भ्रष्टाचार निबंध मराठी 2023 | Best Bhrashtachar Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी म्हणजेच bhrashtachar essay in marathi ह्या विषयावर चर्चा करणार आहोत . भ्रष्टाचार निबंध मराठी म्हणजेच bhrashtachar essay in marathi हा निबंध येथे तुम्हाला १०० , ३०० आणि ५०० शब्दात वाचायला मिळेल . ह्याच्या साहयाने तुम्ही हा निबंध सहज अभ्यासात किंवा परीक्षेत लिहू शकता.

Bhrashtachar Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words | भ्रष्टाचार निबंध मराठी

भ्रष्टाचार निबंध मराठी 100 शब्दात | bhrashtachar essay in marathi in 100 words

भ्रष्टाचाराचा शाब्दिक अर्थ भ्रष्ट-आचरण . स्वार्थाच्या इच्छेसाठी समाजाचे नैतिक मूल्य लक्षात ठेवून जे कार्य केले जाते याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचार देशभर साथीच्या रोगांसारखे पसरत आहे. हे हळूहळू दीमाप्रमाणे संपूर्ण देशाचा नाश करीत आहे. संपूर्ण भारतामध्ये भ्रष्टाचाराचे स्थान आहे. सत्याच्या मार्गावर प्रगती करण्याऐवजी लोक भ्रष्ट धोरणे अवलंबतात. उदाहरणार्थ, एखाद्या कार्यालयाला पदोन्नती किंवा नोकरीची आवश्यकता असल्यास, ते त्यांचे काम करण्यासाठी त्यांना लाच देतात. हे न्यायालयीन व्यवस्थेविरूद्ध आहे.

भ्रष्टाचार निबंध मराठी -  Best Bhrashtachar Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

आजकाल विडंबनाची गोष्ट अशी आहे की जर अशा लोकांना लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या गुन्ह्यात अडकले असेल तर त्यांना लाच देऊनही सूट दिली जाते. भ्रष्टाचाराला देशातील बहुतेक राजकारणी जबाबदार आहेत. पण सत्य हे आहे की देशातील सामान्य नागरिकही विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराचे भागीदार आहेत. थोडे कष्ट पडले तरी चालतील पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक माणसात नाही तोपर्यंत आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही.

भ्रष्टाचार निबंध मराठी 300 शब्दात | bhrashtachar essay in marathi in 300 words

भ्रष्टाचाराची सुरुवात झाली कशी व कुठून याबद्दल कोणीही फारशी माहिती सांगू शकत नाही पण हे खरं आहे की जसजसा माणसाकडे पैसा येऊ लागला तस तसा माणूस चैनीच्या व दिखाव्याच्या गोष्टीकडे आकर्षित होऊ लागला . पूर्वी जेव्हा माणसाकडे जास्त पैसा नव्हता तेव्हा त्याच्या साठी दैनंदिन गरजेच्या वस्तू महत्वाच्या होत्या . त्याच्या इच्छा दोनच वेळचे पुरेसे जेवण आणि जीवनाश्यक वस्तू मिळवणे एवढेच होते .

त्यामुळे पूर्वीचे बहुतेक लोक मेहनती आणि निर्मळ म्हणायचे होते . जस जशी सुधारणा होत गेली आणि चैनीच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्या , गरजा नसतानाही त्या हव्या हव्याश्या वाटू लागल्या . माणसांचा लोभ वाढू लागला , जास्त मेहनत न करता अधिकाधिक संपन्न जीवन जगण्याची हा हाव वाढू लागली हेच मूळ आहे भ्रष्टाचाराचे.

आज भारतात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत आहे. काळा भ्रष्टाचार – हेतुपुरस्सर वस्तूंची किंमत वाढवणे, औषधाच्या क्षेत्रातही चुकीचे ऑपरेशन्स करून पैसे लुटणे, आपल्या स्वार्थासाठी, पैशाने सर्व काही करणे, कोणतीही वस्तू स्वस्त आणि महागडीने विकणे, निवडणूकीत कडक कारवाई करणे, कर चोरी करणे, ब्लॅकमेल करणे, परीक्षेतील अनुकरण , परीक्षार्थीचे चुकीचे मूल्यमापन, हफ्ता वसुली, न्यायाधीशांकडून पचुकीचे निर्णय, मतांसाठी पैसे आणि मद्य वाटप, पैशाने अहवाल छापणे हे सर्व भ्रष्ट आचरण आहे.

आणि भारत व इतर देशांमध्ये दिवसेंदिवस हे वाढत आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आज जगात भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. भारतातील भ्रष्टाचाराने आपली मुळे इतकी बळकट केली की लोकांची मानसिकता लाच घेण्याची व देण्याची बनली आहे. लाच घेणे आणि देणे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. नुकत्याच झालेल्या कोरोना साथीच्या काळात भ्रष्टाचाराचे उदाहरण पाहायला मिळाले. जिथे संपूर्ण जग कोरोनाबद्दल भयभीत झाले होते. त्याच वेळी, वैद्यकीय क्षेत्रांनी स्वतः त्यात भर घातली. त्याने मनमानी फी घेतली, चुकीचा कोरोना अहवाल दिला. कोरोनाव्हायरस दरम्यान, भ्रष्टाचाराने त्याचा प्रदेश आणखी वाढविला आहे.

भ्रष्टाचार निबंध मराठी -  Best Bhrashtachar Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

भ्रष्टाचाराची कारणे – जेव्हा एखाद्याला अभावामुळे त्रास होत असेल तर त्याला भ्रष्टाचार करण्यास भाग पाडले जाते, असमानतेमुळे, आर्थिक, सामाजिक सन्मान, प्रतिष्ठा देखील स्वत: ला भ्रष्ट बनवते. मनुष्याला पटकन यशस्वी होयचे आहे, लोभ आणि अधिक पैसे कमवायचे आहे , कठोर कायद्याचा अभाव आहे.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय – जोपर्यंत या गुन्ह्यास कठोर शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत हा आजार संपूर्ण देशाला दीमक म्हणून खाईल. लोकांना स्वतःमध्ये प्रामाणिकपणा वाढवावा लागेल, चांगल्या आचरणाचे फायदे पुढच्या पिढीपर्यंत द्यावे लागतील.

भ्रष्टाचारविरोधी दिन – जगातील भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिवस 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 2003 रोजी, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय लाचलुचपत प्रतिबंधक दिन साजरा करण्यासाठी घोषित केला.

भ्रष्टाचार हा आपल्या नैतिक मूल्यांवर सर्वात मोठा हल्ला आहे. भ्रष्टाचाराशी निगडीत लोक आपल्या स्वार्थासाठी अंध आहेत आणि देशाचे नाव बदनाम करीत आहेत. म्हणूनच आपण भ्रष्टाचाराच्या विषारी सापाला मारणे फार महत्वाचे आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारलाही भ्रष्टाचार दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलावी लागतील.

Read Also – गाईवर मराठी निबंध – Best Essay On Cow In Marathi Language In 100,300 And 500 Words

भ्रष्टाचार निबंध मराठी 500 शब्दात | bhrashtachar essay in marathi in 500 words

भारत दिवसेंदिवस विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे . परंतु आपल्या समाजात आजही अनेक अतिशय गंभीर समस्या आहेत वाढती लोकसंख्या, बेरोजगारी यासोबतच भ्रष्टाचारही आपल्या देशासमोर गहन समस्या आहे . अगदी सरकारी शिपायापासून ते मोठमोठ्या राजकीय नेता पर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत. आज भारतात कोणतेही छोटे मोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार चहापाणी द्यावेच लागते. कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही. पण कळत नकळत आपण भ्रष्टाचाराला बढावा देत असतो .

आपल्या पदाचा अधिकाराचा गैरवापर घेऊन कमीत कमी मेहनत करून जास्तीत जास्त नफा करून घेणे हा भ्रष्टाचारा मागचा उद्देश असतो . पण सामान्य माणूस सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा लाच मागणारा माणूस . सामान्य माणूस लाच देतो म्हणून समोरचा माणूस लाच घेतो किती सहजपणे आपण नकळतच गुन्हा करत असतो .

किती वेळा बघतो आपण नाक्यावर पोलिसांनी पकडले की सर्वजण पोलिसाच्या हातात पन्नास-शंभर रुपये ठेवून पुढे निघून जातात सरकारी नोकरीच्या ठिकाणी तर लाखांची लाच दिली जाते. शाळेत कॉलेजात ऍडमिशन घेताना कोण कोणाला पैसे चारले जातात . एवढंच नव्हे तर देवाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण हजार पाचशे रुपये देऊन लवकर दर्शन घेतो. का ? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असतात आणि आपण मात्र पैशाच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो . पटत असेल का हे देवाला ? आपल्या मनाला तरी पटते का

भ्रष्टाचार निबंध मराठी -  Best Bhrashtachar Essay In Marathi In 100 , 300 And 500 Words

? किती वेळा लोक दुसऱ्यांना पैसे देऊन नोकरी किंवा उच्च पद मिळवतात. निवडणुकी मध्ये मतदारांना पैसे वाटून मत खरेदी केली जाते नंतर जेव्हा अशा लोकांना अधिकार प्राप्त होतात तेव्हा हे लोक अनेक पटींनी वाटलेले पैसे वसूल करतात. आपली प्रत्येक काम करताना आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात का हे आपल्याला आधी कळत नाही की जे लोक चांगले काम करून निवडून येण्याची मतदाराला पैसे निवडून येतात ते लोक निस्वार्थपणे समाजाची सेवा करणारे नाहीत तेव्हा आपण डोळ्यांवर पट्टी बांधून कोणालाही निवडून देतो आणि मग भारतातील सिस्टीम ला नाव ठेवत असतो .

पण आपली चूक कबूल करत नाही काही दिवसांपूर्वी मी एक लघुपट पाहिला होता त्यात एक भ्रष्ट अधिकारी असतो . जो पैसे घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये मुलांचे ऍडमिशन करून देत असतो त्यामुळे चांगली बुद्धिमत्ता असलेले मुले पुढे येऊ शकत नाही . याउलट कमकुवत बुद्धिमत्ता असलेली मुले पैशांच्या जोरावर डॉक्टरकि साठी प्रवेश मिळवतात . पुढे ही मुलं पैसे चारुन पेपर विकत घेऊन पास होतात काही काळानंतर त्या अधिकार्‍याच्या मुलाला भयंकर रोग होतो त्याचे ऑपरेशन करायचे असते. तो मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो तर तिथे त्याला पैसे देऊन डॉक्टर झालेला मुलगा आढळतो . हा काय आपल्या मुलाचे ऑपरेशन करणार? म्हणून तो दुसरीकडे जातो पण तिथे सुद्धा हीच परिस्थिती . तो हॉस्पिटल मध्ये जातो तिथे सर्वत्र पैशांच्या जोरावर बनलेले डॉक्टर असतात त्याला आपली चूक उमगते पण आता वेळ निघून गेलेली असते .

आपणा सर्वांना समजायला पाहिजे की भ्रष्टाचार करून प्रगती करण्यापेक्षा मेहनत करून प्रगती करायला पाहिजे . थोडा त्रास झाला तरी चालेल पण पैसे देऊन आपण आपले काम करून घेतली नाही. पाहिजेत कदाचित आपल्याला सर्वांना हे पटत असतं पण आपण कळत-नकळत भ्रष्टाचार करत जातो आणि जेव्हा दुसरे आपल्यापेक्षा जास्त पैसे देऊन आपल्याला पुढे जातात तेव्हा मात्र आपण त्यांच्या नावाने शंख करत बसतो.

कधी कधी तर असे होते की आपण पैसे देऊन काम करून देतो आणि आणि आपल्याला या वृत्तीमुळे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला सुद्धा सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लागते मग तो माणूस एखाद्या गरीबाचे सहज काम करतो नाही कारण त्याला नफा नसतो . किती त्रास होत असेल गरिबांना. पण आपण ह्या भ्रष्टाचाराचा विचारच नाही करत . काम पटकन झालं पाहिजे माझे . थोडे पैसे घ्या पण काम करा अशी आपली वृत्ती असते .

जोपर्यंत ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही . आज आपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर आजपासून सर्वांनी प्रतिज्ञा करा . मला किती त्रास पडला , कामाला किती वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही व इतरांना हि करून देणार नाही .

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण भ्रष्टाचार निबंध मराठी म्हणजेच bhrashtachar essay in marathi ह्या बद्दल १०० , ३०० आणि ५०० शब्दात आपण जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयावर निबंध हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषया सोबत ….

तुम्हाला जर मराठी मध्ये काही ब्लॉगिंग बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या

Leave a Comment