नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी म्हणजेच diwali essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . diwali nibandh marathi म्हणजेच information of diwali in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….
दिवाळी निबंध मराठी | information of diwali in marathi | diwali nibandh marathi in 100 , 200 and 300 words
दिवाळी निबंध मराठी 100 शब्दात | diwali essay in marathi in 100 words
दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतो . दिवाळीला घराबाहेर दिवे ,आकाश कंदील लावले जातात . तसेच लहान मुले घराबाहेर किल्ला तयार करतात . दिवाळीला घरोघरी चकली, चिवडा ,शंकरपाळी ,करंजी ,लाडू असे अनेक पदार्थ तयार केले जातात . दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी गाईची व पाडसाची पूजा करून तिला पुरणपोळी खाऊ घातले जाते. धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस .
या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते . नरक चतुर्थी हा दिवाळीचा तिसरा दिवस या दिवशी पहाटे उठून अभंग सणाचे महत्व असते . लक्ष्मीपूजन दिवशी लक्ष्मीचे तसेच सोने-चांदी, पैसे, केरसुनी यांना लक्ष्मी मानून त्यांची पूजा केली जाते . बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो . भाऊबीज हा भाऊ बहिणीचा प्रेमसंवर्धनाचा दिवस असतो . या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो . दिवाळी दिवसात लोके कुणाच्या घरी फराळ जाऊन हा सण उत्साहाने साजरा करतात.
दिवाळी निबंध मराठी 200 शब्दात | diwali essay in marathi in 200 words
दिवाळी किंवा दीपावली हा दीपोत्सव हिंदूंचा प्रमुख सणांपैकी एक आहे. या सणाला घराजवळ लहान दिवे लावले जातात व घराच्या उंच ठिकाणी आकाशकंदील लावला जातो . स्त्री अंगणात रांगोळी काढतात . दिवा ला मांगल्याचे प्रतीक मानला जातो . अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करतो. आपल्या जीवनातील अंधःकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव सारेजण साजरा करतात .

दिवाळीच्या सणाला महाराष्ट्रात काही ठिकाणी लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात त्यावर माती ते बाहुले प्राणी मानतात व त्यावर धान्य पेरतात . दिवाळी हा सण अंदाजे तीन हजार वर्ष जुना आहे परंतु काही लोक असे म्हणतात की प्रभू रामचंद्र सीतेसह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत या दिवशी दिवाळी सण साजरा केला जातो . दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असतो याला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
या दिवशी गाईची व तिच्या पाडसाची पूजा केली जाते . धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस या दिवशी धनाची पूजा केली जाते. दिवाळीचा तिसरा दिवस मध्ये नरक चतुर्थी या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी उटणे आंघोळ करतात व नवीन कपडे घालतात . लहान मुले फटाके वाजवतात. नरक चतुर्थी नंतर येते लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते . घरातील दागिने ,धान्याची पूजा केली जाते व आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणीची पूजा केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी दीपावली पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा या दिवशी बरेच लोक नवीन वस्तू खरेदी करतात किंवा नवीन प्रकल्प चालू करतात. पाडव्या नंतर येते भाऊबीज. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करते. त्यानंतर भावा-बहिणीने एकमेकांना काही भेटवस्तू देतात. दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना शुभेच्छा भेटवस्तू व दिवाळीचे मित्रांना देतात असा हा दिवाळी सण सारे जण आनंदाने वर्षांनी साजरा करतात.
- Read Also – Essay On Dasara In Marathi
दिवाळी निबंध मराठी 300 शब्दात | diwali essay in marathi in 300 words
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतो या सणाला घराबाहेर दिवे लावले जातात. आकाशकंदील लावला जातो . लहान मुले घरावर किल्ला करतात आणि त्या किल्ल्यांवर मावळे ठेवतात . पताके लावून किल्ल्या सजवतात. धान्य पेरतात .
दारात रांगोळी काढली जाते . अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस दिवाळी सण साजरा केला जातो. या सणाला घरोघरी चकली ,चिवडा ,शंकरपाळी ,करंजी लाडू असे अनेक पदार्थ तयार केले जातात. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात . आपली भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे या दिवशी गाईची व पाडसाची पूजा केली जाते . घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून पूजा केली जाते . या दिवशी गाईला ओवाळून पुरणपोळी खाऊ घालतात.

त्यानंतर धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे . ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व धन्वंतरी हा वैद्य राजा असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असेही म्हटले जाते . नरक चतुर्थी हा दिवाळीचा दुसरा दिवस या दिवशी अभंग स्नानाचे महत्त्व असते . सकाळी लवकर उठून शरीरा सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते या दिवशी घरातील स्त्रिया लवकर उठून घराबाहेर दिवे लावतात दारात रांगोळी काढतात लहान मुले पहाटे उठून अभ्यंगस्नान करून फटाके उडवायला सुरुवात करतात .
नरक चतुर्थी नंतर येते लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते तसेच सोन्याचे दागिने चांदी पैसे ठेवून पूजा करतात . हा दिवस व्यापारी लोक उत्साहाने साजरा करतात . या दिवशी लोक केरसुणी विकत घेतात आणि तिलाच लक्ष्मी मानून तिची पूजा करतात . लक्ष्मीपूजन नंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ओळखता . साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.
ह्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात किंवा नवीन प्रकल्प चालू करतात. पाडव्यानंतर भाऊबीज हा दिवस येतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ तिला ओवळणी म्हणून भेटवस्तू देतो अशा प्रकारे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आणि एकमेकांच्या घरी फराळासाठी जातात म्हणून दिवाळी हा एक महत्वपूर्ण सण समजला जातो.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध मराठी म्हणजेच diwali essay in marathi बद्दल चर्चा केली . diwali nibandh marathi म्हणजेच information of diwali in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.
तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.