डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 | Best Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी म्हणजेच dr babasaheb ambedkar essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी म्हणजेच essay on dr babasaheb ambedkar in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी | Essay On Dr Babasaheb Ambedkar In Marathi In 100 , 300 And 500 Words

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 100 शब्दात | Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi In 100 Words

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ भीमराव रामजी आंबेडकर असे होते . डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील महु गावात झाला . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भिमाबाई होते . 1960 साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2021 | Best Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

डॉ आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या . डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. आंबेडकरांनी भारतातील जाती व्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला . 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला . 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 300 शब्दात | Essay On Dr Babasaheb Ambedkar In Marathi In 300 Words

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल अठराशे 1891 साली मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू या लष्करी छावणीत असलेल्या गावात झाला . त्यांचे पूर्ण नाव डॉ भीमराव रामजी आंबेडकर असे आहे . पण ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जातात . त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भिमाबाई असे होते. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या भारतीय सैन्यात नोकरी करत होते . आणि तेथे त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले . डॉ आंबेडकर पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले .

त्यांचे कुटुंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या दलित जातीचे असल्यामुळे त्यांना अनेक वेळा इतर जातीतील लोकांच्या विरोधात सामना करावा लागला. आपल्या भीमराव वर उत्तम संस्कार व्हायला हवेत म्हणून बाबा साहेबांचे वडिल म्हणजेच रामजी नेहमी लक्ष ठेवीत असत . ते बाबा साहेबांना नेहमी उत्तम पुस्तके वाचायला आणू द्यायचे . म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण सवय ही आपल्याला त्यांच्या मध्ये दिसून येते . बाबा साहेबांकडे त्यांच्या मुंबई मधील घरात सुमारे 50 हजार पेक्षा जास्त पुस्तके आहेत व त्याचे उत्तम असे ग्रंथालय निर्माण झाले आहे .

1906 मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई यांच्यासोबत झाले . 1907 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पार केली . 1912 मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची बी एच ची पदवी संपादन केली . त्यानंतर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्ही मधून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या . त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती . उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांना फार संघर्ष करावा लागला . संघर्ष लढून त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2021 | Best Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

डॉ आंबेडकर यांनी सामाजिक ,राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रात सुद्धा मोलाचे कार्य केले. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी भारताचे संविधान तयार केले . शिक्षण हे समाजाचे परिवर्तनाचे शस्त्र आहे हे समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांनी माणसाला कर्तव्य आणि हक्काची जाणीव करून दिली . 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 चाली अखेरचा श्वास घेतला . आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला . भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्य कधीही विसरता येणार नाही .

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 500 शब्दात | Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi In 500 Words

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते . भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू गावी झाला .त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते . भीमरावांचे वडील रामजी सैन्यात नोकरी करत होते . 1894 मध्ये भीमरावांचे वडील रामजी सैन्यातील सेवानिवृत्त झाली . अन् अवघ्या दोन वर्षातच माता भिमाबाई चे निधन झाले . त्यानंतर त्यांच्या वडिलांनी भीमरावांच्या कठीण परिस्थितीत सांभाळ केला . रामजींना वाचनाची फार आवड होती .

व्यायामाने शरीर सदृढ बनते तर वाचनाने मस्तक सुधारते ,मन खंबीर बनते यावर त्यांचा गाढ विश्वास होता . भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड रामजींनी लावली . शालेय शिक्षण घेताना भीमरावांना महार जातीचे असल्याने अस्पृश्यतेचा सामना करावा लागला . अनेक वाईट चालीरीतींची टक्कर द्यावी लागली . पण ते थांबले नाहीत . ही परिस्थिती शिक्षणाने बदलवण्याची त्यांनी खंबीरपणे ठरवले . अज्ञानाला शिक्षणाचा मंत्र देऊन सुरूंग लावण्याचे बाबासाहेबांनी ठरवले . वडिलांनी भीमरावांना शिस्त ,प्रामाणिकपणा ,चिकाटी ,धैर्य आणि स्वावलंबनाचे धडे कुशलतेने दिले .

आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून रामजी नेहमी दक्ष असत . ते भिमाला चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत . म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय ठाई ठाई आढळते . त्यांच्याकडे मुंबईतील घरात 50 हजार पेक्षा जास्त पुस्तकाचे समृद्ध ग्रंथालय होते .त्यांनी अनहीलेशन ऑफ कास्ट ,द बुद्ध अँड हिज धम्म ,कस्ट इन इंडिया असे अनेक सरस महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न सरळ, सुशील स्वभावाचा रमाबाई शी झाले . रमाबाई भिमराव यांच्यामागे प्रत्येक कार्यात सावलीप्रमाणे उभी राहिली . भीमरावांना विश्व पुरुष बनवण्यासाठी ती चंदनासम झिजली . भिमरावांकडे अलौकिक बुद्धिमत्ता ,प्रचंड ग्रहणक्षमता ,सागरी स्मरणशक्ती .अफाट कार्यश्रमता, अमोघ वाणी होती.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1913 मध्ये हुशार भीमरावांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवले . अमेरिकेतील कोलंबिया विद्यालयात त्यांनी प्रवेश घेऊन उच्च शिक्षण सुरू ठेवले . तिथे अस्पृश्यता नसल्याने बाबासाहेबांना अमेरिकेचे अनोखे दर्शन घडले . पुढे लंडन विद्यापीठातील त्यांनी उच्च शिक्षण घेतले . भीमरावांच्या ठाई अंधाराला प्रकाशन फेकण्याची अनोखी ऊर्जा होती . विलायती तिथून परतल्यावर त्यांनी भारतात वकिली पत्करली . सामाजिक संस्थांची उभारणी केली .

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2021 | Best Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

वृत्तपत्राचे संपादन करून दलित ,गरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली .दलित बांधवांच्या संघर्षांचे बीज पेरले . उच्च कोटीतील ग्रंथांची निर्मिती केली . समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले . महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनू मूर्ती स्मृती दहन ,हिंदू कोड बिल अशी अनेक सामाजिक कार्य केली . हिंदू धर्मातील असमानता पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला . पुढे मग त्यांच्या अनेक अनुयायांनी हा धर्म स्वीकारला . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग सर्वांनी भारताची राज्यघटना बनवण्याचे कठीण कार्य बाबासाहेबांना दिले . बाबासाहेबांनी ही संधी मानून भावी देशाची राज्यघटना समस्त देशवासीयांच्या हिताची बनवली . बाबासाहेब युगनायक होते युग निर्माते होते .

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते . तसेच असामान्य प्रतिभावंत लेखक होते . स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते . त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत सारख्या इतर उत्तम वृत्तपत्रांचे संपादन केले . त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान माहिती होती . सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,शैक्षणिक ,धार्मिक व पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला . त्यांनी दीनदलितांच्या ,श्रमिक ,गोरगरीब ,शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला .

वर्षानुवर्षे गुलामगिरीत अज्ञान अडकलेला मागासवर्गीय समाजाचा क्रांतीचे बीज पेरले . स्त्री वर्ग ,शेतकरी ,पददलित ,मजूर समाजाला समतेची वाट दाखवून दिली. अखेर या विश्व पुरुषांनी 6 डिसेंबर 1956 चाली अखेरचा श्वास घेतला . बाबासाहेब एक महामानव नाहीत तर दलित ,गोर-गरीब ,वंचित मूक समाजाचा ते विचार होते . माणसाला माणूस पण मिळवून देणारे ते अलौकिक व्यक्तिमत्त्व होते . सध्याच्या काळात आपण भारतवासीयांनी जर आंबेडकरांचे विचार आचरणात आणले तर नक्कीच भारत देश प्रगतीपथावर झेप घेईल हे मात्र नक्की…..

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी म्हणजेच dr babasaheb ambedkar essay in marathi बद्दल चर्चा केली . बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी म्हणजेच essay on dr babasaheb ambedkar in marathi हा निबंध १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment