नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण रक्षाबंधन निबंध मराठी म्हणजेच essay on raksha bandhan in marathi language बद्दल चर्चा करणार आहोत . raksha bandhan nibandh marathi म्हणजेच raksha bandhan nibandh in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया raksha bandhan in marathi information ….
रक्षाबंधन निबंध मराठी | raksha bandhan in marathi information | raksha bandhan nibandh in marathi in 100 , 300 and 500 words
रक्षाबंधन निबंध मराठी 100 शब्दात | essay on raksha bandhan in marathi language in 100 words
हिंदू धर्मानुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते . भावाला ओवाळते व त्याला दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करते . भारतीय परंपरेत राखी या धाग्याला लोखंडी साखळी पेक्षा ही मजबूत मानले जाते . कारण बहीण-भावाच्या पवित्र नात्याला राखी घट्ट बांधून ठेवत असते .
या धाग्याने कित्येक मने जुळून येतात ,प्रफुल्लित होतात व त्यांना भावनांचा ओलावा मिळतो . रक्षाबंधन हा सण प्रेम व विश्वासाचा प्रतीक आहे . गरीब बहिणीने भावाच्या हातात धागा बांधावा काय ,श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची राखी काय ,किंवा नवीन युगात बहिणीने ऑनलाइन पाठविलेली राखी काय . त्या सर्वामागे एकच भावना असते ती म्हणजे भावा बहिणीचे प्रेम . हल्लीच्या धकाधकीच्या काळात सर्वच व्यस्त आहेत .

पण रक्षाबंधनाचा हा सर्वांना एकत्र आणतो . ज्या समाजात एक वृत्ती असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे . व असा सण इतर कोणत्याही धर्मात नाही या दिवशी प्रत्येक घरात काही तरी गोड बनवला जातो असा हा सण लहानपासून वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरे करतात.
रक्षाबंधन निबंध मराठी 300 शब्दात | raksha bandhan nibandh in marathi in 300 words
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन . भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे . भारत देशांमध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात . रक्षाबंधन हा हिंदु उत्सवांत पैकी एक आहे . हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण आहे . श्रावण पौर्णिमा या दिवशी दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो . तो मुख्यत इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट महिन्यात येतो .
हा सण म्हणजे पराक्रम ,प्रेम ,साहस यांचा संयोग आहे. जगातील नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम ,निस्वार्थी आणि आणि पवित्र मानले जाते. रक्षाबंधन दिवशी बहीण भावाला राखी बांधते . राखी बांधण्यापूर्वी ती भावाच्या कपाळाला टिळा लावते . म्हणजे सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरे शिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र दृष्टी ती आपल्या भावाला देते हा संकेत या क्रियेतून दिसून येतो .
नंतर बहिण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते . बाह्य शत्रुंपासून आणि अंत विकारांपासून आपला भाऊ सुरक्षित राहो आणि आयुष्यात विजय प्राप्त करू त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करते . समाजात आपली बहिण ताठमानाने जगावी आणि तिच्या संरक्षणाची जबाबदारी भाऊ घेतो . हा रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिनी पुरताच मर्यादित राहिलेला नाही . तर गुरु-शिष्य ,आई-वडील ,चुलत भाऊ-बहीण ,मानलेला भाऊ बहीण इत्यादी नात्यांमध्ये साजरा केला जातो . थोडक्यात आज रक्षाबंधन शहराचा विस्तार इतर नात्यांमध्ये होताना दिसून येतो ही आनंदाची गोष्ट आहे .

आई वडिलांना मुले राखी बांधून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतात . शिष्य गुरु ला राखी बांधून त्याच्या विचारांच्या रक्षणाची जबाबदारी घेतात . झाडाझुडपांना हल्ली राखी बांधली जाते . जेणेकरून वृक्षतोड कमी होऊन वृक्ष प्रेम वाढेल . आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात रक्षाबंधन हा पवित्र सण आपले आज वेगळे अस्तित्व राखून आहे . समाजामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत हा सण साजरा केला जातो . राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील ,स्नेह , संयमी ठेवणारे बंधन आहे . या धाग्याने कित्येक मने जुळून येतात म्हणे प्रफुल्लित होतात .
गरीब बहिणीने भावाला बांधलेली धागा काय, श्रीमंत बहिणीने भावाला सोन्याची किंवा चांदीची राखी काय ,किंवा आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट माध्यमातून पाठवले राखी काय या सर्वांमागे एकच भावना असते ती म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाची . या दिवशी घरोघरी गोड पक्वान्नांचा बेत असतो . या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही संबोधले जाते त्यामुळे या दिवशी गोड नारळी भात करण्याची प्रथा आहेत . अशा प्रकारे हा सण फक्त भाऊ बहिणींचा नसून संपूर्ण कुटुंबाचा आहे आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात या सणाला विशेष महत्व आहे.
- Read Also – Importance Of Hard Work Essay In Marathi
रक्षाबंधन निबंध मराठी 500 शब्दात | essay on raksha bandhan in marathi language in 500 words
. रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे . हा सण श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो . भारतात वेगवेगळ्या भागात याच वेगवेगळी नावे आहेत त्याचे नारळी पौर्णिमा ,राखी पौर्णिमा ,गजरी पौर्णिमा इत्यादी . रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे. त्याच्यामध्ये रक्षा बंधन मध्ये हातात रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन होय .
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट नाट्याचे पवित्र बंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकते . रक्षाबंधन म्हणजे पराक्रम ,प्रेम ,साहस किंवा संयमाचा संयोग . जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम ,निस्वार्थी आणि पवित्र असते . भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी आहे . स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी भारतीय संस्कृती आहे . रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण . बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते.
समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावे म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो . मात्र आज तिची मस्करी करणार्या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते . भावाला ओवाळते भावाच्या सुखी निरोगी आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते . भाऊ या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो . प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते . या दिवशी बहीण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

या सणामागे अशीही कथा आहे की महाभारतात कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले तर द्रौपदीने शिशूपालाचा वध त्यामुळे श्रीकृष्णाच च्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडी चा तुकडा फाडुन जखमेवर बांधला . बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धी वरील विश्वासाचे दर्शन आहे . सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरे शिवाय भावनात्मक दृश्य जगाला पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते असा संकेत या क्रियेमधून दिसतो . भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते .
त्याप्रमाणे तिच्या डोळ्याच्या रूपात बहीण भावाला आजार ,वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते . बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रुंपासून आणि अंत विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते . रक्षा बंधन हे सुरक्षितेचे स्मारक आहे. राखी बांधणे एक बंधन आपल्यावर असते हे बंधन मागे न होण्याचे या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते .
राखी बांधताना बहीण-भावाचे बंधन ची व त्याचे रक्षण करण्याची सूचना करते . तिच्याकडे विकृत दृष्टीने न पाहता तीच्या प्रति प्रवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबा पुरतेच मर्यादित ठेवले आहे . असा सुंदर प्रेम आणि भावना च्या सणाला कुटुंब पुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही . सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमापुढे राहिली पाहिजे . रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे . रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल .
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर बहीण आणि भाऊ परस्पर प्रेरक ,पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. आज बाजारात अनेक प्रकारच्या मनोवेधक राखा मिळतात . प्रत्येक जण आपापल्या परीने रक्षाबंधनाची खरेदी करतो . इंटरनेटच्या माध्यमातून आज ऑनलाईन राखी पाठवली जाते . रक्षाबंधन हे एक प्रेमाचे प्रतीक रक्षाबंधन हे एक अतूट विश्वास रक्षाबंधन बहिण-भावाचा स्नेहबंध.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण रक्षाबंधन निबंध मराठी म्हणजेच essay on raksha bandhan in marathi language बद्दल चर्चा केली . aksha bandhan nibandh marathi म्हणजेच raksha bandhan nibandh in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व raksha bandhan in marathi information हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.