मायबोली मराठी निबंध 2023 | Best Essay On Importance Of Marathi Language In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण मायबोली मराठी निबंध म्हणजेच essay on importance of marathi language in marathi ह्यला तुम्ही मराठी भाषेचे महत्व निबंध सुद्धा म्हणू शकता. ह्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत . मराठी भाषेचे महत्व निबंध म्हणजेच essay on importance of marathi language in marathi हा आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघणार आहोत . तर चला मायबोली मराठी निबंध सुरु करूया ….

मराठी भाषेचे महत्व निबंध | Essay On Importance Of Marathi Language In Marathi In 100 , 300 And 500 Words

मायबोली मराठी निबंध 100 शब्दात | essay on importance of marathi language in marathi in 100 words

खरंच आपण सगळे भाग्यवान आहोत . कारण मराठी भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे .आनंद ,दुःख, भीती अशा क्षणी आपल्या ओठी शब्द येतात ते मातृभाषेतूनच. मराठी साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे . आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवेत आपल्या महाराष्ट्राला बराच संतांचा ठेवा लाभलेला आहे.

मायबोली मराठी निबंध 2021 - Best Essay On Importance Of Marathi Language In Marathi

संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आहे . संत रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत. या दर्जेदार लिखाणाला न विसरता यांचे अध्ययन, पठण ,चिंतन करायला हवे . मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे . तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे . बदलत्या काळात इंग्रजीसुद्धा शिकली पाहिजे . हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही….

मराठी भाषेचे महत्व निबंध 300 शब्दात – essay on importance of marathi language in marathi in 300 words

महाराष्ट्रात रहाणाऱ्या बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे . माता, माय ,भूमी आणि मातृभाषा या तिन्ही गोष्टींबाबत प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो . आपले पहिले बोबडे बोल ही आपण आपल्या मायबोलीतून बोलतो . त्यामुळे पुढील आयुष्यात आपण जरी अनेक भाषा शिकलो तरी मातृभाषेला आपल्या अंत:कोशात मानाचे स्थान असते . माझ्या मातृभाषेला-मराठीला फार मोठी परंपरा लाभली आहे . हजार वर्षांपूर्वी मराठीत लिहिलेला पहिला शिलालेख “श्रवणबेळगोळ” येथे गोमतेश्वराच्या पुतळ्याखाली आढळतो .

मराठीतील पहिला आद्य ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो . मराठी माणसाची खासियत अशी की तो हिंदी ,संस्कृत या भाषा सहज आणि सोप्या रीतीने समजून , बोलू शकतो . तसेच इंग्रजी भाषा बोलणे ही सोपे जाते. कारण मराठी भाषा आहे या भाषांमधून विकसित केली आहे . तसेच त्याचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहेत. त्यात विदर्भाची विदर्भी ,कोकणी , मालवणी अशा मराठी पूरक भाषांचा समावेश होतो . आज मराठी भाषा जिवंत आहे ती फक्त शिवाजी महाराजांमुळे . त्यांच्या काळात मराठीला खरे महत्त्व प्राप्त झाले.

मायबोली मराठी निबंध 2021 - Best Essay On Importance Of Marathi Language In Marathi

शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला . मराठी भाषेवरील पा र्शियन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला . या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहिली जात असे म्हणत .अशीही आमची मायबोली मराठी भाग्यवान. तिला लाभलेल्या पहिला सुपुत्र- ज्ञानदेव . “माझ्या मराठीचा बोलु कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके । ” ही त्यांची प्रतिज्ञा . ज्ञानेश्वरांनी व अनेक संतांनी आणि त्यानंतर शाहीरांनी मराठी भाषेची साहित्य भांडार समृद्ध केले . मराठी साहित्याची ही परंपरा अखंड चालू आहे . आजही भारतीय साहित्यात मराठी साहित्याला मानाचे स्थान आहे .

मराठीतील साहित्य अनेक भारतीय भाषांत अनुवादले गेले आहे . समाजातील साऱ्या थरांतून माझी मायबोली विविध रूपांतून फुलत असते. माझ्या या मायबोलीचे शब्दभांडार हि समृद्ध आहे . आपल्या मातेकडून अनेक शब्द तिने आत्मसात केले आहेत . पण त्याचबरोबर आपल्या इतर भाषाभगिनी कडून ही ती शब्दाचे वैभव स्वीकारत असते. 1960 पासून या मायबोलीला राज्यभाषेचा ही सन्मान लाभला आहे . आता आम्ही सुपुत्रांनी तिला दिलेले आश्वासन पाळले पाहिजे आणि ते म्हणजे ” हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, असे आमच्या हृदय मंदिरी”

Read Also – माझा आवडता खेळ निबंध 2021 – Best My Favourite Game Essay In Marathi

मायबोली मराठी निबंध 500 शब्दात | essay on importance of marathi language in marathi in 500 words

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी , एवढ्या जगात माय मानतो मराठी । ” . २७ फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो . मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते “विष्णू वामन शिरवाडकर” ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो . जीवनलहरी, किनारा ,मराठी माती ,वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहे. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला ,नटसम्राट ,राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. वैष्णव ,जान्हवी ,कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या अशा अनेक साहित्यिक कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेचे महत्त्व लोकांसमोर मांडले आहे.

हा दिवस मराठी भाषा दिन ,मराठी राज्यभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो . कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे. त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरुवात कवितेपासून केली . पुढे कथा ,कादंबरी , ललित वाड्मयातील नावाजलेली साहित्य रचना त्यांच्या लिखाणातून अवतरली. भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली . 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आज हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना मराठी गायन ,वादन, वक्तृत्व स्पर्धा ,मराठी निबंध स्पर्धा ,शास्त्रीय संगीत यांचे आयोजन केले जाते. नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते .

मायबोली मराठी निबंध 2021 - Best Essay On Importance Of Marathi Language In Marathi

आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे . आपल्या या मराठी साहित्यात मराठी चित्रपट , नाटक, काव्य , कविता इत्यादींचा फार मोठा वाटा आहे . अशा अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठीचा वारसा जपत आलेलो आहोत. आपल्या या मराठी मातीत अनेक संत होऊन गेले संत रामदास ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून स्तोत्र, श्लोक लिहिले. आणि लोकांना चांगला संदेश दिला . अशा संतांनीसुद्धा मराठी भाषेत त्याचा लोकांवर ठसा उमटवला . बऱ्याच वर्षापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्त्व देणे कमी झालेले दिसते . मराठी भाषेतील साहित्य ,कविता ,नाटके प्रवास वर्णन ,निबंध ,लघुनिबंध यांचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो .

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि मराठी भाषेचे रक्षण केले . एवढेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच काढले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर , सचिन तेंडूलकर, नाना पाटेकर , माधुरी दीक्षित तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील … समाजसेवक अण्णा हजारे , समाज सुधारक बाबा आमटे तसेच उत्तम मराठी लेखक नाटककार पु .ल देशपांडे , यांसारखी अनेक रत्ने मराठी मातीतच घडली . पण या मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत .

मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहे इंग्रजी ही काळाची गरज आहे . नक्कीच याबद्दल दुमत नाही . पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे योग्य नाही . मराठी बोलणारा माणूस नोकरी-व्यवसाय ,उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे. तिथे जाऊन हिंदी , इंग्रजी सारख्या इतर भाषा अवगत करून आपल्या मराठी भाषेला विसरत आहे .

ज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोली आपल्याला घडवले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे . मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे. आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास , मराठीचा इतिहास आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. ही सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी अशा गोष्टींमुळे मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.

निष्कर्ष ( conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण मायबोली मराठी निबंध म्हणजेच essay on importance of marathi language in marathi हा निबंधा बद्दल जाणून घेतले . मराठी भाषेचे महत्व निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात बघितला . जर तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असल्यास तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका ….

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment