नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध म्हणजेच lal bahadur shastri essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . lal bahadur shastri information in marathi म्हणजेच information about lal bahadur shastri in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध | information about lal bahadur shastri in marathi | lal bahadur shastri information in marathi in 100 , 200 and 300 words
लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध 100 शब्दात | lal bahadur shastri essay in marathi in 100 words
लालबहादूर शास्त्री हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारताचे दुसरे पंतप्रधान होते . त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय या गावात झाला . ते केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले . त्यांची आई रामदुलारी आपल्या मुलांना घेऊन माहेरी आली. लहान गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना वाराणसीतील काकांच्या घरी पाठवण्यात आले . लालबहादूर शास्त्री अतिशय नम्र होते.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक मंत्री पदे सांभाळली व ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. त्यांच्या समर्पित सेवेत दरम्यान ते जनमानसात निष्ठा व समतेसाठी लोकप्रिय झाले. त्यांनी देशाला जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले. त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेले. 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले . त्यांनी देशासाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध 200 शब्दात | lal bahadur shastri essay in marathi in 200 words
लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 सली वाराणसी येथे झाला एका प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते . ते अवघे दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे त्यांचे आई रामदुलारी मुलांना घेऊन माहेरी आल्या.
लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले लाल बहादुर शास्त्री यांचे गुरु कामेश्वर प्रसाद यांनी त्यांना महात्मा गांधी लोकमान्य टिळक ,लाला लजपत राय यांच्या जीवन दर्शनाचे महत्त्व सांगितले . वयाच्या 11 वर्षी गांधीजीच्या भाषणाने ते भारावून गेले . चंपारण्य सत्याग्रह रोलेट एक्ट जालियनवाला हत्याकांड या घटनेचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले . शास्त्रीजी खरे गांधीवादी होते ज्यांनी आपले सर्व आयुष्य साधेपणामध्ये घालवले आणि ते गरिबांच्या सेवेसाठी वापरले.

शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. 1946 साली लालबहादूर शास्त्री उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री झाले . 1951साली पंडित जवाहलाल नेहरू आणि त्यांना काँग्रेसचे सदस्य केले . 1956 साली त्यांना रेल्वे मंत्री पद दिले. 1957 मध्ये त्यांना काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या . पंडित नेहरू यांच्या नंतर लालबहादूर शास्त्री एकमताने पंतप्रधान झाले . 9 जून 1964 रोजी त्यांना पंतप्रधान ची सूत्रे देण्यात आली . 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी देशाला जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले.
- Read Also – My Grandfather Essay In Marathi Language
लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध 300 शब्दात | lal bahadur shastri essay in marathi in 300 words
लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक महान नेते तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते . त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1956 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय या छोट्याशा गावी झाला. ते केवळ दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील शारदाप्रसाद यांचे निधन झाले . त्यामुळे त्यांची आई रमदुलारी देवी तीन मुलांच्या सहित आपल्या माहेरी राहू लागली. शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला काकांच्या घरी राहून झाले .
लाल बहादूर शास्त्री लहानपणापासून समंजस ,विवेकी आणि नैतिक मुल्ये जपणारे होते. शिक्षण चालू असताना गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की लालबहादूर शास्त्री यांनी शिक्षण सोडून दिले व देश सेवा करण्याचा निर्णय घेतला. थोडे मोठे झाल्यावर लाल बहादूर शास्त्री यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रुची निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीचा विरोध करण्यासाठी स्थापित केलेल्या वाराणसी काशी विद्यापीठ ते सामील झाले . स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले आणि त्यांना एकूण सात वर्षे ब्रिटिश तुरुंगवासात घालविली . भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये आणि चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता .

स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी ज्या भूमिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यापैकी 1921 ची असहकार आंदोलन, 1930 चा दांडी मार्च आणि 1942 चा भारत छोडो आंदोलन उल्लेखनीय आहेत. नंतर शास्त्रीजींनी पंडित जवाहलाल नेहरू बरोबर कार्य करू लागले. स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते उत्तर प्रदेश गृहमंत्री झाले . त्यानंतर भारताचे रेल्वे मंत्री झाले आणि नंतर भारताचे पंतप्रधान झाले . त्यांनी 30 हून अधिक वर्षे देश सेवा केली.
त्यांची कार्यावर निष्ठा अजोड शमता यामुळे ते जनमानसात लोकप्रिय झाले. शास्त्रीजींच्या मते स्वातंत्र रक्षणाची जबाबदारी फक्त सैनिकांची नसून देश रक्षण करण्यासाठी संपूर्ण देश आतून बळकट असायला हवा . त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. स्वातंत्र्याचे रक्षण आणि लोकांचे पोषण हे किती महत्वाचे आहे हे पटवण्यासाठी शास्त्रीजींनी देशाला जय जवान जय किसान हा मंत्र दिला . अशा या थोर नेते 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. कर्तुत्ववान देश प्रिय लालबहादूर शास्त्री यांना भारतरत्न हा सर्वोच्च पदवी ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्म दिवस 2 ऑक्टोबर हा दिवस शास्त्री जयंती म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण लाल बहादूर शास्त्री मराठी निबंध म्हणजेच lal bahadur shastri essay in marathi बद्दल चर्चा केली . lal bahadur shastri information in marathi म्हणजेच information about lal bahadur shastri in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.