माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 2023 | Essay On Kabaddi In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध म्हणजेच Essay on kabaddi in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . kabaddi information in Marathi language म्हणजेच kabaddi essay in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | kabaddi essay in marathi in 100, 200 and 300 words

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 100 शब्दात | Essay On Kabaddi In Marathi in 100 words

सुदृढ आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि ह्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक ठळकपणे समोर येत आहे . म्हणूनच आपण श्लोक म्हणताना आरोग्य धनसंपदा असे म्हणतो.  हे सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी व्यायामामध्ये सातत्य असावे लागते आणि ते ठेवणे कठीण आहे म्हणूनच यावर उत्तम उपाय म्हणजे खेळ.  कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे . संध्याकाळी मी मैत्रिणीसोबत कबड्डी खेळते. 

आम्ही दोन संघ स्थापित केले आहेत . यामुळे कबड्डी खेळण्यात आम्हाला फार उत्साह वाटतो . शाळेत सुद्धा आम्हाला हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते . आमचे पी टी शिक्षक आम्हाला कबड्डी खेळण्याचे प्रशिक्षण देतात.

शाळेत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मध्ये भाग घेण्यासाठी संघ निवडला आहेत . त्यात माझाही समावेश आहे . टीव्हीवर कबड्डीचे सामने दाखविली जातात ते पाहताना मला आनंद होतो.  खेळाचा चांगला सराव करून राष्ट्रीय संघात सहभागी व्हावे असा माझा मानस आहे.

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 200 शब्दात | Essay On Kabaddi In Marathi in 200 words

प्रत्येकाला आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी खेळाची नितांत गरज असते.  मी माझे शरीर आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी दररोज संध्याकाळी कबड्डी हा खेळ खेळते .

कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे.  खेळाचे सर्व नियम आम्हाला आमच्या शिक्षकांनी समजावून दिले आहेत . खेळाची सुरुवात आम्ही नाणेफेक ने करतो . नाणेफेकीत यशस्वी होणारे संघाला आम्ही चढाई किंवा अंगण निवडण्याचा मान देतो . कबड्डी खेळताना कबड्डी या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो .

कबड्डी खेळताना चढाई करणार्‍याने जर विरुद्ध संघातील खेळाडूंना स्पर्श करून मध्य रेषेस स्पर्श केला तर त्याला एक गुण मिळतो . चढाई करणार्‍या जर विरुद्ध संघाने पकडले तर विरुद्ध संघाला एक गुण मिळतो.  पण जर चढाई करणाऱ्या खेळाडूला विरुद्ध संघाने पकडताना त्यांनी निसटून कुशलतेने जर मध्य रेषेस स्पर्श केला तर मात्र विरुद्ध संघातील त्याला स्पर्श करणारे सर्व खेळाडू बाद होतात.  हे कबड्डी खेळाचे वेगळेपण आहे .

या खेळात खूप बारकावेही आहेत . कबड्डीमध्ये मध्य रेषा , टच  लाईन , राखीव क्षेत्र फार महत्त्व असते . कबड्डी साठी काही साहित्य लागत नाही . हा खेळ खेळताना आमच्यात खूप उत्साह संचारतो . या खेळामुळे आम्ही स्वताचे रक्षण कसे करायचे हे शिकतो .

आम्हाला आमच्या शारीरिक कुवतीची कल्पना येते . मी कबड्डी खेळताना आतापर्यंत कॅप्टन म्हणून खूप चांगले काम केले आहे . जिल्हास्तरावर कबड्डीतील आणि बक्षीस जिंकले आहेत . मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आहे त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.

Read Also – My Dream Essay In Marathi

Essay 1 – माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 300 शब्दात | Essay On Kabaddi In Marathi in 300 words

खेळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो . मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले मनोरंजन तर होतेच शिवाय आपल्या शारीरिक व्यायाम हि होतो . मैदानी खेळ आपल्यात तंदुरुस्ती व ताजेपणा निर्माण करतात . भारतामध्ये क्रिकेट ,खोखो ,कबड्डी ,फुटबॉल यांसारखे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात . प्रत्येक व्यक्तीचा आवडता खेळ असतो . त्याचप्रमाणे कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे. कबड्डी हा मूळ दक्षिण आशियातील खेळ असून हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे.

माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 2021 | Essay On Kabaddi In Marathi

या खेळाला भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते . कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नसते . कबड्डीसाठी फक्त आयताकृती मैदानाची गरज असते . कबड्डीचे मैदान 12.5 मीटर लांब आणि १० मीटर रुंद असते. आयताकृती मैदानात मध्यभागात एक रेषा आखली जाते . आणि मैदानाचे दोन समान भाग केले जातात . प्रत्येक भागाला कोर्ट म्हटले जाते. प्रत्येक कोर्ट मध्ये बोनस रेषा आणि लॉबी असते . कबड्डीच्या मैदानाचे मध्य रेषेपासून तीन मीटर अंतरावर समांतर टच रेषा असते आणि टच रेषेपासून 1 मीटर अंतरावर बोनस रेषा असते . कबड्डी खेळात दोन संघ असतात . प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यापैकी सात खेळाडू मैदानात खेळण्यासाठी उतरतात .

