दसरा निबंध मराठी 2023 | Essay On Dasara In Marathi | Dasara Information In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण दसरा निबंध मराठी म्हणजेच dussehra essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . essay on dasara in marathi म्हणजेच dasara information in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला dasara marathi mahiti सुरु करूया ….

दसरा निबंध मराठी | dasara information in marathi | dussehra essay in marathi in 100 , 200 and 300 words

दसरा निबंध मराठी 100 शब्दात | essay on dasara in marathi in 100 words

दसरा हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे .हा सण दरवर्षी हिंदू कॅलेंडर नुसार अश्विन महिन्यात साजरा केला जातो .हा सण अत्यंत पवित्र मानला जातो . या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते . दसरा हा दहा दिवसांचा सण आहे त्यापैकी नऊ दिवस देवी दुर्गा ची पूजा केली जाते आणि दहावा दिवस हा दसऱ्याच्या रूपाने साजरा केला जातो . दसरा सणा दिवशी दुर्गादेवीने क्रूर महिषासुर राक्षसाचा वध केला . या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून त्याच्यावर विजय प्राप्त केला होता .

या विजय कथांमुळे या सणाला विजयादशमी असेही म्हणतात . दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे म्हणून या सणाच्या मुहुर्तावर नवी खरेदी ,नवे करार आणि नव्या योजनांचा प्रारंभ केला जातो . गोड पकवान भोजन केले जाते. तसेच शस्त्रांची घरोघरी पूजा केली जाते . लोक एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा देतात . दसरा सणा दिवशी सर्वत्र आनंदी वातावरण असते . दसरा सण आपल्याला ही शिकवण देतो की चांगल्या गुणांचा नेहमी विजय होतो.

दसरा निबंध मराठी 200 शब्दात | essay on dasara in marathi in 200 words

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यात या सणाची माहिती गौरविली आहे . भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे . सर्व लोक प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात . त्याचप्रमाणे विजयादशमी म्हणजे दसरा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होतो . हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे . दसरा हा सण दहा दिवस आणि नव रात्रीचा सण आहे . दसरा म्हणजे रावणावर रामाचा विजय आणि महिषासुरावर दुर्गा देवीचा विजय . असा वाईट शक्तीवर चांगुलपणाचा विजय आहे .

दशमुखी रावण व रामाचा विजय असा दशहरा याचा अर्थ आहे. देशभरातील लोक रावणाचे प्रति रूपाने दहन करून या सणाचा दहावा दिवस साजरा करतात. हा सण दरवर्षी सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोंबर मध्ये दिवाळी सणाच्या आधी वीस दिवस येतो . तेव्हा घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेष विशेषत्वाने केले जाते . या दिवशी सीमोल्लंघन ,शमीपूजन ,सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजा केली जाते . तसेच या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात .

आपट्याची पाने देऊन लोक सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा अशा शुभेच्छा देतात . सुरुवातीला हा सण कृती विषयक सण मानला जात असे . म्हणजे पहिल्या शेतातील पहिले पीक घरी येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करतो . दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो . या मुहूर्तावर लोक नवीन खरेदी सोने खरेदी करतात . काही लोक नवीन व्यवसाय चालू करतात. या दिवशी घरोघरी गोड पक्वान्नांचा बेत असतो . लोक पुरणपोळी श्रीखंड पुरीचा बेत करून दिवसाची सुरुवात गोड करतात . आपली संस्कृती आणि परंपरा, मेळे आणि सणांसाठी भारत देश प्रसिद्ध आहे . देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रदेशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो त्यामुळे या सणाची वाट लोक उत्सुकतेने बघतात.

दसरा निबंध मराठी 300 शब्दात | essay on dasara in marathi in 300 words

हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व असलेला व मोठा सण दसरा आश्विन शुद्ध दशमीला येतो . आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्या नंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात . दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यात या सणाची माहिती गौरवली आहे . तर हा पराक्रमाचा ,पौरुषाचा सण आहे . या सणात चातूर्वणा एकत्र आलेले दिसतात. ह्या दिवशी सरस्वतीपूजन ,शस्त्र पूजन केले जाते . दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासून ची आहे.

दसरा निबंध मराठी 2021 | Essay On Dasara In Marathi | Dasara Information In Marathi

याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला . तर रामचंद्र याच दिवशी रावणा वर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्या विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती . अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व झाडाची पूजा केली तो हाच दिवस. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीचा उत्सव या दिवशी प्रारंभ केला . अनेक शूर पराक्रमी राजे या दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करायला जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणतात.

दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस . फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत असतात . अभ्यास करून मोठे होत असत . त्यावेळी मानधन नव्हते त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरु दक्षिणा देत . या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता . त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुजी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ .

तुम्ही मागाल ते मी देईन . ऋषींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी त्याला प्रत्येक विद्याबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा त्याप्रमाणे 14 विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणावयास सांगितल्या . कौत्स हे ऐकून गांगरून गेला . तो रघुराज कडे गेला. परंतु राजाने त्या दिवशी विश्‍वजीत यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरीसुद्धा राजाने तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले . इंद्राला रघु राजाचा पराक्रम माहीत होता . त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली आणि आपट्याच्या पानाची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली .

त्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स तिकडे गेल्यावर गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली . परंतु त्या 14 कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास नकार दिल्यामुळे कौस्ताने त्यानंतर आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगीतले .तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याचे नाणी लुटण्याची प्रथा सुरु झाली. साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण दसरा निबंध मराठी म्हणजेच dussehra essay in marathi बद्दल चर्चा केली . essay on dasara in marathi म्हणजेच dasara information in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व dasara marathi mahiti हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment