माझी आजी निबंध मराठी 2023 | Best Majhi Aaji Essay In Marathi Language

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझी आजी निबंध मराठी म्हणजेच majhi aaji essay in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . majhi aaji nibandh in marathi म्हणजेच my grandmother essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझी आजी निबंध मराठी | Majhi Aaji Nibandh In Marathi | My Grandmother Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

माझी आजी निबंध मराठी 100 शब्दात | Majhi Aaji Essay In Marathi Language In 100 Words

माझी आजी म्हणजे मला सर्वात हवीहवीशी वाटणारी. तिचे नाव सरिता . सरिता म्हणजे नदी. तीची नदी प्रमाणे स्थिती आहे सर्वांसाठी ती काही ना काही सतत करत असते घरी . आईला मदत करते . आईला कोणताही पदार्थ करताना आजीची मदत लागते . माझी आजी म्हणजे साक्षात अन्नपूर्ण . माझी आजी घरी लोणचे ,मुरांबे ,चटण्या ,पापड बनवते. तिच्यामुळे मला रोज नवा खाऊ मिळतो .

माझी आजी निबंध मराठी 2021 | Best Majhi Aaji Essay In Marathi Language | My Grandmother Essay In Marathi

माझी आजी श्रीरामाचा जप करते ,श्लोक म्हणते . मला रोज सायंकाळी रामरक्षा ,शुभंकरोती शिकवते . मला रोज खुप छान छान गोष्टी सांगते . रात्री जेवणानंतर माझ्याशी गप्पा मारते . मला कधीकधी चांदोबाचे ,परीचे, ढगोबाचे गाणे ही म्हणून दाखवते . मला खूप चांगल्या सवयी आजी मुळे लागल्या आहेत . जसे की सकाळी लवकर उठणे ,नेहमी खरे बोलणे, स्वच्छतेचे आवड असणे इत्यादी. अशी माझी आजी मला खूप आवडते.

माझी आजी निबंध मराठी 300 शब्दात | Majhi Aaji Nibandh In Marathi In 300 Words

बाबांना पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता म्हणून आधी गावावरून आली होती . ती परत जायला निघाली होती . आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो पण ती मुळीच तयार नव्हती . आजी म्हणाली अरे नंदू माझं खूप काम रखडले आहे तिकडे . मग त्यापेक्षा आता ऑक्टोबर मध्ये तुला सुट्टी लागेल ना तेव्हा तूच इकडे ये . अरे तुझी मदत होईल मला आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो . आजीने वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे पण आजी थोडीही वाकलेली नाही .

खरे सांगायचे तर गेल्या कित्येक वर्षात आजीची शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही . गेली वीस वर्षे आजी-आजोबा त्या गावात राहत आहे . चार वर्षांपूर्वी आजोब मृत्यू पावले. तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात राहायला येईल . उलटा जी गावात अधिक गुंतली गेली . माझे आजी आजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी ,उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाही . तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊराव यांच्या रयत शिक्षण संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते गावात काम करीत राहिले .

माझी आजी निबंध मराठी 2021 | Best Majhi Aaji Essay In Marathi Language | My Grandmother Essay In Marathi

आजी-आजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे . आताआजोबा नाही पण ती एकटी गावचे सगळे प्रश्न सोडवते . ती गावची मोठी आई बनली आहे . आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत . अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःचे सर्व काम करते . साडे आठ नऊला न्याहारी करते . न्याहारी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज पण हेच. ती दिवसातून एकदा जेवते .

मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कप भर दूध . मर्यादित खाणे हे आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक आहे असे मला वाटते आणि स्वतःच्या नित्याच्या स्वयंपाकासाठी खास काही करत नसली तरी निरनिराळ्या स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात त्याचा हातखंडा आहे . त्यामुळे सुट्टीत आजी कडे गेलो की चंगळ असते . दुसरी चंगळ असते ती वाचनाची . आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे .

त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते . आजीने गावाला अगदी वेगळे स्वरुप आणून दिली आहे . गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत . आजीने त्यांचे बचत गट स्थापन केले आहे . आजी स्वतः कोणत्याही पदावर नसली तरी ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते . आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.

माझी आजी निबंध मराठी 500 शब्दात | Majhi Aaji Essay In Marathi Language In 500 Words

आमच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे आणि वयाने सर्वात मोठी व्यक्ती आहे . माझ्या आजी चे नाव सुमन असे आहे. ती 75 वर्षांची आहे माझी आजी खूप प्रेमळ आहे . मी माझ्या आई बाबा सारखेच आजीची आवडती आहे .ती नेहमी माझे लाड करते .आई-बाबा नोकरी करत असल्यामुळे घरातील सर्व काम सांभाळून माझ्यासारख्या हट्टी मुलांना सांभाळणारी माझी आजी माझ्यासाठी सुपरवुमन आहे , सांभाळणारी असं म्हणणं जरा कमीच होईल . माझ्या प्रत्येक कामात, मला माझ्या आईचा एखाद्या गोष्टीला विरोध असताना तिनेच मला सतत साथ दिली.

माझी आजी दररोज सकाळी लवकर उठून आवरून देवपूजा करते आणि अंगणात सडा मारून सुंदर रांगोळी काढते . सकाळची सर्व कामे आवरून झाली तिची आईला स्वयंपाक घरात मदत करते . आई आणि आजीने ,मी स्वयंपाक घरात वेगवेगळ्या गप्पा मारत काम करत असतात . प्रत्येक क्षणाला माझी आजी आईला पूजेसाठी ,स्वयंपाकासाठी मदत करते. माझ्या आईला सुद्धा आजीची इतकी सवय झाली आहे की प्रत्येक काम ती आजीला विचारूनच करते .माझी आजी प्रत्येक उन्हाळ्यात घरी ,पापड, लोणचे ,मुरंबा बनवते . आमच्या घराच्या अंगणात एक लहान चुल आहे .

तर रोज वेगवेगळे पंचपक्वान करून मला जेवायला भरवणारी ,केसातील गुंता सोडवणारी आणि वेण्या बांधणारी शाळेतल्या तक्रारी आई-वडिलां पर्यंत पोचू देणारी माझी आजी माझ्यासाठी खरच खूप मोठी आहे . काही वेळा आम्ही चुलीवरचा स्वयंपाक बनवण्याचा बेत आखतो . आजीने चुलीवरती केलेला स्वयंपाक सर्वांना खूप आवडतो . आजीने बनवलेले चुलीवरचे वांग्याचे भरीत आम्ही आवडीने खातो . माझ्या आजीला वाचनाची खूप आवड आहे. दुपारची जेवणं झाली की थोडा विश्रांती घेऊन ती पुस्तक वाचत बसते. काही वेळा ती मला माझ्या मराठी पुस्तकातील गोष्टी वाचायला सांगते .

माझी आजी निबंध मराठी 2021 | Best Majhi Aaji Essay In Marathi Language | My Grandmother Essay In Marathi

तिलाही गोष्टी वाचून दाखवल्या मुळे माझे ही आपोआप अभ्यास होतो . त्यामुळे माझे वाचन ही सुधारले आहे . माझ्या आजीने माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत . ती नेहमी मला मोठ्या लोकांशी नम्रतेने आणि आदराने वागायला सांगते . ती दररोज सायंकाळी देवासमोर दिवा लावते . आणि आठवड्यातील वारानुसार ती दररोज मला देवाचे स्तोत्र म्हणायला सांगते . दररोज जेवताना हात स्वच्छ धुणे वडीलधाऱ्यांचा आदर करणे अशा चांगल्या सवयी तिने मला लावले आहेत. सोसायटीतील मुलांच्या पालकांच्या तक्रारी माझ्यासाठी जवळून मिटवणारी, उन्हाळ्याच्या सुट्टीत खास माझ्यासाठी कैरीचे लोणचे करणारी ,दिवेलागणीच्या वेळी श्लोक आणि स्तोत्रे म्हणून घेणारी माझी आजी माझ्यावर योग्य ते संस्कार व्हावेत म्हणून मला कथा किर्तनाला घेऊन जायची .

आई बाबा आपल्या कामात व्यस्त असल्याने माझ्याशी गप्पा मारून माझं मन जाणून घेतलं ते तिने . आम्ही मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन सल्ला देण्याची जबाबदारी तिने पार पाडली . माझ्या आजीला बागकामाची ही खूप आवड आहे . आमच्या घरासमोर तिने रंगीबेरंगी फुलांची ,फळांची झाडे लावली आहेत . ती दररोज झाडांना पाणी घालते आणि त्यांची देखभाल करते. माझी आजी नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते. दिवसभरातील कामात तिचे मन रमते . माझी आजी आमच्या कॉलनीतील भजनी मंडळाचे सदस्य आहे .

सणांच्या दिवशी भजनी मंडळात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशा कार्यक्रमांमध्ये माझी आजी उत्साहाने सहभाग घेते. माझी आजी नेहमी उत्साही आनंदी आणि प्रसन्न असते . त्यामुळे तिची तब्येत नेहमी उत्तम असते . माझी आजी कोणत्या ही कामात मला नेहमी मदत करते . मी चुकीचे वागले तर ती मला समजावून सांगते . माझ्या मैत्रिणी घरी आल्या तर आजी खूप खुश होते . ती आम्हाला सर्वांना गोष्टी सांगते छान खाऊ करून देते . आजी कधी गावाला गेली की आमचे घर रिकामी वाटते . अशी माझी आई माझी मला खूप आवडते

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझी आजी निबंध मराठी म्हणजेच majhi aaji essay in marathi language बद्दल चर्चा केली . majhi aaji nibandh in marathi म्हणजेच my grandmother essay in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment