नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध म्हणजेच mahatma jyotiba phule essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध म्हणजेच essay on mahatma jyotiba phule in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध | essay on mahatma jyotiba phule in marathi in 100 , 200 and 300 words
महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध 100 शब्दात | mahatma jyotiba phule essay in marathi in 100 words
महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते. ते महात्मा फुले या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते . जोतीराव केवळ नऊ महिन्यांची असताना त्यांच्या आईचे निधन झाले . वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
महात्मा फुले यांनी आपल्या अतिशय तल्लख बुद्धी मुळे हा अभ्यासक्रम पाच-सहा वर्षातच पूर्ण केला . महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांचा प्रभाव होता सन 1791 मध्ये थॉमस पेन याने मानवी हक्कांवर लिहिलेले पुस्तक महात्मा फुले यांच्या वाचनात आले . त्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्याय या बाबतीत त्यांच्या मनावर विचार येऊ लागले .
त्यामुळे त्याने विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींचे शिक्षण यावर भर देण्याचे ठरवले . 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873 चाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होते.
महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध 200 शब्दात | mahatma jyotiba phule essay in marathi in 200 words
महात्मा ज्योतिबा फुले ते एक मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते . महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होते .1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला . ते अभ्यासात खूप हुशार आणि अतिशय तल्लख बुद्धीचे असल्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला ते आपला अभ्यास मन लावून करत असत परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत.
शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या . त्यावरुन जोतीरावांना एक नवा मार्ग सापडला . तेव्हा त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली ,नीतीविना गती गेली ,गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले ,इतके अनर्थ एका अविद्येने केले . महात्मा फुले यांच्या या ओळी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
समाजातील अज्ञान दारिद्रय आणि जातिभेद पाहून त्यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला . 1848 आली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात यांची मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षिकेचे जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली . त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्यांची दूरदर्शन आणि दारिद्रयाची वास्तवता आलेली आहे . इतिहास मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार जोतिरावांनी मांडला माणसाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. 24 सप्टेंबर 1873 चाली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते . 28 नोव्हेंबर 1890 साली ज्योतीरावांचा मृत्यू झाला .
- Read Also – Rani Lakshmi Bai Essay In Marathi
Essay 1 – महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध 300 शब्दात | mahatma jyotiba phule essay in marathi in 300 words
महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते . महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव आणि दोन चुलते हे शेवटच्या पेशव्यांच्या काळात फुले पुरवण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्यांचे मूळ आडनाव गोरे असले तरी ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिराव केवळ नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले .

त्यांचे वयाच्या 13 व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत लग्न झाले . महात्मा फुले यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1842 मध्ये पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला . बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुले यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला . महिलांनी साक्षर बनावे यासाठी त्यांनी 1848 आली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलीची शाळा काढून तेथील शिक्षकांची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवून महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले .
अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा महात्मा फुले यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे . परंतु ती आपल्या भूमिकेवर ठाम असत सावित्रीबाईंनी शिक्षण देऊन त्यांना शिक्षणकार्यास प्रवृत्त केले . भारतातील पहिला महिला शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. याचे श्रेय महात्मा फुले यांना जाते . स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले भारतीय होते. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्य वर्णन व जातिभेद ही निर्मिती मानवाची असे त्यांचे रोखठोकपणे मत होते. या विश्वाची निर्मिती करणारी कोणतीही तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती . मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते . त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकात महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक दुदर्श आणि दारिद्रयाची वास्तवत केली आहे . आणि ती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते.
महात्मा फुले यांनी गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकर्याचा असूड आणि इशारा इत्यादी पुस्तके लिहिली महात्मा फुले यांनी भिडे वाड्यात मुलींच्या शाळेची सुरुवात केली तसेच त्यांनी 1852 मध्ये पुना लायब्ररीची स्थापना केली . त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठल राव वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे येथे त्यांचे निधन झाले.
Essay 2 – महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध 300 शब्दात | mahatma jyotiba phule essay in marathi in 300 words
महात्मा फुले यांचे पूर्ण नाव जोतिराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा येथील कटगुण येथे झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यात घालवले. शेतकरी, अस्पृश्य आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.
महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई फुले होते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षण देऊन त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.
जोतिराव लहान असतानाच त्यांची आई वारली. वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला. महात्मा फुले यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये पूर्ण केले. शालेय जीवनात तल्लख बुद्धीचा विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती.
समाजातील कटुता आणि विषमतेला अज्ञान कारणीभूत आहे, हे लक्षात घेऊन महिला आणि सर्वसामान्यांनी काय शिकले पाहिजे, यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. मुलींनी शिकले पाहिजे, तरच कुटुंबाचा आणि समाजाचा खरा विकास शक्य आहे, असे त्यांचे मत होते.
महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि 1848 मध्ये पुण्यात महाराष्ट्रातील मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. तेथे शिकवण्याची जबाबदारी त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. पुढे त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळाही स्थापन केल्या.
महात्मा फुले यांनी 1873 मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि अनुयायांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील पीडितांना न्याय मिळवून देणे आणि जातिवाद आणि अस्पृश्यता नष्ट करून शिक्षणाद्वारे एक उदात्त समाज निर्माण करणे हे या संस्थेचे मोठे उद्दिष्ट होते.
महात्मा फुले यांचे लेखन आणि वाचन प्रगल्भ होते. त्यांची “शेतकर्यांचा आसूड”, “सार्वजनिक सत्यधर्म” आणि “गुलामगिरी” ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते किती महान विचारवंत आणि लेखक होते हे त्यांच्या लेखनातून दिसून येते.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध म्हणजेच mahatma jyotiba phule essay in marathi बद्दल चर्चा केली . महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध म्हणजेच essay on mahatma jyotiba phule in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.