मराठी भाषा दिन निबंध मराठी 2023 | Marathi Bhasha Din Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण मराठी भाषा दिन निबंध मराठी म्हणजेच marathi bhasha din essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . मराठी भाषा दिन निबंध मराठी म्हणजेच marathi bhasha diwas essay in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

मराठी भाषा दिन निबंध मराठी | Marathi Bhasha Din Essay In Marathi | Marathi Bhasha Diwas Essay In Marathi in 100 , 200 and 300 words

मराठी भाषा दिन निबंध मराठी 100 शब्दात | Marathi Bhasha Din Essay In Marathi in 100 words

मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म निमित्ताने मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो . क्रांतीचा जयजयकार ,वेडात मराठे वीर दौडले सात ,आगगाडी आणि जमीन पृथ्वीचे प्रेमगीत कुसुमाग्रज यांच्या कविता आजही लोकप्रिय आहे. 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जातो .

हा दिवस साजरा करताना मराठी गायन वादन वक्तृत्व स्पर्धा मराठी निबंध स्पर्धा शास्त्रीय संगीत यांचे आयोजन केले जाते . नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते . मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास मराठीचा इतिहास ,आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे . तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला खरा अर्थ प्राप्त होईल.

मराठी भाषा दिन निबंध मराठी 200 शब्दात | Marathi Bhasha Din Essay In Marathi in 200 words

मराठी राजभाषा दिन हा दर वर्षी 26 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो . या दिवसाला मराठी भाषा दिवस ,मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन ,मराठी भाषा दिन असे विविध नावाने संबोधले जाते . ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . ” माझ्या मराठी मातीचा ,लावा ललाटास टिळा ,हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, तिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरही मात ” कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी लोकांचा स्वाभिमान बनून गेले आहे .

मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रज यांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित आहे व त्यांची निर्मीती संस्कृत पासून झाली आहे . महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे . मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे. ” माझ्या मराठीची बोलू कौतुके ,परी अमृतातेही पैजा जिंके ,ऐसी अक्षरे रसिके मेळविन “असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा ही जास्त आहे.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा व कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात . तसेच ठिकाणी मराठी नाटके काव्य संमेलन व मराठी संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे . तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला खरा अर्थ प्राप्त होईल.

मराठी भाषा दिन निबंध मराठी 300 शब्दात | Marathi Bhasha Din Essay In Marathi in 300 words

” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी ” 26 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म निमित्ताने जागतिक मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो.जीवनलहरी ,किनारा, मराठी माती ,वादळवेल अश्या प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. तसे दुसरा पेशवा ,वीज म्हणाली धरतीला ,नटसम्राट ,राजमुकुट ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या अशा अनेक साहित्य आणि कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले. मराठी दिन हा दिवस मराठी भाषा दिन ,मराठी राजभाषा दिन ,गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो . कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरुवात कवितेपासून केली . पुढे कथा कादंबरी ललित वाड्मयातील नावाजलेली साहित्य रचना यांच्या लिखाणातून अवतरत गेली. भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे .

आपल्या मराठी माती मराठी चित्रपट ,नाटक ,काव्य ,कविता इत्यादींचा फार मोठा वाटा आहे . अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठी वारसा जपत आलेलो आहोत . आपल्या या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले . संत रामदास, संत ज्ञानेश्वर ,संत तुकारामाचे अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र श्लोक लिहिले आणि लोकांना चांगला संदेश दिला. असे संतांनीसुद्धा मराठी भाषेचा ठसा लोकांवर उमटवला . छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले .

एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीत घडले . गानसम्राज्ञी लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर ,माधुरी दीक्षित ,पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ,समाजसेवक अण्णा हजारे, समाज सुधारक बाबा आमटे तसेच उत्तम मराठी लेखक नाटककार पु ल देशपांडे यांसारखे अनेक रत्ने मराठी मातीतच घडली. पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत . मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहेत . इंग्रजी ही काळाची गरज आहे नक्कीच त्याबद्दल दुमत नाही पण .

त्यासाठी मराठी भाषेला विसरणे योग्य नाही . मराठी बोलणारा माणूस नोकरी-व्यवसाय उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे . तिथे जाऊन हिंदी-इंग्रजी सारख्या इतर भाषा उघड करू मराठी भाषेला विसरत आहे. त्या मायबोलीत आपण जन्मलो आणि आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे . आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे ही सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी अशा गोष्टी मुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण मराठी भाषा दिन निबंध मराठी म्हणजेच marathi bhasha din essay in marathi बद्दल चर्चा केली . मराठी भाषा दिन निबंध मराठी म्हणजेच marathi bhasha diwas essay in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment