कोरोना योद्धा मराठी निबंध 2023 | Corona Warriors Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण कोरोना योद्धा मराठी निबंध म्हणजेच corona warriors essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . कोरोना योद्धा मराठी निबंध म्हणजेच essay on corona warriors in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया ….

कोरोना योद्धा मराठी निबंध | essay on corona warriors in marathi in 100 , 200 and 300 words

कोरोना योद्धा मराठी निबंध 100 शब्दात | corona warriors essay in marathi in 100 words

कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे योद्धा म्हणजे कोरोना योद्धा होय . कोरोना व्हायरस ने धावत्या भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जरी थांबवले असले. तरी कोरोना योद्धा या संकटाची संघर्ष करत होते आणि आजही ते या संकटाचा सामना करत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ देशाचा विचार त्यांनी केला .

कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी समाजातील अनेक घटक एकत्र येऊन कार्य करीत आहे. त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक डॉक्टर हा विशेष कोरोना योद्धा आहे. डॉक्टरांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी स्वतःची व कुटुंबाची पर्वा केली नाही . ते दिवस रात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत .

दिवस-रात्र सर्वत्र बंदोबस्त ठेवून पोलिसांनी आपले काम अगदी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे केले कोरोना रुग्ण सापडलेला परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची होती ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली . या सर्व कोरोना योध्या नचे कार्य सदैव स्मरणात ठेवा कारण त्यांच्यामुळे आपण उद्या मोकळा श्वास घेणार आहोत . या कोरोनाच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपण करू शकणार नाहीत.

कोरोना योद्धा मराठी निबंध 200 शब्दात | corona warriors essay in marathi in 200 words

देशाची सेवा करणे ज्यांचे पहिले काम आहे असा शूर कोरोना योद्धे यांना माझा सलाम . डिसेंबर 2019 मध्ये प्रथम सापडलेला कोरोना या अति सूक्ष्म विषाणूने अल्प काळात जगभर थैमान घातले. घड्याळाच्या काट्यावर धावणार्रे जग अक्षरशः जागेवर थांबले . अशा घातक भयंकर जीवघेणी संसर्गजन्य कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक देशात कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत .आपल्या देशात आणि उन्हाळ्यात सर्वाना नकोसे वाटणारी पीपीई कीट घालून कोरोना रुग्णांची सेवा केली.

कोरोना ड्युटीवर असताना किती डॉक्टरांना कोरनाची लागण सुद्धा झाली . व त्यांना प्राणही गमवावा लागला . दिल्ली येथील बेगमपुर हॉस्पिटल मधील कोरोना योद्धे सुप्रसिद्ध डॉक्टर जावेद अली हे ज्वलंत उदाहरण आहेत . डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स ,आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धे म्हणून विशेष भूमिका बजावत आहेत. प्रत्येक कोरोना योद्धे त्यांचा ते जीव धोक्यात घालून देखभाल करीत आहेत. महाराष्ट्र सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली यावर तर प्रत्येक नागरिकाची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. कोरोना लढाईतील पोलीस हा कोरोना योद्धा अहोरात्र झटून कार्य करीत आहे .

लॉकडाउनच्या काळात बेसावधपणे फिरणाऱ्या नागरिकांवर योग्य कारवाई करणे, विनाकारण नागरिकांनी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे यावर त्यांनी चोख बंदोबस्त केला . ज्यामुळे कोरोनाचा अटकाव करणे सोपे झाले . हे करीत असताना कित्येक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. प्रसंगी जीवही गमवावा लागला .कोरोना महामारी संकटाला अनेक उद्योगधंदे बंद पडले नागरिक हवालदिल झाले अशावेळी स्वस्त धान्य दुकानातील राशनदाराने आपले कार्य चोख बजावली.

सरकारने पुरवलेले धान्य गरीब गरजूंना वेळेवर पोचवले. बँक कर्मचारी ही कोरोना योद्धाची भूमिका पार पाडताना जीवाची पर्वा केली नाही . कित्येक सामाजिक संस्थांनी स्वयंसेवक मार्फत मास्क, सॅनिटायझरचे वाटप गरजूंना केले . महत्त्वाच्या ठिकाणी चेक पोस्टवर शिक्षकांनी केलेली कोरोना योद्धेची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरली . कोरोनाची लढाई प्रत्येक नागरिकाला घरी राहून जिंकायचे होती या परिस्थितीत सोशल मीडियाने देशाच्या कानाकोपऱ्यातील बातमी पोहचवण्याचे कार्य केले.

कोरोना योद्धा मराठी निबंध 2021 | Corona Warriors Essay In Marathi

कोरोना लढाईमध्ये गावचे सरपंच पासून ते देशाचे पंतप्रधानपद प्रत्येकमाणूस कोरोना योद्धा या महामारी विरुद्ध लढत आहे . देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक इत्यादी सर्व क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे . यांच्या मुळे आपण विशाल, सुंदर अशा जगात पुन्हा ताठ मानेने मिरवणार आहोत, कोरोना योद्ध्यांचा ठेवू मान , कार्य त्यांचे आहे महान.

कोरोना योद्धा मराठी निबंध 300 शब्दात | corona warriors essay in marathi in 300 words

कोरोना व्हायरस हा इतका सूक्ष्म वायरस आहे की जो आपल्या डोळ्यांनाही न दिसणारा असा वायरस आहे . हा विषाणू सूक्ष्म असला तरी इतका घातक आहे की या विषाणूमुळे लोकांचा मृत्यूही झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरणा बाधित रुग्णांची सेवा करणारे ते खरे कोरोना योद्धा आहेत. आपल्या देशाचे डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी पोलिस सफाई कर्मचारी हे सर्व कोरोना काळातील कोरोना योद्धा आहेत. कोरोना हा साथीच्या रोगाचा विषाणू आहे .

एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या विषाणूचा फैलाव होतो . हा साथीच्या रोगाचा विषाणू असल्यामुळे हा विषाणू कमी कालावधीत अत्यंत वेगाने संपूर्ण देशभर पसरला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारत सरकारने संपूर्ण लॉकडाउन जाहीर केले होते . सर्व जण आप-आपल्या घरामध्ये सुरक्षित राहावेत हाच त्यामागचा उद्देश होता . परंतु कोरोना योद्ध्यांनी त्या काळात त्यांचे काम जबाबदारीने निभावले. सर्व डॉक्टर नर्सेस हॉस्पिटलमध्ये दिवस-रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत होते.

आरोग्य कर्मचारी सर्व कोरोना बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देत होते . सर्व पोलिस कर्मचारी लोकांना घरी सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी सूचना करत होते . आपल्याला वेळोवेळी भाजीपाला दूध पुरवणाऱ्या लोकांनी आपण विसरता कामा नये. सुरुवातीच्या काळात नव्हे तर आजही प्रत्येक युद्धात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे . लॉकडाऊन च्या काळात आपण सर्वांनी आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत अतिशय आनंदाने आणि समाधानाने घालवला.

कोणी स्वतःचा छंद जोपासला तर कोणी आवडते पदार्थ करून आपल्या कुटुंबासोबत घरात राहून तो क्षण चांगल्या रीतीने पार पाडला . परंतु कोरोना योद्ध्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून दुर राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करुनशी संघर्ष दिला. आपल्या मुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही कोरोना योद्धा त्याच्या कुटुंबापासून दूर राहिले इतकेच नव्हे तर संकटाशी लढताना अनेक डॉक्टर नर्सेस पोलिस यांना आपला जीवही गमवावा लागला.

खरंच या कोरोना योद्ध्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहेत . त्यांच्या या संघर्षामुळे आजपर्यंत अनेक कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत करू नये त्यांनी वेळोवेळी योग्य ती पावले उचलली म्हणून आज अनेक लोकांचे जीव वाचले. मग आपण ही त्यांना कोरोना पासून वाचवण्यासाठी मदत नक्कीच करू शकतो. आपण सरकारच्या नियमांचे पालन करून आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन घरात सुरक्षित राहून या कोरोना योद्ध्यांना मदत करू शकतो.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण कोरोना योद्धा मराठी निबंध म्हणजेच corona warriors essay in marathi बद्दल चर्चा केली . कोरोना योद्धा मराठी निबंध म्हणजेच essay on corona warriors in marathi हा निबंध १०० , 2०० आणि 3०० शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment