh म्हणजेच essay on my father in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व marathi nibandh maze baba हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment