आंबा मराठी निबंध 2023 | Mango Essay In Marathi | Essay On Mango In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण आंबा मराठी निबंध म्हणजेच mango essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . आंबा मराठी निबंध म्हणजेच essay on mango in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

आंबा मराठी निबंध | Mango Essay In Marathi | Essay On Mango In Marathi in 100 , 200 and 300 words

आंबा मराठी निबंध 100 शब्दात | Mango Essay In Marathi in 100 words

आंबा हे फळ अतिशय मधुर लागते. उन्हाळा सुरू झाला की सर्वांना आंब्याची चाहूल लागते . लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात व वरून पिवळा रंगातून , मधुर रसरशीत गोड गर आणि त्याच्या आत कोय असे आंब्याची रचना असते. कच्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी चवीला आंबट असते .कैरीच्या नंतर आगमन होते आंब्याचे .

खरंतर आंबा व आमरस न आवडणारा मराठी माणुस या भूतलावर शोधावे लागेल . कोणताही मराठी माणसाला आईच्या हातची पुरणपोळी आणि आमरस नक्की आठवत असेल . तर अक्षय तृतीयेला आंब्याला खास मान दिला जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आंब्याचे निरनिराळे पदार्थ ठरवले जातात . रत्नागिरीचा हापूस अप्रतिम चवीमुळे फारसा सातासमुद्रापार जाऊन पोचला आहे.

आंबा मराठी निबंध 200 शब्दात | Mango Essay In Marathi in 200 words

फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे फळ म्हणजे आंबा. आंबा हे सर्व फळांमधून सर्वांचे आवडते फळ आहे. महाराष्ट्रात आंब्याला कोकणचा राजा असे म्हणतात . एवढेच नव्हे तर आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे . एप्रिल ते जून हा आंब्याचा मोसम असतो.आंब्याच्या झाडाला फुले येतात त्यांना मोहर असे म्हणतात. झाडांना आंबे लागण्या अगोदर आंब्याचे झाडांना मोहर आलेले दिसते .भारतात जवळपास आंब्याच्या त1300 जाती आहेत . परंतु 25-30 जाती या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत .

आंबा मराठी निबंध 2021 | Mango Essay In Marathi | Essay On Mango In Marathi

हापूस आंबा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आणि देवगड तालुक्यातील होणारा आंबा सर्व श्रेष्ठ समजला जातो. तसेच पायरी ,राजापुरी ,रायवळ ,लंगडा इत्यादी अनेक आंब्यांच्या जाती आहेत. आंब्याचे झाड 30-40 मीटर उंच असते . आणि झाडाचा घेर 10 मीटर एवढा असतो .झाडाच्या कोवळ्या पानांचा रंग केशरी असतो नंतर तो गडद हिरवा होतो. कैरी पासून लोणचे, गुळांबा असे पदार्थ तयार केले जातात . तर आंब्यापासून आमरस, आम्रखंड ,आंबा बर्फी ,मॅंगोची पल्प, मॅंगो आईस्क्रीम इत्यादी पदार्थ तयार केले जातात . काही लोक आंब्याचा पल्प साठवून वर्षभर आंब्याचा आस्वाद घेतात. भारतीय संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे . आंब्याच्या झाडाची पाने पूजेसाठी वापरली जातात .

तसे हिंदू धर्मात सणाच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण दरवाजावर बांधले जाते . आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. जे हृदयविकारावर पचन व इतर आजारांवर मदत करते. तसेच आंबा हे फळ रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत करते . आंब्याचे झाड मोठे असल्यामुळे झाडाची गार सावली आपल्याला सुखावते. उन्हाळ्यामध्ये अशा झाडांचे महत्त्व जास्त जाणवते. आंब्याचे झाड एकदा लावले तर ते शेकडो वर्ष ते आपल्याला फायदा देते. आंब्याचे झाड जेवढे मनुष्यासाठी उपयुक्त आहे तेवढेच निसर्गासाठी ही उपयुक्त आहे . त्यामुळे निसर्गाची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी एक तरी आंब्याचे झाड लावणे आवश्यक आहे.

आंबा मराठी निबंध 300 शब्दात | Mango Essay In Marathi in 300 words

आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो हे आपल्या लहानपणी आंब्याचे गाणे नक्की सर्वांनी ऐकले असेल . आंबा या नावातच माधुर्य आहे . आम या संस्कृत नावात मस्त राजेशाही थाट आहे. आंब्याला फळांचा राजा म्हणतात . आंबा प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले फळ आहे. आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे . आंब्याच्या आगमनाची वर्दी आंब्याचा मोहोर देतो. आंब्याच्या लगडलेल्या आमराईत दुपारी मस्त वाटते . आंबा फळावर गीतेही ऐकायला मिळतात . आंब्याला महाराष्ट्रात कोकणचा राजा असे म्हणतात .

एप्रिल जून हा या फळाचा मोसम असतो . खरं तर आंब्याची चाहूल चैत्रातल्या डाळ कैरी च्या पानात सुरू होते. चैत्रगौरीच्या हळदी कुंकू यामध्ये थंडगार कैरीचे पन्हे उन्हामुळे तापलेल्या शरीराला थंडावा देते . तेव्हापासून आई तसेच आजी लोणचे ,मुरंबा, गुळांबा असे पदार्थ बनवतात . आमरस पुरी ,आंबरस पोळी ,आम रस पुरणपोळी ,आमरस मान ,आमरस सरगुंडे महाराष्ट्रातील निर्णय प्रांतानुसार आमरसाची साथ-संगत आम्रखंड ,आंब्याची मलाईदार कुल्फी ,आंब्याचा शिरा, मॅंगो पल्प ,मँगो फालुदा ,मॅंगो ज्यूस ,बर्फी, मॅंगो आईस्क्रीम असे अनेक पदार्थ आंब्यापासून तयार केले जातात . आंब्याच्या सीझनमध्ये आंबा किती प्रकारे सुखाचे क्षण घेऊन तुमच्यासमोर उभा असतो गरज असते फक्त ते क्षण जगण्याची .

आंबा मराठी निबंध 2021 | Mango Essay In Marathi | Essay On Mango In Marathi

जगाच्या आंबा उत्पादनापैकी 56 टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास 1300 जातींची नोंद आहे. परंतु पंचवीस ते तीस जाती व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात . नीलम व हापूस यांच्या संकरी करणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे . गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे . दक्षिण भारतातील तोतापुरी ,आंध्र प्रदेशामध्ये बंगणपल्ली, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश यांमध्ये दशहरी ,लंगडा दक्षिणेत निलम, पायरी ,मंगवा या जाती प्रसिद्ध आहेत.

आंब्याच्या रसात मुबलक प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व असून दृश्य स्निग्ध बलदायक सुखकारक पचावयास जड वाहन युवक हृदय शरीराची कांती वाढविणारे असा आहे . आंबा सर्व फळात श्रेष्ठ असून त्याचे झाड साधारणतः तीस ते चाळीस फूट वाढते . आंब्याच्या वृक्षाची छाया शितल व आरामदायक असते . या वृक्षास सर्व भागाचा वापर करता येतो . आंब्याचे झाड एकदा लावल्या शेकडो वर्ष आपल्याला फायदा देऊ शकते. तरी सर्वांनी घराजवळ एक तरी झाड लावावे. रत्नागिरीचा हापूस अप्रतिम चवीमुळे फारसा सातासमुद्रापार जाऊन पोचला आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण आंबा मराठी निबंध म्हणजेच mango essay in marathi बद्दल चर्चा केली . आंबा मराठी निबंध म्हणजेच essay on mango in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment