1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 2023 | Maharashtra Din Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण 1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध म्हणजेच maharashtra din essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . maharashtra din marathi mahit म्हणजेच maharashtra din information in marathi हा निबंध 100 , 300 आणि 500 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध | maharashtra din information in marathi in 100, 200 , 300 and 500 words

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 100 शब्दात | maharashtra din essay in marathi in 100 words

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो . या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. 1 मे 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12-24 तास लावून काम करून घेतले जात होते . या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र आंदोलन केले . तेव्हापासून १ मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला . महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणा ,सामाजिक सुधारणाचा इतिहास उल्लेखनीय आहे . महाराष्ट्र हा संतांच्या ,ऋषीमुनींच्या ,वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे . महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम ,संत रामदास, संत ज्ञानेश्वर यांसारख्या अनेक संत होऊन गेले . त्यांनी अनेक ओव्या ,भारुडे, श्लोक रचले आणि एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला .

महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले. लेखक ,कवी ,साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला. अशी माणसे आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे . कला, शिक्षण ,चित्रपट ,संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतली आहे .

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 200 शब्दात | maharashtra din essay in marathi in 200 words

1947 मध्ये, जेव्हा भारत एक स्वतंत्र राष्ट्र बनला, तेव्हा पश्चिम भारतातील बॉम्बे, विद्यमान महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधील क्षेत्रांसह एक वेगळे राज्य होते. १९५० च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र समितीने (SMS) तत्कालीन द्विभाषिक मुंबई राज्यातून वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याच्या मागणीचे नेतृत्व केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यापूर्वी भाषिक राज्यांसाठी घेतलेल्या प्रतिज्ञानुसार ही मागणी होती. पण नेहरूंचा भाषिक राज्यांना विरोध होता. 1950 मध्ये आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक ही राज्ये भाषिक आधारावर निर्माण होऊनही केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या निर्मितीच्या मागणीकडे लक्ष दिले नाही.

केंद्रातील तत्कालीन सरकारच्या आडमुठेपणाला मराठी जनता कंटाळली होती, म्हणून त्यांनी याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. मागणी दाबण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला. मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. संयुक्त महाराष्ट्र समिती (SMS) ने 1 मे 1960 रोजी बॉम्बे री-ऑर्गनायझेशन ऍक्ट अंतर्गत, महाराष्ट्र आणि गुजरातची स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करून, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असताना आपले ध्येय साध्य केले. या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ फ्लोरा फाउंटनचे नाव बदलून हुतात्मा स्मारक असे ठेवण्यात आले आहे.

तथापि, गोवा (तेव्हा एक पोर्टेज कॉलनी), बेळगाव, कारवार आणि लगतचा प्रदेश, समितीने कल्पित महाराष्ट्र राज्याचा भाग, नव्याने स्थापन केलेल्या राज्यात समाविष्ट करण्यात आले नाही. आजही मराठी भाषिक बहुसंख्य असलेला बेळगाव जिल्हा हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेचा सक्रिय वाद आहे.

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 300 शब्दात | maharashtra din essay in marathi in 300 words

१ मे महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो . सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . ” मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ,प्रणाम घ्यावा माझा ,हा श्री महाराष्ट्र देशा, राकट देशा ,कणखर देशा ,दगडांच्या देशा ,नाजुक देशा ,कोमल देशा ,फुलांच्याहि देशा ” असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखातून केले आहे . अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि संत ,कलावंत ,साहित्यिक ,कलाकार ,गायक ,वादक असे अष्टपैलू जन्मले नि वाढले .

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले . असे अनेक थोर व्यक्तिमत्व या मराठी मातीत घडले. हि आहे आपल्या महाराष्ट्राची शान . 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात . त्या दिवशी 1960 चाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली .महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात .

प्रत्येक सण हा मराठी माणसाला एक संदेश देऊन जातो . अनेक नेत्यांनी महापुरुषांनी महाराष्ट्राचे विविध उपाधी देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्र मध्ये भारताच्या सिंहद्वाराच्या प्रहरी आहे या शब्दात गौरव केला आहे.महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ त्या शब्दात महात्मा गांधींनी महाराष्ट्राचे प्रशंसा केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ,वासुदेव बळवंत फडके यांसारख्या अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढले . या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचेही मोठे योगदान आहे . अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फार मोठा अभिमान आहे . आपण महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे.

पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा खरच विकास झाला आहे का ? हा विचार आपण करायला हवा . कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा. भ्रष्टाचार ,गरिबी, मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे . पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे करण्याचा निर्धार केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन …… महाराष्ट्राची यशो गाथा ,महाराष्ट्राची शौर्य कथा ,पवित्र माती लावू कपाळी ,धरती मातेच्या चरणी माथा. जय महाराष्ट्र

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 500 शब्दात | maharashtra din essay in marathi in 500 words

तसेच गेली कित्येक वर्ष जगाच्या आर्थिक ,सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या धडपडी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र . दगडांचा ,मातीचा, डोंगरदऱ्यांच्या , विरांचा, कलावंतांचा ,बुद्धीवंतांचा नानाविध कलाविष्कार यांचा, शास्त्रज्ञांचा ,समाजसुधारकांचा आणि राजकारण्यांचा महाराष्ट्र . आज १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनादिन . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरे करतात . स्वातंत्र्यानंतर मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी काहींचा विरोध होता. यामुळे मराठी बांधवांनी चिडून याचा हर एक प्रकारे निषेध केला .

1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध 2021 | Maharashtra Din Essay In Marathi

प्रसंगी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पुढे व मराठी माणसाच्या आंदोलनांमुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . मराठी भाषेला राजभाषेचा तर मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून दर्जा मिळाला . संत ज्ञानेश्वरांनी …. ” माझ्या मराठीचा बोलु कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन “अशामुळे शब्दात आपल्या मराठी भाषेची थोरवी गायिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हा आधुनिक भारताचे शिल्पकार यशवंतराव म्हणाले की १ मे हा सोन्याचा दिवस 1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस .

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने पुढाकार घेतला होता . महाराष्ट्र आपली ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,सामाजिक कार्यकर्तुत्व ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत जन्मले आणि वाढले . त्यांनी संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची विश्वबंधुत्वाची शिकवण दिली . त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताठ उभा आहे . विदर्भ ,कुंतल ,अश्मक अशा विविध नावांचा मरहट्ट प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र .

आपल्या देशासाठी प्राण पणास लावणारे अनेक रत्ने महाराष्ट्रात चमकली यामध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ,उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,राजगुरू, नाना पाटील अशा किती तरी देशभक्त आणि देशासाठी प्राणाची आहुती दिली . संत ज्ञानेश्वर यांच्या सारखे माणसं तर याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मले . संत नामदेव ,संत तुकाराम ,संत जनाबाई ,संत मीराबाई ,संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराजांच्या अश्या किती तरी संतांची मांदियाळी महाराष्ट्राच्या मानवी मनाला नवचेतना ऊर्जा देत गेली . त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील ,राजश्री शाहू महाराज अशा अनेक समाज प्रबोधन पत्रकारांनी आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली. अनेक लेखकांनी तसेच अनेक कवींनी महाराष्ट्र मातीचा गोडवा गायला आहे .

कवी कुसुमाग्रजांनी मराठी मातीची अवर्णनीय शब्दात वर्णन केले . ” माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा “. महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य ,कला, शिक्षण, क्रीडा ,संस्कृती, नाट्य, चित्रपट ,संगीत कृषी ,उद्योग, संगणक, विज्ञान असे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे . आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा.

मराठी मातीत जन्माला आल्याचा ,महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे . पण खरेच महाराष्ट्र विकसित झाला आहे का ? विकासाच्या नक्की व्याख्या तरी काय ? गेल्या पन्नास वर्षात हळूहळू आपले राज्य कुठल्या न कुठल्या दिशेने जात आहे हे लक्षात घ्यायला हवे . साठ वर्षे होत आली तरी अजूनही मूलभूत प्रश्‍न तसेच आहे. वीज भारनियमन आहेत. सगळीकडे भ्रष्टाचाराचा राक्षस ही आहेच .

सत्तेसाठी चालणाऱ्या अमानुष राजकारणापायी सामान्य जनतेची होणारी फरफट आजही आहेच , राज्याची दयनीय अवस्था आहेच , रोज वर्तमानपत्रात कुठल्या ना कुठल्या शेतकर्याच्या आत्महत्येची बातमी असतेच, स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न ,बलात्कार, नैराश्य व्यसनाधीनता असे एक ना अनेक प्रश्न आधी समाजात सुरू आज हि आहेच . पण आमचे राजकारणी मात्र आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे . विविध प्रश्न समस्या कमी झाल्याचे सांगताना दिसत आहेत . मूळ समस्येवर घाव घालायचा प्रयत्न केला जात नाही ही शोकांतिकाच . असो चला तर मग सर्व महाराष्ट्रीयन एक होऊन महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवूया .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण 1 मे महाराष्ट्र दिन मराठी निबंध म्हणजेच maharashtra din essay in marathi बद्दल चर्चा केली . maharashtra din marathi mahit म्हणजेच maharashtra din information in marathi हा निबंध 1०० , 3०० आणि 5०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment