माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी 2023 | My Family Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी म्हणजेच my family essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी म्हणजेच essay on my family in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी | essay on my family in marathi language in 100 , 200 and 300 words

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी 100 शब्दात | my family essay in marathi language in 100 words

“कोरोना विरुद्ध मोहीम आली घरोघरी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ” कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे . भारत देशात ही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोरोना ने हाहाकार माजवला आहे . कोरोना हा फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भाग वाडी-वस्ती पाडे इत्यादी पर्यंत येऊन पोहचला आहे .

या मोहिमे अंतर्गत गावच्या सरपंच पासून ते खासदार पर्यंत सर्व जण सहभागी होणार आहेत . स्वतःचा जीव धोक्यात घालून गावातील लोक प्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी ,पक्ष कार्यकर्ते ,कोरोना योद्धा, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर ,शिक्षक इत्यादी सर्व घटक या मोहिमेत सामील होणार आहेत . ते सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य बद्दल चौकशी करणार आहेत. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने जबाबदार होऊन स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेईल तेव्हा विषाणूचा प्रसार थांबेल.

या कोरोना काळात सरकारचे नियम पाळणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच नियमित समतोल आहार घेणेही महत्त्वाचे आहे . आपण स्वतःचे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे . आपल्या कुटुंबा सोबतच आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींना जागरूक करणे ही आपली जबाबदारी आहे. आरोग्य कर्मचारी तसेच इतर सरकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या मोहिमेत सहभागी होत आहेत तर आपण कुटुंबासाठी यामध्ये नक्कीच सहभाग घेऊ शकतो.

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी 200 शब्दात | my family essay in marathi language in 200 words

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने वेळोवेळी अनेक उपाय योजना केल्या आहेत. आरोग्य संघटना, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी कोरोना योद्धा, सेवाभावी संस्था इत्यादी लोकांनी दिवस-रात्र एक करून कोराना विरुद्ध लढाई चालू ठेवली आहे . पण कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे . यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारीचे पाऊल उचलले आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही विशेष अशी कोरोना विरुद्ध मोहीम दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात दोन टप्प्यात राबवली जाणारी ही मोहीम प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य जपणारे लोक जागृती करणारे विशेष मोहीम राहणार आहे . कोणती गोष्ट तेव्हाच खरी यशस्वी होते जेव्हा त्याची सुरुवात स्वतःपासून होते. म्हणूनच ही मोहीम प्रत्येकाला स्वतः पासून सुरवात करायची आहे .

कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे ऑक्सिजन लेवल तपासून शक्य वाटल्यास आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटीद्वारे आरोग्य संदेश दिला जाणार आहे. यातून मास्क चा वापर करावा, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टंसिंग पाळावे हे कोरोना विरुद्ध लढायचे सोपा मार्ग सांगितले जाणार आहेत. प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य यातून जपले जाणार आहे . प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असेल तर कोरोनाविरुद्ध लढाई नक्कीच यशस्वी होईल .

या मोहिमेदरम्यान सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयांवर निबंध स्पर्धा तसेच पोस्टर व अनेक स्पर्धांचे भव्य आयोजन केले आहे . याचा उद्देश या मोहिमेत जनतेचा सहभाग वाढून कोरोना विरुद्ध लढाई जिंकणे हा आहे. ही स्पर्धा वैयक्तिक तसेच संस्था पातळीवर असून यात विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे .

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी 2021 | My Family Essay In Marathi Language

महाराष्ट्र संतांची ,शूर वीरांची भूमी आहे हा वारसा आपण अखंड जपण्यासाठी या मोहिमेत प्रत्यक्ष भाग घेऊन साथ देऊया. हे जीवन पुन्हा नाही त्यामुळे कोरोना विरोध लढाईसाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले नवीन पाऊल योग्य ध्येया पर्यंत नेण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन स्वतःचे आरोग्य स्वतः जपूया . महाराष्ट्र कोरोना मुक्त करुया पुन्हा नव्या जोमाने कार्य करूया. आशा कोविड मुक्त महाराष्ट्राची, नव्या दिशेची नव्या पर्वाची.

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी 300 शब्दात | my family essay in marathi language in 300 words

आजच्या धावत्या जगात पूर्णपणे बंद करून संपूर्ण दुनियेची झोप उडवली आहे असा वायरस म्हणजे कोरोना वायरस . कोरोना विषाणूने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात थैमान घातले आहे . हा विषाणू दिसायला अतिशय सुष्म असला तरी अत्यंत घातक असा विषाणू आहे . WHO ने या विषाणूला साथीच्या रोगाचा विषाणू असे घोषित केले आहे. हा विषाणू इतका घातक आहे की 2 व्यक्तीच्या संपर्कात आल्या तरी त्या विषाणूचा प्रसार होत आहे . इतकेच नव्हे तर या विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे .

या विषाणूपासून स्वतःचे रक्षण करणे यातच खूप मोठे शहाणपण आहे . कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने आजपर्यंत अनेक उपाययोजना उपक्रम राबवले आहेत. त्याचेच पाउल म्हणून महाराष्ट्र सरकारने माझ्या कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतः ची जबाबदारी घेणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे . कोरोनाविरुद्ध ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचे कुटुंब हे त्याचे आधार स्तंभ असते.

प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आपले कुटुंब नेहमी आपल्या आधार देत असते. परंतु कोरोना व्हायरस असे संकट आहे की या संकटावर मात करण्यासाठी आपण स्वतः आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ बनने महत्त्वाचे ठरणार आहे . माझे कुटुंब माझी जबाबदारी या शब्दातच सर्वकाही लपलेले आहे . यावरून या काळात आपल्या कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे . आपल्या देशाचे डॉक्टर, नर्सेस ,आरोग्य कर्मचारी ,पोलिस ,सफाई कर्मचारी या कोरोनाविरुद्ध रात्रंदिवस लढत आहेत .

माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमे अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच अन्य सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांचे आरोग्य तपासणी करणार आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी योग्य सल्ला देणार आहेत . आपल्या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून यामुळेच आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे.

सरकारच्या सर्व नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे . बाहेर जाताना मास्क चा वापर करणे ,बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुणे ,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे इत्यादी सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. आपण निश्चय करूया की आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊया . एकजुटीने कोरोनाला हरवूया. जेव्हा प्रत्येक नागरिक या मोहिमेत सहभागी होईल तेव्हाच भारत देशच नव्हे तर संपुर्ण जग लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी म्हणजेच my family essay in marathi language बद्दल चर्चा केली . माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी म्हणजेच essay on my family in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment