200 नवीन स्त्रियांसाठी उखाणे | Marathi Ukhane For Female

नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्रियन लग्नपद्धती मध्ये नवरा व नवरीला उखाणे घेण्याची रीत आहे . व ही रीत कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे . ह्या पोस्ट मध्ये आज आपण अस्सल स्त्रियांसाठी उखाणे म्हणजेच marathi ukhane for female बघणार आहोत .

व हे 200 ukhane in marathi for female म्हणजेच स्त्रियांसाठी असणारे उखाणे ते त्यांच्या लग्नापूर्वी लक्षात ठेवून लग्नामध्ये हे उखाणे म्हणजेच modern marathi ukhane for female ते घेऊ शकतात . तर चला बघूया 200 अस्सल स्त्रियांसाठीचे उखाणे म्हणजेच smart marathi ukhane female ……

200 स्त्रियांसाठी उखाणे | Marathi Ukhane For Female | Ukhane In Marathi For Female

मंदिरात वाहाते, फुल आणि पान, … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा, .. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, .. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, … रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा, … रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, … रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, … रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती, … रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, … रावांचे नांव घेते, …च्या घरात.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती, …रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, … रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला, … रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, … रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, … रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती.

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन.

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष, … रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, … रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा, … रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, … रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे, … राव हेच माझे अलंकार खरे.

पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा, … रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान, … रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला, … रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला.

श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, … रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, … रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

घातली मी वरमाला हसले… राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन, घडविले देवानी… रावांना जीव लावून.

धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.

नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन, …रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात, … रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर, आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, … रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, … रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.

चांदीचे जोडवे पतीची खुन, .. रावांचे नांव घेते,… ची सुन.

दारी होता टेबल, त्यावर होता फोन, … रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?

अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे, … रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले, … रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले.

ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला, … रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, .. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती, … रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी. … रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस, …रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल, …रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

गृह कामाचे शिक्षण देते माता, …रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे, … रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला, … रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा, … रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे, …रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी, …रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा, त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल, …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले, …रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल, … राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले, … रावांचे हेच रुप मला फार आवडले.

आज सारे सुख माझ्या दारी दाटले, …रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा, …राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा, …रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन, …रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग, …रावांच्या संसारात मी आहे हंग.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश, …रावांवर आहे माझा विश्वास.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे, …रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची, …रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती, …रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, … रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

करवंदाची साल चंदनाचे खोड, … रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, … रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा …रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात, …रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, …रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, आता ….राव माझे जीवनसाथी.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, …रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

“नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद , …रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!”

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!”

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची च नाव घेते, सून मी ची

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध… __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध

आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस … __च नाव घ्यायला, मला येते फारच मौज

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व… __ रावांच नाव घेते, ऐकताय ना सर्व?

महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस… __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट… __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून… __रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… __ राव भरले, माझ्या मनात

साजूक तुपात, नाजूक चमचा… __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर… _रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा… __रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा

नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा … __ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले… __रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले

कळी हसली, फूल फुलले, मोहरून आला सुगंध… __रावांमुळे जीवनात, बहरून आलाय आनंद

यमुनेच्या काठी, ताजमहाल प्रेमाचा… __रावांचे नाव घेते, मान राखून सर्वांचा

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याच्या पट्टा… __रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध… __रावांमुळे मिळाला, मला भरभरून आनंद

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने… __रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती… __रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा… __सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून… __रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून

जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल… __रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल

देवळावर चढवला, कळस सोन्याचा… __राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार… __रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले… __रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

विठ्ठलाच्या च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा… _रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा…

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल, … रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, … रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, … रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, …रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी, …चे नाव घेते तुमच्या साठी!”

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद, …रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन, …रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी, …रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर, …रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश, …रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात, …रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, …रावां सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट, …रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, …….. रावांच नाव घेते तांदूळ घेऊन हाथी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

रिद्धी सिद्धी दाता मंगल कार्याला आला, ………..चं नाव घेते ……..सणाला.

निलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात, ………. ची पत्नी होऊन धन्य झाले जगात.

सप्तपदीच्या सात पाऊलात भरला सुंदर अर्थ, ……….. पती मिळाले जीवन झाले कृतार्थ.

निलावर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी, ……….. चं नाव घेते ………. च्या घरी.

निळे-निळे डोंगर, हिरवे-हिरवे रान, …………. चं नाव घेऊन राखते सर्वांचा मान.

आशिर्वाद घेतला मातेचा, निरोप घेतला पित्याचा, ………… चा व माझा संसार आहे सुखाचा.

भारतातले पवित्र स्थान आहे वाराणसी, ……….चं नाव घेते ………. दिवशी.

भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवतगीता, ………… नाव घेते सर्वांच्याकरिता.

200 नवीन स्त्रियांसाठी उखाणे | Marathi Ukhane For Female

संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी, ………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.

संसाररुपी मार्गावर दोन प्रवासी नवे, ………… हेच पती सात जन्मी हवे.

सुमुहूर्तावर संसार सागरात पदार्पण केलं, जीवन नौकेच सुकाणू,……..च्या हाती दिले.

दह्याचे करतात श्रीखंड, दूधाचा खवा, ……..चं नाव घेते नीट लक्षात ठेवा.

सतारीचा नाद, वीणा झंकार, ……….. च्या जीवावर घालते मंगळसूत्राचा अलंकार.

प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे, भक्ती आठवावी संतजनाची, त्याग जाणावा राम सीतेचा,…….नाव घेते आशिर्वाद द्या अखंड सौभाग्याचा.

जिजाऊ होती माता शिवाजी राजाची, ……चे नाव घेते सून……..ची.

व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार, ……….. च्या नावाला रात्र झाली फार

गंगा वाहे, यमुना वाहे सरस्वती झाली गुप्त, …….. रावाच्या पदरी घालून आई-बाप झाले मुक्त.

चातक पक्षी पावसाचे पितो पाणी, …….चे नाव घत ……….. दिनी.

श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, ………चे नाव घेते ………दिनाला / सणाला.

आरक्त गालावर उमटतात लज्जेचे भाव, ……. नी घेतला माझ्या अंतकरणाचा ठाव.

पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर, ……….. रावाचे नाव ऐकण्यासाठी आहेत सर्वजण हजर.

सकाळच्या वेळी बागेत फूल तोडी माळी, ……..रावांचे नाव घेते ………वर आली पाळी.

नभांगणाच्या बागेत सूर्यनारायण माळी, ……….. चं नाव घेते……. वर आली पाळी.

महादेवाच्या पुढे असतो नंदी, ………. रावाचे नाव घेऊन …….. ला देते संधी.

चांदीच्या तांब्याला नागाची खूण, ……..रावांचे नाव घेते ……..ची सून.

स्वच्छता आणि टापटीप अरोग्याचे मूळ, ………… रावांसाठी सोडले माहेरचे मूळ.

स्त्रयांचे कर्तव्य पतीसेवा हेच, ………चे आयुष्य वाढो भूषण मला हेच.

मंगलमाते मंगलदेवी वंदन करते तुला, ………. ना आयुष्य घालून सौभाग्य दे मला.

जय जवान, जय किसान गर्जतो सारा वेश, …….. नी अर्पण केला मला सौभाग्याचा देश.

नेत्राच्या निरांजन लावते पापणीच्या ताट. ……….. माझ्या ऋणानुबंधनाच्या गाठी.

श्रावणधारेच्या वर्जवाणीत पृथ्वी बनते अंजली, ……. व्या संसारी माझी तुळस रंगली.

तार्याचे लुकलुकन चंद्राला आवडलं, ………… नी जीवनसाथी म्हणून ला निवडलं.

लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी, ………रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी.

संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता, ……….. रावांचे नाव घेते खास तुमच्याकरिता.

सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र, ………… रावांच्या जीवावर बांधले मणी मंगळसूत्र.

वाड्यात असते अंगण, अंगणात तुळशीचे वृंदावन, ……….. चा संसार म्हणजे नंदनवन.

संसाररूपी सागरात, प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते …….बरोबर.

गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रुपाचा, …….. रावांना अशिर्वाद द्यावा दीर्घायुष्याचा.

महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल वाहते वाकून, ………… रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.

परमेश्वराचे सोबती, सुख दु:खाचे भागीदार, ……… च्या जीवनी मी आहे साथीदार.

सुवासिक पारिजात बहरो प्रीतीच्या दारी ………… साठी माहेर सोडून आले मी सासरी.

रेशमी सदऱ्याला हाडाचे बटन….रावांना आवडते खेकड्याचे मटन.

पानोपानी फुल फुलावे गहिरे असावे रंग—राव राहतात नेहमीच राजकारणात दंग

आज घरात माजघरात ठेवले हंड्यावर हंडे, नऊ हंडे …. रावांना सोडून सर्वच माकड तोंडे.

दिसते तसं नसते” ….रावांच्या चेहऱ्यावर नेहमीच क्युट सी स्माईल असते.

बशीत बशी काचेची कपबशी उखाणा माझा जुळत नाही-… रावांच नाव सांगू कशी.

नवरात्रिच्या नवरात्रात दुर्गा देवीला चढविला साज…. रावांचे नाव घेते रविवार आहे आज.

अधिकमास सपंला नवरात्रिची झालि सुरुवात… रावांचे नाव घेते एक सेकंदाच्या आत.

नवरात्रीच्या मंडपात दांडिया खेळते छान –…. रावांच नाव घेऊन देते हळदी, कुंकवांच वान.

सोनाराच्या दुकानात सोनाराने घडवला चिकूहार… रावांच नाव घेते आज आहे देवीचा दिवस मंगळवार.

डोंगरगडचे मंदिर बांधणारे होते कुशल… रावांच नाव घेते नवरात्री स्पेशल,

नवरात्रात पूजा करते मनोभावे देवीची …रावांच नाव घेवून देवीला ओटी भरते खणा-नारळाची.

अष्टमीच्या रात्री सनेडो वर केला डॉन्स**रावांच नाव घ्यायला आज मिळाला मला चॅन्स.

दसऱ्याला महत्त्व असते अपतट्याच्या पानाचे * * * * * *रावांसारखे पति मिळाले पुण्य पूर्वजन्माचे

अयोध्येच्या श्री रामाने दहन केले लंकेच्या रावणाचे अशोक राव पाटील आहे हींगणा गावाचे

नवरात्रात ठेवले नऊ दिवसाचे ऊपवास*रावांना भरवते मी गुलाब जामूनचा घास.

Indian army भारताची शान” .. रावांच नाव घेते कॅप्टन नौजवानाचा ठेऊन मान.

Airplane ची टिकिट बुक केली First class च्या सीटवर बैंगलोर फिरायलागेले” ….रावांबरोबर.

हळदीची साथ असते कुकंवाला रावांच नाव घेते कोजागीरी पोर्णिमेला.

Winter झाला सुरू थंडीचा गार वारा AC आता हटवा ….राव जरा शेकोटी पेटवा.

काकडीचे केले थालीपीठ त्यात टाकलं कोथिंबीर * रांवाच्या सेवेसाठी मी नेहमीच असते हाजिर.

नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर आई वडील विसरले… रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.

ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना ****राव के साथ पिक्चर देखा made in china.

क्रिकेट, फूटबॉल पुरुषाचा खेळ… रावांच नाव घ्यायला मला वेळच वेळ.

रितिक रोशन नी डॉन्स केला रघुपति राघव राजाराम या गाण्यावर मी पार्टीला गेले *** रावांच्या म्हणण्यावर.

विराट कोहली चा सिक्सर, सचिन, युवराजचा चौका …रावांन सोबत क्रिकेट बघायचा हा माझा पाहिलाच मौका.

पाऊस लागला की कोकिळा गाते गोड अन…… रावांना भेटायची मला लागली आहे ओढ.

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी.. ….रावांचे नाव घेते मी त्यांची राणी..

अंगणात पडले आहेत पारिजातकाचे सडे……रावांचे नाव घेते, सर्वांनी लक्ष द्या इकडे.

पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला.. …रावांचे नाव घ्यायला अन् आग्रह कशाला..

पुण्याला जाताना लागतो लोणावळा घाट..……रावांसोबत बांधते आयुष्याची गाठ..

नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद…..रावांच नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद.

दिवाच्या आधी येत मुंब्रा….. अन् बबड्याच नाव घेते त्याची लाडकी शुभ्रा.

नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर….. राव आहेत माझे दिसायला स्मार्ट ठेवू नका कूणी त्यांच्यावर नजर.

निष्कर्ष

ह्या पोस्ट मध्ये आज आपण महाराष्ट्रियन लग्नपद्धती गरजेचे असलेले स्त्रियांसाठी उखाणे म्हणजेच marathi ukhane for female जाणून घेतले . ह्या मध्ये आपण 200 ukhane in marathi for female म्हणजेच अस्सल स्त्रियांचे उखाणे जाणून घेतले . व हे modern marathi ukhane for female अर्थात smart marathi ukhane female तुमच्या होणाऱ्या बायकोला , बहिणीला व तुमच्या मैत्रिणी सोबत शेयर करायला विसरू नका ………

Leave a Comment