खेळ सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकलेल्या संघामधील आक्रमक खेळाडू कबड्डी… कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो . विरुद्ध संघातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता तो खेळाडू परत येतो . जर तो खेळाडू सुरक्षित परतला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते खेळाडू बाद समजले जातात. जितके खेळाडू बाद होतात तितके गुण विजयी संघाला मिळतात . आक्रमक खेळाडू विरोधी भागात खेळत असताना त्यांचा दम सुटला तर तो खेळाडू बाद समजला जातो . अशा प्रकारे हा खेळ २० -२० मिनिटाच्या दोन भागात खेळला जातो . भारतीय असणारा हा खेळ पाकिस्तान,श्रीलंका, मलेशिया बांगलादेश इत्यादी देशात खेळला जातो.

आमच्या शाळेत सुद्धा कबड्डीचे संघ बनवीले आहेत. शाळेत होणाऱ्या वार्षिक कबड्डी स्पर्धेमध्ये खेळायला मला खूप आवडते . कबड्डी खेळल्यामुळे शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकास होतो . मला असे वाटते की कबड्डी हा खेळ कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व धाडसी होण्यासाठी प्रेरणा देतो . कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ आहे . हा खेळ खेळण्यासाठी जास्त पैशांची गरज भासत नाही . योग्य प्रशिक्षण मिळाले तर कोणीही हा खेळ खेळू शकतो . या खेळासाठी चातुर्य आणि ताकद याची जास्त गरज असते. अशा प्रकारे कबड्डी हा खेळ मला खूप आवडतो.

Essay 2 – माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध 300 शब्दात | Essay On Kabaddi In Marathi in 300 words

कबड्डीचा उगम प्राचीन भारतात आहे. संगम साहित्यात असा उल्लेख आहे की सदुगुडू (कबड्डीचे जुने नाव) युगानुयुगे सराव केला जात होता आणि जल्लीकट्टू खेळण्यापूर्वी सराव खेळ म्हणून त्याचा वापर केला जात होता. या खेळाचा आणखी एक प्रकार 4,000 वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये निर्माण झाला.

यादव लोकांमध्ये कबड्डी प्रसिद्ध होती. तुकारामांचा एक अभंग सांगतो की भगवान श्रीकृष्ण लहानपणी कबड्डी खेळायचे.

एक स्पर्धात्मक खेळ म्हणून कबड्डी | 1920 च्या उत्तरार्धात प्रथम स्पर्धा आयोजित करून भारताने कबड्डीला स्पर्धात्मक खेळ म्हणून लोकप्रिय केले. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना 1950 मध्ये झाली. 1951 मध्ये दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आशियाई खेळांमध्ये कबड्डी हा प्रात्यक्षिक खेळ म्हणून खेळला गेला आणि 1990 मध्ये आशियाई खेळांचा भाग बनवला गेला.

कबड्डीचे नियम

कबड्डीमध्ये भिन्न भिन्नता आहेत परंतु गुण मिळवण्याचे मूलभूत नियम, खेळाडूंची संख्या आणि एखाद्याला बाद घोषित करण्याचे मूलभूत नियम बहुतेक समान आहेत. कबड्डीच्या मूलभूत नियमांवर एक नजर टाकूया.

प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात ज्यातून एका वेळी फक्त 7 खेळाडू कोर्टवर असतील आणि इतर बदली असतील.

या संपर्क खेळाच्या शारीरिक स्वरूपामुळे खेळाडूंचे वय आणि वजनानुसार सामन्यांचे वर्गीकरण केले जाते.

प्रत्येक गेम हाफटाइममध्ये 5 मिनिटांच्या ब्रेकसह 20 मिनिटांच्या दोन भागांमध्ये खेळला जातो.

एका रेडरला दुसऱ्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला तो एका दमात स्पर्श करतो त्याला एक गुण मिळतो. रेडरला यशस्वीपणे पकडण्यासाठी बचाव करणाऱ्या संघाला एक गुण मिळतो.

चढाई करताना किंवा बचाव करताना ‘बाहेर’ घोषित केलेल्या खेळाडूंना प्रत्येक गुण मिळवून आत घेतले जाऊ शकते.

प्रत्येक संघ चढाई आणि बचाव करतो. अर्ध्या वेळेच्या विश्रांतीनंतर न्यायालये बदलली जातात.

वेळ संपेपर्यंत त्याच पद्धतीने खेळ सुरू राहतो. जो संघ जास्तीत जास्त गुण मिळवतो त्याला विजेता घोषित केले जाते.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध म्हणजेच Essay on kabaddi in marathi बद्दल चर्चा केली . kabaddi information in Marathi language म्हणजेच kabaddi essay in marathi 1०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment