नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता संत मराठी निबंध म्हणजेच maza avadta sant essay in marath बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता संत मराठी निबंध म्हणजेच maza avadta sant essay in marath हा निबंध २०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
माझा आवडता संत मराठी निबंध | Maza Avadta Sant Essay In Marathi In 200 , 300 And 500 Words
माझा आवडता संत मराठी निबंध 200 शब्दात | Maza Avadta Sant Essay In Marathi In 200 Words
संत रामदास हे महाराष्ट्राचे थोर संत कवी होते . छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गुरु होते. त्यांचे मूळ नाव नारायण ठोसर असे होते . लोक त्यांना आदरपूर्वक समर्थ किंवा समर्थ रामदास असे संबोधतात . संत रामदास यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला . वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न ठरविण्यात आले . तेव्हा लग्नमंडपात सावधान हा शब्द ऐकताच त्यांनी पळ काढला .

नंतर ते नाशिकला गेले व त्यांनी तपश्चर्या केली . तिथे कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केले. नाशिकमध्ये ते बारा वर्षे राहिले व त्यांनी या काळात प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे ,वेद ,उपनिषदे यांचा अभ्यास केला . बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांनी भारत भ्रमण केले . त्यांनी गावोगावी मारुती मंदिरांची स्थापना केली व देशभरात सुमारे अकराशे मठ स्थापन केले. ” मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ” याकरिता त्यांनी आपले जीवन अर्पीले . त्यांनी माणसाला संत सन्मार्गाचा आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला .भक्ती केल्याने देवाची प्राप्ती होतेच असे त्यांचे म्हणणे होते .
त्यांना समाजाविषयी अपार तळमळ होती . धर्मस्थापना हेच त्यांचे कार्य होते . दासबोध ,मनाचे श्लोक ,करुणाष्टके ,भीमरूपी स्तोत्र व अनेक आरत्या त्यांनी रचल्या आहेत. लोकांनी साक्षर व्हावे म्हणुन त्यांनी अनेक कार्य केले . ते म्हणत ” जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांस सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जन ” .समर्थ रामदासांनी साताऱ्याजवळील सज्जनगडावर शेवटचा काळ घालवला . माघ कृ. 9 ,शके 1603 ला संत रामदास यांचे निधन झाले .
माझा आवडता संत मराठी निबंध 300 शब्दात | Maza Avadta Sant Essay In Marathi In 300 Words
सामाजिक सुधारणा ,सामाजिक न्याय आणि स्वच्छता या विषयात रुची असणारे महाराज म्हणजे संत गाडगे महाराज . संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे आहे . त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखुबाई असे होते . दिन दलितांचे, पीडितांचे सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत गाडगेबाबा .
डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी ,एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगड्यांची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता . संत गाडगेबाबा म्हणजे एक चालतीबोलती पाठशाळा होती .समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी स्वच्छता आणि चरित्र यांची शिकवण दिली .
ते गोरगरीब ,अज्ञान ,अंधश्रद्धा ,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने काम करणारे समाज सुधारक होते . त्यांनी अपंगाची सेवा सुद्धा केली . समाजातील लोकांना त्यांनी अडाणी राहू नका पोथी ,पुराणे ,मंत्र-तंत्र चमत्कार या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली .

त्यांच्या अंगावर सदैव घोंगडीचा अंगरखा आणि हातात मातीचे भांडे असत. म्हणूनच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत . व पुढे ह्याच नावाने ते प्रसिद्ध झाले. संत गाडगेबाबा यांनी अनाथ लोकांसाठी महाराष्ट्र ठीक ठिकाणी धर्मशाळा ,अनाथालय ,आश्रम विद्यालय सुरू केली . संत गाडगेबाबा महाराजांनी देहू, आळंदी, पांढरपूर, नाशिक व मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या आहेत. त्यांनी अनेक जनकल्याणाची कामे राबवली आणि यशस्वीरित्या पार पाडली.समाजातील वाईट परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी किर्तनाचा मार्ग वापरला .
जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद ते मानत नव्हते. व त्यांनी नेहमी समतेचा पुरस्कार केला .त्यांच्या मनात लोकांचे कल्याण करण्याची भावना असे.त्यांच्या कीर्तनातून श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत . गाडगे महाराज संत तुकाराम महाराज ह्यांना गुरू मानत. आपले विचार जनमाणसात पोहचविण्यासाठी त्यांनी काही वेळा संत तुकारामांच्या अभंगाचा वापर केला .
रंजले ,गांजले लोक, दीनदुबळे लोक आणि अपंग ,अनाथ ह्यांच्या साठी गाडगे महाराज देव होते . 20 डिसेंबर 1956 साली अमरावती जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचा मृत्यु झाला . हल्ली गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार ही दिला जातो .
- Read Also – Majhi Aaji Essay In Marathi Language
माझा आवडता संत मराठी निबंध 500 शब्दात | Maza Avadta Sant Essay In Marathi In 500 Words
” जे का रंजले गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले ,तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा “असा अभंग जनसामान्यात पोहोचवून ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवणारे संत म्हणजे संत तुकाराम.असाध्य ते साध्य करिता सायास ,कारण अभ्यास तुका म्हणे |अशा प्रकारचे अनेक एकापेक्षा एक नितांत सुंदरअभंग महान संत तुकाराम महाराजांनी रचले.
संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे आहे . त्यांना तुकोबा असेही म्हटले जाते. संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक थोर वारकरी संत होते .
त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला त्यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची पूर्वापार प्रथा होती . त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता . वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते .
पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता . तुकारामांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक त्रास भोगावी लागले . पंढरपूरचे विठोबा म्हणजेच विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ही ओळखतात .

महाराष्ट्राच्या आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना गुरू मानत. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची सुरुवात संत तुकाराम यांनी केली. समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून आणि कीर्तनातून केले . संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या होती. संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा लिहिली .
त्याच्यामध्ये पाच हजारांच्या वर अभंग आहेत . पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते . त्यांनी विठ्ठलावर तसेच समाजाला अनेक उपदेशपर अभंग ,कीर्तने रचली . लहानपण देगा देवा ,मुंगी साखरेचा रवा | तसेच ” नाही निर्मळ जीवन, काय करील साबण “अशी अनेक अभंग व त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे द्योतक आहेत . त्यांच्या अभंगातील गोडवा अतुलनीय आहे .
त्यांच्या अभंगांना स्वतः बाज वआगळे सौंदर्य आहे त्यातील शब्द प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतात. संत तुकराम महाराज ह्यांनी वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा निर्माण केली . सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची प्रभावी मुहूर्तमेढ संत तुकाराम महाराजांनी रोवली. त्याकाळी समाजातील अंधश्रद्धा दूर करून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण महान कार्य तुकाराम महाराजांनी केले .
स्वतःच्या सुखापेक्षा रयतेच्याव जगाच्या कल्याणाकडे त्यांनीसदैव लक्ष दिले .संत तुकाराम महाराज हे त्या काळातील लोक पसंतीस येऊन . बहुजन समाजाला जागृत करून देव धर्माबद्दल त्यांची मते लोकांना पटवून देण्यात यशस्वी ठरले . समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म ,नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले .
त्याचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत . संत तुकाराम यांना गरिबां विषयी कळवळा होता . माणुसकीची त्यांना जाणीव होती . कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होता. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगा बरोबरच गवळणी ही रचल्या आहेत . त्यांच्या अभंगांचा अभ्यास करून सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते . हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो . तुकाराम महाराजांच्या जीवन पटावर अनेक पुस्तके मालिका चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत .
आजही मराठी भाषेत सुप्रसिद्ध असलेल्या अनेक म्हणी, वाक्यप्रचार, शब्दप्रयोग आपण तुकाराम महाराजांच्या पोथी तून घेतलेले आहेत . आजच्या समाजाला संत तुकारामांचे अभंग नवीन दिशा देतात. आज आपण विज्ञान तंत्रज्ञान खूप प्रगती केली तरी प्रत्येकाला अनेक कौटुंबिक ,सामाजिक ,भावनिक समस्या भेडसावतात . त्या सर्वांवर तुकोबाच्या अभंगातून नक्की मार्ग सापडेल . नाही तर आपली अवस्था ” तुझे आहे तुजपाशी ,परी तू जागा चुकलासी” अशी होईल . आपल्या देशात संत तुकाराम महाराज जन्मास आले हे प्रत्येक भारतीयांचे अहोभाग्यच म्हणावे लागेल .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता संत मराठी निबंध म्हणजेच maza avadta sant essay in marath बद्दल चर्चा केली . माझा आवडता संत मराठी निबंध म्हणजेच maza avadta sant essay in marath हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.