लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 2023 | Lokmanya Tilak Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध म्हणजेच lokmanya tilak essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . essay on lokmanya tilak in marathi निबंध म्हणजेच essay on lokmanya tilak in marathi language हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध | essay on lokmanya tilak in marathi | essay on lokmanya tilak in marathi language in 100 , 200 and 300 words

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 100 शब्दात | lokmanya tilak essay in marathi in 100 words

लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेचला स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र दिला. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला . त्यांचे खरे नाव केशव असे होते . बाळ हे त्यांचे टोपण नाव होते.

त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते . टिळक लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते . 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून बीएची पदवी मिळवली . टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी ही दोन वृत्तपत्रे चालू केली . या वृत्तपत्राद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार केला . लोकांनी एकत्र येऊन त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केली . इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला .

मंडालेच्या तुरुंगात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला . 1920 साली टिळकांची प्रकृती बिघडू लागली. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले . आजन्म देश सेवेत गर्क असलेला भारताचा हा तेजस्वी सूर्य मावळला.

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 200 शब्दात | lokmanya tilak essay in marathi in 200 words

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंहगर्जना करणारे म्हणजेच लोकमान्य टिळक हे नाव आपल्या डोळ्यासमोर येते . म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यातील जहाल नेता अशी त्यांची ओळख. टिळकांचे जन्मगाव रत्नागिरी येथील चिखली हे गाव . त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले व पुढील स्वातंत्र्यलढ्याचे चळवळ त्यांनी येथूनच चालू केली .

ते उच्चशिक्षित होते परंतु इंग्रजांची नोकरी न पत्करता त्यांनी स्वतःला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले ते नेहमी म्हणायचे अरे आपण सर्व हिंदुस्थानी जरी चुकलो तरी हे मूठभर गोरे इंग्रज वाहून जातील त्यांनी केसरी हे वृत्तपत्र चालू केले . त्यांनी जनमाणसात स्वातंत्र्य विषयी जागृती करायला सुरुवात केली . त्यांची इंग्रजांना एवढी भीती निर्माण झाली की त्यांनी त्यांना कैद केले. व मंडाले येथे सहा वर्षाची कैद दिली .

असंतोषाचे जनक असे त्यांना इंग्रज सरकार संबोधू लागले . पण हार मानतील ते टिळक कसले. त्याने तेथेही गीतारहस्य हा ग्रंथ लिहला व आपली देशसेवेची सेवा येथे ही चालू ठेवली . लोकांच्या मागणीवरून इंग्रजांना त्यांना सोडावे लागले. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीतील मुख्य आधारस्तंभ झाले . त्यांच्या सभांना तुडुंब गर्दी होऊ लागली.

लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली आणि आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले . सहा वर्षे कारावासाची शिक्षा भोगून आल्यानंतर ते थोडे थकले होते. अहोरात्र देशसेवेचे काम ,सभा यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ न मिळणे त्यातच ते आजारी पडले . व दिनांक 1 ऑगस्ट 1920 सली त्यांची प्राणज्योत मालवली . आपले अख्खी हयात या स्वातंत्र्यलढ्यात घालवणाऱ्या शूर व सच्चा देशभक्ताला माझा सलाम…..

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 300 शब्दात | lokmanya tilak essay in marathi in 300 words

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे वडील गंगाधरपंत हे एका शाळेत शिक्षक होते . त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई . टिळकांचे वडील संस्कृत शिकवायचे . टिळकांचे वय अवघे सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले . येथून टिळक पुण्याला स्थाईक झाले . 1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात त्यांनी पदवी मिळवली . फारच कमी लोक त्या वेळी उच्च शिक्षण घेऊ शकत होते त्यापैकी टिळक हे एक होते .

1871 झाली त्यांचा विवाह झाला . 1879 साली त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली . दोन वेळा प्रयत्न करूनही एम ए ही पदवी पूर्ण करू शकले नाहीत . एवढी घरची परिस्थिती त्यांची बिकट होती . एक खाजगी शाळेत टिळकांनी गणीत शिक्षक म्हणून काम चालू केले . पुणे पत्रकार म्हणून कार्य करताना सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झाले . ते म्हणायचे धार्मिक आणि वास्तविक जीवन हे वेगळे आहे. तेव्हाच्या ब्राह्मणांना फक्त सन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतू नसावा हे ठणकावून सांगितले .

लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 2021 | Lokmanya Tilak Essay In Marathi

जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे हा आहे . प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकले पाहिजे तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यास लायक बनू अशी त्यांची ठाम श्रद्धा होती . महाविद्यालयीन मित्र महादेव बललाळ ,गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या समवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली . या संस्थेचा मुख्य उद्देश हा भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवा दिशा देणे होता . पुढे त्यांनी उच्चशिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली . आणि त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली .

त्यांची जनजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली . त्यातूनच ते आपली सामाजिक चळवळ जोमाने चालवत होते व प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा कळले पाहिजे की इंग्रज सरकार काय करत आहे हा त्यांचा कटाक्ष होता . लोकांमध्ये एकतेची भावना अखंड जागृत राहावे म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सव चालू केले. 1897 त्याच्यावर राजद्रोहाचा आरोप लावून दीड वर्षाची कैद झाली .

त्यावेळेस टिळकांनी आपल्या बचावासाठी जे भाषण दिले ते तब्बल चार दिवस आणि 21 तास चालले . पुढे 1960 साली भारतीय काँग्रेसचे अधिवेशन सुरत येथे झाले . त्यात जहाल आणि मवाळ समूहांचा संघर्ष झाला . परिणामी मवाळ समूहाने जहाल गटाला काँग्रेस मधून काढून टाकले . त्यात टिळक होते आणि मग त्यांनी जहाल गटाचे नेतृत्व केले . 1908 झाली त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली . इंग्रज सरकार ने त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवले तिथे त्यांनी गीतारहस्य हा महान ग्रंथ लिहिला . 1916 साली सुटून आल्यावर होमरूल लीग ची स्थापना त्यांनी केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करायचे यालाच स्वशासन देखील म्हणतात .

हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला हवा याकरता सर्वात आधी पुढाकार टिळकांनी घेतला होता . टिळक हे देशातील स्वातंत्र्य लढ्यातील तीन त्रई लाल-बाल-पाल ह्यातले ते होते . त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले गेले . असे हे महान कार्य या देशासाठी करून टिळक एक ऑगस्ट 1920 साली आपल्याला सोडून पुढील कार्य करण्या साठी देवाघरी निघून गेले . त्यांना माझा शतक्ष प्रणाम .जय हिंद .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध म्हणजेच lokmanya tilak essay in marathi बद्दल चर्चा केली . essay on lokmanya tilak in marathi निबंध म्हणजेच essay on lokmanya tilak in marathi language हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

1 thought on “लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध 2023 | Lokmanya Tilak Essay In Marathi”

Leave a Comment