नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्रियन लग्नसमारंभा मध्ये नवरा व नवरीला उखाणे घेण्याची रीत आहे . व ही पद्धत कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे . ह्या पोस्ट मध्ये आज आपण अस्सल मराठी उखाणे नवरदेवासाठी म्हणजेच marathi ukhane for male बघणार आहोत .
व हे 101 ukhane in marathi for male म्हणजेच मराठी उखाणे नवरदेवासाठी ते त्यांच्या लग्नापूर्वी लक्षात ठेवून लग्नामध्ये हे उखाणे म्हणजेच smart marathi ukhane male ते घेऊ शकतात . तर चला बघूया 110 अस्सल मराठी उखाणे नवरदेवासाठी म्हणजेच ukhane marathi for male ……
Table of Contents
110 मराठी उखाणे नवरदेवासाठी | Marathi Ukhane For Male | Ukhane In Marathi For Male
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा,
एक दिवा, दोन वाती,……. च्या सुख दुःखात, मी तिचा साती
राधेचा चेहरा, थोडासा हासरा……. समोर, पैसा पण कचरा
एक दिवा, दोन वात……… बरोबर करतो, संसारची सुरूवात
स्वरांचा सुर, सुरांची गायिकी……..समोर माझ्या, पैशांची काय लायकी
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ माझ अपूर्ण आयुष्य, ……. मुळे पूर्ण
राम भरवतो सितेला, प्रेमाचा घास…..च माझ जीवन, आणि…….च माझा श्वास
उसाचा पेर, लागतो गोड माझ्या आयुष्याला मिळाली, …….. ची जोड.
कृष्णाला आहे, राधेची जोड ………….माझी, साखरे पेक्षा गोड
हिरव्या गार निसर्गाची, ताजी तवानी हवा सुखी ठेविन ……….. ला, तूम्ही निश्चिंत राहा
हिमालय पर्वतावर, बर्फाचे खडे ……. चे नाव घेतो, आई बाबांपुढे
पवित्र नदीचा, संत प्रवाह अवडली……….., केला विवाह
अर्जूनाची युक्ती, अर्जूनाचा नेम सदैव करेन , …………..वर प्रेम
“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी ..………चे नाव घेतो, तुमच्या साठी
उगवला रवी मावळली रजनी, ………चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध, ………सहवासात सापडतो आनंद.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ………बरोबर बांधली जीवनगाठ.
जगाला सुवास देत उमलती कळी, ………नाव घेतो………वेळी.
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, ………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व, ………… आहे माझे जीवन सर्वस्व.
भाजीत भाजी मेथीची, ………माझ्या प्रीतीची.
विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात, ………… अर्धागिनी म्हणून घेतला हातात हात.
पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती, हाण नाही मार नाही,………कशी रडते.
सत्कर्याची करावी नेहमीच पूजा ….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.
ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास ….. झाली माझी लाडकी राणी खास.
बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप ….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.
मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा ….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?
रोज….. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस ….. काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस.
नाव नाव क्यू कहते है नाव नदी के इस पार आप सब लोग उस पार, मै और….. नाव मे इस पार.
रोम इज द स्वीट आर्ट ….. इज इन माय हार्ट.
गुल गुल को पसंद है, बुल बुल को पसंद है, किसी को क्या पसंद है मेरी तो….. मन पसंद है.
घर असावं नेहमी क्लीन अँड नेट …… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव ….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.
पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.
सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा….. चा सहवास मला नेहमीच हवा.
स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली ….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.
अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश, सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.
आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास ….. ला देतो मी लाडवाचा घास.
सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास…… ला देतो मी श्रीखंडाचा घास.
ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.
गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे…. चे नाव माझ्या ओठी यावे.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन……… आहे माझी ब्युटी क्वीन.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर…. च्या आगमनाने पडली त्यात भर.
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन सौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !!!!!
नंदनवनात अमृताचे कलश …. आहे माझी खूप सालस.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री …..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान …..चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.
निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात अर्धांगिनी म्हणून …. ने दिला माझ्या हातात हात.
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी …. चे नाव घेतो … च्या घरी.
पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका, … ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का – चस्का.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, …….. ची व माझी जडली प्रिती.
पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले त्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले.
पुढे जाते वासरू, मागून येते गाय, …ला आवडते नेहमी दुधावारची साय.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, ….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
लग्नात लागतात हार आणी तुरे …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
वड्यात वडा बटाटावडा, … मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.
प्रसन्न वदनाने आले रविराज … ने चालविला संसारात स्नेहाचा साज.
फुलासंगे मातीस सुवास लागे, …. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.
बंगलौर, म्हैसूर ,उटी म्हणशील तिथे जाऊ. घास भरवतो ……… बोट नको चाउ.
बकूळीच्या फुलांचा सडा पडे अंगणी सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती ……………. चे नाव घेतो लग्नाच्या राती.
भाजीत भाजी पालक, … माझी मालकिन अन् मी मालक !
मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे, …माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.
मातीच्या चुली घालतात घरोघरी ….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.
मायामय नगरी, प्रेममय संसार ….. च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.
मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावली घंटी, ……. माझी बबली आणि मी तिचा बंटी.
मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.
मुखी असावे प्रेम, हातामधे दया … सोबत जोडली माझी माया.

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास …. ला देतो गुलाबजामचा घास.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा …………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
मोहमाया – स्नेहाची जाळी पसरली घनदाट …… बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा जीवनाचा खेळ समजला … मुळे सारा.
रुप्याचा लोटा सोन्याची झारी असली काळी सावळी तरीही …. माझी प्यारी.
गर्द आमराईत पोपटांचे थवे _ चे नाव सदैव माझ्या ओठी यावे.
काय जादू केली आणि जिंकले मला एका क्षणात _ भरली पहिल्याच भेटीत माझ्या मनात.
दवबिंदू पडताच चमकतो फुलांचा रंग सुखी आहे आयुष्यात _ च्या संग.
हों नाही म्हणता म्हणता लग्नाला परवानगी दिली, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने _ माझी राणी झाली.
कोकणातून आणले फणस, काजू _ च नाव घ्यायला मी कशाला लाजू.
हिरवळीवर फिरते सुवर्ण हरिणी _ झाली माझी सहचारिनी.
चांदण्या आहेत चंद्राच्या सोबती _ झाली माझी जीवन साथी.
वसंत ऋतूत कोकिळा गाते गोड _ माझ्या तळहाताचा फोड.
महाराष्ट्रीयन संस्कृतीत असतात खूप सण _ ला आयुष्यभर सुखी ठेवेन हा माझा पण.
प्रेमाची नगरी, सुखाचा संसार _ च्या जिवावर माझ्या आयुष्याचा भार.
अंगणातील झाडाला बहरली पाने फुले _ च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
मोगऱ्याच्या गजऱ्याचा दरवळतो सुगंध _ च्या येण्याने झाला मला आनंद.
नेहरूंच्या शर्टवर नेहमी गुलाबाचे फुल _ च्या रुपाची पडली मला भूल.
कोकणात जाताना लागतो घाट _ च्या हौशी साठी केलाय सगळा थाट.
चेहऱ्यावरची बट तिची दिसते एकदम भारी _ झाली माझी तेव्हापासून जाळतात सारी.
माझ्या ___ राणीला पाहा सगळ्यांनी निरखून जसा कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.
आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर ___ सारखी पत्नी मिळायला भाग्य लागते थोर.
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आज आपण महाराष्ट्रियन लग्नपद्धती गरजेचे असलेले मराठी उखाणे नवरदेवासाठी म्हणजेच marathi ukhane for male जाणून घेतले . ह्या मध्ये आपण 110 ukhane in marathi for male म्हणजेच marathi ukhane for men हे अस्सल मराठी उखाणे नवरदेवासाठी जाणून घेतले . व हे ukhane marathi for male अर्थात smart marathi ukhane male तुमच्या होणाऱ्या नवरऱ्याला , भावाला व तुमच्या मित्रा सोबत शेयर करायला विसरू नका ………