गुढीपाडवा निबंध In Marathi 2023 | Gudi Padwa Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण गुढीपाडवा निबंध म्हणजेच gudi padwa essay in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . gudi padwa nibandh in marathi म्हणजेच essay on gudi padwa in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात अश्या तीन स्वरूपात बघणार आहोत . गुढीपाडवा निबंध ह्या पोस्ट च्या साहयाने तुम्ही हा निबंध अभ्यासात व परीक्षेत सहज लिहू शकता . तर चला सुरु करूया ….

गुढीपाडवा निबंध मराठी | Essay On Gudi Padwa In marathi In 100 , 300 And 500 Words

गुढीपाडवा निबंध मराठी 100 शब्दात | Gudi Padwa Essay In Marathi in 100 words

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो . संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो . नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी उभारली जाते . गुढी उभारण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधले जाते. त्यावर साखरेची माळ, कडुलिंबाची पाने , आंब्याच्या डहाळ्या व झेंडूच्या फुलांचे हार बांधले जाते व त्यावर एक कलश ठेवला जातो . ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारली जाते. या गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते .

 गुढीपाडवा निबंध In Marathi 2021 - Best Gudi Padwa Essay In Marathi

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्या आले व त्यांचे राज्याभिषेक झाले तेव्हा हा सण साजरा केला गेला असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करण्याची पद्धत आहे . यामुळे रक्त शुद्ध होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते . या दिवशी अनेक कुटुंबात पुरणपोळी किवा श्रीखंड पुरीचा छान बेत असतो . झालं गेलं विसरून आयुष्याला नव्या उत्साहाने व आनंदाने सामोरे जावे हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देत असतो .

गुढीपाडवा निबंध मराठी 300 शब्दात | gudi padwa nibandh in marathi in 300 words

गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण आहे . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो. वसंत ऋतूची चाहूल देणारा हा गुढीपाडवा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. व जास्ती करून महाराष्ट्रतात प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून वनवास संपून आयोध्या नगरी मध्ये प्रवेश केला . त्या दिवशी श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी आयोध्येतील प्रजेने गुढ्या, तोरणे उभारली होती आणि आनंद साजरा केला होता . तीच प्रथा पुढे वर्षानुवर्षे चालत आली म्हणून .

आजही घरोघरी गुढी उभारली जाते . दारासमोर सुबक रांगोळी काढली जाते . या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरच्या दारासमोर गुढी उभारली जाते . गुढी उभारण्यासाठी लांब काठी घेऊन तिच्या टोकावर जरीचे किंवा रेशमी वस्त्र बांधले जाते . त्यावर कडुलिंबाची पाने ,रंगीबिरंगी बत्ताश्याची माळ ,आंब्याच्या डहाळ्या , फुलांच्या माळा बांधल्या जातात . आणि त्या वर एक कलश ठेवला जातो . ती गुढी बांधून तिची पूजा केली जाते . त्यामुळे हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो .

 गुढीपाडवा निबंध In Marathi 2021 - Best Gudi Padwa Essay In Marathi

उभारलेली गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते . या दिवशी लोक वस्तू खरेदी, सोने खरेदी करतात काही लोक या मुहूर्तावर व्यवसायाचा प्रारंभ किंवा नवीन उपक्रमाचा प्रारंभ करतात . या दिवशी घरोघरी गोड पक्वान्ने बनवली जातात . पुरणपोळी , श्रीखंड पुरीचा बेत करतात आणि दिवसाची सुरुवात गोड करतात. गुढीपाडवा या दिवशी सर्वत्र साफसफाई केली जाते .या सणाला लोक वेळ काढून साफसफाई करतात दारात सुंदर रांगोळी काढतात . या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे . कडू लिंबाच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते .

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात . महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोषाखात मिरवणुकीत सहभागी होतात . मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी . हाच संदेश गुढीपाडव्याचा सण आपल्याला देतो.

Read Also – मायबोली मराठी निबंध 2021 – Best Essay On Importance Of Marathi Language In Marathi

Essay 1 – गुढीपाडवा निबंध मराठी 500 शब्दात | essay on gudi padwa in marathi in 500 words

गुढीपाडवा हा सण आपल्याला माहित नाही असा होणार नाही . कारण लहानपणा पासून आपण सगळेच सण साजरे करत आलो आहेत . व मराठी माणसाने गुढीपाडवा हा सण साजरा केला नाही असे क्वचितच पाहायला मिळेल . गुढीपाडवा हा सण भारतीयांचा प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे . हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला भारतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो . हा सण भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे . याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते . गुढीपाडवा हा सण साजरा करण्याचे कारण म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव केला . रावणाचा व राक्षसांचा पराभव करून श्रीराम यांनी याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला . म्हणूनच त्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला. म्हणूनच भारतातील सगळीच ठिकाणी गुढीपाडवा सण साजरा केला जातो .

महाराष्ट्रतात ह्या सणाला फार महत्व आहे . नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक घराच्या प्रवेशद्वारी गुढी उभारतात . महाराष्ट्रातील लोकांचे नवीन वर्ष या शुभ दिवसापासून सुरू होते . त्यामुळे नवीन वर्षाची सुरवात असल्यामुळे मराठी माणूस हा सॅन फार जोशात व उत्साहात साजरा करतो . भारतातील लोक आपल्या घरातील सदस्यांना ,लहान पोरांना, मित्र परिवार आणि नातेवाईक यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नववर्ष साजरे करतात .

गुढीपाड्व्या बद्दल काही पुराणातील कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत जसे कि भगवान शंकर व देवी पार्वतीचा विवाह सोहळा गुढी पाडव्याच्या दिवशी ठरला गेला असे प्रचलित आहे . व गुढी पाडव्याच्या दिवसापासून लग्नाची तयारी सुरु करण्यात आली व तृतीयेला भगवान शंकर व देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला . असे हि प्रचलित आहे . गुढी म्हणजे उंच बांबूपासुन काठी तयार केली जाते ही काठी या शुभदिवशी धुतली जाते . काठी स्वच्छ धुवून लांब बांबूच्या तोंडाला म्हणजेच टोकाला रेशीम किंवा साडी गुंडाळली जाते . त्या काठीला कडुनिंबाची डहाळी , आंब्याची पाने ,फुलांचे हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवली जाते.

 गुढीपाडवा निबंध In Marathi 2021 - Best Gudi Padwa Essay In Marathi

गुढी उभारण्याची ती जागा स्वच्छ केली जाते . तसेच ग्रामीण भागांमध्ये ती जागा सारवले जाते . त्या जागी गुढी ऊभारून गुडी बांधली जाते . गुडी समोर स्त्रिया व मुली सुंदरशी रांगोळी काढतात . त्या गुढीला गंध , हळद-कुंकू , फुले आणि अक्षता वाहिली जाते . गुढीची पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यात येते . निरंजन अगरबत्ती व धूप लावतात. प्रसाद म्हणून कडुनिंबाची कोवळी पाने गुळासोबत खाण्याची प्रथा आहे . यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिंदू धर्मात विजयाचे व समृद्धीचे प्रतीक मानून घरोघरी गुढी उभारण्याची आपली जुनी परंपरा आहे .

गुढीपाडवा हा आरोग्यच्या दृष्टीने सुद्धा आपल्या साठी फायदे शीर आहे . कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ज्या गोळीचे चे सेवन करतो ओवा , मीठ , हिंग आणि साखर व कडुनिंब ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून बनवली जाते त्यामुळे हि गोळी आपल्या साठी गुणकारक ठरते जसे कि ह्या मुळे आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही व आपली पचनक्रिया सुधारण्यात ह्या गोळीचा मोलाचा वाटा आहे . दुपारी गुढीला गोड-धोड नैवेद्य दाखवला जातो . तसेच सायंकाळी गुढीला पुन्हा हळद-कुंकू वाहून गुढी उतरवली जाते . अशाप्रकारे गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला संपूर्ण भारत व विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Essay 2 – गुढीपाडवा निबंध मराठी 500 शब्दात | essay on gudi padwa in marathi in 500 words

गुढी पाडवा (गुढी पाडवा देखील) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात नवीन वर्षाचा दिवस साजरा करतो. हा हिंदूंचा सण आहे. हिंदू महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

हा सण सामान्यतः आंध्र प्रदेशातील उदगी उत्सवाशी जुळतो, जो डेक्कनच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा उत्सव आहे.

कस्टम: पेस्ट बनवण्याची प्रथा आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने, गूळ, चिंच आणि मीठ वापरतात. ही पेस्ट खाऊन ते सण सुरू करतात.

कापणीचा सण: गुढीपाडवा हा कापणीचा सण आहे. भारत हा बहुतांशी कृषीप्रधान देश आहे. सण हे विशेषत: कृषी हंगामाच्या सुरुवातीशी आणि समाप्तीशी संबंधित असतात. गुढीपाडव्याला रब्बी हंगाम संपतो.

महत्त्व: विशेषत: हिंदूंमध्ये या दिवसाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. म्हणून, भक्त पवित्र तेल स्नान करतात, जे शुभ मानले जाते. हा दिवस भगवान रामाच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देखील साजरा केला जातो. चौदा वर्षे वनवास भोगून भगवान राम अयोध्येला परतले.

उत्सव: गुढीपाडवा उत्सव हा समृद्धी आणि कल्याणाशी संबंधित आहे. सर्व काही तेजस्वी आणि दोलायमान दिसते. या दिवशी लोक पारंपारिक कपडे परिधान करतात. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होते. मग, नातेवाईक आणि मित्रांमध्ये मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. हा मेजवानीचाही दिवस आहे. हा मेजवानीचाही दिवस आहे.

लोकांची घरे धुण्यास वेळ लागतो आणि जुन्या व निरुपयोगी वस्तू टाकून दिल्या जातात.
काही लोक आपली घरे नवीन रंगांनी रंगवतात आणि दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवतात.
काही लोक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातात.
गुढी ध्वजारोहण. हा ध्वज ब्रह्मध्वज (ब्रह्माचा ध्वज) म्हणून ओळखला जातो.
स्त्रिया सुंदर रांगोळी रचनांनी फरशी सजवतात.
महिला स्वादिष्ट पदार्थ आणि मिष्टान्न बनवतात. या दिवशी पुरण-पुरी बनवण्याची प्रथा आहे.
कुटुंब एकत्र येण्याची ही वेळ आहे. लोक त्यांच्या जुन्या मित्रांना भेट देतात. वेगवेगळ्या ठिकाणी दूर राहणारे लोक फोन कॉल्सद्वारे शुभेच्छा व्यक्त करतात.

निष्कर्ष ( conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण गुढीपाडवा निबंध म्हणजेच gudi padwa nibandh in marathi बद्दल जाणून घेणार आहोत . gudi padwa essay in marathi म्हणजेच essay on gudi padwa in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघितला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ….

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment