नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण गणेश उत्सव निबंध मराठी म्हणजेच ganesh utsav essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . ganesh utsav marathi nibandh म्हणजेच ganesh chaturthi essay in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत . तर चला सुरु करूया …
गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Marathi Nibandh | Ganesh Chaturthi Essay In Marathi in 100 , 300 and 500 words
गणेश उत्सव निबंध मराठी 100 शब्दात | ganesh utsav essay in marathi in 100 words
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे . हा उत्सव पूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जातो . गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते . सर्व घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेश मूर्तीची स्थापना केली जाते . गणपतीला दुर्वा व लाल फुले अर्पण केली जातात . मोदक , पुरणपोळी , लाडू तयार करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवले जातात . पण नंतर प्रसाद वाटला जातो .

गणरायाचे भक्त मोठ्या उत्साहाने गणेश मूर्तीची पूजा व आरती करतात . पूर्वी हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा . परंतु 1893 साली लोकांमध्ये एकी यावी म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत चालू केली . दहा दिवस हा सण आनंदाने साजरा केला जातो .
गणेश उत्सव निबंध मराठी 300 शब्दात | ganesh utsav essay in marathi in 300 words
आपल्या भारत देशात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात . जसे गुढीपाडवा, दिवाळी, दसरा ,नागपंचमी, मकरसंक्रात ,गणेश उत्सव, होळी इत्यादी . या सर्व सणांमध्ये मला गणेशोत्सव हा सण खूप खूप आवडतो . गणेशाला अनेक नावे आहेत . कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते .. अशा या गणेशाच्या सण अर्थात गणेश उत्सव होय . गणेश उत्सव हा अत्यंत लोकप्रिय सण आहे . हा सण भाद्रपद महिन्यात येतो. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीस लोक मोठ्या भक्तिभावाने गणेशाची मूर्ती घरी आणतात .
आकर्षक सजावट आरास केलेल्या ठिकाणी गणेश मुर्ती स्थान दिले जाते . लोक दररोज सकाळ-संध्याकाळ गणेशाची आनंदाने आरती करतात . हा सण लहानपणापासून थोरांपर्यंत या सर्वांना खूप आवडतो . गणेशाला गोड गोड नैवद्य दाखवला जातो. उदाहरणार्थ मोदक, खीर ,पुरणपोळी ,लाडू इत्यादी . असा हा सण किमान दीड ते कमाल 11 दिवसांपर्यंत साजरा केला जातो . गणेशोत्सव घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो. व अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते .
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सारे जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात . सार्वजनिक गणेशोत्सव ची प्रथम सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली . या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतील व विचारांची देवाणघेवाण होईल. हा उद्देश टिळकांचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या या उत्सवाचे स्वरूप आता विस्तारले आहे. अनेक सार्वजनिक मंडळे या काळात सामाजिक, ऐतिहासिक ,तसेच पौराणिक सुंदर देखावे या काळात करतात . भारतात वेगवेगळे स्पर्धांचे आयोजन सार्वजनिक मंडळे करतात .

यामुळे सर्वत्र आनंदी उत्साही वातावरण दिसून येते. पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत . पण आजच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जातात पण या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे आपण पर्यावरणपूरक गणेशउत्सव साजरा करण्यावर भर दिला पाहिजे . आपण सगळयांनी प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक उत्सव साजरे केले पाहिजेत . गणपती विसर्जनात म्हणेजच मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा उपयोग करायाला हवा. समाजाला चांगला मार्ग दाखवण्याचे काम गणेश मित्र मंडळांनी करायाला हवे .
यासाठी प्रत्येक माणसाने ठरवावे कि आपण उत्सव साजरे करत आहोत त्याने पर्यावरणाला काही हि हानी होता काम नये . व त्यासाठी प्रत्येकाने झटायला हवे. व ह्याने गणेश उत्सवाचे महत्व नक्कीच वाढेल . असा हा गणेशोत्सव मला खूप खूप आवडतो .
- Read Also – Nadiche Atmavrutta Essay In Marath
गणेश उत्सव निबंध मराठी 500 शब्दात | ganesh utsav essay in marathi in 500 words
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे. हिंदू धर्मीयांचा गणेश उत्सव आवडता सण आहे . हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव . गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक सण आहे. हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व शुभकार्यात सर्व प्रथम गणपतीचे पूजन केले जाते . शिवपार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते . गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस म्हणजेच इंग्रजी कालगणनेप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होते व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो . घराघरात गणपतीचे लहान मूर्ती आणली जाते आणि अकरा दिवस मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा केली जाते .
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप मखर पताका याची तयारी केली जाते . घरातील लहान थोर अगदी उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात गणेशाला घरी आणतात . गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणत सर्व लोक लहान मुले गणपती चा जयघोष करतात . गणेशाला दूर्वा जास्वंदीचे फूल केवडा लाल फुले वाहून गणपतीची पूजा करतात . व आरती केली जाते. तसेच मोदक ,खीर ,लाडू इत्यादी पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून आरती करतात. व सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला जातो. घराघरांमध्ये गणपतीची सुंदर आरास केली जाते.
त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे ही आकर्षक देखावे करतात व भारतात गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरीचे आगमन होते . गौरीच्या दिवशी दिवशी सर्व स्त्रिया हळदी कुंकू चा कार्यक्रम करतात . गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये मंडळा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . ऐतिहासिक, पौराणिक ,सामाजिक पोवाडे ,लोकगीते असे विविध दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. काही लोक दीड दिवसांनी काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते . अनंत चतुर्थी हा गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असतो .

या दिवशी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन मिरवणूक काढून वाजत-गाजत केले जाते.अनंत चतुर्थीला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणपती बाप्पाचे भावुकपणे विसर्जन होते . लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा गणेशोत्सव भारत देशात ,देशा बाहेर कोणती जात, पंथ, धर्म न मानता साजरा केला जातो. 1892 झाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली. लोकांनी एकत्र यावे आणि एकोपा आणि आनंदाने हा सण साजरा करावा हा त्यामागचा हेतू होता .
भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले . लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हाही उद्देश होता . त्या अनुषंगाने कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असत . आजही ही प्रथा चालू ठेवणारी काही गणेशोत्सव मंडळे आहेत . परंतु त्या मध्ये वाढ व्हावी. वकृत्व स्पर्धा ,गायन स्पर्धा , क्रीडा स्पर्धा ,लेखक ,साहित्य, कवी ,नाटककार यांच्या भाषण कलागुणांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम या काळात सादर व्हावे.
यातून नवीन पिढीला नक्कीच योग्य दिशा मिळेल. गणेशोत्सवातील देखाव्यांवर कमीत कमी खर्च करून ते सामाजिक जाणीव जागृती या विषयांवर प्रकाश टाकणारे विविध उपक्रम गणेश मंडळांनी राबवावेत . लोकमान्य टिळकांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. विविध प्रकारच्या जाहिरातबाजी व पोस्टरबाजी वर बंदी आणायला हवी . शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन मिरवणूक झाली पाहिजे. मूर्तीचे रंग पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होते तसेच शाडूच्या मूर्ती वापरण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे .
आणि आपण प्रदूषण मुक्त पर्यावरण आदी उत्सव साजरे केले पाहिजेत. विसर्जनाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा . समाजाला योग्य दिशा देण्याचे काम गणेश मंडळांनी करावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने झटावे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला गेला तर नक्कीच गणेशोत्सवाचे महत्त्व आणखी वाढेल .
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण गणेश उत्सव निबंध मराठी म्हणजेच ganesh chaturthi essay in marathi बद्दल जाणून घेतले . ganesh utsav marathi nibandh म्हणजेच ganesh utsav essay in marathi हा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघितला . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवे असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून सांगू शकतात . हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ….
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.