नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता मित्र निबंध मराठी म्हणजेच my best friend essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . maza mitra nibandh in marathi म्हणजेच essay on my best friend in marathi language हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
माझा आवडता मित्र निबंध मराठी | Maza Mitra Nibandh In Marathi | Essay On My Best Friend In Marathi Language In 100 , 300 And 500 Words
माझा आवडता मित्र निबंध मराठी 100 शब्दात | My Best Friend Essay In Marathi Language In 100 Words
मैत्री हे एक असे नाते आहे जिथे फक्त तुम्हाला आनंदच मिळतो . मित्र जोडीला असले म्हणजे सर्व सुख ,दुख विसरून आपण त्यांच्यातच रमून जातो . असाच आहे माझा एक आवडता मित्र . दोस्त , यार , भाऊ कीती सारे नावे त्याची . पण प्रत्येक शब्दात प्रेम तेवढेच . माझ्या आवडत्या मित्राचे नाव आहे साहिल . आम्ही लहानपणा पासून म्हणजे पहिली पासून एकत्रच आहोत .

तो खूप समजुदार आहे . तो प्रत्येक वाईट प्रसंगात माझ्या मागे उभा राहतो . आमच्यात कित्तेक वेळा भांडणे सुद्धा होतात . परंतु आमची दोस्ती कधी तुटली नाही . असा मित्र देवाने मला दिला म्हणून देवाचे मी आभार मानतो .
माझा आवडता मित्र निबंध मराठी 300 शब्दात | Maza Mitra Nibandh In Marathi In 300 Words
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मैत्री ही खूप महत्त्वाची असते . मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असणारा आदर प्रेम आणि आपुलकी. एक मित्रा शिवाय आपले जीवन हे अधुरी आहे . एक चांगला मित्र हा आपल्या सुख दुःखात आपल्याला साथ देतो . जेव्हा आपण एखाद्या अडचणी असतो तेव्हा तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो . तसेच तो आपल्या समस्या दूर करतो आणि सांत्वन देतो . मधुरा ही माझी आवडती मैत्रीण आहे. अगदी बालवाडीपासून आम्ही एका शाळेत आहोत . त्यामुळे आमची मैत्री खूप पक्की झाली आहे .
म्हणून माझ्यासाठी मधुरा खूप खास आहे . ती अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू आहेत . मधुरा अभ्यासात खूप हुशार आहे . त्यामुळे अभ्यासात काही अडचण आली की मी तिची मदत घेते . दररोज आम्ही दोघे एकाच बाकावर बसतो . शाळेतील दररोजचे तास आणि आमच्या गप्पा गोष्टीमुळे दिवस कसा जातो हे आम्हालाही कळतच नाही . मधुरा अभ्यासासोबतच खेळ चित्रकला, वक्तृत्व अशा अनेक गोष्टींमध्ये सुद्धा हुशार आहे . शाळेतल्या सर्व शिक्षकांची ती आवडती विद्यार्थिनी आहे. तिला वाचनाचीही खूप आवड आहे . शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही वाचनालयात जातो .
आणि गोष्टींची पुस्तके घेऊन येतो. तिच्यामुळे मला ही वाचनाची आवड निर्माण झाली आहे . मधुरा दररोज डब्यामध्ये वेगळे पदार्थ घेऊन येते . डब्यातील पदार्थ आणि वाटून खातो . सुट्टी झाली की आम्ही शाळेतील मैदानावर खेळायला जातो आणि मजा करतो . आम्ही दोघी एकाच कॉलनीत राहत असल्यामुळे दररोज शाळेला एकत्र जातो . सुट्टीच्या दिवशी घराजवळील मैदानावर खेळला जातो . परीक्षेदरम्यान काही वेळा आम्ही एकत्र बसून अभ्यास करतो . अभ्यास करताना काही अडथळे आले तर दोघेही एकमेकांना सांगून मदत करतो .

काही वेळा आम्ही एकमेकांशी भांडतो सुद्धा पण रुसवा गेला की आम्ही पुन्हा एकत्र येतो सगळे विसरून पुन्हा एकमेकांशी बोलतो . मधुराला पुस्तके वाचण्याची आवड असल्यामुळे तिच्या वाढदिवसाला प्रत्येक वेळी मी शुभेच्छा पत्र आणि वेगळ्या गोष्टींची पुस्तके भेट म्हणून देते . त्याचबरोबर ती सुद्धा माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला सुंदर भेटवस्तू देते . आम्ही दोघीजणी एकमेकांवर खूप प्रेम करतो .
आम्ही दोघेही नेहमी एकमेकांना चांगला सल्ला देत असतो . नवीन गोष्टी करण्यासाठी मधुरा नेहमी मला प्रेरित करते . अडचणी वेळी नेहमी ती मला मदत करते . अशा सर्व गुणांमुळे मधुरा ही माझी आवडती मैत्रीण आहे . आतापर्यंत तिने मला केलेली मदतीच्या उपकारांची मी ऋणी आहे.
- Read Also – Essay On Importance Of Time In Marathi Language
माझा आवडता मित्र निबंध मराठी 500 शब्दात | My Best Friend Essay In Marathi Language In 500 Words
मैत्री एक अनमोल जिव्हाळ्याचे नाते म्हणजे सखा ,सोबती आणि जिवलग . माझे अनेक मित्र आहेत अगदी बालपणापासून ते आजपर्यंत परंतु माझा जिवलग आवडता मित्र आहे तो म्हणजे सूरज . सुरज हा माझा अतिशय आवडता मित्र आहे . तो माझ्या घराशेजारीच राहतो . सुरजची आणि माझी अगदी बालपणापासूनच घट्ट मैत्री आहे . काय सांगू मी माझ्या जिवलग मित्रा बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे . सूरज हा माझ्या बालपणापासून चा मित्र आहे . तो माझ्याच वर्गात शिकतो .
तो एका गरीब कुटुंबातील आहे . तो जरी परिस्थितीने गरीब असला तरी मनाने आणि बुद्धीने खूप श्रीमंत आहे . बालपणी आम्ही दोघेजण खूप धमाल करायचो . आम्ही दोघे ही लहानपणी खूप खेळलो आणि बालपणातील सुखद क्षणाचा आम्ही मनमुराद आनंद घेतला आहे. आम्ही दोघेही सहावी मध्ये शिकतो . वर्गात आम्ही दोघे एकाच बेंचवर बसतो . मन लावून अभ्यास करणे ,एकमेकांना अभ्यासात मदत करणे आणि रिकामा वेळेत खेळणे व एकत्र खेळणे ,जेवणे हा आमचा रोजचा दिनक्रम . शाळा सुटल्यानंतर आम्ही एकत्र खेळतो अभ्यास करतो .
आम्ही दोघे दररोज शाळेत जातो. एखादा दिवस तो वर्गात नसेल तर मला अजिबात करमत नाही . शाळा सुटल्यावर कधी एकदा त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करतो असे वाटते . तो परिस्थितीने जरी गरीब असला तरी मनाने खूप श्रीमंत आहे . त्याच्या आई बाबांची आणि माझ्या आई बाबांची चांगली ओळख आहे . त्याचे हस्ताक्षर खूप सुरेख व टपोरे आहे . त्याची चित्रकला अप्रतिम आहे . तो शाळेतील सर्व उपक्रमात सहभाग घेतो . मी तसा अबोल होतो पण सुरज सारखा अनमोल बोलका मित्र मिळाल्या मुळे मी बोलू लागलो आहे .
सुरज वर्गात सर्वात हुशार असूनही त्याला आपल्या हुशारीचे अजिबात गर्व नाही . घरची परिस्थिती गरिबीची असूनही सुरजच्या चेहर्यावर नेहमी हास्य असते . सुरज हा अत्यंत प्रेमळ आणि गुणी विद्यार्थी आहे . तो आमच्या वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा आहेत . अत्यंत अभ्यासू वृत्तीचा सुरज त्याच्यामुळे मला हे अभ्यासाची गोडी लागली आहे . सुरज ला काही मदत लागली तर मी नेहमी त्याला मदत करतो . अभ्यासात मला ही चांगले गुण मिळावेत यासाठी नेहमी तो माझ्या प्रत्येक विषयाची उजळणी घेतो . शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्याची ओळख आहे .

सुरज चा आवडता विषय गणित आहे . अभ्यासाबरोबरच तो उत्तम खेळाडू देखील आहेत . तो उत्कृष्ट कबड्डीपटू आहे . त्याने अनेकदा आंतरशालेय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकले आहेत . असा हा सर्वगुणसंपन्न सुरज स्वतः गरीब असून देखील इतर गरीब आणि अनेक लोकांची देखील मदत करतो . आपल्या प्रमाणेच इतरही मुलांना लिहिता वाचता यावे यासाठी तो अप्रगत विद्यार्थ्यांची उजळणी घेतो . त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतो . सुरजला पुढे शिकून पायलेट व्हायचा आहे. गरिबीवर मात करून व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्याला या देशाची सेवा करायची आहे .
सुरज चे जितके गुण सांगावे तितके कमीच पडतात . मी खूप नशीबवान आहे कारण मला सुरज सारखा मनमिळावू ,प्रेमळ ,उत्साही जिवाभावाचा मित्र मिळाला आहे . सुरज विषयी मी इतकेच म्हणेन की ” सुरज तू आहेस जणू सूर्यासारखा तेजस्वी तारा ,माझ्यासारख्या अनेकांना सदैव प्रेरणा प्रकाश देणारा ” असा हा माझा जिवाभावाचा जिवलग मित्र मला खूप खूप आवडतो .तो सर्वांशी अगदी चांगल्या प्रकारे आणि प्रेमाने बोलतो .
तसा एक मित्र नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो त्याचप्रमाणे सुरज सुद्धा माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या पाठीशी राहतो . मी त्याच्यावर खूप प्रेम करतो .आमची मैत्री कितीही काही झाल तरी संपणार नाही . ती एक सदाहरित आहेत असे म्हटले तरी चालेल . सुरज सारखा खरा मित्र म्हणजे देवाकडून मिळालेल्या अमूल्य भेट आहे. मला या मैत्रीचा खूप अभिमान आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता मित्र निबंध मराठी म्हणजेच my best friend essay in marathi language बद्दल चर्चा केली . maza mitra nibandh in marathi म्हणजेच essay on my best friend in marathi language हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.